मित्रांचे अनाथाश्रम - भाग २ Durgesh Borse द्वारा नाटक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मित्रांचे अनाथाश्रम - भाग २

मी बेशुद्ध झालो, डोळे उघडले ते सुध्दा दवाखान्यात आणि समोर बाबा, आई, काकू आणि रजनी होते. डॉक्टर बाबांना काहीतरी सांगत होते.
डॉक्टर," रक्तपुरवठा करावा लागला, आमच्याकडे त्याचा साठा नव्हता म्हणून जो घेऊन आला त्यानेच रक्त दिले."
बाबा," कोण आहेत ते ?"
डॉक्टर," इतक्यात इथेच होता, नंतर कुठे गेला काय माहिती ?"
माझ्याकडे पाहून बाबा," आता बरं वाटतं ना ?"
मी मान हलवून होकार दाखवला. एक आठवडा मी दवाखान्यात होतो, पूर्ण बरा झालो तेव्हाच मला डॉक्टर ने घरी जाण्याची परवानगी दिली. मी जाण्यासाठी नुकताच बेडवरून उठलो, बॅग भारत होतो. काकू जवळच होत्या, बाबांना काम होते आणि बाकी पोरांची काळजी म्हणून आई घरीच होती. काकू बाहेर निघत होत्या तेव्हाच तिथे एक माझ्याच वयाचा एक मुलगा आला तो काकूंनी विचारू लागला,
"इथे एक मुलगा होता, तो कुठे गेला?"
काकू माझ्याकडे बघत होत्या आणि त्याच वेळी डॉक्टर आले.
डॉक्टर, "मॅडम, हाच संजयला घेऊन येणारा"
मी त्याच्याकडे कृतज्ञतेच्या भावनेने बोलायला सुरुवात केली, त्याच्याबरोबर गप्पा मारायला लागलो. तेव्हा मला त्याचे नाव समजले, तोच होता आपला अम्या म्हणजे अमर.
जाताना मी त्याला,"Thank You"
अमर,"मला गरज पडेल तेव्हा मदत कर"
तो तिथून गेला. मी घरी आल्यानंतर मी घरातून बाहेर पडलो नाही. लहान तिघांचा अभ्यास घेणे, बाबांना आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा त्याची शिकवण देणे हेच काम करत होतो. पण मला त्या काळातही मित्र नसण्याची खंत कायम जाणवायची, जे मित्र मला संकटात सोडून गेले त्यांच्यापेक्षा ते नसलेच तरी चालेल. एकटेपणा वाटत होता, तो एखादा चांगला मित्र नसल्याचा.
घरी असताना मी बाबांना सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बाबा कॉम्प्युटर वर काम करत होते. मी त्यांना मदतच करत होतो.
मी, "बाबा जरा बोलायचं होत"
बाबा, "बोल"
मी, "अपघाताच्या दिवशी मी प्यायलो होतो"
बाबा, "मला माहिती आहे"
मी, "तरीही मला का काहीच नाही बोलले ?"
बाबा, "मी नसल्यावर तुला समजेल, काही गोष्टी आपल्याला माहिती असून देखील काहीच माहिती नाही असा आव आणतो"
मी, "मी खुप वाईट पेपर लिहिले आहेत, मी नापास झालो तर पुन्हा खुप मेहनत करेल आणि पास होईल."
बाबा, "क्लासेस लावून देईल मी आणि पास झालास तर चांगल्या कॉलेज ला एडमिशन घेऊन देईल"
मी, "नाही बाबा, आता जे करेल ते माझ्या हिंमतीवर आणि पास झालो तर मिरिट नुसार ज्या कॉलेजला नंबर लागेल तिथे जाईल."
बाबा, "पण मी आहे ना ?"
मी, "तुम्ही आजपर्यंत खुप केलं माझ्यासाठी पण आजनंतर मी स्वतः धावणार, पडलो तर तुम्ही आहेतच उचलायला"
त्यानंतर बाबांनी मला घट्ट मिठी मारली आणि मी त्या मिठीत माझा भुतकाळ विसरलो. अपेक्षा नसतांनाही मी जेमतेम मार्कांनी पास झालो. बाबांना सांगितल्या प्रमाणे मी ज्या कॉलेज ला नंबर लागेल तिथे एडमिशन घेतले.
कॉलेजच्या पहिल्या दिवशी हृदय धडधड करत होते. कसे असेल कॉलेज मी तिथे जागा करू शकेल का ? तिथले नवीन मित्र आधीच्या मित्रांसारखे असले तर, मला मोठ्या घरचा म्हणून वाळीत तर नाही टाकणार ना ?
अश्या विचारातच मी कॉलेजच्या मुख्य दरवाज्यावर येऊन पोहचलो. मुद्दाम बाबांना नाही घेऊन आलो, नाहीतर वणवा पेटायचा की पाटलांचा मुलगा साध्या कॉलेजात शिकतो. नोटिसबोर्ड जवळ जाऊन मी माझं नाव आणि खोली शोधत होतो. मला मिळालेले मार्क बघता मी शेवटून नाव शोधायला सुरुवात केली. एकदाचं माझं नाव मिळालं पण अजून वेळ होता म्हणून मी बाकीचे नाव वाचत उभा होतो. विज्ञान, वाणिज्य आणि कला सर्वच याद्या मी वरून खालून वाचून टाकल्या.
अचानक माझ्या खांद्यावर कुणीतरी हाथ ठेवला, मी जरा दचकलो. मागे वळून पाहिले तर तो अम्या होता म्हणजे आपला अमर. आज मी त्यांना जवळून आणि निरखून पाहिले. माझ्यापेक्षा किंचितसा उंच, सावळा आणि कुरळे केस होते.
मी, "या कॉलेज ला आहेस तु ?"
अमर, " पण हाच प्रश्न मी विचारायला पाहिजे "
मी, " हो पण तु कोणत्या ब्रांच ला आहे ?"
मला कुणीतरी ओळखीचे दिसले म्हणून मला खुप आनंद झाला. त्याच आनंदात अमर सुध्दा माझ्यासोबत पाहिजे असे मला वाटले आणि त्याचमुळे मी त्याला ब्रांच विचारली.
अमर, "मी कॉमर्स, आणि तु ?"
मी, "आर्ट्स"
अमर, "गंमत काय करतो, नसेल सांगायचं तर तसे सांग ना ?"
असाच मी त्याला विषयांतर म्हणून तुझा वर्ग कुठे आहे असे विचारत पुढे घेऊन गेलो. आता दोघंही मिळून आमचे वर्ग शोधू लागलो. त्याने मला घरच्यांबद्दल विचारले की घरी कोण कोण असतं तसच मी पण विचारले,
"तुझ्या घरी कोण असतं?"
तितक्यात तो थांबला आणि बोलला,
"तुझा वर्ग आला"
आणि इच्छा नसतांना सुध्दा मला अलविदा करून जावे लागले. तो शेवटचा अलविदा नव्हताच खरा, ती सुरुवात होती आमच्या मैत्रीची. त्या दिवसानंतर आम्ही बरोबर ये जा करत होतो. कॉलेजचे दिवस कसे जात होते ते अमरच्या मैत्रीत कळत नव्हते, मी सुध्दा त्या प्रवाहात स्वतःला सोडून दिले होते.
एके दिवशी कॉलेज संपल्यावर मी मोटरसायकल घ्यायला कॉलेज पार्किंगला गेलो. अम्याला बाहेरच उभा करून मी एकटाच आत गेलो. गाडी बाहेर काढून येत असतानाच कुणीतरी गाडीला मागून धडक मारली.

क्रमशः