Mitranche Anathashram - 11 books and stories free download online pdf in Marathi

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ११


विवेक ने बाटली फिरवली.
विवेक समोर बाटली येऊन थांबली, तो उभा राहिला आणि सर्वांवर एक नजर फिरवून बोलला, "विचारा काय विचारायचं ते ?"
सुरेश काका, "याला मी विचारणार"
विवेक, "विचारा"
सुरेश काका, "संजयला संध्या आवडते तशी तुझी आवडती स्त्री कोण आहे ?"
विवेक हसून, "आई"
मी, "ओ साहेब, स्वामी विवेकानंद नको बनू, खर काय ते सांग"
विवेक, "काकांनी प्रश्नच तसा विचारला"
काका, "मग दुसरी सांग ?"
विवेक हसत खाली बसतांना बोलला,
"एकच प्रश्न विचारायची अट होती"
विवेक ने पुन्हा बाटली फिरवली, यावेळी संजय वर वेळ आली.
तो उभा झाला आणि म्हणाला, "कोण विचारणार"
आम्या, "मी विचारतो"
विवेक, "काहीतरी माहिती मिळेल असं विचार"
आम्या, "संध्यासाठी काय सरप्राइज आहे ?"
संजय, "अरे देवा, मला वाटल काय अवघड विचारतो की काय, तिची आई आणि मामा येणार आहेत उद्या. रजनी साठी एक मुलगा पाहिला आहे त्याचे पण आई बाबा येणार"
विवेक, "सर्वाची भेट होऊन जाईल म्हणजे... आणि संध्या च्या आईला पण भेटणं होईल."
संजय, "अरे ते तर संध्याच सरप्राइज आहे तुझ्यासाठी पण वेगळं आहे काहीतरी"
आम्या, "माझ्यासाठी?"
संजय, "तुझ्यासाठी अजून काय पाहिजे, किती नवीन लोक आश्रमाच्या कार्यक्रमाला येणार आणि तुला वहिनी भेटते आहे त्याच काहीच नाही का ?"
मी, "ठीक आहे म्हणजे मी पण वाहिनी भेटणार याच समाधान मानायच का ?"
संजय, "नाही रे, तुझ्यासाठी पण आहे काहीतरी"
सर्व सुरू असताना काका हसत होते.
मध्येच ते बोलले, "मला नको काही"
संजय, "तुम्हाला देण्यासारखं आमच्याकडे काहीच नाही, उलट तुम्हीच आम्या सारखा छान मित्र दिला"
यावर सर्वजण मोठ्याने हसायला लागले.
संजय ने बाटली फिरवली, आत्ता माझ्यावर वेळ आली होती. मी उभा राहिलो, मला माहिती होत कोण विचारणार मला प्रश्न,
विवेक, "याला मी विचारणार"
मी, "विचार"
विवेक, "तुला स्वातीबद्दल कुणी सांगितलं?"
संजय, "त्याच उत्तर मी देतो उद्या"
मी, "मी सांगतो ना.."
संजय, "अरे समिऱ्या मी सांगतो ना"
विवेक, "ठीक आहे"
मी बाटली घेतली आणि फिरवली, गोलगोल फिरून शेवटी बाटली येऊन काकांवर थांबली.
काकांना प्रश्न विचारण्यासाठी आम्या उभा झाला,
आम्या, "मी विचारणार प्रश्न"
काका आनंदाने, "विचार"
आम्या, "माझ्या आईचं म्हणजे तुमच्या बायकोचं नाव काय आहे ?"
आनंदात असणारे सर्व चेहरे अचानक गंभीर झाले आणि आम्या कडे बघायला लागले.
काका, "काहीही काय प्रश्न विचारतो तु"
मला धक्काच बसला, कारण हा खेळ विवेक ने सुरू केला असला तरी त्यामागची कल्पना आम्या ची होती आणि आत्ता कुठे त्याच्या मनात काय सुरु होत ते समजलं.
आम्या, "आज शेवट करा या प्रश्नाचा, तुम्हाला माझी शपथ आहे"
काका खाली मान करत, "माझं लग्न नाही झालं"
सर्वजण आश्चर्याने थक्क झाले, कुणीच काही बोलणार नाही असा प्रसंग घडला होता.
संजय ने बोलण्याचे धाडस केले, "काय बोलता काका तुम्ही"
आम्या, "हो, खर बोलत आहेत ते, मी त्यांचा मुलगा नाही. अनाथ आश्रमात राहतो म्हणजे अनाथ असणार ना ?"
काका, "तुला कसं माहिती, कोण बोललं हे सर्व ?"
आम्या, "हेच काय अजून खुप काही माहिती आहे"
काका, "अजून काय माहिती आहे"
आम्या, "मी काय सांगणार आता खरं काय आहे ते तुम्हीच बोला"
या घडत असलेल्या प्रसंगात विवेक, संजय आणि मी फक्त बघ्याची भुमिका घेत होतो. जे काही समोर घडत होत त्यात आम्ही काही बोलण निरर्थक होत.
काका, "तुला कसं माहिती पडलं हे सर्व आणि गैरसमज करून घेऊ नको. मला समजु तर दे कुणी काय सांगितलं आहे, म्हणजे खर काय, खोटं काय ते तुला सांगता येईल."

आम्या बोलत होता,
ज्या दिवशी माझा अपघात झाला. त्या संध्याकाळी मी आश्रमात आलो, तेव्हा काही लोक तुमच्याशी भांडत होते.
मध्येच एक माणूस बोलला, "हमारे कौम का लडका है वो हमे लौटा दो."
तुम्ही, "आता तो माझा मुलगा आहे. या आश्रमाचा मुलगा आहे."
दुसरा माणूस, "उसका अंजाम बुरा होता. देख लेना"
तुम्ही काहीतरी बोलून त्यांना हाकलून लावले. मी सर्व लपून ऐकत होतो. ते सर्व गेल्यावर मी तुमच्याकडे आलो तर तुम्ही मला पाहून खुप घाबरले होते.
मी विचारलं, "कोन होते ते?"
तुम्ही, "मुलाला दत्तक घेण्यासाठी आले होते"
त्यानंतर मी पुढे काहीच बोललो नाही. त्यांच्या बोलण्यावरून आणि तुमच्या घाबरलेल्या चेहऱ्यावरून मला हेच वाटलं की ते ज्या मुलाबद्दल बोलत होते तो मी आहे.

विवेक, "म्हणून हा खेळ खेळायचा होता तुला"
मी, "मग सरळ सरळ विचारायचं ना ?"
आम्या, "यांनी सांगितलं असतं का ?"
मी, "नाही"
संजय, "विवेक, समीर तुम्ही दोघं शांत रहा. दोघं बाप लेकाच काय असेल ते त्यांना मिटवू दे"
त्यानंतर शांतता पसरली होती. काही क्षणांसाठी कुणी काहीच बोललं नाही. एकदम आम्या बोलला, "खर काय आहे ते सांगा बाबा, आज विषय बंद करू कायमचा, काय त्रास होईल मला किंवा तुम्हाला तो होऊन जाऊ द्या. मला नको असे प्रश्न आयुष्यात"
सुरेशकाका, "ठीक आहे सांगतो, पण पूर्ण ऐकून घे, काय घडल ते नीट समजून घे."

सुरेश काकांनी सांगायला सुरुवात केली,
पंचवीस वर्षापूर्वी,

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED