मित्रांचे अनाथाश्रम - भाग 3 Durgesh Borse द्वारा नाटक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मित्रांचे अनाथाश्रम - भाग 3

कुणीतरी धडक मारली, मी मागे वळून बघणार त्याच्या आधीच अम्या धावत आला आणि बोलला, " ये गाडी नाही येत का, फुटले काय तुझे"
मी, "गप्प रे अम्या"
पण तो एकदा सांगून कुठे ऐकणार होता, पुन्हा बोलला, " हे बघ गाडी तोडून मोडून एक कर, पण आपल्या दोस्ताला काही झाले ना तर तुझे दातच पडतो, आंधळी". तिने लाल रंगाचा स्कार्फ बांधला होता आणि काळया रंगाचा गॉगल त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. शरीराने बारीक अशी मुलगी आमच्या दोघांकडे पहात होती पण अम्याची कॅसेट सुरूच होती. त्याला कसेतरी गप्प केले आणि स्वतःहून मी माफी मागितली ते सुध्दा ती काही बोलेल याची जरा ही अपेक्षा न करता.
तिथून निघून पुढे घरी जाण्याचा रस्ता पकडला. दहावीला मला एकदा झटका बसला होता म्हणुन मी पुढे अभ्यासावर लक्ष दिले. जेमतेम पास झालेलो मी आता वर्गात टॉपर च्या रांगेत होतो. स्पर्धा तर खुप होती पण मी कुणाबरोबर स्पर्धा केली नाही. हो, होते चार पाच मुलं जे खुप अभ्यास करायचे माझ्यापेक्षाही जास्त, तरीही मी त्यांच्याबरोबर मैत्री केली नाही. माझ्यासाठी अम्या खुप होता. तसे तर मी दररोज आम्याला एका चौकात सोडुन मग घरी जायचो. त्या दिवशी माझ्या डोक्यात काय आले काय माहिती मी त्याला त्याच्या घरी सोडण्याचा निर्णय घेतला. ज्या वळणावर येऊन आम्या जातो त्या रस्त्याला मी माझी गाडी वळवली. मागे बसलेला आम्याला ते समजले होते म्हणुन तो बोलला, "तुझा रस्ता मागे गेला, इकडे कुठे"
मी, "हो, मला माहिती आहे पण आज तुला घरी सोडतो"
आम्याचा आवाज बदलला, "नको, नको, तुला का त्रास"
मी, "मग मला त्या रात्री हॉस्पिटल ला घेऊन जाण्याचे कष्ट का घेतले आपण"
आम्या, "म्हणजे तु आता मागचे काढणार का ?"
मी, "आता पुढचा रस्ता सांग, मला माहिती नाही"
आणि दोघंही हसायला लागलो. आम्या मला सांगत होता तसे तसे मी जात होतो. शेवटी गाडी सरपोतदार अनाथाश्रमासमोर थांबली.
मी, "तु इथे राहतो ?"
मला खुप वाईट वाटले की अमर सारखा मुलगा अनाथाश्रामात राहतो म्हणून मी सहानुभूतीने त्याला बोललो, "स्वतःला एकटा नको समजु, मी आहे तुझ्यासोबत"
आम्या, "हो ना, पण तु समजतो तसे अजिबात नाही ये रे"
मी, "म्हणजे ?"
आम्या, "सरपोतदार अनाथाश्रम माझ्या बाबाचं आहे, मी अनाथ नाही ये म्हणुन हे जे तोंड आहे त्यावर जरा हसू येऊ दे"
मी बोलणार तितक्यात मागुन एक आवाज आला, "अमरदादा" असा, एक मुलगा आमच्या दिशेने येत होता आणि आम्या कडे पाहून बोलला,
"दादा, चॉकलेट दे माझे"
आम्या, "अरे देवा, विसरलो रे मी, हा बघ संजय दादा याने कुठे थांबुच दिले नाही म्हणुन राहून गेले."
त्या लहान मुलाचा चेहरा पार उतरला, म्हणुन त्याला बोललो, "माझ्यामुळे झाले ना, तर मी घेऊन देईल चॉकलेट"
त्यानंतर आम्ही दोघे खुप फिरलो आणि आश्रमात सर्वांसाठी खाऊ घेऊन मी त्या मुलाला सोडले आणि घरी गेलो. त्या एका घटनेने मला खुप आनंद झाला कारण आम्या मला बोलला की तो अनाथ आहे. त्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर आलेले हसू पाहून माझा तो दिवस काहीतरी कामात आला. माझ्या अपघातानंतर मी इतका खुश कधीच नव्हतो, मला पाहून घरचे विचार करायला लागले. मी घडलेला प्रकार सविस्तर घरी सांगितला. आत्तापर्यंत घरच्यांना अमर कोण हेच माहिती नव्हते. काकूंनी त्याबद्दल विचारले, मी त्यांना हॉस्पिटल मध्ये भेटला त्या दिवसाची आठवण करून दिली. त्यानंतर काकूंनी सर्व घटना बाकीच्यांना सांगितले.
छोटी आई, "त्याला घरी घेऊन ये एकदा, माझ्या लाडक्या पोराचे जीव त्याने वाचवले."
रजनी लगेच पाय आपटत आली म्हणाली, "सर्व दादाचे लाड करतात, माझे कुणी नाही"
मला पण कायम तोच प्रश्न पडतो. मुळात मुलगा मुलगी हा भेदभाव नाही ये आमच्या घरात, तरीही कौतुक मी काहीही केलं त्याचच. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे कॉलेज ला गेलो. आम्या ज्या जागेवर उभा असतो नोटीसबोर्ड समोर तिथे नव्हता. मला उशीर होत होता म्हणून मी लेक्चर ला गेलो, त्यानंतर जेव्हा मी पुन्हा आलो तेव्हा तो तिथेच उभा होता.
मी, "काय झालं आज कॉलेजला दांडी ?"
आम्या, "अरे आमच्या आश्रमाचा आज सतरावा वाढदिवस त्याची तयारी करत होतो म्हणून नाही येता आले, आता तुझ्यासाठी आलो, चल."
मी, "मी नाही येत जा, तुला एकट्यानेच सर्व तयारी करायची होती का ? मी मदत केली असती तर तुझे काम बिघडले असते ना रे?"
आम्या, "सॉरी, खुप मोठी चुक झाली आता जीव घेतो का माझा, चल उशीर होतो आहे."
मी, "हो येतो, तु थांब पार्किंग च्या बाहेर मी गाडी घेऊन येतो"
मी पार्किंग ला जाऊन गाडी बाहेर घेत होतो तितक्यात माझ्या गाडीला मागुन कुणीतरी धडक मारली.
आम्या, "ये फुटले काय तुझे आंधळी, तुला दुसरे नाही का कुणी भेटत"
मी मागे न बघताच अंदाज बांधला कोण असणार, फक्त खरंच माझा अंदाज बरोबर आहे हे बघण्यासाठी मी मान वळवली. पुन्हा तीच मुलगी माझ्या गाडीला येऊन धडकली.

क्रमशः