जोडी तुझी माझी - भाग 42 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 42



थोडावेळणी गौरवीच काही काम असत म्हणून ती विवेकच्या कॅबिनमध्ये येते.. तो ही काम करतच असतो..

गौरवी - मी येऊ का ??

विवेक - हो ये ना.. आणि तू नाही विचारलं तरी चालेल..

गौरवी - ती आत येत.. थोडी अडचण होती विवेक, हा एक पॉईंट मला क्लिअर होत नाहीये, सृष्टीकडे गेले असते पण ती आज जर जास्त कामात आहे आणि सकाळपासून थोडी अपसेट पण.. म्हणून मग तुझ्याकडे आले..

विवेक - ये ना बस..

ती विवेकच्या बाजूच्या खुर्चीत बसते.. आणि त्याच्या कडून पॉईंट क्लिअर करून घेते. काम झाल्यावर ती निघून जात असते.. विवेक तिला बघतच असतो ती काही बोलेल अस त्याला वाटत पण ती उठून जात असते.. थोडं पुढे जाऊन ती परत मागे फिरते आणि त्याच्याकडे येते..

गौरवी - आणखी एक बोलायचं होतं, बोलू का??

विवेक - बोल ना...

गौरवी - मला माफ कर विवेक, मी उगाच गैरसमज करून घेतला तुझ्याबद्दल आणि तुला काही बाही बोलले..

विवेक - ठीक आहे गौरवी तुझा गैरसमज दूर झाला हे महत्त्वाचं..

गौरवी - सृष्टी ला आज तू बराच रागात बोलला का ? ती रडतच बाहेर आली..

विवेक - अ.. हो ग.. जरा जास्तच चिडलो, पण तिला कशाला हव्यात नसत्या चौकश्या सांग बरं... माझ्या आयुष्यात मी बघेल ना, तीला मी एवढाच म्हंटल माझ्या वयक्तिक जीवनात डोकावू नको , कामाशी काम ठेव.. आणि काय ग ती तुलाच का जास्त काम देते?? मी तीला त्यावरून पण बोललो.. की सगळ्यांना सारख काम दे म्हणून..

गौरवी - ठीक आहे विवेक पण थोडं शांततेने घे, मला वाटत तिला तू आवडतोय, आणि तुझं माझ्या कडे असलेलं लक्ष बघून तिला वाईट वाटतं असावं.. तर आपण तिला विश्वासात घेऊन सांगुयात म्हणजे ती अस वागणार नाही..

विवेक - पण तिला कशाला सांगायचंय ? ती कोण लागून गेली अशी..

गौरवी - तुझी एम्प्लॉयी विवेक, तुला सगळ्यांची मन जपली पाहिजेत तू बॉस आहेस ना.. अस कुणाला उतरून बोलू नये.. शोभत का ते?? आणि आपलं लग्न झालंय मग यात लपवण्यासारखं काय आहे.. फक्त माझी एक इच्छा आहे आपले वाद कुणाला कळू नयेत.. आपण अस करूयात आज तिला रात्री जेवायला घेऊन जाऊ .. तिथेच तू तिला सॉरी पण बोल सकाळसाठी आणि मग दोघे मिळून तिला नीट सगळं सांगूंयात.. चालेल का??

विवेक - हे तू बोलतेय गौरवी.. खरच.. तुला सांगू किती तरी दिवसांपासून माझ्या मनात आहे असं पण बोलू नाही शकलो.. चालेल आपण जाऊयात..

गौरवी - ठीक आहे तस विचार तिला मग.. येते मी..

विवेक - एक मिनिट, थांब ना तू पण, मी बोलावतो तिला इकडेच.. आपण सोबतच बोलूयात..

गौरवी - नको विवेक तू बोल मी नको

विवेक - अग जर तिला नाही समजावू शकलो मी तर.. तू असायला हवी ना थांब तू.. आणि तो लगेच फोन करतो आणि तिला बोलावतो..

सृष्टी लगेच येते पण आता ती विचारून आत येते आणि गौरावीला तिथे बघूनथोडी घाबरते थोडी चिडते.. तिला वाटत गौरवीने आणखी काही सांगितलं असेल विवेकला माझ्याबद्दल..

सृष्टी - बोल विवेक.. तू बोलवलं मला??

विवेक - अ .. हो.. आज संध्याकाळी काय करतेय??

सृष्टी - काही खास नाही, काही काम होतं??

विवेक - हो म्हणजे, आज रात्री आपण जेवायला जायचा का बाहेर?? तू, गौरवी आणि मी..

सृष्टी आधी खुश होते पण गौरवीच नाव ऐकून मात्र नाराज होते..

सृष्टी - अ.. नको तुम्ही दोघेच जा.. मला घरी थोडं लवकर जायचंय..

गौरवी - प्लीज सृष्टी चल ना.. तू हवी आहेस ग म्हणूनच जेवायचं प्लॅन केलाय.. नाही तर आम्ही दोघे नसतोच गेलो..

सृष्टी - मी आले असते पण ऑफिस मध्ये पण काम आहे ना.. सो सॉरी..

विवेक - ठीक हे ते काम उद्या नाही झालं तरी चालेल, गौरवी इतकं इनसिस्ट करतेय तर चल ना...

सृष्टी - आज काही खास आहे का?? ठीक आहे तुम्ही दोघे बोलताहेत तर येते मी... पण केव्हा जायचंय??

विवेक - संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर..

सृष्टी - ओके.

गौरवी आणि सृष्टी दोघीही बाहेर येतात..

सृष्टी - सांग ना काय आहे आज ?? वाढदिवस तर नाहीय विवेकचा मला माहिती आहे पण मग अस काय आहे?? आणि तू आता या प्रोजेक्ट पासून आमच्या टीम मध्ये आली.. या आधी त्यानी कधीच कुणाला असा वेळ दिला नाही आणि कधी कुणाशी असा बोलला देखील नाही.. पण इतक्या लवकर तो तुझ्यासोबत जेवायला तयार झाला?? आणि मला पण विचारलं?? एक तर तुला किंवा मला अस विचारयच तर दोघींना सोबतच??

गौरवी - (तिला थांबवत) होल्ड ऑन सृष्टी सगळे प्रश्न इथेच बोलायचे का काही संध्याकाळ साठी राहू दे.. आणि तू त्यालाच विचार सांगेल तो..

सृष्टी - नको मी नाही विचारणार, सकाळी विचारायचं प्रयत्न केला तर खूप चिडला माझ्यावर..

गौरवी - अग सकाळी तो आधीच थोडा वैतागला होता ना, आणि मग तुझ्यावर राग निघाला असेल , आता नाही चिढणार..

सृष्टी - तुला कस माहीत?? तू त्याला इतकं कस ओळखते?? आणि सकाळी तू मी तुला काम जास्त देते म्हणून कम्प्लेइंट केली का माझी??

गौरवी - नाही मी नाही केली.. ते काल मी जरा जास्त वेळ बसली होती ना काम होत म्हणून तो ही बसला होता त्याच्या कॅबिनमध्ये बराच वेळ म्हणून त्याला वाटलं असेल तसं..

सृष्टी - तो का थांबला होता इतका वेळ??

गौरवी - मला काय माहिती?? काम असेल त्याचं.. बर चल ना काम आहे आता तुला आणि मला पण , आपण संध्याकाळीच बोलूयात ना आता सगळं..

सृष्टी - ओके .. आणि सॉरी गौरवी मला वाटलं तूच कम्प्लेइंट केली म्हणून मी चिडली होती तुझ्यावर.. आणि अग काम तुला देते कारण तुझं काम परफेक्ट असतं म्हणून.. बाकीच्यांच्या कामात खूप चूका असतात ग..

ती तिला थोडं समजवण्याचा प्रयत्न करते म्हणजे विवेक तिच्यावर नाराज राहणार नाही..

गौरवी -इट्स ओके सृष्टी, नो प्रॉब्लेम.. चल आता कामाला लागूंयात..

सृष्टी - हा हा चल..
----

क्रमशः