जोडी तुझी माझी - भाग 44 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 44

दोघेही हॉटेल मध्ये बाहेरच्या लॉन मध्ये असलेल्या बाकड्यावर जाऊन बसतात..

विवेक - कस वाटतंय तुला ऑफिस आणि काम? आधीपेक्षा काही वेगळं?? कसला ताण वगैरे आहे का??

गौरवी - नाही रे कसला ताण, सगळं छान आहे.. सृष्टी थोडी विचत्र वागायची पण आता तीचा पण गैरसमज आज दूर झाला..

विवेक - हम्म.. 😊

पुन्हा दोघांमध्ये शांतता काय बोलावे काळात नाही..

विवेक - गौरवी तू रागावणार नसशील तर एक विचारू का??

गौरवी - तू काय विचारतो त्यावर निर्भर करते रागवायच की नाही.. बर विचार..

विवेक - गौरवी अजूनही तुझ्या मनात माझ्याबद्दल राग तसाच आहे का ग?? तू मला माफ करू शकशील ना ग?? तुला मी हवा तेवढा वेळ देईल बोललो तर होतो आणि मला घाई नाही आहे काही.. तू तुझा वेळ घे, मला फक्त एवढं सांगायचं होत की.. की ...

गौरवी - बोल विवेक..

विवेक - की मी आजही पच्छतापाच्या आगेत फडफडतोय, वरून शांत दिसत आलो तरी मनात खूप बेचैन असतो ग मी नेहमी... गेल्या 6 महिन्यांत असा एकही क्षण नसेल ज्यात तू नव्हती.. मी रोज खूप आतुरतेने तुझी वाट बघतो ग.. माझं मन मला नेहमी प्रश्न विचारत असतं, तू खूप मोठा गुन्हा केलाय विवेक ती तुला माफ करू शकेल का?? तिच्या जागी तू असता तर तू काय केलं असत.. पण नंतर मीच मला समजावतो, ती गौरवी आहे माझ्यासारखी मूर्ख आणि दगाबाज नाही तिने अस कधी केलच नसतं जे तू केलय.. मग आणखी वाईट वाटतं.. अचानक डोळेे गळायला लागतात.. आणि तुझ्या आठवणीत तळमळत राहतो.. किती दिवस असणार आहे ग ही शिक्षा ..

विवेक त्याच्याही नकळत हळवा होऊन रडत असतो.. गौरवी त्याच्याकडे बघते तिला वाईट वाटते..

गौरवी - राग असला असता ना विवेक तर मी कधीच तुझी बाजू मांडली नसती कुणापुढे.. मी प्रयत्न करतेय विवेक.. पण मी जेव्हा पण विचार करते तुला माफ करायचा माझ्या समोर माझं सगळं उध्वस्त झालेलं आयुष्य अजूनही जसेच्या तसे उभं राहतं.. आणि मग मात्र तुला माफ करायची भावना निघून जाते.. विवेक लग्नाच्या आधी मी आपल्या लग्नाची खूप सारी स्वप्न रंगवली होती रे.. अगदी पहिल्या दिवसापासून, पण त्यातील एकही स्वप्न सत्यात नाही आलं, विवेक तुझं विचित्र वागणं माझं एकेक स्वप्न तोडत पुढे जात होतं.. प्रत्येक वेळी तू माझा अपेक्षा भंग केलास, त्या वेळी मी किती तडफडली याची तुला कल्पनाही नसेल विवेक, तुझं माझ्यावर नसलेलं प्रेम मिळवण्याचा मी खूप खूप प्रयत्न केला बरेच व्रत वैकल्यही केलेत, त्याचाच फळ की काय मला तुझं हे सत्य कळलं.. आणि सगळंच सम्पल रे... तरीही तुला तुझ्या चूकीची जाणीव आहे आणि त्याचा तुला मनःस्ताप होतोय म्हणून मी आपल्या नात्याला आणखी एकदा संधी द्यायचं ठरवलं.. पण सहज सगळं आधिसरखं शक्य नाही होणार.. माझ्यापेक्षा कदाचित कमीच आहे तुझी शिक्षा.. तू जे वागला विवेक त्यात मी बरच काही गमावलाय रे, ते परत मिळेपर्यंत मला तुला माफ करता नाही येणार.. आणि अस वरवर तुला माफ करून काय उपयोग, तू जेव्हा माझ्या जवळ यायचा प्रयत्न करशील तेव्हा मला पुन्हा सगळं आठवेल आणि मी मनानी तुझ्यासोबत नसणार याला काय अर्थ आहे ना!!.. जेव्हा मला तुझ्या जवळ येन्याने त्या जुन्या आठवणी येणार नाहीत तेव्हा मी येईल तुझ्याकडे.. विवेक वेळ दे रे थोडा, वेळ हे सर्व गोष्टींवर, सर्व दुःखांवर रामबाण इलाज आहे..

विवेक - खरच ग मी आधी कधीच हा विचारही नव्हता केला की तुही तुझ्या डोळ्यात स्वप्न घेऊन आली असशील आणि मी त्यांची अशी माती केली.. मी खरच खूप मोठा गुन्हेगार आहे ग तुझा... मला माफ कर गौरवी.. जेव्हा पण तुला जमेल..

गौरवी - ठीक आहे विवेक पुन्हा पुन्हा नको तेच.. बर ते जाऊ दे.. तुला संदीप काही बोलला का??

विवेक - संदीप ??? नाहीतर, कशाबद्दल???

गौरवी - तो आणि रुपाली बद्दल..

विवेक - काssssय?? संदीप आणि रुपाली ??? हे कधी झालं??

गौरवी - माहिती नाही मला पण.. पण एकदिवस रुपलीचा फोन आला होता ..असाच... तेव्हा माझ्याशी बोलता बोलता तिला संदीपचा कॉल येत होता तर ती मला घाईतच म्हंटली गौरवी चल मी नंतर बोलते मला संदीप कॉल करतोय.. मी विचारलं तरी पण संदीप तुला का कॉल करतोय??? तर मला म्हंटली अ सीक्रेट आणि मोठी स्टोरी आहे मी नंतर सांगेल आता ठेवते बाय.. घाईतच काही न सांगता फोन कट केला तिने.. मला वाटलं तुला कदाचित संदीप काही बोलला असेल म्हणून विचारलं..

विवेक - बापरे, आता तर भेटलो होतो मी आणि संदीप मागच्या आठवड्यात पण त्याने तर शब्द पण नाही काढला .. छुपेरुस्तुम , थांब जरा आता भेटला की बघतोच त्याला.. आणि हो तुला काही कळलं तर मला सांगशील हं...

दोघांचाही विषय बदलून दोघेही हसत हसत घरी गेले.. आजही विवेक तिच्या मागे होता पण आज तिला माहिती होतं.. घरी गेल्यावर "घरात ये" म्हणून बोलली ती पण त्याने नकार दिला "नंतर कधी" म्हणून बाय करून निघून गेला..

-------------------------------------------------------

क्रमशः