जोडी तुझी माझी - भाग 48 - अंतिम भाग Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 48 - अंतिम भाग

हळदीच्या कार्यक्रमाला थोडा वेळ होता.. गेल्या गेल्या त्यांना नाश्ता मिळाला.. तो खाऊन दोघेही कामाला लागले.. हळद लागण्याची वेळ झाली आणि पाहिले गौरवी ने संदीपला हळद लावली आणि मागून सगळ्यांनी.. नंतर सगळ्यांनी धम्माल हळद खेळली.. त्यात गौरवी आणि विवेकनेही हळदीने एकमेकांना पिवळ केलं होतं.. मनसोक्त हळद खेळून झाली आणि तिथला कार्यक्रम आवरला नंतर ती रुपाली कडे आली अर्थातच विवेकने सोडलं, रुपलीला भेटून तो निघाला.. रुपलीची पण हळद आटोपली.. मग गौरवी ने विवेकला फोन केला तर विवेक आधीपासूनच बाहेर येऊन तिच्या फोनची वाट बघत होता.. गौरवी रुपालीकडे फ्रेश झाली होती हळदीचे कपडे काढून दुसरा पल्लझो कुर्ती आणि जॅकेटचा भारी ड्रेस घातला.. त्यातही ती खूप सुंदर दिसत होती आणि विवेक तिच्याकडे बघतच राहिला.. त्याच्या पुढे जाऊन हातातल्या ब्रेसेलेटचा आवाज करत तिने त्याला भानावर आणले..

विवेक - अरे वाह खूप सुंदर दिसतेय.. ये चल बस.. गाडीचा दरवाजा उघडत तो बोलला.. तीही बसली..

सूर्य मावळला होता, 6:30 - 7 वाजले असतील कदाचित..

गौरवी - घरी सोडतोय ना विवेक की??

विवेक - की?? अग तुला सांगितलं ना सकाळी surprise आहे.. तू चल फक्त..

गौरवी- ठीक आहे चल..

विवेकला विरोध न करता तीही खुप उत्सुकतेने त्याच्या बरोबर जायला तयार झाली आज.. दोघेही खूप खुश होते.. रुपाली बोलली तस या लग्नामुळे त्या दोघांबरोबर हे दोघेही एकत्र येत होते..

विवेकने एका शहराबाहेरील टेकडीवर छान रोमँटिक डिनर चा प्लॅन केलेला असतो.. खूप सुंदर lighting आणि डेकोरेशन केलं असत, मधात एक टेबल आणि खुर्च्या आणि टेबलवर काही मेणबत्या ठेवलेल्या असतात.. बाजूला एक टेंट टाकलेला असतो.. आणि या सगळ्या मुळे ती टेकडी खूपच उठून दिसत असते..

दोघेही तिथे येतात आणि ते सुंदर मनमोहक दृष्य बघून गौरवी एकदम भारावून जाते.. विवेक हळूच तिच्या मागून जाऊन तिच्या कानाजवळ बोलतो..

विवेक - कसं वाटलं??

गौरवी - (त्याच्या अस जवळ येण्याने गौरावीला शहारा येतो, त्याच्यापासून थोडं लांब जात) खूप छान.. खूप खूप आवडलं मला हे सगळं..

विवेक - तुझ्याच साठी केलंय माझी राणी...

गौरवी पुन्हा लाजेने गोरीमोरी होते..

दोघेही थोडं पुढे चालत जातात आणि टेकडीवरच्या एक मोठ्या दगडावर बसतात.. काय बोलावे दोघांनाही सुचत नसतं..

विवेक - आजचा डिनर डेट चा प्लॅन आवडला ना??

गौरवी - खूपच अनपेक्षित होत हे.. डिनर डेट वगैरे ते ही इतक्या सुंदर जागी.. खूप आवडलं.. पण तू डेट का प्लॅन केली??

विवेक - तुझ्या सहवासासाठी.. इतके दिवस किती लांब होतो आपण.. आज तुझ्याशी बोलायचं होत जरा.. म्हणून..

गौरवी - अच्छा , काय बोलायचं??

विवेक - गौरवी, संगीत कार्यक्रमात ल्या डान्स नंतर मला तुझ्या डोळ्यातले भाव बदलल्या सारखे वाटलेत.. खूप अधीर झालो आहे ग मी.. तू काही बोलशील हे ऐकण्यासाठी.. मला अस का वाटतंय माझी परीक्षा आणि प्रतीक्षा आता संपली..

गौरवी - म्हणजे??

विवेक - तू मला माफ केलंस का गौरवी?? तू येशील ना आता माझ्याकडे परत?? खूप उतावीळ झालोय ग मी हे ऐकायला.. सांग ना ग..

गौरवी - हे जाणून घ्यायसाठी एवढी उठाठेव कशाला केली?? आता माझं उत्तर नकारात्मक असलं तर गेलं ना हे सगळं वाया..!!

विवेक - नाही तस काही नाही.. तू तुझं सांग, मला सगळं मंजूर असेल.. तुझ्या सकारात्मक उत्तराची आशा आहे पण तू तयार नसशील तर काहीच हरकत नाही.. माझी काहीच बळजबरी नाहीय तुझ्यावर.. आणि हे सगळं तर मी असच तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी केलं होतं.. तो मला मिळाला.. काहीच वाया नाही गेलं.. तुझं जे उत्तर असेल मान्य आहे.. अजून वेळ हवा असेल किंवा सद्धे नकार असेल तरी चालेल आपण जेवण करून निघुयात..

गौरवी - मी जर म्हंटल की मला या नात्यात नाही राहायचं मग???

विवेक - काय?? म्हणजे तू मला कायमच सोडून जायचं म्हणतेय का?? प्लीज गौरवी अस नको ना ग करू तुझा विरह सहन नाही होणार मला.. तुला हवा तर आणखी वेळ घे पण आपलं नात नको तोडू ग.. मी चुकलो होतो ग मी मान्य करतो पण मी खरच बदललो आहे .. एकदा विश्वास ठेवून बघ फक्त एकदा.. विवेक कळकळीने बोलत होता..

गौरवी - विवेक मी माफ केले तुला ... पण ज्या नात्याची सुरुवात खोट्यापासून, फसवेगिरी पासून झाली आहे ते नात मजबूत कस बनेल.. ज्याचा पायाच कच्चा आहे ती इमारत मजबूत नाही राहू शकत ना.. त्या कटू आठवणी सोबत घेऊन आपण सोबत आयुष्य जगायचं म्हंटलं तरी ते कुठे ना कुठे कधी न कधी मनाला बोचेलच ना रे.. माझी स्वप्न, माझा स्वाभिमान आणि माझं मन अस बरच काही तुटलय रे या नात्यात ती खूप मोठी सल असेल माझ्या आयुष्यातली.. ती तर पुढे येतच राहील ना.. कितीही विसरले तरी कधीतरी आठवेलच की या लग्नात माझ्या नव्या नवरीच्या स्वप्नांची तू माती केली होती ते.. म्हणून मी हे नात संपवायचं म्हणतेय...

विवेक - गौरवी , तुझं सगळं बरोबर आहे पण एकदा माझा पण विचार कर ना ग.. मी झुरतोय ग तुझ्यासाठी..

आणि अग तूझं वागणं आणि हे बोलणं इतकं विरोधात्मक का वाटत आहे?? तुझे डोळे अजूनही मला हेच सांगताहेत की तुझं अजूनही प्रेम आहे माझ्यावर.. पण तू अस काहीतरी वेगळं बोलतेय.. नको ग अस करू..

विवेक खूप हळवा होतो.. आणि मग गौरवी मात्र हसून बोलते..

गौरवी - किती रे तू वेडा!! बरं एवढं सगळं कळलं ना तुला मग आणखी एक ऐकशील माझं..

विवेक - तुझं सगळं ऐकेल मी , तू म्हणशील ते करायला तयार आहे, तुझ्यासाठी किती बद्दललोय आणि आणखी तु म्हणशील तस बदलालयला तयार आहे.. या पुढची तुझी सगळी स्वप्न मी पूर्ण करेल, तुझा स्वाभिमान कधीच दुखावल्या जाणार नाही मी वचन देतो.. मीच काय पण कुणीही तुझा अवमान केलेला मी सहन करणार नाही.. विश्वास कर गौरवी एकदा फक्त.. हवा तर वेळ घे आणखी , पण मला सोडून नको जाऊ ग प्लीज.. जीव आहेस तू माझा..

गौरवी - आता नको बदलू.. तू जसा आहेस तसाच आवडतो मला.. प्रेम आहे रे.. पण ते विवेकवर.. त्या नात्यावर नाही .. ते नात मोडून आपण एक नवीन सुरुवात करायची का?? म्हणजे त्यात त्या आठवणी तेवढ्या बोचनार नाहीत, माझी पुढची स्वप्न तू पूर्ण करशीलही पण एक नव्या नवरीची असणारी ती सारी स्वप्न तू मला परत दे मग ते तुटल्याचा आभास ही राहणार नाही, आणि माझा स्वाभीमानही मला परत मिळेलच..

विवेक - म्हणजे ?? काय म्हणायचं तुला?? मला काहीच कळत नाहीय? नवं नात?? मला कळेल अस बोल ना काहीतरी..

गौरवी - (हसते) अरे वेड्या मला तुझ्याशी पुन्हा लग्न करायचंय, तेव्हा जे झालं त्या आठवणी पूसून नव्या आठवणी बनवायच्या आहेत.. तू मनानी तेव्हा माझा नव्हता, तेव्हा घेतलेली सात फेरे आणि वचनं तू मनापासून घेतली नव्हती ती पुन्हा घे मनापासून माझ्यासाठी.. हे हवाय मला... चालेल का तुला?? करशील माझ्याशी पुन्हा लग्न??

गौरवीच उत्तर ऐकून विवेकच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहू लागलेत.. त्याने रडतच पटकन गौरावीला मिठी मारली..

विवेक - बापरे... जीव काढला होतास तू माझा आज.. मी तर कितीही वेळा तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.. तुझ्याशिवाय माझं आयुष्यच नाहीय ग..

आता गौरवी चे डोळेही पाणावले होते.. आता दोघही खूप खुश होते..

विवेक - (बाजूला होत) सांग कधी करायचं लग्न? उद्याच करायचं का? रुपाली आणि संदीप च झालं की तिथेच आपण पण करूयात.. आज हळद लागलीच उद्या लग्न पण करू..

गौरवी - धीर धर.. घरी सांग आधी.. मी पण सांगते.. मग करूयात.. नाहीतर उद्या रुपलीची लग्नानंतर सगळ्यांना आपण सोबतच ही खुशखबर देऊयात..

विवेक - हो चालेल.. चल आता जेवण करून घेऊ..

दोघांनी मस्त रोमँटिक candle light डिनर केलं .. बराच वेळ सोबत घालवला.. एकमेकांच्या मिठीत कितीतरी वेळ ते बसले होते.. दोघांनाही घरी जावस वाटत नव्हतं.. पण आईबाबा वाट बघतील म्हणून दोघेही निघाले.. गाडीत छान रोमँटिक गाणे लागले..

मेरे हाथ में तेरा हाथ हो
सारी जन्नतें मेरे साथ हो

तू जो पास हो फिर क्या ये जहाँ
तेरे प्यार में हो जाऊं फ़ना

तेरे दिल में मेरी साँसों को पनाह मिल जाए
तेरे इश्क में मेरी जां फ़ना हो जाए

जितने पास हैं खुशबू साँस के
जितने पास होठों के सरगम
जैसे साथ हैं करवट याद के
जैसे साथ बाहों के संगम
जितने पास-पास ख़्वाबों के नज़र
उतने पास तू रहना हमसफ़र

तू जो पास हो फिर क्या ये जहाँ
तेरे प्यार में हो जाऊं फ़ना...

रोने दे आज हमको तू आँखें सुजाने दे
बाहों में ले ले और ख़ुद को भीग जाने दे
हैं जो सीने में क़ैद दरिया वो छूट जायेगा
हैं इतना दर्द के तेरा दामन भीग जायेगा

जितने पास-पास धड़कन के हैं राज़
जितने पास बूंदों के बादल
जैसे साथ-साथ चंदा की है रात
जितने पास नैनों के काजल
जितने पास-पास सागर के लहर
उतने पास तू रहना हमसफ़र

तू जो पास .हो फिर क्या ये जहाँ
तेरे प्यार में हो जाऊं फ़ना..

अधूरी साँस थी धड़कन अधूरी थी अधूरे हम
मगर अब चाँद पूरा हैं फलक पे और अब पूरे हैं हम...

गौरवीच हात हातात घेऊनच विवेक गाडी चालवत होता.. कधीची त्याची इच्छा आज पूर्ण झाली होती.. गौरवी ला घरी सोडून गुड night करून तोही घरी निघून गेला..

दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद लपवता लपत नव्हता.. दोघांच्याही घरच्याच्या ते लक्षात आलं..

बाबा - गौरवी , अरे वाह आज कळी एकदम खुलली आहे.. काय खास आहे??

गौरवी - बाबा , खास तर आहेच आणि मला तुम्हाला सांगायच ही आहे पण आता बरीच रात्र झालीय ना आपण उद्या बोलूयात का?

बाबा - ठीक आहे..

इकडे विवेक कडे सुद्धा त्याची आई त्याला विचारते पण तोही उद्या बोलूयात म्हणून टाळतो..

दुसऱ्या दिवशी रुपाली आणि संदीपच लग्न आणि रुपलीची पाठवणी झाल्यानंतर सगळे घरी येतात.. काही महत्वाचं बोलायचं आहे म्हणून विवेकच्या आई बाबांना पण गौरवी त्यांच्या घरी बोलावते.. सगळ्यांची छान बैठक आणि लग्नाच्या गोष्टी सुरू असतात..गौरवी सगळ्यांसाठी सरबत आणते आणि मग सगळ्यांना सोबतच त्यांच पुन्हा लग्न करण्याबाबत सांगते.. त्यामागचं कारण ऐकल्यावर सगळे जण तिच्या या निर्णयाला दुजोरा देतात.. आणि चांगला मुहूर्त बघून दोघांचं लग्न होते..... आणि अशी ही "जोडी तुझी माझी".. पूर्णत्वास येते...

समाप्त

-----------------------------------------------------------------