प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 1 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 1

सॅटरडे नाईट आऊट राघवला जास्त काही मानवलेलं नसतं.. दोन्ही हाताने आपलं जड झालेलं डोकं त्यातल्या त्यात दाबुन मेंदूतून जाणवणारे ठणके पुन्हा आतल्या आत कुठे तरी दाबुन ठेवण्याचा त्याचा प्रयत्न चालु असतो..

"गुड मॉर्निंग माय डिअर सन..",

नेहमी प्रमाणे वाफाळलेल्या चहाचा कप राघव समोर ठेवत त्याचा डॅड किचनमध्ये जायला निघतो..

"डॅड तु माझ्यावर कधीच का नाही रे रागवत... ",राघव कपातून बाहेर पडणाऱ्या वाफा बघतच आपल्या डॅडला विचारतो..

राघवचे केस विस्कटत जास्त काही न बोलता डॅड सरळ किचनमध्ये निघुन जातो..

"डॅड.. ", राघव पुन्हा त्याला आवाज देत त्याच्या सोबत किचनमध्ये जातो..

"तुझ्या आवडीचा व्हाईट एग आम्लेट बनवतोय.. आवडतं ना तुला??

"हम्मम.. ", राघव कोऱ्या चहाचा कप तसाच हातात पकडत किचनच्या ओट्यावर बसतो..

राघव : डॅड आय एम सॉरी.. काल थोडी जास्तच ड्रिंक झाली.. मला नाही माहिती ती दिसली की मला काय होतं..? आणि पुढील काही महिने ती नेहमीच दिसत राहिलं रे.. कंपनीत सॅम प्रोजेक्टवर आम्ही दोघे काम करतोय.. मला तर ही कंपनी सोडावी अस वाटतंय.. सोडु का??

डॅड : ओनीअन एड करू आम्लेटमध्ये??

"डॅड ती का असं वागली माझ्यासोबत.. आणि अजुनही का असं वागतेय रे?? आपल्या डॅडच्या प्रश्नाचं उत्तर न देता राघवचं आपल्या डॅड च्या मागे आपलंच तुणतुणं लावणं चालु असतं..

डॅड : ब्लॅक पेपर तुला आवडत नाही मी नाही टाकत..

डॅड.. मी सिरियसली काही तरी सांगतोय रे तुला.. तु ते ठेव बघु बाजूला.. आणि माझ्याशी बोल.. डॅडने हातात पकडलेलं ब्रेडचं पॅकेट त्याच्या हातातुन काढुन घेतंच राघव त्याला बोलतो..

राघव : मी काय करू??

(आपल्या डॅडचा हात हातात पकडतंच तो त्याला विचारतो.)

डॅड : तुझ्या आईकडून मला बुलवा येण्याआधी तुझ्यासोबत हे घर सांभाळणारी आणि मॅन म्हणजे तुला सांभाळुन घेणारी कोणी भेटते का बघ.. आणि सावधान हो एकदाचा..

राघव : डॅड.. तु सकाळ सकाळी नको ना रे सुरू होऊस.. डबल सेंच्युरी मारायची तुला..

डॅड : सेंच्युरी मारण पण कठीण वाटतंय.. म्हातारा झालो रे आत्ता..

राघव : माझे मित्र माझ्यापेक्षा तुला यंग म्हणतात रे.. आत्ता लग्नासाठी उभा राहिलास तर अश्या पोरी मिळतील तुला.. स्वतःला म्हातारा कसलं समजतोयस तु..

डॅड : हेच मला तुला सांगायचंय.. आत्ता लग्नासाठी उभा राहिलास तर तिच्या पेक्षा छान मुली मिळतील तुला.. दिसायला एखाद्या हिरॉ प्रमाणे आहेस, इंजिनिअर आहेस, महिन्याचं पॅकेज तुझं लाखांच्या घरात आहे आणि मॅन म्हणजे तुझं स्वतःचं घर आहे ह्या मुंबईत.. एखाद्या मुलीची अजुन काय स्वप्न असतील.?? हा.. आत्ता तुझी ती छान नव्हती किंवा नाही आहे अस माझं अजिबात म्हणणं नाही.. तुला ती आत्ता छान वाटत नाही आणि तु छान वाटत नाहीस म्हणुन बोलतोय.. म्हणजे त्या मागे तुझी कारणं असतील आय नो.. बट खरच मुव्ह ऑन हो.. आणि मला तुझ्या जबाबदारीतून मोकळं कर.. तुझी आई वाट बघत असेल रे माझी.. तुला एकट्याला ठेवुन तिच्याजवळ गेलो तर खुप ओरडेल ती माझ्यावर.. तुला पण तिचा राग माहितीच आहे.. सॉरी तुला कसं माहिती असणार म्हणा.. तीन वर्षांचाच तु होतास तेव्हा. पण तुझ्या सारखीच हट्टी.. नेहमी स्वतःचं तेच खरं.. दुसर मुलं नको म्हणत असताना माझ्या राघवला बहिण हवी ह्या वेड्या आशेने पुन्हा आई व्हायला निघाली पण दूसर बाळंतपण नाही झेपलं तिला.. पण बोलली तसं बहिण मात्र तुला देऊन गेली.. तिचे हात पिवळे करून तिला सासरी पाठवलं मी.. पण कालचं तुझं वागणं बघुन तुझी आई बनायला कुठे तरी मीचं कमी पडलोय अस वाटु लागलं रे.. दोन्ही जबाबदाऱ्या एकटाच उचलत होतो ना मी.. त्यात तुम्ही दोघं..

नाकावरील चष्मा काढुन डोळ्यांतील पाणी पुसत ते पुन्हा किचनमध्ये येतात.. राघवला पण आपल्या वडिलांचं बोलणं ऐकुन थोडं भरून येतं.. चहाचा कप हातात तसा पकडतंच तो डायनिंग टेबलजवळ यायला निघतो

साहेब सॉरी.. आज उशीर झाला यायला.. राजाराम त्याला बोलतो.. राजाराम म्हणजे राघवच्या घरातील जेवण बनवणारा कुक.. राघव समोर मान खाली घालतंच त्याला बोलतो..

राघव : आज नवीन कोणतं कारण तु घेऊन आलायस??

राजाराम : ते मी नेहमी प्रमाणे वेळेवर निघालो.. पण..

राघव : आय नो तुझं काही ना काही असेलंच..

तसं नाही.. (राजाराम हसतंच बोलायला जातो तसं राघव हाताची घडी घालत रागातंच त्याच्याकडे बघतो..) तसंच काहीसं.. असं बोलत हातात आणलेल्या भाजी पाल्याच्या पिशव्यांसोबत तो किचनमध्ये आपला मोर्चा वळवतो..

राजारामने किचनमध्ये एंट्री करताच राघवचे डॅड हॉलमधील खिडकीत लावलेल्या झाडांना पाणी घालायला म्हणुन किचनबाहेर पडतात..

नेहमी प्रमाणे FM चालु करत राजाराम आपल्या रोजच्या कामाला लागतो..

रेडिओमधुन बाहेर पडणारे बोल त्याच्या कानावर पडतात..

बदले रास्ते झरने और नदी
बदले दीप की टीमटीम
छेड़े ज़िंदगी धुन कोई नयी
बदली बरखा की रिमझिम
बदलेंगी ऋतुयें अदा
पर मैं रहूंगी सदा...

गाणं अर्ध्यात संपत आलं असतं.. आणि नेमकं राजारामने लावलं असत.. खुप साऱ्या जुन्या आठवणी त्याच्या ह्या गाण्यामागे लपल्या असतात.. होऊन गेलेलं जुने क्षण गाण्याच्या लिरिक्स सोबत आणि वाफाळलेल्या कपातुन बाहेर पडणाऱ्या वाफेसोबतच त्याच्या नजरेसमोर जणु नाचु लागतात..

राघव हातातील चहाचा कप तिथेच ठेवत आपल्या रूम मध्ये घुसतो निवांत अस गॅलरीत उभं राहुन काल पासुन ठणकणारं डोकं बिना चहाच्या घोटा शिवाय शांत करण्याचा प्रयत्न तो करत असतो..

बाहेर पावसाने जोर धरला असतो.. मगाशी FM वर ऐकलेलं गाणं पावसांच्या सरीसोबत तो आत्ता स्वतः गुणगुणत असतो.. तो जे काही विसरण्याचा प्रयत्न करत असतो ते सगळं पुन्हा त्याच्या नजरेसमोर येत असत.. आणि त्याला आठवते त्याची ती.. त्याची ती म्हणजे मेघना.. प्रेमाने तो तिला मेघच बोलायचा.. राघ-मेघ त्याच्या कॉलेजमधील अगदी गाजलेलं आणि नावाजलेलं कपल्स होतं..

राघवचा तो कॉलेजमधला पहिलाच दिवस.. शिक्षक वर्गात कधी येतील ह्याची वाट बघत एकमेकांची मज्जामस्ती करत सगळे बसले असतानाच त्याच्या तिने वर्गात घेतलेली एंट्री.. तिची ती एंट्री आठवुन हलकेच अस हसु राघवच्या ओठांवर येत.. मेघना आली तशी सगळीच मुलं उठुन उभी राहिली.. सगळ्यांसोबत राघव सुद्धा.. राघव तीच रूप बघण्यातच हरवुन गेलेला..

तिचे ते घारे डोळे... नक्षीदार अस तिचं नाक... गुलाबीसर ओठ.. त्यात उजव्या कानापाशी रेंगळणारी तिच्या केसांची बट.. तिच्या गालाची छेड काढत होते.. त्यात तिने घातलेला पिंकीशी अश्या रंगाचा चुडीदार.. क्लासरुमच्या उघड्या असलेल्या खिडकीतून हवेच्या झुळके सोबत उडणारी तिची ओढणी..

"कुदरत ने बनाया होगा
फुरसत से तुझे मेरे यार "

ती दिसताच क्षणी राघवच्या हृदयात गाण्यातील हे बोल आपणच वाजु लागतात..

सगळ्यांकडे ती रागगभऱ्या नजरेने बघत होती.. सगळे तिच्या नजरेतील तो राग बघुनच गप्प खाली बसले.. राघव मात्र उभं राहुन तिच्याकडे बघण्यात हरवुन गेलेला.. हॅण्डसम अश्या राघवला बघुन मेघनाच सुद्धा काही वेगळं नव्हतं.. पण ती तस जरा सुद्धा न दाखवता एक रागभरी नजर राघववर फिरवून गप्प पणे जियाच्या बाजुला जाऊन बसते..

गुड मॉर्निंग सर.. संपुर्ण क्लास उभं राहून एकत्रच बोलतो..

तस राघव त्याला लागलेल्या तंद्रीतून बाहेर येतो.. एक नजर मेघना वर फिरवतो आणि इतरांसोबत तो खाली बसतो..

कोण आहे ग हा?? मेघना राघवकडे तिरक्या नजरेने बघतच जियाला प्रश्न करते..

जिया : आजच आलाय ग.. न्यु एडमिशन..

मेघना : ओहहह.. आल्या आल्या इतरांसोबत त्रास देण चालु पण झालं ह्याच.. बाकीच्या मुलांसारखाच आहे वाटत हा..

जिया : त्याला माहिती नसेल ग.. सगळे उभे राहिले म्हणुन तो उभा राहिला असेल.. आणि आत्ता बोलु नकोस माझ्याशी.. सर इथेच बघतायत..

हम्मम.. अस बोलत मेघना आत्ता सरांकडे लक्ष देऊ लागते.. पण अधुन मधुन ती राघवकडे बघत असते.. इथे राघवच सुद्धा काही वेगळं नसत.. चोरून एकमेकांकडे बघणं चालुच असत.. मेघना अधुन मधुन नकटा राग मात्र त्याला दाखवत असते..

तिच्या चेहऱ्यावर दिसणारा राग बघुन राघव खोल असा श्वास घेत सरांकडे आपलं लक्ष केंद्रीत करतो.. मेघनाला मात्र अस काही करायला जमतच नसत..

लेक्चर संपताच सगळे क्लासरुम बाहेर पडु लागतात..

हाय.. मी राघव कुलकर्णी.. मला वाटलं तु लेक्चरर आहेस.. म्हणुन ते मी.. आय मीन त्या लोकांसोबत उभं राहुन.. रिअली सॉरी.. मेघना बाहेर येताच राघव तिच्या जवळ जातच थोड अडखळतच तिला बोलतो..

इट्स ओके.. जिया चल आपल्याला उशीर होतोय.. एका वेगळ्याच अंदाजात ती त्याला बोलते.. आणि आपली नजर त्याच्यावरून हटवत ती जियासोबत तिथुन जाऊ लागते..

वाऱ्यावर उडणारी तिची ती ओढणी.. राघवच्या चेऱ्यावर झळकत असते... राघव आपले डोळे मिटुन ओढणी सोबत दरवळणाऱ्या आणि त्याच्या मनाला मधहोश करणाऱ्या सुगंधाचा आस्वाद लुटत असतो..

तोच श्री तिथे येत जोरातच त्याच्या डोक्यात मारतो..

आहह.. श्री.. काय करतोयस?? राघव डोक चोळतच श्रीला बोलतो..

श्री : कोणत्या देवाची आठवण झाली तुला?? नाही म्हणजे डोळे मिटुन होतास म्हणुन विचारतोय..

राघव मात्र मेघनाची ती हवेच्या झुळकेसोबत उडणारी बघत पुन्हा हरवुन जातो..

खुप कठीण आहे रे मित्रा.. श्री त्याचा मित्र त्याच्या खांद्यावर हात ठेवतच त्याला बोलतो..

राघव : कोण आहे रे ती..??

श्री : ती मेघना.. जसे मेघ बरसतात तशी ती बरसते.. तुझ्यावर पण बरसली का काय??

राघव : काय बोलतोयस..??

श्री : बरसते म्हणजे भडकतेरे.. कॉलेजमधली सगळ्यात आणि सगळ्यांमध्ये हुशार अशी ती मेघना.. पण अति हुशार अस म्हटलस तरी चालेल.. प्रत्येक गोष्टीत नुसती चिडत असते..

राघव : मला तर अशी नाही वाटत..

श्री : हळुहळु वाटेलरे मित्रा..

राघव मात्र तिथे उभं रहात तिला कॉलेजच्या गेट मधुन बाहेर पडेपर्यंत बघत असतो.. इथे मेघना जियासोबत बोलता बोलता अचानक आपली मान मागे वळवत राघववर आपली नजर फिरवते. तिच्या त्या नजरेने राघवच हृदय चांगलंच धडधडु लागत..

मेघनाला घेऊन केंटींगमध्ये जाऊयात का?? श्री राघवच्या गळ्यात हात घालत त्याला तिथुन घेऊन जातो..

हं??? राघव प्रश्नार्थी चेहरा करत त्याच्याकडे बघतो..

श्री : एवढं काय टक लावुन बघत बसलायस तिला..?? असच बघत राहिलास तर प्रेमात वैगेरे पडशील हा तिच्या.. साधं इथे तिथे पडल्यावर एवढा रडतोस मग प्रेमात पडल्यावर जास्तच रडशील मित्रा.. (राघव हाताची घडी घालत श्री ला खुन्नस देत उभा असतो).. माझ्याकडे अस बघु नकोस हा. आय नॉ मी तुझा खास मित्र आहे बट मी तसला मुलगा नाही रे.. राघवला चिडवत श्री तिथुन पळ काढतो..

श्री तु थांबच.. अस बोलत राघव त्याच्या मागे पळत जातो..

युअर ब्रेकफास्ट इज रेडी... डॅड राघवच्या मागे येतच त्याला बोलतो..

तस राघव हरवुन गेलेल्या भुतकाळातुन बाहेर पडतो..

उद्या परत ती भेटेल रे.. खुप त्रास होतोय रे.. बाहेर बरसणाऱ्या पावसांच्या सरींकडे एकटक बघतच आपल्या डॅडला तो बोलतो..

(कुछ तो हुआ हे.. कुछ हो गया हे.. असच काहीच झालंय आपल्या राघ-मेघ मध्ये.. पण नक्की काय?? त्यासाठी प्रतिक्षा करा पुढील भागाची.. पण हा भाग कसा वाटला.. हे नक्की कळवा..)

©भावना भुतल