प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 3 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 3

ट्रीपवरुन घरी येताच मेघनाने मारलेली मिठी आठवुन राघव गालातल्या गालात हसतो. रात्रीचे दोन वाजुन गेले तरी राघव जागा असतो नंतर उशिरा त्याला मेघनाच्या आठवणीत झोप लागते.

दुसऱ्या दिवशी मेघना नेहमीपेक्षा लवकरच कॉलेजमध्ये येते. पण तिला राघव कुठेच दिसत नव्हता.. कॉलेजमध्ये गोंधळ चालु असतो. नोटीस बोर्डभोवती गर्दी असते. "एवढ्या गर्दीतुन कळणार कसं की कसली नोटीस आहे??" जिया तोंड पाडतच मेघनाला बोलते.

"गर्दी कमी झाली की बघुयात", मेघना तक्रारीवरचा तोडगा काढत जियाला बोलते. तोच गर्दीतुन राघव आणि श्री बाहेर येताना तिला दिसतात..

"ह्ये राघव ! कसली नोटीस लागलीय?”, जिया राघव दिसताच त्याला विचारते.

"कॉलेज थ्रू इंटरडान्स कॉम्पिटीशन आहे. जो कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी आपल नाव ऑफिसमध्ये जाऊन द्या.", श्री बोलतो.

"ए वाव्ह यार ! मी सगळी डिटेल्स पुन्हा नीट बघुन येते", मेघनाचा हात सोडत जिया गर्दीतून वाट काढत नोटिसबोर्डच्या दिशेने जातेसुद्धा.

“कशी आहेस??”, राघव मेघनाला विचारतो.

“बरी आहे", राघवकडे बघतच मेघना बोलते.

"मग विचार काय आहे??", राघवने अस काही विचारताच धडधडत्या हृदयाने प्रश्नार्थी चेहरा करत ती राघवकडे बघते..

राघव इशाऱ्यानेच तिला, “माझा नाही नोटिसबोर्डवर लावलेल्या कॉम्पिटिशनबद्दलचा..” अस बोलतो..

मेघना नाक मुरडत मानेने नाही म्हणुन सांगते.

"तुझा काय विचार आहे?"

"तु हो बोललीस की मग पुढे", राघव तिच्या नजरेत बघतच तिला बोलतो..

"म्हणजे?"

"कपल्स डान्स आहे ना.. तुला चालणार असेल तर आपण दोघे करू काही तरी."

"विचार करून सांगते."

"9123******", राघव आपला मोबाईल नंबर तिला सांगतो.

मेघनाच्या चेहऱ्यावर पुन्हा प्रश्न चिन्ह.

"माझा मोबाईल नंबर ग. ह्यावर फोन करून कळव. कळवशील ना?? आय मीन मोबाईल नंबर कळला ना तुला??"

नकारार्थी मान हलवत ती नाही म्हणुन बोलते. राघव पुन्हा नंबर रिपीट करतो. मेघना मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करते.

"कॉलेज सुटल्यानंतर मी फ्रिच असतो. तु कधीही फोन कर मला.. तुझ्या फोनची वाट बघेल आणि त्यासोबत तुझ्या उत्तराची.”

"हम्मम."

"मेघना कपल्स डान्स कॉम्पिटीशन आहे ग. ए राघव तु करणार आहेस का पार्टीसिपंट??" जिया राघवला विचारते.

"बट कोणी पार्टनर भेटत नाही ग आणि जी भेटली ती विचार करून सांगेल अस बोलली", राघव मेघनाकडे आपली नजर फिरवतच तिला बोलतो.

"आपण करूयात?", जिया खुशीत राघवला बोलते.

जिया अस बोलताच राघव आपल्या भुवया उडवतच मेघनाकडे बघतो.

"जिया लेक्चरला उशीर होतोय ग", जियाचा हात पकडत ती तिला तिथुन घेऊन जाते..

"अग थांब तरी", जिया चिडून आपला हात सोडवतच तिला बोलते.

"राघव आपण दोघे मिळुन करूयात", जिया परत राघवला विचारते.

"जर ती नाही बोलली की मग मी तुला सांगतो बट आत्ता खरच लेक्चरला उशीर होतोय अस मला पण वाटत", बाजुलाच एका मित्राशी बोलत उभ्या असलेल्या श्रीच्या गळ्यात हात टाकत राघव त्याला जबरदस्ती लेक्चरमध्ये घेऊन जातो..

कॉलेज सुटताच राघव मेघनाची गेटजवळ वाट बघत उभा असतो. मेघना लायब्ररीतुन बुक्स घेऊन येईपर्यंत खुप उशीर होतो. नेहमीप्रमाणे जिया तिला एकटीला टाकुन घरी निघुन जाते.

"मेघ.. ना", गेटआड लपलेला राघव मेघनाला थांबवतो..

"काय झालं? तु अजुन घरी नाही गेलास?"

"ते जियाचा नंबर हवा होता ग मला. तु माझ्या नंबरवर व्हाट्सएप करशील??"

"तुला कश्याला हवाय तिचा नंबर??"

"ते कपल्स डान्स रिलेटेड थोडं बोलायच होत."

"काय?"

"तुझ्याशी नाही ग तिच्याशी."

"मी तुझ्यासोबत कपल्सडान्स कॉम्पिटिशनसाठी तुझी पार्टनर म्हणुन डान्स करायला रेडी आहे.”, मेघना गंभीर अस तोंड करतच राघवला बोलते.

"तरी तु मला तिचा नंबर व्हॉट्सएप कर."

"आत्ता का हवाय तुला तिचा नंबर ?"

"तु मला व्हॉट्सएप तरी कर मग सांगतो."

मेघना चेहऱ्यावर आठ्या पाडतच जियाचा नंबर राघवला व्हॉट्सऍप करते..

"हा 8321****** हा तुझा नंबर आहे ना??" आपला मोबाईल मेघना समोर धरतच राघव तिला विचारतो.

“हम्मम.”

"मेघ".. मेघनापेक्षा मेघ सेव्ह केलं तर चालेल ना??

“हम्मम..”, हसतच ती त्याला बोलते..

राघव खुप वेळ हनुवटीजवळ आपली दोन बोट ठेवत विचार करू लागतो.

"कसला विचारत करतोयस?"

"आत्ता तु कॉम्पिटीशनसाठी हो बोललीस मग जियाचा नंबर ठेवुन काय करू मी?" हे बघ डिलीट करतो.. अस बोलत तो जियाचा नंबर डिलीट करून टाकतो.

"तुला माझा नंबर हवा होता तर सरळ सरळ मागायचास ना. विषय एवढा फिरवत बसायची गरज नव्हती.."

"विषय फिरवला नसता तर तु माझी पार्टनर बनायला तैयार आहेस हे कळलं कस असत ग मला.", राघव हसून बोलत तिथुन जाऊ लागतो.

मेघनासुद्धा गालातल्या गालात हसत त्याला बाय बोलते आणि कॉलेजच्या गेट बाहेर पडते. नेहमीप्रमाणे ऑटो दिसते का ते बघते.. तोच राघव बाईक घेऊन तिच्या समोर हजर..

"ह्ये मेघ.. एकटं जाण्यापेक्षा मी सोडतो तुला. तसही मी चांगला मुलगा आहे हे काल ट्रिपमध्ये कळलं असेलच तुला"

मेघना थोडावेळ विचार करत तिथेच उभी राहते.

"इट्स ओके, नाही यायच तर राहु देत", मी निघतो मग..

"येते", अस बोलत मेघना राघवच्या बाईकवर जाऊन बसते. पाठी असणाऱ्या हँडलला एकदम घट्ट धरते. जेणेकरून आपला स्पर्श राघवला होणार नाही.

"थँक्स..", घराजवळ उतरताच मेघना बोलते आणि आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागते..

"मेघ..", राघव अस बोलताच मेघना मागे वळुन बघते.

"चालेल ना मेघ बोललेलं?"

"हम्मम."

"ते आपण कपल्स डान्स कॉम्पिटीशनमध्ये पार्टीसिपेंट करायचंच का?? म्हणजे नाही केल तर नाही का चालणार??"

"आत्ता काय झालं?"

"मला डान्स वैगेरे नाही ग येत" राघव मेघनापासून आपली नजर लपवतच तिला बोलतो.

हे ऐकताच मेघना दिलखुलास हसते आणि राघव शरमेने चूर होतो. हा विषय मग इकडेच संपतो.

दुस-या दिवशी श्री कँटीनमध्ये बसून राघवची खेचत होता.

“काय यार तूपण. जरा बाहेर कुठेतरी जा की. मुव्ही, डिनर.. काहितरी एन्जॉय करा.”

“अरे पण कॉलेज मध्ये कुठे वेळ मिळतो. तिला सगळे लेक्चर करायचे असतात. संध्याकाळी वेळेवर घरी पोहोचायचं असतं.”

“धत्तेरी. एक दिवस बंक नाही करु शकत तुम्ही? जाऊ दे मला काय. मी आपलं सांगायचं काम केलं.”

श्री असं म्हणाल्यापासून राघवच्या मनात मेघनाला बाहेर घेऊन जाण्याचे वारे वाहू लागले. एखादी रोमँटीक डेट असावी असं त्यालाही वाटत होतं. फक्त ते दोघंच. नाहीतर नेहमी कोणी ना कोणी सोबत असायचंच.

एकदा लेक्चरनंतर कँटीनला जात असताना राघव मेघनाला म्हणाला,

“मेघ कुठेतरी बाहेर जायचं का?”

“पिकनिकला?”

“नाही गं. आपण दोघे.”

“कॉलेज बुडेल त्याचं काय?”

“जाऊ दे मग राहीलं.”

“चिडू नकोस ना. हे बघ आज तर नाही जमणार. परवा जायचं का? दोननंतर प्रॅक्टिकल्स आहेत आणि सर येणार नाहीत त्यामुळे ते फ्री आहेत.”

राघवची कळी खुलली. मग तो हसून म्हणाला,

“ठिक आहे. पण कुठे जाऊया? मूव्ही बघायचा?”

“नको रे. मला झोप येते तिकडे. बीच वर जायचं का?”

“अंम्.. ठिक आहे चालेल.”

त्या दिवशी सकाळी कॉलेज झाल्यावर दोघं मस्तपैकी फिरायला समुद्रावर गेले. तिथे एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना त्यांना जग जिंकल्याचा भास होत होता.

भेळ, नारळपाणी असं खाल्ल्यावर ते दोघं किना-यावर फिरायला गेले. पाण्यात पाय टाकताच मेघनाने हाताने राघवच्या अंगावर पाण्याचा फवारा उडवला.

“नको गं मेघना. तू भिज ना. मला नको भिजवू.”

“एवढा काय घाबरतो रे. ये ना पाण्यात. किती छान वाटतंय.”

“नको गं आणि तू पण जास्त आत जाऊ नकोस.”

राघव नको नको म्हणत असतानाही मेघनाने त्याला पाण्यात खेचलं. मेघना एवढी खुष होती की तिला अजुन नाही म्हणणं राघवला शक्यच झालं नाही. दोघे मग मनसोक्त भिजले. थोडया वेळाने उन्हामध्ये वाळूत बसले.

“आय लव्ह यू राघ.”, मेघना राघवचा हात हातात घेऊन त्याच्या डोळ्यात पहात म्हणाली.

“आय लव्ह यू टू मेघ..”, राघवने तिचा हात दाबला आणि वाळूत राघ-मेघ असं नाव कोरलं.

ओले कपडे थोडे कोरडे झाल्यावर ते उठले आणि जवळच्या ढाब्यावर जाऊन खाल्लं. राघवने तिला तिच्या घराच्या थोडं आधी सोडलं. खुप छान आठवणी मनात साठवून ते आपापल्या घरी गेले.

दुस-या दिवशी पूर्ण कॉलेज शोधूनही मेघनाला राघव दिसला नाही. कँटीनमध्ये टाईमपास करणा-या श्री ला तिने विचारलं, “ राघव कुठे आहे? लेक्चरला नव्हता. माझा कॉल उचलत नाहीये.”

“अरे तुला नाही सांगितलं का? तो आजारी आहे असं त्याचे वडील कॉलवर बोलले मला. मला वाटलं तुला माहीत असेल.”

“काय झालंय त्याला?”

“ताप आलाय.”

“चल आपण त्याच्या घरी जाऊ. मला त्याला भेटायचं आहे.”

“अगं हो पण मला थोडं काम आहे प्रोजेक्टचं.”

“मग मला एड्रेस दे. मी जाते.”

श्रीकडून पत्ता घेऊन मेघना जरा घाईघाईतंच राघवच्या घरी गेली.

राजारामने दार उघडलं तेव्हा ती म्हणाली, “ मी राघवची मैत्रिण. मला भेटायचंय त्याला.”

“राघवबाबा त्यांच्या खोलीत आहेत. तुम्ही जाऊन भेटा. उजवीकडून दुसरी खोली.”

“राघव.. कसा आहेस तू?”, डोळ्यात पाणी आणून बेडवर झोपलेल्या राघवला पहात मेघना म्हणाली.

“बरा आहेस ना रे. किती ताप आलाय तुला.”, राघवच्या कपाळाला हात लावत मेघनाने बघितलं. तो तापाने फणफणत होता.

“मला माफ कर राघव. माझ्यामुळे झालं सगळं. मी उगीच तुला फोर्स केलं.”

“मेऽऽघ तूऽऽ कऽऽधीऽऽ आऽऽलीऽऽस?”, राघव गुंगीत बोलत होता.

“काहीही बोलू नकोस. मी तुझ्यासाठी काही खायला आणते.”

मेघना खाली आली आणि राजारामला विचारले “ काका घरी कोणी नाहीये का?”

“मोठे मालक ऑफिसला गेलेत आणि ताई कॉलेजला”

“अच्छा. डॉक्टर येऊन गेले का?”

“हो. औषधं देऊन गेलेत. राघवबाबाच्या टेबलवर ठेवलीत.”

“बरं. तुम्ही मला मूगडाळची खिचडी बनवायचं साहित्य काढून द्या. थंड पाणी आणि एक रुमाल द्या.”

मेघनाने पटकन खिचडी टाकली आणि तिकडे राजारामला लक्ष द्यायला सांगून राघवच्या डोक्यावर पाण्याच्या पट्टया ठेवत राहिली.

थोडया वेळाने तिने राघवला खिचडी भरवली आणि प्रिस्क्रीपशननुसार त्याला गोळ्या दिल्या. नंतर राघवला गाढ झोप लागली. मेघना त्याच्या उशाशी बसून पट्टया बदलत राहिली.

ब-याच वेळाने श्रीच्या आवाजाने तिची तंद्री भंगली.

“कसा आहे आता तो?”

“ताप कमी झालाय. पण अशक्तपणा आहे. झोपलाय.”

“ ठिक आहे. मी थांबतो इकडे मेघना. तुला उशीर होईल घरी जायला. तू निघ.”, फळांची पिशवी टेबलवर ठेवत श्री म्हणाला.

“ठिक आहे. पण काळजी घे त्याची.”

“हो मी घेईन. सोडू का तुला?”

“नको. तु इथेच थांब. माझं मी जाईन.

मेघना, श्री आणि राघवच्या घरचे यांच्यामुळे राघव दोन दिवसात बरा झाला.

श्री सोबत त्याला कॉलेजमध्ये आलेलं बघुन मेघना खुश झाली.. डोक्याला हात लावुन ताप आहे का ते चेक करत असतानाच “बरा आहे ग राणी.. किती काळजी करशील?”, मेघनाच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत राघव बोलतो.. आणि तिच्या डोळ्यांत बघण्यात हरवुन जातो..

“मम्माssss”, एका लहान मुलीच्या आवाजाने राघव भानावर येतो..

एक छोटीशी गोंडस अशी परी आपल्या मम्माला आवाज देत पळतच राघवच्या मागुन जात असते.. राघव त्या गोंडस अश्या परीकडे बघतच राहिला.. त्याच्या मनात खोलवर कुठेतरी वेदना झाल्या जेव्हा ती परी मम्मा करत मेघनाला बिलगली.

(कोण आहे ती परी?? किती काय घडून गेलंय ह्या 5 वर्षाच्या कालावधीत?? का वेगळे झाले राघमेघ?? पाहुया पुढील भागात)