प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 4 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 4

"मम्माssss.. एक गोंडस अशी साधारण चार पाच वर्षांची सुंदर आणि गोड अशी परी मेघना जवळ पळतच जात असते.."

तिला आपल्या मेघला बिलगताना बघुन आपल्या शरीरातुन कोणी तरी प्राणच काढुन घेतलेत अस काहीस राघवच झालं असत.. मेघना राघवकडे बघतच त्या गोंडस अश्या परीच्या गालावर हात टेकवत तिला उचलुन घेते.. नकळत का होईना राघवचे डोळे पाणावले असतात..मनात एक वेडी आशा ठेवुन तो जीची वाट बघत होता ती त्याच्या हृदयातील घरात परतून काही येणार नसते ह्याची त्याला जाणीव झाली असते.. आयुष्य भरासाठी त्याच हृदय हे रिकामीच रहाणार असत..

ऑफिसमध्ये लहान क्युट अशी छोटी मुलगी आली हे बघुन सगळेच तिची ओळख करायला तीच्या भोवती जमतात.. ऑफिसमधील एक जण तिला तीच नाव विचार..

"युक्ता" रागवला ऐकु जाव म्हणुन मेघना मोठ्याने बोलते..

("मेघ मला ना पहिली मुलगीच हवी.. "राघव मेघनाला आपल्या मिठीत घेतच बोलतो.

मेघना : मला काहीही चालेल.. म्हणजे मुलगा ही चालेल आणि मुलगी पण..

राघव : बट मला मुलगीच हवी.. "युक्ता" मी नाव पण ठरवलंय..

मेघना : तुझ पुढच पण सगळं ठरलेलं दिसत..

राघव : हा मग.. मी खुप स्वप्न रंगवलीत आपल्या दोघांबद्दलची.. खूप म्हणजे खुपच.. तु नाही बघितलीस का??

मेघना : स्वप्न स्वप्नच असतात.. आणि ती स्वप्न बनुनच रहातात म्हणुन मी नाही बघत.. मला काळासोबत जगायला मला आवडत..

"तुला मी कोणत्या एंगलने काळा दिसतोय मेघ?" राघव मेघनाची गंमत करतच बोलतो..

तु तर ना.. अस बोलत मेघना चौपाटी वरील वाळु मुठीत घेत राघवच्या अंगावर उडवते..)

आणि राघव हात तोंडासमोर धरतो.. आपण ऑफिसमध्ये आहोत ह्याची जाणीव त्याला होते आणि त्याच स्वप्न हे स्वप्नच बनून राहत..

खोल श्वास घेत टेबलावरील फाईल हातात घेत तो काँफेरेन्स रूममध्ये वळतो.. थोड्याच वेळात मिटिंगला सुरुवात होणार असते..

इथे मेघना युक्ताला ऑफिसमध्येच असलेल्या डे केअरमध्ये सोडते. तिची कोणतीही गैरसोय नको म्हणुन एक नेनी तिने तिच्यासोबत तिथे ठेवली असते..

"The Del company is launching a new product in the market. our Company will provide the base as required for that product. Miss Meghna Dixit will explain the whole procedure to you." राघवचे सिनियर काँफेरेन्स मध्ये मिटिंगची आनऊन्समेंट करतात.. आणि आपल्या जागेवर जाऊन बसतात..

"लग्न झाल तरी सरनेम अजुन दीक्षित??" राघव स्वतःच्या मनाला प्रश्न करतो..

"हॅलो एव्हरीवन" मेघणाच्या त्या धारधार आवाजाने राघवच हृदय अगदी धडधडू लागलं असत.

मेघना प्रोडक्ट संदर्भात माहिती देण्यात गुंतून जाते. राघवला मात्र तिथे क्षणभर सुद्धा थांबायला होत नसत. मेघनाला बघुन मुळात इतक्या वर्षांनी तिचा आवाज ऐकुन तो कावरा बावरा झाला असतो.. पाय जोर जोरात हलवत तर असतो त्याचसोबत हातातील पेन काँफेरेन्स पॅड वर आपटत असतो..

"राघव व्हाट्स रोंग विथ यु.." बाजुलाच बसलेले सर त्याला बोलतात.. तस राघव भानावर येतो.. मेघना सकट संपुर्ण काँफेरेन्समध्ये जमलेली मंडळी त्याच्याकडे बघत असतात..

"Sir I am not feeling well, can I leave this meeting?"

"ok.. sure.."

"Miss Meghna.. sorry for disturbance.. you continue.." राघवला काँफेरेन्स मिटिंगमधुन बाहेर पडणाऱ्या राघवकडे एकटक बघण्यात हरवुन गेलेल्या मेघनाला राघवचे सर बोलतात.. तशी मेघना भानावर येते..

गळ्याभोवती गुंडाळलेली टाय सुद्धा आपला जीव घेते एवढा राघवचा जीव कासावीस झाला असतो.. टायची पकड थोडी हलकी करतच तो डेस्कवर येऊन बसतो..

तोच युक्ताच्या रडण्याचा आवाज त्याला येतो.. मेघनाने तिला सांभाळायला ठेवलेल्या नेनीला सुद्धा ती ऐकत नसते. "मम्मा पाहिजे" म्हणुन पुर्ण फ्लॉर तिने डोक्यावर घेतलेला असतो..

आपण नाही जायच असा विचार करून सुद्धा राघव स्वतःला तिच्या जवळ जाण्यापासून रोखु शकला नाही..

हाय.. तिच्यासमोर घुडगे टेकतच राघव गोड स्माईल देत तिला बोलतो..

युक्ता खुप वेळ त्याच्याकडे बघते आणि पुन्हा रडु लागते..

"शहहहsss तुला तुझी मम्मा हवीय ना??"

युक्ता होकारार्थी मान हलवतच हो बोलते..

"बट ती तर मोठी अशी मिटिंग घेतेय ग पिल्लु.. एक काम करूयात?? आपण तिच्यासाठी छोटस गिफ्ट बनवुयात?? काय बनवुया बर?? तुझ्या मम्माला काय आवडत??

काय आवलत बल?? युक्ता पण राघव सारख एक बोट उजव्या बाजूच्या कपाळावर मारत आपल्या बोबड्या शब्दात बोलते..

"आपण क्यूट अस बटरफ्लाय काढुयात?? तु मला त्यात कलर्स भरून दे.. तुला येतात कलर भरायला??"

युक्ताने होकार दर्शवताच राघव तिला उचलुन आपल्या डेस्कवर घेऊन जातो.. आपल्या कॉम्प्युटरमध्ये फुलपाखरूच चित्र शोधत त्याची प्रिंट तो देतो. हाउस किपर्सला सांगुन तो रंगीबेरंगी खडू मागवुन घेतो..

युक्ता ते चित्र रंगवण्यात हरवुन जाते..

"तुम्ही देवासारखे धावुन आले.. नाही तर मेघना ताईंशिवाय ही एक मिनिट सुद्धा रहात नाही.." युक्ता सोबत असलेली नेनी राघवला बोलते..

"हिचे वडिल कुठे असतात" हा प्रश्न विचारू का हिला?? राघव स्वतःशीच पुटपुटतो.. नाही नको.. कुठेही असेल.. मला काय करायचय?

तोच युक्ता राघवच्या हाताला पकडतच त्याला तिने रंगवलेलं चित्र दाखवत असते..

राघव सगळं काही विसरून तिच्या निरागस आणि गोंडस अश्या रुपाकडे खुप वेळ बघत राहतो.. "दिसायला थोडी फार मेघ सारखीच आहेस तु"मनातल्या मनात स्वतःशी बोलतो..

"अंतल, आत्ता मम्माला द्यायला जाऊयात हे गिफ्ट??" राघवचा हात पकडतच ती त्याला विचारते..

"एकच गिफ्ट?? अजुन काही तरी मस्त अस बनवुयात ना.. तुला एरोप्लॅन येतो बनवायला.."

"मी शिकवतो तुला.. युक्ता ने नकार दर्शवताच राघव तिला बोलतो..

तिला पेपर्सचे एरोप्लॅन बनवुन दाखवतो.. आणि ते उडवुन सुद्धा.. युक्ताला ते बघुन खुप गंमत वाटते.. टाळ्या वाजवत ती त्या उडणाऱ्या विमानाच्या मागे पळते.. अगदी कमी वेळात तिची आणि राघवची चांगलीच गट्टी जमली असते..

युक्ता तिथेच कागदाच्या विमानासोबत खेळण्यात हरवुन जाते.. ती शांत झालीय हे बघुन राघव सुद्धा आपल्या कामाला लागतो.. काम करता करता अधुन मधुन तो युक्तावर आपली नजर टाकत असतो..

"छानच गट्टी जमलेली दिसतेय तुझी, लहान मुलांना मस्त हॅण्डल करतोस तु" राघवचा एक कलीग तिच्याजवळ येतच बोलतो..

"माझ्या बहिणीची मुलगी पण अशीच आहे ना.. त्यामुळे थोडा एक्सपेरियन्स आहे.." राघव हसतच बोलतो..

"मग मेघना दिक्षितला सांगाव लागेल.. पुढील काही दिवस म्हणजे जो पर्यंत हा प्रोजेक्ट फायनल होत नाही तो पर्यंत त्यांच्या मुलीला तूच संभाळशील.. तेवढंच त्या आपल्या कंपनीवर खुश होऊन लगेच डिल करतील रे" राघवचा कलीग मस्तीच्या सुरात बोलतो.

"म्हणजे??"

"तुला काहीच माहिती नाही का??"

राघव नकारार्थी मान हलवत नाही म्हणुन सांगतो.

"त्या पुण्याला असतात रे.. मुलीला एकट सोडुन इथे यायला त्या नाही बोलत होत्या.. आपल्याला कंपनीतच बेबीसीटर्स आहे म्हटलं तर त्या तैयार झाल्या..म्हणजे मिटिंगसोबत त्यांना त्यांच्या मुलीवर लक्ष ठेवता येईल. ही खुप मोठी डिल आहस म्हणुन कंपनीने त्यांना त्यांच्या मुलीला ऑफिसमध्ये आणायची परमिशन दिली आहे"

राघव आपल्या कलीगच बोलणं ऐकतच राहतो..

तोच युक्ता परत रडत त्याच्या जवळ येते..

"घ्या तुमची नवीन ड्युटी" हसतच राघवची पाठ थोपटत त्याचा कलीग तिथुन निघुन जातो.

जवळपास तासाभराने मेघना मिटिंग आटोपुन घाई घाईतच बाहेर येते.. ती बाहेर येऊन बघते तर युक्ता राघवच्या कुशीत अगदी गाढ झोपली असते.. एका कुशीत तिला घेऊन राघव आपलं काम करत असतो..

मेघना धडधडत्या ह्रदया सहित एक एक पाऊल राघवच्या दिशेने टाकते.. पुन्हा त्या येणाऱ्या हिलच्या आवाजाने राघव कावरा बावरा होतो.. कम्प्युटरचा माऊस पकडलेला हात त्याचा थरथरू लागतो कारण मेघना त्याच्या दिशेने येतेय ह्याची जाणीव त्याला झाली असते..

"झोपली ही??" मेघनाच्या ह्या प्रश्नावर राघव शांत असतो..

"हो आत्ताच झोपली.. ह्या सरांना सोडुन ती माझ्याकडे यायलाच तैयार नव्हती" नेनी तिथे येत मेघना मिटिंगला गेल्यापासूनची जे काही घडलं ते सगळं तिला सांगत असते.. राघव युक्ताला अलगद उचलत नेनीकडे सुपुर्द करतो..

"लग जा गले के फिर ये
हसीं रात हो ना हो
शायद फिर इस जनम में
मुलाक़ात हो ना हो"

राघवच हृदय मेघनासाठी गाणं बोलत असत.. भरलेल्या डोळ्यांनी तो मेघनावर नजर फिरवतो अन तिथुन बाहेर निघुन जातो.. बाहेर येताच श्री ला फोन लावतो..

"बोल मित्रा"

"श्री.. तिला मुलगी पण आहे यार"

"तुझ्या मेघला??"

"होssss.. खुप क्युट आहे.. तिच्यासारखीच.."

"परत एकदा मामा झालास मित्रा" श्री नेहमीच्या सवयी नुसार राघवचा चिडवतो"

राघव फोनवर शांत बसुन असतो.. डोळ्यांतुन पाणी येत असत त्याच्या..

"तु रडतोयस?? ए राघव मस्ती करतोय यार.. आय एम सॉरी"

"कुठे चुकलोय यार मी.. कुठे कमी पडलो.. निस्वार्थ प्रेम माझं तिच्यातील स्वार्थ स्वभावाला ओळखुच नाही शकलं यार.. खूपच पुढे गेली ती.. मी विचार केला त्या ही पलीकडे.. आज खरच जीवन नकोस झालंय.. एक वेडी आस होती यार ती परत येईल ह्याची.. पण आत्ता सगळं संपलंय रे.."

"ए राघव काय नको ते बोलतोयस मित्रा.. आज ऑफिस सुटल्यावर मी तुझ्या ऑफिसजवळ येतोय.. आपण भेटुयात.."

"तो पर्यंत उशीर होईल रे.."

"काम जास्त आहे का?? मग किती वाजता येऊ?? आत्ता येऊ??

"तिला फक्त विचारशील?? ती अस का वागली माझ्यासोबत ते??

"हो मी विचारतो तिला.. संध्याकाळी लवकर येतो तुझ्या ऑफिसजवळ"

"ऐकणं डॅड खुप हर्ट होईल यार माझा.."

"तु काय वेड्यासारखं बोलतोयस राघव"

"ड्रिंक करून घरी गेलो ना तर त्याला आवडत नाही रे.. खुप त्रास होतो त्याला पण माझ्यावर खुप प्रेम करतोना म्हणुन ओरडत नाही तो.."

"हे तुला मी सेटरडेला सांगत होतो.. पण देवदास बनायची भारी हौस तुला.. बर ऐक मी 5 वाजता ऑफिसमधुन निघतो.. तुझ्या ऑफिसबाहेरच असेल मी"

"बाय..."

फोन वर बोलुन होताच राघव तसाच ऑफिसबाहेर पडतो.. मेघनाने दरवाजा आड लपुन त्याच सगळं फोनवरच बोलणं ऐकलं असत.. तिला सुद्धा खुप रडु येत असत.. तशीच रडतच वॉशरूममध्ये ती शिरते.. वॉश बेसिनजवळ उभी राहत तोंडावर पाणी मारतच रडु लागते..

अश्यातच संध्याकाळ होते.. श्री बोलल्याप्रमाणे राघव वाट बघत त्याच्या ऑफिसखाली उभा असतो.. मेघना तिच्या मुलीसोबत ऑफिसमधुन बाहेर पडताना त्याला दिसते.. मेघना आणि श्री ची नजरानजर होते..

आज श्री तिच्याकडे रागातच बघत असतो.. मेघना आपल्या मुलीला सोबत घेऊन एक एक पाऊल श्रीच्या दिशेने जाऊ लागते.. श्री तिच्याकडे बघुन न बघितल्यासारख करत राघवला फोन लावत असतो.. राघव त्याचा फोन काही उचलत नसतो..

"कसा आहेस??" मेघना श्री जवळ जातच त्याला विचारते..

"जसा दिसतो मी तसाच आहे.. आतुन आणि बाहेरून सॅम.. तुझ्या सारखा स्वार्थी अजिबात नाही"

"मी पण स्वार्थी नाही आहे श्री"

"ए मेघ पटेल अस बोल.. माझ्या मित्राची काय अवस्था केलीय ना बघ जरा... कधी दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श न करणारा माझा मित्र दारूच्या एका थेंबा शिवाय रहात नाही.. अजुन पण मेघ मेघ करत बसलाय.. एक वेडी आशा ठेवुन होता की तु परत त्याच्या आयुष्यात येशील.. पण आत्ता ते पण नाही."

"मम्माsss.. चल ना.." युक्ता रडक्या सुरातच मेघनाला बोलते."

"तुला मुलगी पण आहे?" श्री युक्तकडे बघतच बोलतो..

"श्री ही माझी मुलगी नाही आहे रे आणि मी नाही राघवला फसवलय.. माझ्याशी लग्न करून तो फसु नये म्हणुन मी स्वतः लांब झालीय त्याच्यापासुन. पण मीच फसले" मेघना रडतच श्री ला बोलते..

(काय झालं असेल नक्की..?? पाहुया पुढील भागात)

©भावना विनेश भुतल