PREMTARANG - EKA PREMACHI MANRANGI KAHANI - 6 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमतरंग - एका प्रेमाची मनरंगी कहाणी - 6 - अंतिम

"राघsss", मेघना पळतच राघवजवळ जाते.

श्री च्या कुशीत अगदी डोळे मिटुन शांत झाला असतो तो..

"ए राघव, काय मूर्खां सारख केलंस तु हे.. उठ बघु", श्री रडतच बोलतो.

"श्री ह्याचे हार्ट बिट्स जाणवतायत मला", राघवच्या छातीवर डोकं टेकतच मेघना बोलते..

"अंकलsss" श्री मोठ्यानेच ओरडतो.

राघवचे डॅड राघवच्या रूममध्ये येतात.. आपल्याला मुलाला अश्या अवस्थेत बघुन ते घाबरून जातात..

"अंकल गाडी काढा.. लगेच हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं ह्याला.. मी आणि मेघना मिळुन ह्याला खाली घेऊन येतो.. तुम्ही अस बघत नका बसु लेट्स गो...." श्री जोरातच ओरडतो.

राघवच्या वडिलांना खर तर सुधरत नसत.. त्यातल्या त्यात स्वतःला सावरत ते तिथु निघतात. सगळेच मिळुन त्याला हॉस्पिटलमध्ये नेतात.. राघवला इमर्जन्सी वोर्डमध्ये नेल असत..

"डॅड भाई कुठेय?? डॉक्टर काय बोलले" राघवची बहिण तिथे येतच विचारते..

राघवचे वडिल काहीही बोलत नसतात.. शांत बसुन असतात..

"अंकलsss मनु आलीय बघा आणि राघवला काहीही नाही होणार. काळजी नका करू", श्री राघवच्या डॅडना सावरतच बोलतो पण राघवच्या डॅडच्या चेहऱ्यावर काहीच प्रतिक्रिया नसते..

जवळपास अर्ध्या तासाने डॉक्टर इमर्जेन्सी वोर्डमधुन बाहेर येतात..

"घाबरण्यासारखं काही नाही.. थोड्या वेळाने पेशन्ट शुद्धीवर येईल", डॉक्टर श्रीजवळ येतच बोलतात..

डॉक्टरांचे शब्द ऐकताच सगळ्यांच्या भांड्यात जीव पडतो..

"श्री मला एक काम आहे मी आलेच", मेघना श्रीजवळ येतच त्याला बोलते..

"तु जीच्याकडे जातेय ती येतेय इथे", श्री अस कोड्यात बोलताच मेघना त्याच्याकडे बघत रहाते..

"जियाकडे चाललीस ना जाब विचारायला??"

मेघना होकारार्थी मान हलवते.

"मी तिला इथे बोलवुन घेतलंय. तस पण राघवला अस काही झालं म्हटलं तर सगळं सोडुन येईल ती."

श्री अस बोलताच मेघना प्रश्नार्थी चेहरा करत त्याच्याकडे बघु लागते.

"सगळी उत्तर मिळतील तुला"

जवळपास अर्ध्या तासाने जिया तिथे हजर रहाते..

"राघव कुठेय श्री??",डोळ्यांत पाणी आणतच ती श्री ला विचारते..

तोच बाकड्यावर एकट्यात हरवुन गेलेल्या मेघनाकडे तिच लक्ष जात..

"हि काय करतेय इथे??"

श्री काहीही न बोलता शांत बसुन असतो..

"मेघss तु इथे??? मुंबईला कधी आलीस तु?? आणि मला सांगितल का नाहीस??

जिया समोर दिसताच मेघना रागाने पेटुन उठते तशीच उभी राहत एक सनसनीत कानाखाली ती तिला मारते.. एक भयाण अशी शांतता संपुर्ण फ्लॉरवर पसरते.. सगळेच मेघना जवळ येऊन उभे रहातात..

"का वागलीस?? का खोट बोललीस माझ्याशी?? माझ्या राघवच्या ह्या अवस्थेला तु जबाबदार आहेस?? प्रत्येक गोष्टीत मला फसवलस तु?? मला माझ्या राघव पासुन लांब केलंस.. मिच मुर्ख माझ्या प्रेमाला विश्वासात घेऊन सगळं न सांगता त्याच्यापासुन घाबरून लांब पळाले.." मेघना डोक्यावर जोर जोरात हात मारत रडु लागते.

श्री राघवच्या बहिणीला सांगत तिला सांभाळायला सांगतो.

राघवची बहिण तिला धीर देतच आपल्या कुशीत घेते..

"मनु हिने माझा विश्वास घात केलाय.. माझं माझ्या राघववर खुप प्रेम आहे.. हिने.. हिने मला त्याच्यापासुन लांब केलं.. मी हि पाच वर्षे कशी काढलीत त्याच्याशिवाय हे नाही सांगु शकत.. श्री हिला विचार ही माझ्यासोबत अस का वागली मला हिने का सांगितलं राघवने लग्न केलं म्हणुन."

"जिया काय मिळालं हे सगळं करून??", श्री रागातच जियाला विचारतो..

"राघवने ज्या दिवशी कॉलेजमध्ये प्रवेश केलेला त्या दिवसापासून मला तो आवडायचा.. हिला मी बोलली सुद्धा.. "जिया तो अजिबात चांगला मुलगा नाही.. टपोरी वाटतो.. पहिल्याच दिवशी आल्या आल्या मला त्रास देतोय ह्यावरुन तुला कळत नाही का तो कसा आहे.." अस हि मला बोलली.. तरी हिच बोलणं मी इग्नोर केलं.. बट जेव्हा केव्हा त्याच्याशी बोलली की हि मला त्याच्या बद्दल नको ते सांगायची.. बट माझं खुप प्रेम होत त्याच्यावर आणि अजुनही आहे.. मी तर संधीच शोधायची त्याच्यासोबत बोलण्यासाठी.. तो लायब्ररीत दिसला की मी तिथे जायची, तो केंटींगमध्ये दिसला की मी तिथे जायची.. पण जस ट्रिप वरून हि आली तस राघव हिच्याजवळ जास्त वळु लागला. मी दिसले की मला इग्नोर करायचा.. आणि ह्या मॅडम ज्या मला सांगायच्या राघव पासुन लांब रहा एन्ड ऑल त्या मात्र त्याच्या प्रेमात पडल्या होत्या.. सगळं चांगलं हिच्याच बाबतीत होत होतं.. कॉलेजमध्ये पण हिच टोपर्स, सगळी लोक हिच्याच मागे पुढे करायची.. ज्याच्या मी प्रेमात पडले तो पण हिच्याच प्रेमात पडला.. मग मीच ठरवलं बस झालं.. आत्ता अजून नाही.. तस पण सुरुवातीपासून मला हिचा फक्त नि फक्त रागच येत होता.. राघव माझा नाही तर हिचा पण नाही हे मी तेव्हाच ठरवलेल.. प्रत्येक वेळेला मी त्याला आणि हिला लांब करण्यासाठी प्रयन्त केलेले.. पण सुरुवातीपासुन प्रत्येक प्रयन्त माझा असफल ठरला.. पण शेवटी नशीबाने माझ्या बाजुने साथ दिली.. आणि हि दोघ वेगळी झाली.. सगळंच माझ्या प्लॅन नुसार ठरलं.. आपण ज्या हॉस्पिटलमध्ये तुझं मेडिकल चॅकअपसाठी गेलेलो तिथे माझ्या कझिनचा मित्र काम करतो.. त्याच्या ओळखीने मी तुझ्या रिपोर्ट मध्ये फेरबदल केले.. डॉक्टर जे तुला बोलले तस तुला काहीच झालं नव्हतं.. मला माहित होतं तु इतकी मानी आहेस की तुला अस काही झालंय हे कळल्यावर तु स्वतःहुन राघवपासून लांब होशील आणि तसच झालं.. तु लांब झालीस.. आज ना उद्या मी माझं राघवसमोर प्रेम व्यक्त करून त्याला आपलंस करण्याचा प्रयत्न करत होते.. हा श्री पण मला मदत करत होता..

जिया अस बोलताच मेघना श्री कडे बघत होती..

"हि ने अस काही केलं हे मला खरच माहिती नव्हत ग मेघ.. मी फक्त माझ्या मित्राने त्याच्या नवीन संसाराला सुरुवात करावी म्हणुन ह्या दोघांना एकत्र आणत होतो.. जियाला राघवचा पास्ट माहिती असुन ती त्याच्याशी लग्न करायला तैयार आहे हे बघुन मला तर हिच्या बद्दल सहानुभूती वाटु लागली.. बट हि अशी आहे हे आज इथे आत्ता तुझ्यासमोर मला कळतय."

"राघ हिच्यासोबत लग्न करायला तैयार आहे??" मेघना डोळे पुसत श्रीकडे बघतच त्याला विचारते..

"उत्तर तुझ्या समोर आहे ना ग मेघ.. जर त्याने हिच्यासोबत फ्युचरची स्वप्न बघितली असती तर तुला मुलगी आहे हे कळल्यावर त्याला इतका त्रास नसताना झालं?? मी खुप समजवल त्याला. एकदा जियाचा विचार कर.. बट कधी हो सुद्धा नाही बोलला आणि नाही सुद्धा नाही.. तेव्हा मला सुद्धा कुठे तरी अस वाटु लागलेल की त्याला जियाबद्दल फिलींग आहेत.. बट आज त्याने प्रुफ केलं की त्याला फक्त नी फक्त त्याच्या मेघ बद्दलच फिलींग आहेत.."

"जिया कॉलेजच्या पहिल्या दिवशी राघवची आणि माझी ज्या पद्धतीने भेट झाली त्यावरून मी त्याच्याबद्दल तुझ्यासमोर माझं मत मांडला. माझी बेस्ट फ्रेंड मानायची मी तुला.. तुझी काळजी वाटायची म्हणुन प्रत्येक क्षणाला मी तुला अगदी हक्काने ओरडत आलीय.. माझ्या सगळ्या पर्सनल गोष्टी मी तुला सांगत आली बट तु माझ्या त्याच स्वभावाचा फायदा घेतलास ग.. तुला राघव आवडतो हे तु मला बोलली होतीस बट राघव कॉलेजमध्ये येण्याआधी तुला अशी खुप जण आवडायची जिया.. तु राघवच्या प्रेमात आहेस हे मला आत्ता तुझ्याकडुन कळतंय.. आणि एकतर्फी प्रेमाला महत्व नसत.. आपण समोरच्याला ज्या नजरेने बघतो त्याच नजरेने समोरचा आपल्याला बघतो का हे बघ ना?? आणि कॉलेजमधल्या ट्रिपमध्ये घडलेल्या प्रसंगाने मला राघवच्या प्रेमात पाडायला भाग पाडल ग... तेव्हा मला माझा राघव कळला.. बट मी हे सगळं सांगुन तुला काहीच कळणार नाही किंवा तुला फरक सुद्धा पडणार नाही कारण तु फक्त स्वतःचा विचार करत आलीस आत्तापर्यंत.. कधी कधी मला तुझ्या स्वभावातून जाणवायचं ग जिया बट मी मात्र तुला बेस्ट फ्रेंडच समजत आले.. आपल्या बेस्ट फ्रेंडमधल्या न आवडणाऱ्या गोष्टी इग्नोर केल्या मी.. शेवट पर्यंत मी तुझ्यासोबत प्रामाणिक राहिली.. आणि मी माझी मैत्री निभावली.. बट तु माझं प्रेम माझ्यापासुन कायमच दुर करायला चालली होतीस ह्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करणार.. आणि मी तुला शिव्या श्राप सुद्धा नाही देणार.. कारण मला माझा राघव मिळलाय आत्ता. मला नाही फरक पडत तु माझ्याशी कशी वागलीस पण तुला मात्र हि गोष्ट रोज आठवेल की तु माझ्यासोबत खुप वाईट वागलीस."

मेघना आपले डोळे पुसतच आत राघवच्या रूममध्ये जाऊन बसते.. त्याच्या हात आपल्या हातात पकडत एकटक त्याच्याकडे बघत असते.. खुप वर्षांनी ती इतक मनमोकळेपणाने त्याच्याकडे बघत होती..

काही तासांनी राघव शुद्धीवर येतो.

"डॅडsss ", शरीराची थोडी हालचाल करतच तो बोलतो..

राघवचा आवाज ऐकुन मेघनाला थोडं हायस वाटत..

"राघss" मेघनाचा आवाज ऐकताच तो डोळे उघडतो..

"तु??? डॅडsss डॅडsss" प्रश्नार्थी चेहरा करतच तो मेघनाकडे बघतो आणि मोठं मोठ्याने डॅडला आवाज देऊ लागतो..

राघवच्या डॅडसोबत श्री, आणि त्याची बहिण सुद्धा आत येते..

"हिला इथुन जायला सांग", राघव श्री कडे बघतच बोलतो..

"राघव दोन मिनिटं मी जे काही बोलतो ते ऐक मग तुला जो काही डिसीजन घ्यायचाय तो तु घे." श्री जे काही घडलं ते सर्व राघवला सांगतो.. राघव डोळ्यांत पाणी आणतच मेघना कडे बघतो..

"आय एम सॉरी.. मला नको ना लांब करुस तुझ्यापासुन.. माझं कोणीच नाही रे ह्या जगात.. प्रत्येक क्षणाला तुला मिस केलं मी राघ.. तुझी स्वप्न माझ्याकडुन पुर्ण होणार नाहीत अस वाटलं रे म्हणुन मी लांब झाले पण जियाने फसवल मला आणि मी फसले.." मेघना रडतच राघवला बोलते..

राघव श्रीचा आधार घेत बेडवर एका उशीच्या आधार घेत टेकुन बसतो.. मेघना रडत असते.. राघव एकटक तिच्याकडे बघत असतो..

"माझी युक्ता कुठेय??" राघव हसतच तिच्याकडे बघत तिला विचारतो..

"आपल्या घरी ठेवलीय.. जयराम सोबत" मेघना पण आपले डोळे पुसत हसतच त्याला बोलते..

"ओहह हो लगेच आपलं घर हां" श्री मेघनाला चिडवतच बोलतो..

"भाई जरा डॅडकडे पण लक्ष दे" मनु अस बोलताच राघव आपल्या डॅडकडे बघतो..

"डॅड आय एम सॉरी.."

राघवचा डॅडचा हात उठतो तो थेट राघवच्या गालावर..

"डॅडss" राघव गाल धरतच आपल्या डॅडकडे बघतो..

"आत्तापर्यंत अनेक चूका केल्यास पण त्याने मी कधी एवढं हर्ट नाही झालो ही खुप मोठी चूक केलीस म्हणुन नाईलाजाने माझा हात उचललाय मी.."

"परत नको उचलत जाऊस तो हात.. खुप जोरात लागतो.." गाल चोळतच तो आपल्या डॅडला बोलतो..

"अंकल मग आत्ता आपल्याला कामाला लागल पाहिजे.. भरपुर काम आहेत.. लग्न नाही करायचं असा म्हणणारा आपला राघव उद्याच लग्नासाठी तैयार आहे.. काय बोलतोस राघव"

"आत्ताच..." हसतच मेघनाचा हात आपल्या हातात पकडतच तो बोलतो..

जिया लांबुनच आत जे काही चाललं ते बघत असते.. माफी मागण्या इतपत सुद्धा तिने जागा ठेवलेली नसते.. आज ना उद्या तिला तिच्या कर्माची शिक्षा ही मिळेलच.. आणि मुळात मेघना सारख्या मैत्रिणीला ती कायमची मुकली ह्याहुन मोठी शिक्षा तिच्यासाठी असुच शकत नाही..

साधारण वर्ष भराने

"डॅड मम्मा बद दूध पीत नाही.. मम्मा दूध फिनिश कल बघु.. मला माझा होणाला भाऊ नाही तल बहिण हेल्दी हवेत हा.. डॅड लवकल ये बदु तु", युक्ता आपल्या बोबड्या बोलातच राघवला आवाज देत तिच्या मम्माची त्याच्याकडे कम्प्लेन्ट करत असते..

"माझा हा बच्चा परवडला.. खुप समजदार आहे (राघव युक्ताला उचलून घेतच बोलतो)बट हा मोठा वाला अजिबात नाही (एका हाताने मेघनाच नाक खेचतच तो बोलतो..

"आहह" मेघना थोडं कळवळतच बोलते..

"मेघ मी हळुच नाक खेचल हा तुझं"

"म्हणुन नाही रे राघ बेबीने किक मारली"

"बड मम्मा म्हणजे बेबीला पण दुध हवंय.. आत्ता फिनिश कल बघु तो ग्लास.. नाहीतल मी आजोबांकडे कम्प्लेन्ट कलेल हा तुझी."

"राघ ही आजकाल मला खुपच धमकी देते हा"

"बरोबर तर बोलतेय.. युक्ता मम्मा ऐकली नाही तर असच दम जा.."

"येस डॅड"

राघ आणि मेघच प्रेम दिवसेंदिवस जशी वाट भेटेल तस तरंगतच चालले होते. एक क्षण सुद्धा दोघेही एकमेकांपासुन दूर असेल घालवत नव्हते. न्यु प्रोजेक्ट सोबत मेघनाने सुद्धा राघवच्या कंपनीत एंट्री घेतली होती.. युक्ता राघवला डॅड बोलू लागली.. मेघनापेक्षा ती त्याच्या सहवासात जास्तच रमली.. कोणाची तरी नजर लागेल इतकी छान फेमिली आपल्या राघ आणि मेघची झाली होती आणि आत्ता न्यु फॅमिली मेंम्बरच स्वागत करायला सगळेच सज्ज होते.. सगळं काही हॅप्पी झालं होतं राघ आणि मेघ मध्ये.

आणि फायनली ह्या कथेचा झालाय..

😊The Happyy End😊

©भावना विनेश भुतल


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED