Hokar - 1 books and stories free download online pdf in Marathi

होकार - 1

भाग-१


(नमस्कार मंडळी..पुन्हा आले नवीन कथेसह....माझी ही कथा होकार... या कथेविषयी सांगायचं झाल तर ही कथा त्या दोन माणसांची आहे ज्यांच मन नकळत एकमेकांमध्ये गुंतत जाते....साधी,गोड़ प्रेमकथा ज्यात काही प्रॉब्लमस नाहीत..☺️एका होकाराने आपल आयुष्य कस पूर्ण होऊ शकते यावर आहे ही कथा.....)


#होकार...!!


आज माझ्या खास आणि जवळच्या मैत्रीणीचा साखरपुडा होता म्हणून तिच्या घरात नुसती गड़बड़ चालू होती......पाहुणे येत होते.......खान पिन चालू होत.....मी मात्र एका बाजूला शांत उभी राहून सगळ बघत होते......माझी मैत्रीण कामिनी,तिचा साखरपुडा आताच झाला म्हणून ती तिच्या होणाऱ्या नवरयासोबत फोटोज काढण्यात बिझी होती......मग आंगन थोड़ रिकाम झाल......खुर्च्या ही रिकामया झाल्या.......होणारच पाहुणे जेवायला जे गेले होते.........मग माझी मैत्रीण मला स्टेजवर बोलवु लागली,पन तिकडे नवरयाकडील माणसच होती.......म्हणून मी तिला नकार कळवला.......आणि खालीच उभी राहिले........मला एकंदरीतच खुप बोर होत होते........कारण कामिनीच्या लग्नासाठी मी नाशिक हुन तिच्या गावी गडहिंगलजला आले होते मग काय ओळखीच अस कोणी नव्हतं.......माझ्या फ्रेंडची बहिन तर आहे पन तीं सुद्धा तिच्या मित्र मंडळी सोबत होती........सगळे आपल्या आपल्यात गुंतले होते.......माझे पाय दुखु लागले म्हणून मी मागच्या रो मधील खुर्चीवर बसले.......
तेवढ्यात कोणीतरी माझ्या शेजारी येऊन बसल........मी कोन बसलाय मुलगा की मुलगी हे पाहिलेच नाही..........खुपवेळाने माझ्या बाजूला बसलेली व्यक्ती बोली........
"आआ कोल्डड्रिंक....नाही घेणार का???........व्यक्ती.."मी त्याच्याकडे न बघताच त्यांच्या हातातली कोल्ड्रिंक घेतली आणि घटकन प्यायले कारण,मला वाटल तो माझ्या ओळखीतला आहे आणि ती कोल्ड्रिंक मला देतोय.......आणि मला तशी तहांन लागली होतीच....."थैंक्यू...........मी त्याच्याकडे न बघताच बोले...""आ काय केलास अग हे....माझी उष्टि कोल्ड्रिंक प्यायलीस😃😂😅.........."तो व्यक्ती असा बोल्यामुळे मी तोंडाला हात लावला आणि त्याच्याकड़े पाहिले............समोर एक २६ वर्षाचा मुलगा ऑरेंज कलरचा कुर्ता आणि व्हॉइट झब्बा घालून बसला होता..........गोरापान रंग..! थोड़े लाईट ब्राउन डोळे..! सिल्की केस..! शेव केलेली थोड़ी बियर्ड..! जिम करून केलेली त्याची ती बॉडी..! खुप हैण्डसम दिसत होता तो........माझ्याकडे बघत स्माईल करत होता........त्याची स्माईल सुद्धा खुप गोड़ होती........मी तशीच शांतच राहिले.........मला आता काय बोलू सूचत नव्हते......"अअअअअ ससससस मीमीमी तेते ते...मला........मी घाबरत बोले.."मी खुप घाबरले हे बहुतेक त्यांला समजलेच असावे......म्हणून तो फक्त स्माईल करत होता...."ईट्स ओके...समजल मला की तुझ लक्ष नव्हतं..........तो..."तो खुप शांतपने बोला.........पण मी अजूनही घाबरलेलीच होती.........तेवढ्यात कामिनीने मला स्टेजवरुन आवाज दिला........पहिल्यांदा कामिनीने योग्य वेळेवर आवाज दिला होता........मी त्याच्यापासुन नजर चोरत स्टेजवर गेले.......तो अजूनही मला बघत होता.......कामिनी आणि मी तिच्या खोलीत गेलो........


सगळ घर आता थोड़ रिकाम झाल होत.......आज साखरपुडा व्यवस्थित झाला.......रात्री मला झोप येत नव्हती..........मी केलेला वेडेपणा मला राहून राहून आठवत होता........आता टेंशन याच होत की आठवडाभर अजुन मला इथेच राहयच होत आणि तो ही इथेच असनार ना........त्यांला कस फेस कराव हेच मला समजत नव्हतं.........कारण एखाद्या अनोळखी व्यक्तीची उष्टि कोल्ड्रिंक मी प्यायले होते,तस माझी त्यात काही चूक नव्हती पण तरी,मी आधी बघायला हव होतच त्यांला कस वाटल असेल,तो तर मला वेडीच समजत असणार..........म्हणून मला त्यांच्यासमोर जायला आता लाज वाटत होती........


●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●


{चौथा दिवस...सकाळी}इतके दिवस मी कसबस स्वतःला त्याच्यापासुन लपवलेच नंतर तो ही मला दिसला नाही म्हणून मी जरा टेशन फ्री होते........तर आज सगळ्या बायका मिळून साडी खरेदी करणार होते.........संध्याकाळी मेहंदी फंक्शन होत म्हणून..........बायकाच नाहीतर पुरुष मंडळीही आज कपड़े खरेदी करणार होते........ऐका बाजूस महिला मंडळ आणि दुसऱ्या बाजूस पुरुष मंडळ खरेदी करत बसले होते........मी सुद्धा त्यांच्यात बसले.......तेवढ्यात तो आला.......आधी माझ लक्ष नव्हतं तो तर आल्यापासून मलाच पाहत होता.......त्याची नजर काही माझ्यावरुन हटत नव्हती.........हे सगळ पूर्वाने(कामिनीची बहिन) घेरल.........ती मला कोपर मारून बोलवु लागली...."तेजा दी ऐक ना..............पूर्वा""हम्म बोल पूरवे...काय झाल?...........मी तिच्याकडे न पाहता बोले...""तेजा दी अग वैभव दादा तुला केवहापासुन एकटक बघतोय😂..............पूर्वा हसतच म्हणाली..""कोण वैभव?................मी प्रश्नार्थी नजरेने विचारल""तो बग तो ग...............पूर्वा मला डोळ्यांनी इशारा करत बोली"मी समोर पाहिले तर तो बसला होता...........मल धक्काच बसला..........आणि खरच तो मला पाहतोय हे कळताच मला थोड़ी लाजही वाटू लागली आणि त्याची भीति सुद्धा वाटायला लागली..........मला वाटल कदाचित तो त्या प्रकारामुळे अजुन ही हसतोय माझ्यावर..........त्यांला समोर बघून मला तर ठसकाच लागला..........मी जोरात खोकु लागले.........आणि पानी पिण्यासाठी किचनमध्ये आले...........पानी पिउन मी बाहेर जाणारच होते की तो आत आला....मला आता अजुन बावरल्या सारख झाल...........तो हळूहळू माझ्या समोर येऊन उभा राहिला..........मी पुढे जायला निघाले तर त्याने माझां हात पकडला..........माझ हॄदय धड़धड़ करू लागले,दूसऱ्या मुलाने हात पकडला असता तर कडचित मी त्यांला मारल असते पण का कुणास ठाऊक ह्याला मारावस नाही वाटल,उलट त्याचा स्पर्श मला जादुई वाटला..........तो पुन्हा माझ्या समोर येऊन उभा राहिला..........मी तर नजर खाली झुकवूनच होते...."तू मला पाहीलस की घाबरतेस का तेजश्री...??..............तो"त्याच्या तोडून माझ नाव ऐकायला खुप छान वाटत होत.........अस वाटल अंगावरून कोणीतरी मोरपीस फिरवतय..........पन मनात आता प्रश्न निर्माण झाला की याला माझ नाव कस माहित...???
"ककक काही नाही....पन तुम्हला माझ नाव कस माहित??..................मी""हो माहित आहे....ते नंतर सांगतो..आधी मला जे बोलायच आहे ते ऐक................तो माझ्या डोळ्यात बघून बोला""हम्म............मी खाली मान करून बोले""I Love You....तेजश्री.....मला तू आवडतेस..माझ्याशी लग्न करशील का..???........माझी लाइफ पार्टनर होऊन मला आयुष्यभर साथ देशील का??..............तो बिंदास्तपने बोलला.."त्याच्या या वाक्यावर मी काय बोलू मला सूचलेच नाही....अचानक अस घड़ल म्हणून माझी बोलतीच बंद झाली..........माझा मेंदू काम करायचा बंदच पडला..........हृदय झटका आल्यासारख धड़धड़ करत होते.........आणि आजुबाजुला गिटार वाजत होते.........तो माझ्या डोळ्यात पाहत होता..........त्याच्या डोळ्यात मला कुठेच खोटेपना नाही दिसला.........पन प्रेम...अस पटकन होते का???........ हा प्रश्न तेव्हा सारखा मनात काहूर माजवत होता...."पपप पण ते...अस पटकन???.............मी चाचरत विचारल""नाही....ऐक माझ......तुझी फ्रेंड कामिनी तिच्या नवरयाचा मी मित्र आहे......जस तू आणि कामिनी आहेत तस...आणि हो कामिनीचा मी जवळचा नातेवाईक पण आहे,हव तर तू तिला विचारु शकते........एकदा जेव्हा कामिनी आणि काशीनाथ भेटानार होते तेव्हा मी काशीनाथ सोबत तुमच्या ऑफिस खाली आलो होतो.........तेव्हा तिकडे पहिल्यांदा मी तुला पाहिला आणि तुझ्यात गुंतलो.........खुपदा तुझ्या ऑफिस ख़लून तुला बघायचो मी......तुझा पाठलाग करायचो.....एकदा तू काही अनाथ मुलांना जेवण देत होतीस तेव्हा तुला पहिल मी, खुप गोड़ वाटत होतीस तू,अगदी तुझ्या स्वभावा सारखी.......पण नंतर तू दिसायची बंद झालीस......मला ही काही कळेना,तुझ्या ऑफिस मध्ये ही विचारल ते बोले की, तू आता इकडे काम करते नाहीस....मी खुप उदास झालो,कामिनीला तरी अस विचारण योग्य नाही वाटल मला......पण साखरपुडयाच्या दिवशी मी तुला अंगनात पहिल........आणि मला समजलच नाही की तू खर इकडे आहेस की मी स्वप्न बघतोय.....मग पूर्वा कडून तुझा स्वभाव,आवड़,माहिती सगळ समजून घेतल........मग तुझ्या शेजारी कोल्ड्रिंकच कारण काढून बसलो.......(हसत)...पण तेव्हा तू.......😂😂.....तेजश्री माझ मन आणि मेंदू दोन्ही ही एकच मला सांगत होते की,ज्या मुलीची मी as a life partner म्हणून वाट पाहत होतो....ती तूच आहेस....खरच हे सगळ अस पटकन का झाल मला नाहीत माहित पन..हो माझ हे अट्रैक्शन नाही खर प्रेम आहे तुझ्यावरच...तुला पाहिल खुप विचार केला आणि मग मनाशी ठरवले लग्न फक्त तुझ्याशीच......बग मला तुला गर्लफ्रैंड नाही सरळ माझी बायको बनवायचा आहे...प्रधान घराची सुन बनवायचा आहे......माझ्या मित्रांची वहिनी बनवायचा आहे.....मझ्या मुलांची आई बनवायचा आहे.......तू मला ओळखत नशील पण मी तुला ओळखतो.....अग मी तर माझ्या आई,बाबाना ही सांगितले आहे तुझ्याबद्दल......त्यांना माझी निवड चालणार आहे......त्यांनी तर तुला न बघताच होकार दिलाय.......म्हणूनच कामिनीकडून तुझ्या आयुष्यात कोणी आहे का ही माहिती आधी काढली मी......सॉरी मी अस..पण काय करू....राहवल नाही मला.....बग तेजश्री होकार द्यायचा की नकार हे तू ठरव मी जबरदस्ती नाही करणार...आणि माफ कर मला मी अस न विचरता तुझा हात पकडला....तुझ्या उत्तराची वाट बघतोय...............तो माझा हात सोडत बोला"मला त्याच्या बोलनयावर काय रिएक्ट होऊ कळतच नव्हते........मी तेव्हा फक्त बेशुद्ध पडायचे बाकी होते......याने तर त्याच्या आई बाबानी ही सांगितले होत कमाल आहे........बराच डेरिंगबाज आहे हा अस मी मनात म्हंटल.......मग मी कशीबशी नजर चोरत किचनमधुन बाहेर पडले आणि सरळ खोली गाठली......क्रमशः

(तर मग तुम्हाला पहिला भाग आवडला असेल अशी मी आशा करते........किती छान प्रपोज केल ना वैभव ने तेजाला........आता पुढे बघुया क़ाय होतय........मला ही कथा आधीच सूचली होती,वाटल म्हणून पोस्ट केली........ही कथा अशी आहे की,अस बऱ्याचदा घडत.......म्हणजे एखदया लग्न समारंभात आपली ही सेटिंग होते😅😂खुप साधी आणि गोड़ कथा आहे,मला कमेन्ट्स करा यार नुसते स्टार देता पण कशी वाटली कथा हे सुद्धा सांगा........मला आजुन प्रोत्साहन मिळेल ना.....बाकी तुमचा स्पोर्ट असाच राहुदे.....Stay tuned ☺️Keep supporting)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED