Yes - 3 books and stories free download online pdf in Marathi

होकार - 3

भाग-३

माझा आजचा दिवस ही मस्त गेला..........रात्री सगळ्या मूली हिरवा चूड़ा भरत होत्या..........सगळ्यांनी मला ही चूड़ा भरायला सांगितला शेवटी मी आणि पूर्वा करवली होतो ना............आणि माझी मेहंदी ही सुकली होती म्हणून मी ही चुड़ा भरायला बसले............तेवढ्यात सविता काकू मधेच बोल्या...........


"क़ाय ग तेजा..............सविता काकू"


"हु क़ाय ओ काकू?????..............मी'


"आज सकाळीच मेहंदी काढली होतीस ना,आणि आता बग किती काळी झाले...एवढी तर कामिनिची पण नाही झाली...म्हणजे तुझा होणारा नवरा तुझ्यावर खुप प्रेम करत असणार..................सविता काकू माझ्या हाताकडे पाहत बोल्या"


सविता काकू बोल्या तस सगळ्यांच्या नजरा माझ्या हाताकड़े वळल्या..............वैभव ही तिकडे बसला होता.............त्याने हे ऐकला आणि कॉलर ताठ करून माझ्याकडे पाहून हसू लागला,मलाही आता हसू येत होता...............मग पुन्हा आम्ही चुड़ा भरू लागलो..........चुड़ा भरताना माझ्या हातात दोन बांगडया फुटल्या,माझ्या हातातुन रक्त ही वाहु लागला...........माझ्या डोळ्यात पटकन पाणी आल.............तस वैभव काहीच विचार न करता पळत माझ्या जवळ आला आणि माझ्या हातावरील रक्त रुमालने पुसू लागला..........


"क्या अंकल जरा देख कर भरो चूड़ी,लग गयी ना उसको....क्या आप भी,ऐसे कैसे करते हो आप.................वैभव बांगड़ी वाल्यावर वैतागत बोला"


"अअअअअ असुदया आहो ते इतक काही नाही.............मी"


"वैभया दादा हात सोड आता थांबल रक्त😂आता क़ाय तिचा गोरा रंग पुसतोस की क़ाय,पण तो ओरिजनल आहे हु😂🤣...........पूर्वा त्यांला चिडवत म्हणाली"


"आआआ ह्म्म्म....सॉरी तेजश्री..............वैभव बाहेर पळत बोला"


तो बाहेर लाजतच गेला तस सगळ्या बायका हसू लागल्या............सगळ्यांना आता कळत होत की वैभवच माझ्यावर प्रेम आहे आणि का नाही कळणार तो वागायचा तसा🤦..............जेव्हा त्याने माझा हात पकडला तेव्हा माझ्या अंगात वेगळीच शीरशीरी आली..........त्याचा पहिला स्पर्श वेगळाच जानवला मला.........मैजिकल टच म्हणतात ना तस काहीस...........आणि मी त्याच्या विचारात हरवले......


"तेजा बाई,माहित आहे हो आम्हाला सगळ..........सविता काकू"


"ककक क़ाय काकू................मी"


"अग अस क़ाय करालीस..आम्ही क़ाय म्हणालोय तुला कळना होय..................गायत्री काकू(कामिनिची आई)"


"नाही की ओ,क़ाय ते??............मी घाबरत बोले"


"अग आमच्या वैभया न तुला क़ाय म्हणतात ते परपोज़ दिलाय नव्ह..............गायत्री काकू"


"आय,परपोज़ नव्ह प्रपोज,ते प्रपोज करतात,देत नाही😂लग्नाची मागणी महण तू उगा शब्दानची वाट लावायलीस😂............पूर्वा"


"तू गप ग,बर तेजा क़ाय उत्तर दिलीस मग.............गायत्री काकू"


"काकू मी आजुन काही उत्तर दयायला नाही.............मी"


"का ग आमचा वैभ्या तुला आवडत नाय व्हय..............गायत्री काकू"


"नाही नाही तस नाही.............मी पटकन बोलून गेले"


"म्हणजे वैभ्या तुला आवडतो...........कामिनी"


"हम्म्म्म..............मी लाजतच बोले"


"अग बाई कसली भारी लाजतीस ग,खरच वंस आज आल्या नाहीत पण त्यांना तू नक्की पसंत असणार,तुला त्या नकार देउच शकत नाहीत..............गायत्री"


"आय,अग दादान आत्त्याला आणि काकाला सांगितला पण हाय,त्यांना तेजा दी लई आवडले..............पूर्वा"


"हे बाकी भारी झाल...............सविता"


"होय...ख़र सांगते तेजा वैभ्या लई चांगला मुलगा आहे,खुप जीव लावतो ग तो तुला....आम्ही इतके दिवस बघालोय की....आम्ही क़ाय जबरदस्ती करत नाही पण बाळा निट विचार करून होकार दे...या होकारान तुझ चांगलाच होणार हाय.............गायत्री"


"होय काकू.............मी"


"आय,बाकी मज़्ज़ा आहे बाबा दीदीची.....मगाशी मी चुड़ा भरताना मला लागल तेव्हा नाही आला वैभव दादा धावत आणि हिला लागल तर कसला भितरला.....आजकाल खुले आम रोमांस हो रहा है😂................पूर्वा"


"खरच बोलीस बग पूर्वे😂...............सविता काकू"


"क़ाय....एए पूर्वा थांब तू.....तुला आता दनकेच देत असते.................मी तिच्या मागे पळत बोलले"


"ग तेजा हळू पळ.....क़ाय या पोरी😂................सविता काकू"


"पूर्वा, तूच सगळ्यांना सांगितला ना...........मी"


"माझ नावच पूर्वा हाय तर सगळ्यासनी माहितीच पुरवनार नव्ह मी..............पूर्वा पळतच बोली"


"तू ना थांब............मी"


पूर्वा तर माझ्या हातून निस्टली...........मग मी सुद्धा खोलीत गेले.............तिकडे कामिनी तीच सामान बांधत होती...........मी जाउन तिच्या जवळ बसले..........


"आ मीने...ऐक ना,एक विचारायच होत..................मी"


"हम्म बोल की ग...काय झाल,आणि आज माझी परमिशन काढून का बोलायलीस??................कामिनी"


"अग,असच...ते वैभव कोन ग..म्हणजे...............मी अड़खळत बोले"


"ओह.....वैभया बद्दल माहिती हावी तर...............कामिनी चमकुन माझ्याकडे बघत बोली"


"आ अग....ते.....म्हणजे.......(थोड़ थाबुंन)......हो..............मी मान खाली करून बोले"


"तेजा....मला सगळ माहित आहे ग....तुझ ही प्रेम आहे ना त्यांच्यावर?...........कामिनी"


"ह्म्म्म.............मी लाजत बोले..."


"वाव..!!! आ यम सो हैप्पी फ़ॉर यू...............कामिनी मला मीठी मारून बोली..."


"आता तू त्याच्या बद्दल सांग ना..............मी"


"हम्म ऐक...वैभवला मी चांगल ओळखते माझ्या नवरयाचा फ्रेंड तर आहेच आणि माझ्या आत्त्याचा मुलगा ही आहे...............कामिनी"


"हो........मी"


"हो आणि...त्याच नाव वैभव मोहिते आहे....सॉफ्टवेयर इंजीनियर आहे..एका सॉफ्टवेयर कंपनीमध्ये मोठ्या पदावर आहे...स्वतःच घर आहे...तो ही नाशिक मध्ये राहतो................कामिनी"


आणि कामिनी मला त्याच्याबददल सगळ सांगू लागली.........त्याच्याविषयी एकताना खुप छान वाटत होत..........कामिनीला त्याच्या सवयीपासून,आवड,निवड सगळ माहित होत..........वैभव खुप चांगला मुलगा आहे हेच मला समजल होत.........पन मेरा दिल और दिमाग दोनों भी अलग अलग सोच रहे थे..........म्हणून मला काय कराव समजत नव्हतं......


●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●


{पाचवा दिवस.....}


आज हळद होती.............आम्ही सगळ्या जनी खाली बसलो होतो.............सगळ्या जेष्ठ बायका हळदीचे गाणी बोलात होत्या.............आणि कामिनी समोर बसली होती आणि तिच्यासमोर उखळ ठेवली होती हळद पिसायला.............त्यांचा कार्यक्रम चालू होताच.............मी आणि पूर्वा बाहेर फुलांच्या माळा लावण्यात व्यस्त होतो................वैभव त्याचा मित्र अविनाश ते ही इतर काम करत होते.............तेवढ्यात जोरात वाजनारा डी.जे अचानक बंद झाला तस आम्ही हसायला लागलो😂


"अय्य डि.जे वाल्या दादा जरा प्रेमाची गाणी लाव ना हळद संध्याकाळी हाय नव तवर ऐकु दे आम्हाला,ही क़ाय जुनी गाणी लावतोयस..................पुर्वा"


"पुरवे गप ग तो बरोबर लावल तू स्टूल निट धर मी पड़ेंल ग..................माळ लावत मी बोले"


मी बोले ख़री पण पुर्वाच लक्षच नव्हतं..............नंतर पुर्वा अचानक स्टूल सोडून त्या डी.जे जवळ गेली.............मला माहितीच नव्हतं..............मी आपली माळ लावन्यात व्यस्त होते..............वैभवने हे पाहिला म्हणून तो स्टूल पकडायला येऊ लागला तोवर मी टाचा वर केल्या,स्टूल हलायला लागला आणि स्टूल वरुन माझा तोल खाली गेलाच पण वैभवने त्याच्या दोन्ही हातानी मला सावरुन धरल..............मी आणि तो एकमेकांच्या खुप जवळ होतो............


पहिल्यांदा आमची नजर एकमेकांच्या नजरेला भिड़ली होती😍आम्ही एकमेकांच्या डोळ्यात हरवलो...........वरती उभा असलेल्या अविनाशने हे पाहिला आणि चुकुन त्याच्या हातून गुलाबाच्या पाकळयांची टोपली पडली............सगळ्या पाकळया आमच्यावर पडल्या आणि हेच क़ाय कमी नव्हतं की तेवढ्यात त्या डि.जे वर गाण ही सुरु झाल आणि वातावरणच बदलून गेल.........आरर अस क़ाय करताय डोळ्यात बोलताय


हे दिल मे क्या क्या शुरू..


लुपचुप देखे आखों में झांके


हे दिल मे क्या क्या शुरू..


मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा


इश्क का रंग अग बाय बाय बाय बाय..


उधळ उधळ उधळ हो...


उधळ उधळ उधळ हो...समझे क्या छोरी तू


हे सीनाजोरी तू


करती क्यों,आर करती क्यों


बाते फितूरी वोह


दिल की कीजोरी है


खुली यू हा खुली यू


गाड़ी घुमाय के तू सिग्नल दिखादे जरा..आ..


मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा


इश्क का रंग अग बाय बाय बाय बाय..


उधळ उधळ उधळ हो...


उधळ उधळ उधळ हो...हा सगळा सिन चित्रपटात घड़तो तसा घडला..........खऱ्या आयुष्यात अस होत नाही पण आमच्या आयुष्यात झाल..............गाण संपल तरी आम्ही मात्र हरवलो होतो मग पुर्वा जवळ आली आणि जोरात ओरडली तिच्या आवाजाने आम्ही भानावर आलो..............त्याने मला खाली सोडल,काही पाकळया आमच्या अंगावर होत्या त्या आम्ही झटकु लागलो.............आम्हा दोघाना आता कमालीची लाज वाटत होती...............मी तर लाजुन लाल झाले होते.............पण पूर्वाला आता आम्हाला चिड़वायला संधी मिळाली होती........


"(चिडवत)........उधळ उधळ उधळ हो😂वा गुलाबाच्या पाकळया वैगेरा....गुड़ जॉब अविनाश दादा.....आहाहा🤣😂................पुर्वा"


"पुरवे.....एकतर तुझ्यामुळे झाल हे वरुन आता मला चिडव तू....थांब तू...............मी तिच्या मागे पळत बोले"


"वैभया...मज़्ज़ा आहे राव तुझी...अरे कसला सिन क्रिएट झाला महिते तुला...............अविनाश"


"होय की भावा समजल आता चल गप आतमध्ये...............वैभव"


"ह्म्म्म😂मला वाटत काशीनाथ नंतर तुझच लग्न होणार आहे😂.................अवि"


"चल भाई स्वप्न नको बघू.😂...............वैभव"मग आम्ही सगळी काम आटोपली..............संध्याकाळी सगळे मस्त नटुन खाली जमलो..............नवरयाची उष्टि हळद अजुन यायची होती..............आम्हाला तर बसून कंटाला आला म्हणून आम्ही सगळ्या डान्स करू लागलो..........मी सुद्धा त्यांच्यात जॉइन झाले.........काहीवेळाने वैभव तिकडे आला.............माझ लक्षच नव्हतं मी आपली नाचन्यात गूंग होते............तो मला भान हरपुन पाहत होता...........इनशॉर्ट त्याची विकेटच गेली होती..........मग नावरयाची उष्टि हळद आली..........कामिनीला हळद लावली.........पूर्वाने मला ही थोड़ी हळद लावली............आणि आता सगळे पुन्हा जोमाने नाचत होते.............माझ अजूनही वैभवकड़े लक्ष नव्हतं गेल.......
मी तर खुप वर्षानी नाचत होते म्हणून मला तर भानच नव्हतं..............मग आम्ही सगळ्यानी गुलाबाची कळी सॉन्गवर त्यांच्या त्या तशा स्टेप करत नाचायच ठरवले..............आमच्या मागून वैभव आणि त्याची मित्र मंडळी ही आली...........तेव्हा माझ लक्ष वैभवकड़े गेल.............माझ्या चेहऱ्यावरचे भावच बदले............लाजुन चूर झाले होते मी..........हें वैभवला समजल म्हणून तो गोड हसत होता.............सगळ्यांचे पार्टनर ठरले छोट्याशा योगायोगाने वैभव माझा पार्टनर झाला...........डान्स पार्टनर हा.............😄मग आम्ही त्या सॉन्गवर तशा स्टेप करू लागलो......गुलाबाची कळी कशी हळदी माखली ,


आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली ...


नटून थटून लाजते जणू चांदणी--


गुलाबाची कळी बघा हळदी माखली ,


आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली ...


कुणासंगे कुठे कशी, कधी कधी कळेना


कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो ,


कोण हलकेच तार काळजाची छेडतो ,


कधी कधी, कधी कधी देतो कुणी नजरेचा इशारा...


कुणी हरपून देहभान त्यात गुंततो


हे गुलाबाची कळी बघा हळदी माखली ,


आली लाली गोऱ्या गली उतू उतू चालली..पुढच्या स्टेपसाठी आम्ही एकमेकांच्या जवळ आलो.............माझ हृदय तर १०० च्या स्पीडने धावत होते.......त्याच्या नजरेत माझ्या बद्दल प्रेम,आपुलकी,काळजी मला दिसत होती..........माझ्या नजरेत त्यांला काय दिसत असेल हे तर मला नाही माहित............हो त्या नजरेच्या जाळयात आम्ही दोघेही अडकलोच.....♥️😍हं हे हे चढते भिडते जादू नजरेची अशी


नकळत वेड बावर्या जीवाला लागते,


मन विसरून वाट सैरभैर धावते..


गुलाबाची कळी बघा हळदी माखली ,


आली गाली लाली लाली उतू उतू चालली....🌹🌸डान्स करून झाला आणि सगळे टाळया वाजवू लागले..............माझी तर त्याच्याकडे तोंड वर करून बघायची हिम्मत नव्हती होत............नंतर नवरा मुलगा आणि कामिनी दोघेही नाचू लागले..........त्या गर्दीत वैभव कुठे गेला कुणास ठाऊक..............खुप वेळ झाला तरी वैभव मला दिसलाच नाही..............मग रात्री बऱ्याच वेळाने मी व पूर्वा जेवायला मंडपाच्या दुसऱ्या बाजूस गेलो.............तेव्हा जास्त माणस जेवायला नव्हती............खरतर कुनीच नव्हतं.......आम्ही जेवायला सुरवात करत तर होतोच की तेवढ्यात समोरून जिलेबीची प्लेट घेऊन वैभव आला.............मला काही कळतच नव्हतं.............तो माझ्याकडे बघून हसत होता.............मी तर डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत बसले..😯😮😮


"काय रे वैभ्या दादा..हे पन काम सुरु केलास वाटत...🤣इंजीनियर आज काल जिलेबी वाढायला लागले...............पूर्वा त्याला चिडवत बोली.."


"हो ना...प्यार में करना पड़ता है पुरवे...पण तेजा बग ना..माझ्याकडे कशी बघते जस काय मी भूत आहे😂................वैभव माझ्याकडे बघत बोला.."


"अअअ अस ककक काही नाही...तुम्ही अचानक गायब झालात आणि आता आलात ते ही जिलेबीचा ताट घेऊन...म्हणून................मी गड़बड़त हसत बोले"


"तुझ्यासाठी जिलेबीवालाच नाही तर काहीही बनायला तयार आहे मी................तो माझ्याकडे पाहत बोला"त्याच्या या वाक्यावर मी लाजले आणि हे सगळ बघून पुर्वा मात्र हसत होती............म्हणून तिने पटापट जेवन उरकला आणि तिथुन काढता पाय घेतला............वैभव मात्र सारख काही नाही पदार्थ घेऊन माझ्याकडे येत होता..........त्याच्या वागन्यावर मला हसू येत होत............आणि हो त्याच्या तोडूंन तेजा ऐकून खुप भारी वाटल होत मला..............मनात गुदगुलया झाल्या😀एवढ मला वाटून सुद्धा मी अजुन त्यांला उत्तर नव्हतं दिल.....😅क्रमशः

(गायत्री काकू सारखी काकू सगळ्यांना मिळाली पाहिजे नाही का मंडळी😂आणि वैभव ची फॅमिली सुद्धा.........बघा आपली तेजा क़ाय उत्तर आजुन देइना..........बिचारा वैभव किती स्यंमी आहे😊....बर हा भाग कसा वाटला नक्की कमेन्ट करा.....आणि मी मागच्या कथेच्या कमेंट वाचल्या सगळ्यांना वैभव खुप आवडलाय😂वैभवला जाउन सांगायला हव की खुप मुलीं तुझ्या दिवान्या झाल्यात😂पन मग तेजाच क़ाय????🙄🤣)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED