Yes - 2 books and stories free download online pdf in Marathi

होकार - 2

भाग-२

रूममध्ये जाउन मी विचार करत बसले........माझ मन आणि मेंदू दोघ वेगळी उत्तर मला देत होते.........पहिल्यांदा कोणत्या तरी मुलाने अस समोरासमोर मला मागणी घातली ती ही थेट लग्नाची............बापरे!! विचार करून डोक जड़ झाल..............मग झोप केव्हा लागली मलाच समजल नाही..............बऱ्याचवेळाने पूर्वा मला उठवायला आली...........मी डोळे चोळत उठले........"तेजा दी लवकर तयार हो...मेहंदी फंक्शन आता सुरु होइल....मीनू दी खाली गेली आताच.................पूर्वा""अच्छा..आले मी रेडी होऊन..................मी..""हे घे,हा ड्रेस घाल आज................पूर्वा ड्रेस देत बोली""पुरवे कोणी दिला ग ड्रेस?...................मी""आआआ ते अग तू मगाशी ड्रेस न घेता वरती आलीस मग म्हणून मीनू दीदीने हा चूस केला तुझ्याकरता.................पूर्वा""हम्म्म्म...ओके आलेच मी....तू होय पुढं...................मी""हम्म्म्म...पटदिशी ये...............पूर्वा बाहेर जात बोली"


मग मी मस्त फ्रेश झाले............आणि तो ड्रेस घातला............तो रेड कलरचा पंजाबी टाइप ड्रेस होता.............त्यावर मी सागर वेणी घातली...........थोड़ा मेकअप केला..............गोल्डन कलरचे मोठे झुमके घातले..........टिकली लावली..........हातात लाल बांगड्या घातल्या..........डोळ्यात काजळ लावली........आणि झाले मी तयार!!...........का कुणास ठाऊक पण आज आरशात स्वतःला बघताना मी हसत होते...........अस आधी कधीच नव्हतं झाल..........कदाचित प्रेमात पड़त असताना असाच वेडेपणा करावासा वाटतो.............😄ज्याने आपल्याला प्रपोज केलाय तो मुलगा जर आंपल्या जवळपास असणार असेल तर कोणती मूलगी निट नटुन नाही जाणार............सगळ नीट आहे का बघून मी रूम बाहेर आले.......माझ मन हे मान्य नव्हत करत पण हो माझी नजर बाहेर आल्यावर त्यालाच शोधत होती..............मेंदू आणि मन यांची गल्लत करत मी खाली आले..............समोर कामिनी बसली होती तिच्या हातावर मेहंदी काढली जात होती............बाकी सगळे पाहुने एका बाजूस बसले होते.............पण वैभव मात्र दिसत नव्हता...........माझ्या डोळ्यांना फक्त त्यालाच बघायची ओढ़ लागली होती अस का होत होते कळत नव्हतं पन जे घड़तय ते मला आवडत होत............मग काहीवेळाने वैतागुन मी खुर्चीवर बसले तेवढ्यात माझ्या बाजूला वैभव बसला........."कोणाची वाट बघत होतीस,माझीच ना??..........वैभव खुर्ची वर बसत बोलला""नाही ग वैभवची.............मी त्याच्याकडे न बघता बोले""ओह!!! मलाच शोधत होती तर तुझी नजर? म्हणजे माझा अंदाज खरा ठरला म्हणायचा😃..................वैभव माझ्याकडे पाहून बोला"आवाज ओळखीचा वाटला म्हणून मी त्याच्याकडे पाहिला.............त्यांला पाहून माझी कळी खुलली हे ख़र............पण त्याच्या ह्या प्रश्नवर मला काय बोलू समजेना........मी सुद्धा न बघताच बोलून गेले.......म्हणून आता खोट बोलून चालणार नव्हतं............आणि नेहमी सारखा आज ही तो हैण्डसम दिसत होता............त्याच्या डोळ्यात स्वतः ला पाहून तर मी विरघळलेच.............तरी स्वतःला मी कसबस सावरल......"आ अस काही नाही...तुम्ही चुकीचा समजताय...................मी नजर चोरत बोले""अच्छा...मग मंडपात काय फुलपाखरू शोधत होतीस का😅🤣...............वैभव""आ ते हो हो..तसच हव तर समजा...............मी""बर म्हणजे मगाशी तू माझ नाव घेऊन बोलीस तो सुद्धा माझा चुकीचा समज होता वाटत..नाहीतर माझे कान वाजले असतील... माझ वय झालय ना आता😂..........वैभव मला चिडवत बोला""काहीही😂.............मी""बर....बाय द वे...ड्रेस छान दिसतोय तुझ्यावर..म्हणजे माझी चॉइस तुला सूट करते तर...................वैभव हसत बोला...""तुमची चॉइस???...................मी प्रश्णार्थी नजरेने विचारल""हो,अग मला खुप आवडला हा ड्रेस म्हंटल तुझ्यावर अगदी शोभुन दिसेल म्हणून घेतला....आता माझ्या हातून तू घेणार नाहीस म्हणून पूर्वा कड़े पाठवून दिला...सॉरी ह😜..................वैभव जीभ काढत बोला""काय....पूर्वेला ना मी आता सोडत नसते....लई खोट बोलते ना.................मी खुर्चीवरन उठून बोले"मग मी तिकडूंन पळत सुटले आणि पूर्वाला गाठल आणि तिला चांगला चोप दिला..............तो मात्र यावर खुप हसला..............असच दिवसभर तो मला लपुनछपुन पाहत होता...........माझ्या मागे येत होता............मी काय करणार मला तर खुप लाज वाटत होती..............हे अस पहिल्यांदाच माझ्यासोबत घडत होत ना आणि मला ही ते आवडत होतच..............आज फंक्शन होता,सगळ्यांच्या नंतर मी सुद्धा माझ्या हातावर मेहंदी काढली आणि मेहंदी सुकावी म्हणून फैन जवळ जाउन बसले.............तेवढ्यात वैभव तिकडे आला........"वाव!!! खुप सुंदर................वैभव""काय?? मेहंदी की मी?...............मी मुद्दामच प्रश्न करत बोलले""मेहंदी काढलेली तू😍................वैभव माझ्या डोळ्यात पाहत बोला""thanks............मी लाजुन दुसरीकडे पाहत बोलले""उफ्फ!! एक तो नशीले नैंन उपरसे क़ातिलाना अदाए....जनाब हमे मारने का इरादा है क्या😍..............वैभव""काहीही क़ाय..............मी लाजतच""By the way.....छान काढले मेहंदी...............वैभव""हो ना.............मी""आणि तुझी मेहंदी भारी रंगेल बगच तू...............वैभव""एवढ ठामपने कस सांगताय तुम्ही??................मी""कारण माझ प्रेमच तेवढ आहे तुझ्यावर😍आणि अस म्हणतात ना,नवरयाच प्रेम जास्त असेल तर मेहंदी खुप रंगते.................वैभव"यावर मी फक्त लाजले.............त्याने तर ठरवूनच ठेवल होत की तोच माझा नवरा होणार आणि मी त्याची बायको.............पण माझ आजुन काहीच ठरत नव्हतं............वैभव तेवढाच बोलून शांत बसनारा नव्हता..........तो माझ कौतुक करतच होता.........आणि मी फक्त ऐकत होते..............अस वाटत होत त्याने फक्त बोलाव आणि मी ऐकाव..........


मी अस बऱ्याचदा पाहिला होत की मुलानी प्रपोज केल्यानंतर मूली उत्तर दयायला खुप वेळ लावायच्या,तेव्हा मला अस वाटायच की हो किवा नाही बोलून पटकन मोकळ व्हायच ना काही मूली उगाच भाव खातात..........पण आज मी सुद्धा तेच करत होते😂..........आज माझ्यावर ही वेळ आली होती म्हणून मला समजत होत की मूली उत्तर दयायला वळ लावतात कारण, त्यांना त्या मुलाला होकार द्यायच्या आधी जाणून घ्यायचा असत............तो आपली काळजी मनापासून करतोय का........त्याच्यात किती पेशन्स आहेत,आपल्यासाठी तो किती वेळ थांबू शकतो हे पाहायचा असत.........🤗


क्रमशः

(कीती रोमांटिक आहे ना वैभव......किती भारी वाटत ना तेव्हा जेव्हा एखादा मुलगा आपल्यावर जीवापाड प्रेम करतो, आपल्याला चोरुन बघत असतो,आपन जाऊ तिकडे काही न काही कारण काढून फक्त आपण दिसाव म्हणून येतो,तसाच तेजश्रीला ही वाटत होता.....आता बघुया अजुन तेजा वैभवला किती तड़पवनार.........मी आशा करते तुम्हाला माझी कथा बोरिंग नसेल वाटत........काही जनानी मला कमेंट केल्या बर वाटल वाचून.........म्हणून मी कथा लिहितेय, आता लोकांना कथा आवड़ो किवा नाआवड़ो मी कथा लिहित राहणार,माझी आवड़ जपनार आणि हिम्मत नाही हारनार☺️आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा प्लीज,सगळ्यानी करा.........आणि स्पोर्ट असुदया.......तुमचा स्पोर्टच माझी ताकद आहे मित्रानो🤗)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED