होकार - 3 - शेवटचा भाग Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

होकार - 3 - शेवटचा भाग

भाग-४ (शेवटचा भाग)


{सहावा दिवस...}


लग्नाचा दिवस उजाडला.............कामिनी,पुर्वा आणि मी तिच्या खोलीत तयार होत होतो............पूर्वाची तयारी झाली तशी ती बाहेर पळत गेली............मी ही मस्त तयार झाले..............मी आज पिवळया रंगाची नऊवारी घातली होती............त्यावर आंबोडा,गालावर येत असलेल्या दोन बट...........हलकासा मेकअप............गळ्यात ठुशी,आणि लक्ष्मी हार घातला.............कानात झुमके.............नाकात नथ.............हातात हिरव्या बांगड्या.............कमरेला साखळी घातली...............असा सगळा शृंगार मी आज केला होता.........तोवर कामिनी सुद्धा तयार झाली.......



"मीनू...लई भारी दिसतेस ग,आज काशीनाथ दाजी तर गेलेच😂................मी"


"हो क़ा मग वैभव दाजीनच पण क़ाय खर नाही हो आज..................कामिनी"


"गप ग..............मी(लाजत)"


"एक सांगू तुला तेजा...वैभव चांगला मुलगा आहे...तू उत्तर द्यायला वेळ लावतेस हे ठीके पण...तुझ्या मनात ही तो बसलाय मग क़ा वेळ घालवते...बग कोणावर तुम्ही जर प्रेम करता तर पटकन बोलून मोकळ व्हावे..नंतर वेळ निघुन जाते..वेळ निघुन गेली की कोणी पुन्हा येत नाही.......तुझा एक होकार तुझ्या आयुष्यात अजुन आनंद भरू शकतो...सो प्लीज.................कामिनी"


"हो..पण..मी......."



मी पुढे बोलताच होते की कामिनीची आई आली आणि तिला खाली बोलावल.............मग मी कमिनीला मीठी मारली आणि तिच्यासोबत खाली आले.............समोरच वैभव उभा होता...............नेहमी सारखाच हैंडसम दिसत होता.............त्याने ही यलो कलरचा कुर्ता त्यावर फेटा घातलेला.............मला बघून त्याने हॄदयावरच हात ठेवला.............हे बघून मला हसू आल......



मंगळआष्टका सुरु झाल्या तस सगळे उभे राहिले............वैभव माझ्या मागेच उभा होता............अक्षदा मुद्दाम माझ्यावर फेकत होता..............मला तर याच हसू येत होत.........लग्न पार पड़ल.......सगळे जेवायला बसले होते.......मग वैभव माझ्या जवळ आला.......



"आ तेजा...एक फ़ोटो काढूया आपण सोबत...प्लीज म्हणजे..................वैभव"



तो एवढा केविलवाना चेहरा करून बोला कि मी नाही म्हणूच शकले नाही...........मग आम्ही थोड़ अंतर ठेवून बाजूला उभे राहिलो........आणि अविनाशने आमचे दोन चार फोटो काढले........मग तिकडूंन आम्ही जेवायला गेलो.........जेवून झाल्यावर आम्ही चालत गप्पा मारत होतो...........नेहमीपेक्षा आज वैभव जरा कमीच बोलात होता..........थोड़ा उदास ही वाटत होता........पण मी काही विचारल नाही......



"आ बोला ना काहीतरी.................मी"


"हम्म...आता विचारनार काय..सगळ तर महित आहे..............वैभव"


"हम्म...नेहमी पेक्षा आज शांत वाटतंय तुम्ही...............मी"


"एक विचारु का तुला??..............वैभव"


"हु............मी"


"(रडत)........मी चांगला नाही का ग...नाही म्हणजे तू अजूनही तुझा होकर की नकार कळवाला नाही आहेस...मी जबरदस्ती नाही करत आहे हा...फक्त बोलतोय..तू इतका वेळ घेतेस तर मला ना अस वाटतंय की तू नकार देणार आहेस.......आणि मी तुला गमवेन....😢माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम काहीतरी गमवायची भीती मला वाटत आहे..मी तुझ्याशिवाय...आसो तुझ उत्तर मी समजलोय................वैभव"


"त तुम्ही अस..............मी(इमोशनल होत)"


"सॉरी............वैभव"


"वैभया..ए वेभ्या जरा इकड ये...............अविनाश मागून आवाज देत म्हंटला"


"ह्म्म्म...आलो.............वैभव(डोळे पुस्त)"



वैभव तिकडूंन निघुन गेला.........त्याच्या डोळ्यात पानी पाहून माझ हृदय आतल्या आत हुंदके देऊन रडत होते........माझ्यामुळे तो रडला याच मला खुप वाइट वाटल.........त्यानंतर वैभव माझ्याकडे बघत ही नवहता.......बहुतेक त्यांला अस वाटल की मला तो आवडत नाही म्हणून..........कामिनीची पाठवनी झाली.........तिच्यासोबत मी आणि पुर्वा ही पाठराखिन म्हणून जनार होतो..........मग आम्ही पण बैग भरली आणि निघालो........



सगळ्यात शेवटच्या गाडीत ड्राइवर काका,अविनाश,मी,वैभव,पुर्वा आम्ही बसलो होतो...........वैभव माझ्या बाजूला बसला होता.........पण माझ्याकडे बघत ही नव्हता..........उदास होता.........पण मी मुद्दामच त्याच्याकडे सारख बघत होती.........प्रवास करत असताना रात्र झाली.........कधी मी झोपेत वैभवच्या खांद्यावर डोक ठेवल मला ही समजल नाही..........त्याने ही मी झोपली होती म्हणून मला उठवल नाही........


●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●



{सातवा दिवस.....}



सकाळी आम्ही नवरयाच्या घरी पोहोचलो...........मी आणि पुर्वा फ्रेश होऊन.........तयार झालो आणि खाली पुजेसाठी आलो...........वैभव सुद्धा आलेला.........पूजा,जेवण सगळ पार पडल..........आता मी ही नाशिकला जायला निघत होते.........बॅग पैक केली आणि सगळ्यांचा निरोप घेऊन मी निघाले..........मग वैभवला शोधत मी बाहेर आले.......



"आ...Hiiiii....तुम्ही निघनार नाहीत का नाशिकला आज???..................मी"


"हम्म...मी उद्या निघनार आहे अविसोबत...तू चालीस ना आज..................वैभव"


"हो...हे क़ाय निघालेच...जास्त दिवस सुट्टी नाही ना काढता येणार.....आ बर मला सोडाल का तुम्ही बस स्टॉपवर??.................मी"


"ममम..मी....ठीके...चल................वैभव"



मग मी आणि वैभव बस स्टॉपकड़े निघालो...........मी मुद्दामच त्यांला मला सोडायला सांगितले.........मी आज फस्ट टाईम एक मुलाच्या बाइकवर बसले होते.........तो खांद्यावर ठेवलेला हात..........आरशातुन होणारी नजरानजर सगळ आवडत होत मला.........खरच बोली होती कामिनी माझा एक होकार खुप काही घडवू शकतो.........माझ्या आयुष्यात आनंद वाढवू शकतो.........पण तोच देण्याची हिम्मत मात्र होत नव्हती........पण यावर मी उपाय काढला होताच की.........



मग थोड्यावेलाने आम्ही बस स्टॉपवर पोहोचलो.............नाशिकची बस तिकडे उभी होती मी बसमध्ये बसले.........वैभव बाहेर उभा होता.........नकळत त्याच्या डोळ्यात पाणी साचल............माझ्या जीवाची तर घालमेल चालू होती............वैभव खिड़कीतुन मला डोळे भरून पाहत होता जणु मी पुन्हा त्यांला दिसणारच नव्हते..............मी मात्र नजर खाली करून बसले होते..........तेवढ्यात ड्राइव्हर समोरून येऊ लागला.........मग मी पटकन एक कागद वैभवच्या हातावर ठेवला...........त्यांला ही काही समजल नाही..........त्याने पटकन तो कागद उघडून पाहिला.............आणि वाचू लागला.....



प्रिय,वैभव...

क़ाय बोलू हेच कळत नाही आहे.........तुमच्यासोबतचे हे ७ दिवस खुप छान गेले...........हे सात दिवस म्हणजे गोड़ आठवणी आहेत माझ्यासाठी त्या मी कायम जपुन ठेवनार आहे........तुमच्यामुळे मी कोनासाठी तरी स्पेशल आहे ही जाणीव झाली.........तुमच्यात मला हवा असलेला जोडीदार भेटला.........आणि मी धन्य झाले.........मी खुप वेळ घेतला हे सांगायला पण अस याचा अर्थ होत नाही की मला तुम्ही आवडत नाही.............खरतर मला तुम्ही खुप आवडता.........मी ही नकळत तुमच्यात गुंतले........माझ ही तुमच्यावर प्रेम आहे.......



तुम्ही उत्तर विचारल होत ना..........तर माझा होकार आहे.........मला तुमची बायको,प्रधान घराण्याची सुन,तुमच्या मित्रांची वहिनी आणि आंपल्या मुलांची आई व्हायच आहे...........आणि सॉरी माझ्यामुळे तुम्ही रडलात म्हणून.......ही चिठी यासाठीच कारण मला तुमच्याशी बोलायला जरा भीती वाटत होती म्हणून.......भीती कसली खरतर लाज वाटत होती......😅


आता तुम्ही तुमच्या आई वडिलां घेऊन माझ्या घरी या म्हणजे लग्नाची पुढची बोलनी रीतसर करता येईल.........आणि Thank you तुमच्यामुळे आज मला मी पूर्ण झालेय अस वाटतंय............आता फक्त लवकरात लवकर मला तुमची अर्धांगिनी बनवा ♥️

तुमची लवकरच होणारी बायको,

तेजश्री....



वैभव माझा होकार वाचून आनंदाने नाचूं लागला.........मग खिडकीतुन माझा हात पकडला आणि.......


"I love You तेजा♥️......."


मला हे ऐकुन लाजच वाटली........मी सुद्धा मान खाली घालून लाजतच......म्हणाले.....


" I Love you too वैभव..."



वैभव आणि मझ्या डोळ्यात आनंद अश्रु वाहु लागले............यावेळी येणारे अश्रु काही वेगळेच असतात.........मग माझी बस स्टार्ट झाली........आणि मी नाशिकला निघाले........मी जाईपर्यंत वैभव मला बाय करत उभा होता......त्याच्या चेहऱ्यावर भलीमोठी स्माईल होती.........तीं बघूनच मी खुश झाले..........मग माझी बस नाशिकच्या वाटेला निघाली.......



गढ़हिंगलज आणि ते ७ दिवस मागे चालले होते........पण आठवणी मझ्या हॄदयावर कोरल्या गेल्या होत्या कायमच्या...............खरच प्रेम ही खुप भारी फिलिंग आहे............आयुष्यात ना आपल्याकडे सगळ असत पण तरी कायतरी कमी आहे अस वाटत राहत ते हेच.......जेव्हा योग्य जोडीदार आपल्याला मिळतो तेव्हा सगळ मिळाल्याच समाधान असत...........पुर्णत्वाला गेल्याच सुख आज मला मिळत होत कारण माझ्या मनात असलेल्या,चांगल्या,आणि योग्य जोड़ीदारासोबत लवकरच लग्न होणार होत माझ.............यापेक्षा जास्त आनंदाची कोणती गोष्ट नाही........आता घरी जाउन आम्ही आमच्या घरच्याना सांगू आणि मग आमच लग्न होइल.........माझ्या घरच्याना काही अड़चन नसनारच आमच्या लग्नाला याची मला खत्री आहे........उलट ते खुशच होणार आहेत...........Happy ending क़ाय ते बोलतात ना ते हेच.......काही संकट न येता जी ending होते ती Happy Ending...


माझ्या एका होकाराने हे सगळ होत होते........आयुष्यात सगळ्याच गोष्टीना होकार देऊ नका.........आधी खुप विचार करा.......ती गोष्ट योग्य आहे का हे बघा मग होकार दया कारण तेव्हाच तुम्ही सुखी राहु शकता.......



माझ्या आणि वैभवच्या होकाराची कथा साधी,गोड़ आणि सगळ्यांच्या आयुष्यशी थोड़ी तरी रिलेटेड होती.......नाही का.??


.


.


.


समाप्त-


(माझी ही कथा आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा बर.....आता तुम्ही stars सगळे देता....मग त्यासोबत कथा कशी वाटली हे लिहून पण सांगा मला अजुन प्रोत्साहन मिळेल.....लवकरच पुढच्या कथेसह भेटू......☺️Thank You!!! Keep supporting.!!)

क्रमशः



©_प्रतिksha✍️❤️