Friendship - also a form books and stories free download online pdf in Marathi

मैत्री - एक रुप असेही

नुकतेच बारावीचे निकाल लागले होते. आणि नेहा,रेवा आणि अवनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या. तिघी पण एकाच कॉलेज मध्ये होत्या. एकाच सोसायटीत राहत असल्याने त्या लहानपणा पासून सोबत राहत होत्या. एकाच शाळेत आणि आता एकाच कॉलेज मध्ये अँडमिशन घेतले होते.
आज कॉलेजचा पहिला दिवस असल्याने त्या लवकरच निघालेल्या .रेवा आणि नेहा पार्किंग मध्ये येउन थांबल्या होत्या, तर अवनी अजून आली नव्हती.
रेवा. अरे यार ही अवनी कधी येणार आज तरी लवकर यायला हवे होते ना? नाही तर आज पहिल्यादिवशीच उशीर होईल आपल्याला.
नेहा. बग ना हि नेहमीच अस करते 😏
अवनी. साँरी साँरी थोड लेट झाला निघायचे का आपण नाहितर अजून उशीर होईल.
रेवा. काय अग अवनी थोड लवकर यायला काय होते तुला?
अवनी. सॉरी ना उद्यापासून नाही उशीरा करणार.
नेहा. बर चला नाहीतर आज उशीर नक्कीच होईल आपल्याला.
तिघीही काँलेज मध्ये येतात तेव्हा लेक्चर चालू झाले नसते.
त्या पटकन क्लास मध्ये जाऊन बसतात त्यांच्या बर्‍याच फ्रेंड्सनी त्याच कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलेले असते .तर काही नवीन चेहरे दिसत असतात. त्यांचं कॉलेज शहरातील फेमस कॉलेज असल्यामुळे बरेच नवीन ऍडमिशन झालेले असतात .आज पहिला दिवस असल्यामुळे जास्त काही शिकवत नाहीत. ब्रेकमध्ये त्या कॅन्टीन मध्ये जातात.
अवनी. रेवा आज कॉलेज सुटल्यावर मला शॉपिंग करायचे आहे .
रेवा. ओके जाउ आपण.
कॉलेज सुटल्यावर तिघेही शाँप मध्ये जातात मग घरी येतात रेवा. अवनी प्लीज उद्या तरी लवकर ये .
अवनी. हो ग उद्या नक्की लवकर येते नेहा चला मग उद्या भेटू बाय 👋 दुसऱ्या दिवशी नेहा आणि रेवा पार्किंग मध्ये येत असतात .
नेहा ते बघ 😲
नेहा. अग रेवा ओरडायला काय झालं ?
रेवा. अगं आज चक्क अवनी मॅडम लवकर आल्यात .
नेहा .हो ना अगं ही कस काय आज लवकर आली ,
रेवा .नेहा आज सूर्य नक्की पूर्वेलाच उगवला आहे ना अवनी आज आपल्या आधी आली.
अवनी .काय ग तुम्ही पण मी लवकर आली आहे त्यात चिडवण्यासारख काय आहे 😏,बर आज गाडी मी चालवणार .
नेहा. बर बाई तू चाललो पण नीट चालव नाहीतर मागच्या वेळेस सारखं पाडून ठेवशील कुठेतरी 🤭
अवनी .हो ग नेहा नीट गाडी चालवते मी ,नाही पडत तुला . रेवाला तिच्या वडिलांनी स्कुटी घेऊन दिली होती म्हणून त्या तिघी तिच्या गाडीवर कॉलेजला जात होत्या.
मग त्या कॉलेजला जातात तर अशा या आपल्या तीन मैत्री मैत्रिणी रेवा, नेहा ,आणि अवनी लहानपणापासून एकत्र वाढलेले .त्यांच्या लहानपणापासून सोबत होत्या. कुठेही जायचं म्हटलं की सोबतच असायचा ,त्यांच्या बऱ्याच मैत्रिणी होत्या पण या तिघींची मैत्री एकदम घट्ट अशी होती. त्यांच्या मैत्रीवर कधीच परिणाम झाला नाही त्यांच्या घरचे पक्के शेजारी होते .या तिघीही एकदम बिनधास्त जगणाऱ्या मुली होत्या त्यांच्या घरच्यांचा ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता .
अवनी दिसायला एकदम साधी आणि सरळ होती. मध्यम रंगाची काळे डोळे, सरळ नाक आणि केस, स्वभावाने एकदम शांत होती. तर नेहा दिसायला गव्हाळ रंगाची होती स्वभावाने एकदम मनमिळावू होती .तर रेवा थोडीशी रागिट स्वभावाची पटकन बोलणारी होती. दिसायला नाकी डोळीनीट होती. मध्यम बांध्याची तिचा स्वभाव थोडासा नटखट असा होता .पाणी तिघीही स्वभावाने वेगळ्या असल्या तरीही मनाने खूप चांगल्या आणि जवळ होत्या. बिनधास्त अशा जगणाऱ्या होत्या .त्यांचे स्वभाव जरी वेगळे होते पण विचार सारखे होते त्यामुळे त्यांच्यात एकदम घट्ट मैत्री होती. तिघींची पण मैत्री एकदम घट्ट आणि मजबूत होती.
त्यांच्या मैत्री वर येणाऱ्या नवीन संकटाची चाहूल त्यांना नव्हती .बघू आता त्यांच्या लाईफ मध्ये येणाऱ्या नवीन ट्विस्ट मुळे त्यांच्या मैत्री वर काही परिणाम होतो का ?

नवीन भागात नवीन ट्विस्ट हा भाग कसा वाटला सांगा. हा माझा पहिला प्रयत्न असल्यामुळे काही चुकलं तर नक्की सांगा.
Vaishnavi 🍁

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED