मैत्री - एक रुप असेही - 6 vaishnavi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मैत्री - एक रुप असेही - 6

This song i dedicated to my friends Rohan, Reva, Neha, and Avani This is for you guys ❤🤗
आणि विहान ने गिटारची तार छेडली,तसे इकडे या चौघांच्या चेहर्‍यावर एक मोठी स्माईल आली.

"नवे नवे गीत हे गीत हे
मनाचे धडकन नवी छेडूया
नवे नवे गीत हे मनाचे
धडकन नवी छेडूया
जिंदगी ला नव्याने देऊ
चेहरा हा स्वप्नातला"

कभी हो मनमानीया
कभी हो बदमाशीया
तेरी मेरी यारियाँ हो
तेरी मेरी यारियाँ हो ओ..........
(क्लासमेट्स पिक्चर मधले हे गाणं आहे. नक्की ऐका.)

त्याच गाणं संपताच सगळे एकच कल्ला करू लागले. रोहन ने तर उठून त्याला मिठीच मारली. त्याने गाणे एकदम मस्त गायले होते .सगळेच त्याचे कौतुक करत होते.मॅडम ने पण त्याचे कौतुक केल.इकडे विहानचे गाण ऐकून रेवा भलतीच खुश होती.हम्म दिसतो इतका खडूस नाही हा Nice ती मनातच म्हणाली.
आणि मॅडमनी सगळ्यांना झोपायची सुचना दिली.तसे सगळे टेन्टमध्ये गेले .
मॅडम आम्ही तिघी एकाच टेंन्ट मध्ये झोपू शकतो का? रेवा ने मॅडम ला विचारले . मॅडम: अगं पण तुम्हा तिघींना झोपायतर येईल का एकाच टेन्टमध्ये ?Adjust करावे लागेल .ओके मॅम नो प्रॉब्लेम आम्ही करू Adjust नेहा मॅडम ला म्हणाली तिघींना एकच टेन्ट मध्ये झोपायचं होतं . तिघींना सोबतच मस्ती करत, धिंगाणा घालून झोपायचे होते म्हणून इतका खटाटोप.🤭
अवनी ला काही केल्याने झोप येत नव्हती. तिला सारखे दुपारी ती विहानच्या खांद्यावर डोके ठेवून झोपलेली आठवत होते.आणि आता त्याने गायलेले गाणं आठवत होतं. असे पहिल्यांदाच तिच्यासोबत होत होते.वेगळीच काही तरी फिलींग आहे.असं तिला वाटत होतं. ती उठून बाहेर आली आणि एका ठिकाणी जाऊन बसली. विहान पण जागाच होता त्याला थोडा आवाज आला, म्हणून तो बाहेर आला तर ,त्याला अवनी बाहेेर बसलेली दिसली.
विहान :काय ग अवनी अजून जागीच आहेस? झोपली नाहीस?
अवनी :हा प्रश्न मी तुला पण विचारू शकते?
विहान : पण मी आधी तुला प्रश्न विचारला?
अवनी : अरे नवीन जागा आहे त्यामुळे कदाचित झोप येत नाही. आणि आजचा दिवस माझा खुप छान गेलायना त्यामुळे तेच आठवतेय सारखे. Bay the way तु खूप छान गाण म्हणतोस, आम्हाला माहित नव्हते की तुला इतके मस्त गाता येत.
विहान : thank you नेहमी नाही गात मी कधी तरीच गातो. Mood असला तरच.
अवनी :हम्म पण छान गातोस. कभी पासुन आवड लागली तुला गाण्याची?
विहान : तस काही ठरवून नाही केल मी पण मला अगदी आठवतय तस माझी आज्जी सारखी गाण गुणगुणत असायची कधी ओव्या तर कधी जुनी गाणी म्हणत असायची. अजून ही म्हणते. अगदी लहानपणी मला झोपवताना पण गात असायची. मग काय तिच बघुन मी पण गुणगुणायला लागलो. आवडायला लागले मला गाणे तेव्हापासून.
अवनी :अरे वा म्हणजे तु आता आमचा हक्काचा सिंगर आहेस तर, मी तुला कधी पण गाण म्हणायला सांगणार तेव्हा मग म्हणायच नाही की माझा mood नाहीये.
विहान :जरुर आपकेलिए ये बंदा हमेशा हाजीर है. 😊
त्याने असे म्हणताच अवनी एकदम खळखळुन हसली, 🤭तेव्हाच तिच्या एका गालावर पडणारी खळी विहान ने पहिल्यांदाच बघितली. आशीच नेहमी हसत जाना अवनी खूप छान दिसतेस हसताना त्यात ही खळी तो मनातच म्हणाला. 😊
अवनी :विहान जायच का? खूप उशीर झाला आहे.
विहान :चल निघुयात, एक मिनिट पण मी गाण म्हणल्यावर मला काय मिळणार?
अवनी :तु म्हणशील ते.
विहान :बघ हा नाही म्हणायचे नाही , तु पण माझ्यासाठी गाण म्हणायचे done?
अवनी:विहान पण मला इतक गाण म्हणता येत नाही. पण मी ट्राय करेन. एखाद्या दिवशी मी म्हणेन गाण .आता जायच ?विहान: हो चल ,वाट पाहिल मी त्या दिवसाची तो मनातच म्हणाला.
अवनी दिसती तशी नाही एकदम वेगळीच आहे. किती शांत असते, नेहमी हसून असते .तिच्या मनात जरी दुःख असलं तरी चेहऱ्यावर हास्य असतं.एकदम शांत वाटते. वेगळीच आहे एकदम . streng person. विहान अवनीच्या विचारात झोपी गेला .
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकर उठले आणि उरलेले स्पॉट बघितले. जाताना ते सर्व मागच्या सीटवर जाऊन बसले.असाच त्यांचा दंगामस्ती करत प्रवास सुरू झाला.आणि ते दुपारी परतीच्या प्रवासाला लागले. मनात खुप सुंदर आठवणी साठवत आणि डोळ्यात हा सुंदर हिरवा निसर्ग भरत. 🌿🌲🌲🌲🍀
हिच तर सुरवात होती त्यांच्या मैत्रीच्या प्रवासाची .
I hope तुम्हाला आजचा पार्ट आवडला असेल प्लीज कमेंट करुन सांगा.
***********************************************
Vaishnavi 🌸