मैत्री - एक रुप असेही - 5 vaishnavi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मैत्री - एक रुप असेही - 5

त्यांचा प्रवास सुरूच असतो. आणि त्यांच्या गप्पा पण खुप रंगलेल्या होत्या. रोहन तर शेवटी झोपून गेला, पण त्यां दोघांच्या गप्पा चालुच होत्या. अवनी पण आज पहिल्यांदाच रेवा आणि नेहा शिवाय इतक्या मोकळ्या पणाने वागत होती. निसर्ग सौंदर्य आणि आज सोबत पहिल्यांदाच अवनी, विहान तर ही ट्रीप खूप एन्जॉय करत होता.❤

काही वेळाने अवनीची झोप लागते आणि नकळतपणे तिची मान विहानच्याा खांद्यावर पडते. विहान तर क्षण भर गोंधळला.आणि गालात हसला ,मग तसाच तिला कम्फर्टेबल होईल असा बसला,आणि तो पण झोपून गेला. थोड्याच वेळात अवणीला जाग आली आणि तिने बघितलं तर तिची मान विहानच्याा खांद्यावर होती😳. ती लगेच गडबडुन उठली आणि पुढे निघून गेली. तिची चुळबुळ झाली तेव्हाच त्याला कळलं होतं तिला जाग आली ,पण तो मुद्दाम तसाच पडून राहिला.
🙄अशी कशी काय झोपले मी त्याच्या खांद्यावर काय काय वाटले असेल त्याला ?मला तर भीती वाटते, पण तो तर झोपला होता त्याला कळले असेल का ?
थोड्याच वेळात ते त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात .सभोवताल हिरवी 🌴🌲झाडे,संपूूूर्ण हिरवा परिसर असतो. पावसामुळे सगळीकडे हिरवळ दाटलेली असते. संपूर्ण पावसाळी वातावरण असते. त्यामुळेे हवेत थोडा गारवा असतो ,आणि पावसाची रिपरिप 🌧पण चालूच असते. सगळे बस मधून खाली उतरता .मॅडम सगळ्यांना सुचना देतात ,आणि थोड्यावेळ फ्रेश होऊन सगळ्यांना माघारी बोलवतात .त्यांना सगळ्यांना ट्रेकिंग ला जायचं असतं. पावसाळ्यात ट्रेकिंग करण्याची मज्जाच वेगळी असते .थोड्यावेळाने सगळे फ्रेश होउन ठरलेल्या ठिकाणी येतात .अवनी,नेहा ,रेवा आधिच येऊन थांबलेले असतात नंतर विहान आणि रोहन त्यांना जॉईन होतात .अवनी तू पुढेे कधी निघून आलीस रोहन विचारतो ?अवनीला तर आता काय बोलावे ते कळतच नाही. अरे तुम्हा दोघांची पण झोप लागलेली ना म्हणून मी पुढे आली.ओके जायच का आपण विहान विचारतो आणि तेे सगळे जातात.
मॅडम सगळ्यांना माहिती देतात आणि सगळे त्यांना फॉलो करत ट्रेकिंगसाठी निघतात .
नेहा : अवनी सॉरी, रियाला त्रास झाल्यामुळे तुला एकटीला बसावे लागले .😔
अवनी :इट्स ओके नेहा ,मी एकटी नव्हते बसले रोहन ने मला बोलवून घेतले, मी रोहन आणि विहान सोबत बसलेली त्यामुळे बोर नाही झाला मला .
नेहा :ओके मग काय प्रॉब्लेम नाही आत्ता जाताना आपण तिघी सोबतच बसू.
विहानला मगाशी अवनी घाबरून पुढेे पळाली ते आठवल त्यामुुळे तो गालात हसत होता .
रोहन: काय रे विहान एकटाच काय हसतोयस मला पण सांग🙄
विहान:काही नाही रे असच ,चल पुढे जाउ नाही तर आपण दोघेच मागे राहू. सगळे चढाई करत असतात ,आणि मग ते वर टेेेकडीवर पोहोचतात .वर पोचल्यावर सगळेच खुुश होता कारण वरून खालचा नजारा एकदम भारी दिसत होता सगळीकडे हिरवळ पसरली होत छोटे छोटे धबधबे दिसत होता.रेवा,अवनी,नेहा सगळेच मनभरुन निसर्गात अनुभवत होते .
मॅडमनी सगळ्यांना टेन्ट लावायचा सूचना दिल्या. आजची रात्र ते सगळे टेन्ट मध्ये राहणार होते.पाऊस पण आता थांंबला होता.मॅडमनी सांगितले तसे सगळ्यांंनी एकमेकांच्याया मदतीने टेन्ट उभे केले व जेवणाची तयारी करू लागले .जेवण झाल्यानंतर मॅडमन एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता . सगळेजण जेवून एका ठिकाणी बसले मॅडमनी सांगितल्या प्रमाणे कोणी डान्स केला तर कुणी गाणी म्हटली. रोहन ला माहित होते विहान ला गाणं खूप छान म्हणतात येते म्हणून त्यानेे विहान ला गाणंं म्हणायला सांगितलं.सगळेजन विहानला फोर्स करू लागले .आणि
तिकडे अवनी ,नेहा, आणि रेवा शॉक झाल्या कारण त्यांना माहितच नव्हते की विहानला गाता पण येत. 😲
रेवा : काय ग ह्याला नक्की काय काय येत? स्पोर्ट्स मध्ये पण आहे, क्लास मध्ये पण हुशार आहे आणि आता गाण पण येत का ह्या खडुसला? 😏
अवनी :हो ना आपल्याला तर माहिती पण नव्हते की याला गाण पण म्हणता येत.
रेवा :हम्म्म बघु आता हा कस गाण म्हणतो. 🤨
***********************************************
बघु आता विहान कस गाण म्हणतो ते, next part मध्ये तो पर्यंत stay tuned........
Stay safe stay home ❤

Vaishnavi 🌸