समीराला काय सांगावे ते शौर्यला सुचत नव्हतं..
किती विचार करतोयस??? समीरा शौर्यचा हात पकडतच बोलते..
शौर्य : "आपण कुठे तरी फिरायला जाऊयात..? फक्त दोघेच??"
समीरा : "हे विचारायला तु एवढा वेळ लावलास.. किती ते टेन्शन तुझ्या चेहऱ्यावर.."
शौर्य : "पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलीला अस एकटीला फिरायला घेऊन जातोय मग टेन्शन तर येणारच ना.."
समीरा : "हम्म ते तर आहे. मला आवडेल तुझ्यासोबत फिरायला जायला.. पण कुठे जायच??"
शौर्य : "तु सांग ना.. मला दिल्लीच एवढं नाही माहीत ग.."
समीरा : "मला तरी कुठे माहिती.. "
दोघेही विचार करू लागतात..
समीरा : "आपण नेक्स्ट विकमध्ये जाऊयात..??"
शौर्य : "का?? ह्या विकमध्ये काय प्रॉब्लेम आहे??"
समीरा : "अस काय करतोस.. तुला बुक सबमिट करायचीय ना.."
शौर्य : "अरे हो मी विसरलोच.."
तोच सीमा समीराला आवाज देऊ लागली..
"हो आले..", समीरा शौर्यच्या बाजुची उठतच बोलली..
शौर्य : "नको ना जाऊस.. बस ना इथे.."
समीरा : "तु बोलतोस तर बसते.. परत मग राज तुला जस चिडवतो तस मग सीमा मला चिडवायला लागेल.. तुला चालणार असेल तर बसते मी..
शौर्य : "नाही नको.. जाsss.."
समीरा : "नक्की??"
"हम्मम..", शौर्य थोडं तोंड पाडतच बोलला..
समीरा : "तु पण चल ना आत."
शौर्य : "नाही मी जातो रूम वर.. खुप लिखाणकाम बाकी आहे ग माझं.. मला कंटाळा आलाय एवढं सगळं लिहीत बसायच.."
"आता???", समीरा शौर्यच्या गालावर आपले ओठ टेकवतच आपल्या डोळ्यांची एक भुवई उडवतच त्याला विचारते...
शौर्य फक्त तिच्याकडे बघत रहातो.. तोच पुन्हा सीमा त्याला आवाज देते..
"आले ग",अस बोलत समीरा सरळ आत निघुन जाते..
शौर्य समीराचा हाथ पकडणार पण तिने तिथुन पळ काढला असतो...
शौर्य आपल्या गालावर हात फिरवतच हसत प्ले हाऊसमध्ये जाणाऱ्या समीराकडे बघत होता.. समीरा ही त्याला ठेंगा दाखवत आतूनच चिडवत होती..
तो तिला बाय करत आपल्या रूममध्ये आला.. रूममध्ये येताच नको ते विचार पुन्हा त्याच्या डोक्यात येऊ लागले.. तो स्वतःच्या मोबाईलमध्ये एक टक बघु लागला.. त्याने जास्त काही विचार न करता फोन सरळ फ्लाईट मोड वर टाकला... आणि अभ्यासाला लागला..
सुरुवात कुठून करावी हेच त्याला कळत नव्हतं..
जास्त विचार करत न बसता.. प्रॅक्टिकल बुक्स कम्प्लिट करायला त्याने घेतली..
★★★★★
मनवीच्या फेमिली डॉक्टरांचा फोन लागत नसतो त्यामुळे मनवीचे वडील मनवीला घेऊन त्यांच्या दवाखान्यात येतात.. तिकडच्या रिसेप्शनीस्टकडे ते डॉक्टरांची चौकशी करतात.. तेव्हा त्यांना अस समजत की ते आजच UK ला गेलेत.. मे बी फ्लाईट मध्ये असतील म्हणुन फोन लागत नसेल..
"अरे पाठक... तु इधर क्या कर रहा हे???", मनवी चे डॅड रिसेप्शन सोबत बोलत असतानाच पाठून कोणी तरी आवाज देतच त्यांना बोलत..
मनवीचे वडील पाठी वळुन बघतात तर त्यांचे शेजारचे खान साहेब त्यांच्या मागे उभे असतात..
मनवीच्या वडिलांना त्यांना काय बोलावे कळत नाही..
"अरे तेरेसे बात कर रहा हु.. क्या हुआ...?? अरे मनवी बेटा तु ठिक तो हे ना.."
मनवी : "मे तो ठिक हु... आप कैसे हो अंकल??"
खान सहाब : "मे भी एकदम ठिक.. पर आप दोन्हो यहा क्या कर रहे हो??"
मनवी : "वो मुझे.."
"मनवी का क्लासमेट यहा पे एडमिट हे उसीसे ही मिलने आये थे..", मनवी काही बोलणार तोच तिचे वडील तिला थांबवत बोलतात.
खान अंकल : "ओहह अच्छा.. मे वही सोच रहा हु.. मनवी को लेकर आप इस अस्पताल मे क्या कर रहा हे.!"
मनवी : "अंकल आप यहा??"
खान अंकल : "अरे बेटा मे तो इधर ही काम करता हु.. नाईट मे काम करता था आज से ही डे की ड्युटी लगी.. तो मिल लिया क्लासमेट से??"
"हा मिल लिया.. अभी निकल ही रहे थे यहा से.. अच्छा तो हम चलते हे..",अस बोलत मनवीच्या वडिलांनी तिथुन काढता पाय घेतला.
मनवी : "डॅड तु खोटं का बोललास खान अंकलशी??"
डॅड : "काय सांगायला हवं होतं....? तुलाच इथे चेकअप साठी इथे आणतो म्हणुन?? मग पूर्ण सोसायटीमध्ये पसरेल.. "
मनवी : "डॅड तु उगाच टेन्शन घेतोयस.. तुला माहिती ना मला राग कंट्रोल होत नाही.. मग मी कशी पण वागतेआणि तु त्या गोष्टीमुळे मला ह्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येतोस..आता गोळ्या औषध खाऊन पण राग कंट्रोल होतो का??"
डॅड : "तुझा हा राग तु समजतेस तसा नॉर्मल नाही ग.. मला खुप काळजी वाटतेय तुझी.. आज रोहनसोबत तु जे वागलीस ते मला जरा पण नाही आवडलं.."
मनवी : "डॅड तो पण तसाच वागला ना.."
डॅड : "काय वागला तो ते तरी सांग.."
मनवी : "प्रत्येक गोष्ट तुला नाही ना सांगु शकत आणि मला खुप म्हणजे खुप भूक लागलीय.. चल आपण आधी काही तरी खाऊयात."
मनवीचे डॅड आणि मनवी एका हॉटेलमध्ये येतात.. मनवी तिला हवं ते फुड ऑर्डर करते.. पण मनवीचे डॅड डॉक्टरांना फोन लावत असतात.. पण अजुनही त्यांचा फोन काही लागत नसतो..
मनवी : "डॅड ठेव ना तो फोन आणि एन्जॉय दि फुड.."
डॉक्टरांशी बोलल्याशिवाय तिच्या डॅडच कशातच लक्ष लागत नव्हत..
हॉटेल मधुन घरी आले तरी त्यांच डॉक्टरांना फोन लावायचं काम चालुच होत आणि फायनली रात्री नऊ साडे नऊ च्या सुमारास डॉक्टरांना फोन लागतो..
"अरे आहेस कुठे तु?? कधीच फोन लावतोय तुला..?", डॉक्टरांनी फोन उचलल्या उचकल्या मनवीच्या वडिलांनी त्यांना विचारलं..
डॉक्टर : "अरे नातु झाला मला. त्यालाच बघायला आलोय UK ला.."
डॅड : "अभिनंदन."
डॉक्टर : "तु का फोन केलास??मनवी आहे ना ठिक??"
मनवीचे डॅड सकाळपासून घडलेला प्रसंग डॉक्टरांना सांगतात..
डॉक्टर : "हे बघ पाठक.. मनवी मला सुद्धा माझ्या मुलीसारखी आहे.. पण तु तिच्या डोक्याचा प्रॉब्लेम समजुन घ्यायला हवास.. तुला मी आधीही सांगितलं की अश्या परिस्थिती पेशंट कुणालाही इजा पोहचवू शकत कारण त्यांच त्यांच्यावर कंट्रोल नसत.. "
डॅड : "मी काय करू आता??"
डॉक्टर : "मी माझ्याच हॉस्पिटलमध्ये एक दुसरे डॉक्टर आहेत त्यांच्याशी तुझा कॉन्टेक्ट करून देतो आणि मला वाटत की तु त्यांना एकदा भेटुन घे..."
डॅड : "तु दिल्लीला परत कधी येणार.."
डॉक्टर : "मी निदान एक महिना तरी नाही येऊ शकणार... पण तु उशीर करू नकोस.."
डॅड : "मी काय बोलतो.. तु तात्पुरती औषध बदलुन दिलीस तर. म्हणजे दीड एक महिन्यांनी कॉलेजला पण सुट्ट्या लागतील ना.. कारण आता जर तीने अस अचानक कॉलेज बंद केलं तर तिच्या फ्रेंड्स लोकांना सुद्धा कळेल..मे बी तिला नंतर एडमिशन मिळताना खुप प्रॉब्लेम होईल. प्लिज हा एक- दीड महिना तु बघ ना.."
डॉक्टर : "म्हणुनच बोलतोय डॉक्टर महाडिक आहेत माझ्या ओळखीचे तु त्यांना भेट.. ते बघ काय बोलत आहेत ते.. आणि शक्य झाल्यास कॉलेजमध्ये तिला नाही पाठवलस तर ते बर होईल.."
डॉक्टरांशी बोलुन मनवीचे वडील मनवीच्या रूममध्ये जातात.. मनवीसुद्धा आपली बुक कम्प्लिट करत बसलेली असते..
तिला अस पुन्हा नॉर्मल झालेलं बघुन तिच्या डॅडला बर वाटत.. पण खान सहाब तिथे असताना मनवीला त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास संकोच वाटत असतो.
★★★★★
हॉस्टेलमध्ये सगळे रात्रीच जेवण आटोपुन शौर्यच्या रूममध्ये मस्ती करत असतात..
शौर्य आपली बुक कम्प्लिट करण्यात बिजी असतो..
राज टॉनीला इशारा करतच शौर्यसोबत मस्ती करूयात अस बोलतो...
राज : "काय रे शौर्य तुला तुझी ती ज्यो फोन नाही करत का आज काल??"
"करते.", शौर्य लिहितच बोलला.
टॉनी : "समीराला सांगायला हवं ना राज.."
लिहिणारा हात थांबवतच शौर्य वर बघु लागला..
शौर्य : "तुम्हा दोघांना कोणी दुसर भेटत नाही का त्रास द्यायला.. जे मला टार्गेट करताय.."
टॉनी : "अरे..आता तु ज्यो शी बोलतोस हे समीराला सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे.."
शौर्य : "तुम्ही लोक आज ज्यो बद्दल का एवढ विचारताय पण..?"
वृषभ : "कारण तु एकच कोणाला तरी धर ना.. एक तर ज्यो नाही तर समीरा.."
शौर्य : "एक मिनिट तुम्हा लोकांना काय बोलायच काय आहे??"
वृषभ : "हे बघ शौर्य तुला पण चांगलं माहिती की आम्हाला काय बोलायचं ते आणि आमचं दोन दिवसांपासून चालेल की तुला ह्या बाबत विचारायचं.. आता राज ने विषय काढला म्हणुन विचारतो तुला.. त्यादिवशी एवढ्या रात्री तु ज्योच्या घरी ते ही तीच्या रूममध्ये काय करत होतास.."
शौर्य : "तुम्ही लोक माझ्यावर डाउट घेताय यारआणि तुम्ही जे समजता तस काहीही नाही.. "
राज : "ती तर आम्हाला बोलली की तु तिचा BF आहेस.."
शौर्य : "अरे म्हणजे बेस्ट फ्रेंड आहे मी तिचा.. अस तिला म्हणायच असेल.."
टॉनी : "मग तिच्या रूममध्ये?? ते ही इतक्या रात्री??"
शौर्य : "माझी बेस्ट ऑफ बेस्ट फ्रेंड आहे यार ती.. मी लहान पणापासुन माझ्या घरी कमी तिच्या घरी जास्त राहिलोय.. अंकलने तर माझ्यासाठी रूमपण रिनोव्हेट केलेली.. उगाच माझ्या आणि तिच्या मैत्रीवर नको ते आरोप नका रे करू.. आणि त्यादिवशी ना..", शौर्य आपली बुक्स बाजूला ठेवतच त्यादिवशी घडलेला प्रसंग अगदी जसाच्या तसा त्यांना सांगु लागला)
आणि हे ऐकुन सुद्धा तुम्हाला माझ्यावर डाउट वाटत असेल तर ज्योलाच फोन लावुन देतो.. तिच्याशी बोला..
वृषभ, राज आणि टॉनी एकमेकांकडे बघु लागले..
वृषभ : "आय एम सॉरी शौर्य.."
टॉनी : "आम्ही तुझ्यावर अस डाउट घ्यायला नको होतं.."
शौर्य : "इट्स ओके. पण तुम्ही ही गोष्ट मला विचारून क्लीअर केली म्हणुन तुमच्या मनातला गैरसमज तरी मी दूर करू शकलो.."
राज : "पण तु खरच US ला जाणार..???"
शौर्य : "हा म्हणजे तुम्ही जा बोललात तर जाईल मी.."
वृषभ : "म्हणजे तु नाही जाणार ना..?"
शौर्य मानेनेच नाही बोलतो..
राज : "मग तुझी मम्मा??"
शौर्य : "विर ने तिला समजवल आणि तिने पण तिच माईंड चेंज केलंय.."
राज : "समीरासाठी काय काय करावं लागतंय ना शौर्य तुला.."
टॉनी : "हो ना.. बिचारा"
शौर्य : "तुम्ही आता असच त्रास दिला ना तर मी खरच जाईल हा US ला.. "
राज : "खरच जाणार???"
"हो खरच जाईल मिस चांदणी आणि तुझं काय रे बघावं तेव्हा समीराला नुसतं नाव सांगत असतोस.. जशी काय ती माझी गर्लफ्रेंड नाही तर मम्मा आहे.."
राज : "ए शौर्य मला चांदणी बोलायच नाही हा.."
शौर्य : "आता तर बोलणारच मी.. फक्त तु मला समीरा वरून चिडव.. मी मग सगळ्यांच्या पुढ्यातच बोलणार.."
राज : "अस...??"
शौर्य : "हो असच."
राज पटकन शौर्यच्या पुढ्यातील बुक घेत तिथुन पळ काढतो..
"ए राज यार.. मला कम्प्लिट करायचीय बुक..",शौर्य जसा राजकडे जात होता तस तो टॉनीकडे बुक फेकत होता..
वृषभ : "गाईज..प्लिज त्याला करू दे बुक कम्प्लिट.."
राज : "ह्या मदर तेरेसा बोलल्या.. तेच मी विचार करत होतो.. शौर्यला एवढा त्रास देतोय पण आपल्या मदर तेरेसा अजुन बोलत का नाहीत.."
टॉनी : "राज जाऊ दे रे. देऊन टाक.. नाही तर शौर्य रडला की आपल्या मदर तेरेसाला वाईट वाटेल.."
"अस बोलतोस तु टॉनी धर रे तुझी बुक शौर्य..आम्ही जातो आमच्या रूममध्ये..",अस बोलत शौर्यकडे बुक देतच राज आणि टॉनी शौर्यच्या रूम बाहेर पडले..
वृषभ : "एवढ्या सहज कसे गेले रे ही दोघ.."
"जाऊ दे मला खुप अभ्यास आहे.. नंतर बघतो त्यांच्याकडे..",शौर्य काही तरी शोधतच बोलला.
वृषभ : "काय शोधतोयस??"
शौर्य : "वृषभ यार माझा पेन घेऊन गेलेत ती दोघ."
वृषभ : "दुसरा पेन घे.."
शौर्य : "ते लोक दोन्ही पेन घेऊन गेले.. आणि दुसरे आहेत ते दोन्ही ब्लॅक आहेत.."
वृषभ : "माझा घे पेन.. पण माझ्याकडे जेल पेन नाही.. बोलपेन आहे.."
शौर्य : "आता मध्येच बोलपेन ने लिहिलं तर कस दिसेल ते.."
"किती त्रास देतात यार ही दोघ..",अस बोलत शौर्य टॉनी आणि राजच्या रूममध्ये गेला.. त्याच्या मागोमाग वृषभ पण..
शौर्य हाताची घडी घालुन दोघांकडे बघत होता..
राज : "टॉनी बघितलस.. आपण ह्याला हा अभ्यास करावा म्हणुन इथे आलो तर हा आला आपल्या मागे.."
टॉनी : "हो ना.. शौर्य तुला काही हवं आहे का?? आम्ही मदत करू शकतो.."
शौर्य : "नाही.. मला अस वाटतंय की तुम्हा दोघांना आता माझ्याकडुन काही तरी हवंय.. "
"तुझ्याकडुन.. ??",राज पुढे काही बोलणार तोच शौर्य राजचा हात पकडतच तो मागे उलटा पिरगळतो..
"आहहह शौर्य हात दुखतोय... टॉनी बघना ह्याला..",राज कळवळतच बोलतो
शौर्य : "टॉनी पुढे आलास तर मी अजुन जोरात पिरगळेल ह्याचा हात.."
"वेरी गुड शौर्य.. किप इट अप..", वृषभ हसतच शौर्यला बोलु लागला..
राज : "टॉनी जरा ह्या वृषभचा हात पण पिरघळ रे.. मग बघतो कस किप इट अप करायला सांगतो ते.."
"अजिबात नाही हा",वृषभ शौर्यच्या मागे स्वतःला लपवतच बोलतो..
"ए टॉनी त्याला हात तरी लावुन दाखव मग बघतोच मी तुझ्याकडे आणि आत्ता माझा पेन नाहीस ना दिलास तर मग", अस बोलत शौर्य अजुन जोरात राजचा हात पिरघळतो
टॉनी : "ए बाबा थांब.. हा घे तुझापेन.. नीट मागितल असता तर देणारच होतो.."
"नीट बोललेलं समजत का तुम्हांला", शौर्य राजचा हात सोडत पेन घेतो..
शौ"माझी बुक कम्प्लिट झाली ना की दोघांकडे बघतोच मी. ", अस बोलत तो आपल्या रूममध्ये येऊन बुक कम्प्लिट करत बसतो..
★★★★★
दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे सगळे लेक्चरला बसतात.. शौर्य आज रोहनला बघुन इग्नोर करत असतो.. रोहनला कळत नसत की शौर्य अस का वागतोय त्याच्यासोबत.. लेक्चर संपताच सगळे गप्पा गोष्टी करत बाहेर पडतात..
राज : "ए रोहन मनवी आणि तुझं भांडण सोल्व्ह नाही झालं का.. जे ती तुझ्यावर रागावून आज सुद्धा नाही आली कॉलेजमध्ये.."
"तुला कोण बोललं आमच्यात भांडण झाली...", रोहन शौर्यकडे बघतच राजला विचारतो..
राज : "बोलायला कश्याला हवं.. काल तु असा पळालास.. त्यावरून कळलं आम्हाला."
सीमा : "आज का नाही आली ती..?"
रोहन : "ते ती तिच्या कजिनच्या घरी जाणार आहे.. ती एवढ्यात काही कॉलेजला येणार नाही.."
शौर्य : "गाईज मी लायब्ररीत जातोय.."
राज : "काल तर गेलेलास..??"
शौर्य : "गेलेलो पण कामच नाही झालं.."
रोहन : "केंटींगमध्ये जाऊयात ना.. मग तु जा लायब्ररीत.."
"मी जाऊन येतो..",शौर्य रोहनकडे न बघताच बोलला.
रोहन : "शौर्य मी तुझ्याशी बोलतोय.. तु माझ्याशी का नाही बोलत??"
शौर्य : "who are you?? आणि मी तुझं का ऐकु.. कोण लागतोस कोण तु माझा जे मी तुझं ऐकायला आणि खर सांगु मला तुझ्याशी बोलायचंच नाही..", शौर्य मोठ्यानेच रोहनवर ओरडतो"
समीरा : "शौर्य... काय झालं..? तु एवढा का भडकतोय त्याच्यावर.."
"भडकु नाही तर काय करू यार.. ह्याच्यामुळे ती मनवी मला ब्लॅकमेल करत बसतेय वैतागsss...."शौर्य मध्येच बोलायचा थांबतो..
रोहन : "काय बोललास.? परत बोल"
आपण
रागात काही तरी बोलुन गेलोय हे शौर्यच्या लक्षात येताच तो तिथुन पळ काढतच आपल्या रूममध्ये यायला निघतो..
"शौर्य थांबss.. मला तुझ्याशी बोलायच आहे..", अस बोलत रोहन शौर्यच्या मागे जात त्याचा हात पकडुन त्याला जोरात खेचतच थांबवतो..
क्रमशः
(आता पुढे काय?? त्यासाठी पुढील भागाची प्रतीक्षा करा.. आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)
©भावना विनेश भुतल