अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 35 भावना विनेश भुतल द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • अनुबंध बंधनाचे. - भाग 18

    अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्य...

  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

श्रेणी
शेयर करा

अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 35

शौर्यला रोहन समोर काय बोलाव तेच कळत नसत..

रोहन : तु आता अस का बोललास मनवी तुला ब्लॅकमेल करते..??

शौर्य खाली मान घालुन कसल्या तरी विचारात हरवुन जातो..

"अरे बोल ना काहीतरी..",रोहन जोरातच ओरडतो शौर्य ₹वर

वृषभ : "रोहन हळु.... एवढ्या मोठ्याने का ओरडतोयस तु?? सगळे बघतायत इथे.."

रोहन : "मग काय करू यार?? आज सकाळपासून मी वेड्या सारखा ह्याच्या मागे मागे फिरतोय पण हा साध बघत सुद्धा नाही माझ्याकडे.. तुम्हाला माहितीना तो नाही नीट बोलला तर मला त्रास होतो आणि त्यालाही माहिती तरी तो अस करतोय.."

शौर्य : "मग काल तु जे वागलास त्यामुळे मला किती त्रास झाला असेल रोहन..?? साद वचन मागितलेलं रे तुझ्याकडे... ते ही तुझ्याच भल्यासाठी.. ते तर तु देऊच शकला असतास ना.. वर आत्ता मोठं मोठे डायलॉग मारतोयस आणि मला स्वतःचा मित्र बोलतोस पण मला तुझ्यासारखा मित्र नकोय.."

रोहन : "शौर्य आय एम सॉरी यार.. ते मनवी मला सोडून..."

शौर्य : "नुसतं मनवी मनवी... स्टॉप टु टेक हर नेम यार. मला इरिटेट होतंय तीच नाव काढलं तरी.. तिच्यासारखी चिप आणि सेल्फीश मुलगी ह्या जगात असूच शकत नाही.."

रोहन : "शौर्य.. तु माझ्या मनवी बद्दल काहीही बोलशील तर मी ऐकुन नाही घेणार.. "

शौर्य : "जे आहे ते आहे रोहन.. तुला तिला बोलल्यावर जेवढा राग येतो ना तेवढा राग मला तीच नाव काढल्यावर येतो.. "

समीरा : "शौर्य प्लिज शांत हो आणि तु मनवीबद्दल अस कस काय बोलु शकतोस.."

शौर्य : "कारण की ती तशीच आहे समीरा आणि ह्याला जरी मी तिच्याबद्दल सांगितलं तरी ह्याला नाही पटणार.."

रोहन : "शौर्य जे आहे ते स्पष्ट बोल.."

शौर्य : "मग स्पष्टच बोलतो ते ऐक.. त्यादिवशी तुझ्या बर्थडेच्या दिवशी तु माझी कॉलर धरलेलीस.. का तर तुला अस वाटल की मी तुझ्या मनवीच्या मागे आहे.. पण तो तुझा गैरसमज आहे जे ती क्रिएट करतेय.. समीरा तुझ्या भावाच्या लग्नापासून नुसतं जवळ येण्याचा प्रयत्न करते ती.. त्यादिवशी पार्टीत पण तेच.. वाईट ह्या गोष्टीच वाटत की तु तिच्यासाठी काल जीव द्यायला चाललेलास आणि काल तु जरी जीव दिला असतास तरी तिला काही फरक नसता पडला रोहन.. कारण ती सेल्फीश आहे.. फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करते ती फक्त.."

"शौर्य बस हा.. आत्ता अजुन एक शब्द नकोय..", रोहन शौर्यची कॉलर धरतच बोलला...

"रोहन खर ऐकायकची पण हिंमत ठेवत जा आणि तुला मी ह्या आधीही सांगितलंय रोहन की मला माझी कॉलर पकडलेली नाही आवडत आणि असल्या मुलीसाठी जर तु माझी कॉलर पकडलीस तर मला जरा पण नाही आवडणार.. मग मी काय करेल ह्याचा तु विचारच नको करुस", शौर्य रोहनला धमकवतच बोलतो

"रोहन... प्लिज कॉलर सोड त्याची..",वृषभ दोघांमध्ये मध्यस्थी करत बोलला..


"तु बोलतोस म्हणुन त्यावर विश्वास नाही ना ठेवु शकत शौर्य मी कारण तु कसा आहेस हे मला काय आम्हा सगळ्यांनाच चांगलं माहिती आणि मनवी बोलत होती ना तुझ्याबद्दल तेच खर आहे..", शौर्यला लांब ढकलतच रोहन बोलतो

शौर्य : "आता कोड्यात तु बोलतोयस रोहन.. नीट काय ते बोलणं.. कसा आहे मी मला तरी कळु दे म्हणजे मला कळेल तरी मनवीने माझ्याबद्दलच कोणतं चित्र तैयार करून ठेवलय तुझ्या मनात ते.."

"सोड.. जेव्हा मनवी येईल ना तेव्हाच खर खोट करेल मी आणि मनवीच माझ्यावर किती प्रेम आहे ते मला चांगलं माहिती आणि तीच तुझ्यासारख नाही ना शौर्य मुंबईत एक आणि दिल्लीत एक.. ", एवढं बोलुन रोहन तिथुन जावु लागला..


"what you mean Rohan?? तुला बोलायच काय आहे??",शौर्य रोहनला थांबवत बोलतो..


रोहन : "मला काय बोलायचं ते तुला चांगलं माहिती.. उगाच भोळेपणाचा आव चेहऱ्यावर नको आणुस.. प्लिज.. ओव्हर एकटिंग होतेय"

राज : "रोहन तु नीट काय ते बोल ना.. उगाच भांडत नका बसू यार दोघे.. बसून काय ते सॉर्ट आउट करा.."

रोहन : "मी नीटच बोलत होतो.. बहुतेक शौर्यलाच भांडायचा मुड झालेला आणि खर सांगु मनवीबद्दल हा अस बोललाय ना की मला ह्याच्यासोबत ह्या पुढे बोलावसं सुद्धा वाटणार नाही.. ना ह्याच तोंड पहावंस वाटेल.."

शौर्य : "हे अस काही होणार हे मला माहित होतं म्हणुन मी शांत होतो इतके दिवस कारण मी तुला गमवेल ह्याची भीती वाटत होती रे मला.."

वृषभ : "रोहन तुम्ही दोघ एकदा शांतपणे विचार करून बोला ना.."

"मला नाही बोलायच शौर्यसोबत निदान माझं डोकं शांत होईपर्यंत तरी.. ",एवढं बोलुन रोहन आपल्या बाईकला किक मारतच तिथुन निघुन जातो..


समीरा : "शौर्य तु त्याला सांगु शकत नव्हतास पण मला तर सांगु शकत होतास ना.."

"समीरा मी कधी सांगणार होतो तुला सांग.. मुंबईवरून दिल्लीला आलो आणि मग मी पुन्हा मुंबईला गेलो आणि खर सांगायच तर मला अस वाटत होतं की माझाच काही तरी गैरसमज होतोय म्हणुन मी इग्नोर करत होतो ग.. प्लिज आता तु पण रोहन सारख नको ना वागुस माझ्याशी.. तु तरी विश्वास ठेव ना माझ्यावर..", एवढं बोलताना शौर्यच्या डोळ्यांत पाणी आलेलं


समीरा : "शौर्य तु असा रडतोस का?? मी फक्त विचारतेय आणि माझा आहे विश्वास तुझ्यावर. आता रोहनच बोलशील तर त्याचा राग शांत झाला की तो बोलेल तुझ्याशी आणि मनवीशी काय बोलायच ते मी बघते.. तु नको काळजी करुस.."

समीरा शौर्यची समजुत काढतच बोलली..

समीराने आपल्यावर विश्वास दाखवला हे बघून शौर्यला बर वाटत.. पण आज त्याच लक्ष कश्यातच लागत नसत.. रूमच्या गेलरीत तो एकटाच गिटार वाजवत बसला होता..

राज आणि टॉनी वृषभच्या रूममध्ये चर्चा करत बसलेले..

टॉनी : "गाईज मला काय वाटत माहिती आपण मनवीची बाजु न ऐकता तिला चुकीच ठरवणं अयोग्य आहे.. म्हणजे मी अस नाही म्हणत की शौर्य खोटं बोलतोय.. पण मनवीची बाजु पण आपण बघायला हवी.."

राज : "मला सुद्धा तुझं म्हणणं पटत आहे.. पण आता मनवी आल्याशिवाय ह्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष काही लागणार नाही.."

वृषभ : "मला काय बोलावे तेच कळत नाही.. शौर्यसोबत आपण काल इतका वेळ त्याच्या रूममध्ये होतो त्याने तेव्हा तरी सांगायला हवं होतं ना. "

टॉनी : "पण मनवी अस वागेल अस नाही वाटत रे म्हणजे तूच विचार कर ना रोहनला सोडुन ती शौर्यच्या मागे का लागेल.. "

राज : "तिचा काही भरोसा नाही.. कधी कधी वागते ती अशी वेड्यासारखी.. लास्ट टाईम पण तिनेच शौर्यला पाडलेल आणि ती कशी वागायची बघितलस ना.."

वृषभ : "पण तिने एक्सेप्ट केलं की ते चुकुन झालय आणि झालेल्या गोष्टी उकरून काढण्यात काही अर्थ नाही.. आपण हे बघुयात की हे दोघे कसे एकत्र येतील ते.."

राज : "वृषभ तुला वाटत ते दोघे एकत्र येतील पुन्हा..??"

राजच्या ह्या प्रश्नाच उत्तर मात्र वृषभकडे नसत..

★★★★★

समीराने खर तर मनवीला ह्याबाबत जाब विचारायचं ठरवलं असत पण मनवी कुणाचाच फोन उचलत नसते..

समीरा तिच्या दादाच्या लग्नापासून ते आता पर्यंत प्रत्येक गोष्टी आठवु लागते. प्रत्येक गोष्ट आठवताना ती थोडी फार चलबीचल होत होती..

सीमा : "समीरा.. तुला पण वाटत का मनवी???"

समीरा : "मलाच नाही कळत आहे.. कधी कधी मनवी बरोबर वाटते तर कधी कधी शौर्य.. माझं मुंबई वरून आल्यापासुन शौर्यबद्दल नको नको ते विचार माझ्या डोक्यात येतायत"

सीमा : "बट रोहन अस का बोलला शौर्यला तुझं मुंबईत एक आणि इथे एक.."

समीरा : "ते त्यालाच माहिती.. मे बी तो रागात होता त्यामुळे कदाचित बोलला असेल आणि मी खर बोलु जी गोष्ट मी स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही त्यावर मी कस विश्वास ठेवु.. उद्या कोणीही येऊन मला शौर्यबद्दल काहीही सांगेल.. मी नाही ना विश्वास ठेवू शकत.. रोहनने ठेवला का शौर्यच्या बोलण्यावर विश्वास मग मी पण तो जे काही बोलतोय त्यावर विश्वास नाही ठेवु शकत.. बाकी तर मी मनवीसोबत बोलल्यावर कळेल.."

सीमाला सुद्धा समीराच बोलणं पटत..

★★★★★

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे सगळे कॉलेजमध्ये जातात.. रोहन अजुनही क्लासरूममध्ये आला नसतो.. शौर्य नेहमीच्या जागेवर जाऊन बसतो.. तो हातातील घड्याळात बघत असतो.. अजूनही पंधरा मिनिटं शिल्लक असतात.. रोहनचा राग झाला असेल का शांत..तो मनातच विचार करत असतो.. तोच रोहन क्लासरूममध्ये येतो तस शौर्य रोहनकडे बघतो.. पण रोहन त्याच्याकडे न बघताच वृषभच्या बाजुला जाऊन बसतो..

राज : "आज तु इथे बसणार का??"

रोहन राजकडे रागातच बघतो..

राज : "अस काय बघतोस.. सहज विचारलं.. नेहमी शौर्यच्या बाजूला बसतोस ना."

रोहन : "तुला नाही आवडत का मी इथे बसलेलं?? तस सांग."

वृषभ : "रोहन हळु बोल ना.. कालपासुन नुसती चिडचिड करतोयस तु"

तेवढ्यात सर येतात.. शौर्य सरांच्या समोरूनच क्लासरूमच्या बाहेर पडतो.. कॉलेजच्या गेटमधुन बाहेर पडणार तेवढ्यातच समीरा समोरून येते.. तिला देखील नेमका आजच उशीर झालेला असतो..

समीरा : "लेक्चर नाहीत का?? मला आज उशीर झाला.."

शौर्य : "जस्ट सर आत गेलेत.."

समीरा : "मग चल आत.. तु बाहेर काय करतोयस..?"

शौर्य : "मुड नाही माझा.. आपण कुठे तरी जाऊयात का बाहेर फिरायला..??"

समीरा थोडा विचार करत बसते.. तिला अस विचार करताना बघुन शौर्यला वाटत की तिला बहुतेक लेक्चर अटेंड करायच असेल..

शौर्य : "समीरा तु एवढा विचार नको करत बसुस.. हे बघ तुला लेक्चरला जायच असेल तर जा.. आपण नंतर कधी तरी जाऊयात फिरायला.."

समीरा : "अरे मी विचार करतेय की कुठे जाऊयात म्हणजे मला मॉल शिवाय दिल्लीतल काहीच माहिती नाही.."

शौर्य : "मग मॉलमध्येच जाऊयात.. तुला चालणार असेल तर.. "

समीरा : "तु सोबत असशील तर मला काहीही चालेल.."

दोघेही सोबत मॉलमध्ये जाऊ लागले..

समीरा : "शौर्य तु अजुनही कालच्या टॉपिकला घेऊन टेन्स दिसतोयस मला.."

शौर्य : "ते रोहन माझ्याशी बोलत नाही ना ग म्हणुन थोडं वाईट वाटत.."

समीरा : "प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ दे रे. त्याचा राग झाला शांत की तो बोलेल.. आणि एक बोलु का शौर्य.. आपण चुकीच नाही मग आपण त्या गोष्टीच टेन्शन घ्यायच नाही.."

शौर्य : "तु सेम विर सारखी बोलतेस.. "

समीरा : "विर म्हणजे तुझा भाऊ ना.."

शौर्य : "हम्म.. तो पण मला त्यादिवशी हेच बोलला..मी टेन्शनमध्ये असलो ना की त्याच्याशी बोलतो मग खुप बर वाटत.. जस आता तुझ्याशी बोलुन वाटतंय. पण एक बोलु समीरा.. बाकी कोणी माझ्यावर विश्वास ठेवु दे किंवा नको ठेवु दे I Don't care.. पण तु मला कधी चुकीच समजु नकोस मला एवढंच वाटत.."

समीरा : "हम्मम"

दोघेही बोलत बोलत मॉलमध्ये पोहचले.

शौर्य : "चल तुला छानसा ड्रेस घेऊयात.."

समीरा : "आज तुला घेऊयात.. माझ्याकडुन.."

शौर्य : "मला नको.. तुझ्यासाठीच घेऊयात".

"मी तुझं काहीही ऐकणार नाही.. समीरा शौर्यचा हात पकडतच त्याला कपड्यांच्या दुकानात घेऊन येते.."


"शौर्य हा वाला शर्ट ट्राय कर ना.. तुला छान वाटेल..", समीराच्या हातातलं शर्ट बघुन शौर्य तोंड वाकड करतो..


"काय झालं??? नाही आवडल का???", समीरा हातातलं शर्ट पकडतच बोलते

शौर्य मानेनेच नाही बोलतो..

समीरा थोडी नाराज होतच ते शर्ट खाली ठेवते आणि दुसरं शर्ट बघु लागते..

तेवढ्यात शौर्य तिने त्याला दाखवलेलं शर्ट घेऊन तिच्या नकळत चँजिंग रूम मध्ये जातो..

समीरा दुसर शर्ट शोधुन शौर्यला आवाज देतच दाखवते.. पण शौर्य तिला दिसत नाही.. तेवढ्यात तीच लक्ष चेंजिंग रूममधुन बाहेर पडणाऱ्या शौर्यकडे जात..

शौर्यने आपण चॉईज केलेलं शर्ट घातलेलं बघुन समीराला नवल वाटत..

शौर्य तिला इशाऱ्यानेच विचारतो.. कस वाटत म्हणुन..

समीरा पण तोंड वाकड करत नाही चांगलं दिसत अस त्याला सांगते...

समीरा अस बोलताच शौर्य खुश होतो.. शौर्य चेंजिंग रूमच्या बाहेर येतो..

समीरा : "तुला नाही आवडलं तर का गेलास चेंज करायला??"

शौर्य : "तु नाराज झालेली पण नाही ना आवडत म्हणुन..."

समीरा शौर्यकडे बघतच रहाते...

"समीरा हा कसा वाटतोय.. हा ट्राय करून बघु..", शौर्य हातात दुसरा शर्ट घेतच तिला दाखवतो.

समीरा मानेनेच हो बोलते पण ती शौर्यच्या मागसच्या वाक्याने त्याच्या अजुन प्रेमात पडते.

शौर्य शर्ट ट्राय करून समीराला दाखवतो.. शौर्यने चॉईज केलेलं शर्ट त्याला खुप छान दिसत असत... समीरा एक टक त्याच्याकडे बघतच रहाते..

शौर्य : "समीरा कस वाटतंय...??? "

समीरा : "खुप खुप छान.."

शौर्य तिला अंगठा दाखवतच पुन्हा चेंज करायला आत जातो...

(इथे समीरा मात्र गाण्यात हरवुन जाते)

¶¶तू आता है सीने मैं
जब-जब साँसे भरती हूँ
तेरे दिल की गलियों से
मैं हर रोज़ गुज़रती हूँ
हवा के जैसे चलता है तू
मैं रेत जैसी उड़ती हूँ
कौन तुझे यूँ प्यार करेगा
जैसे मैं करती हूँ¶¶

"ए समीरा कुठे हरवलीस.. ", शौर्य तिच्या बाजूला येत तिला लागलेली तंद्री दूर करतच बोलला..


समीरा मान नकारार्थी हलवतच कुठे नाही म्हणुन सांगत शौर्यच्या हाताभोवती आपल्या हाताचा विळखा घालतच त्याला घेऊन काऊंटरवर जाते.. समीराचा हा स्पर्श शौर्यला सुध्दा हवा हवासा वाटतो..

शौर्य खिश्यातून पॉकेट काढतच बिल पे करणार तोच समीरा त्याला थांबवत बेगेतुन डेबिट कार्ड काढत काऊंटरला देते..

समीरा : "मी आधीच बोललेली शौर्य हे माझ्याकडुन असेल."

शौर्यसुद्धा समीराच मन तोडत नाही.. त्या दुकानातून बाहेर पडतात.. दोघेही मॉलमध्ये फिरत फिरत गेमझोन मध्ये घुसतात..

"शौर्य ते टेडी बघ ना किती क्युट आहेत..", गेम झोनमध्ये एका काचेत ठेवलेले टेडी दाखवतच समीरा शौर्यला बोलली..


समीरा आणि शौर्य दोघेही तिथे काचेच्या बॉक्सजवळ जातात.. कॅच दि टेडी अस त्या बॉक्सवर लिहिलं असत..

शौर्य : "तु इथेच थांब आपण हा गेम खेळूयात.."

समीरा : "अरे शौर्य ते मी सहज बोलली.. तु.."

"तु थांबना मी आलोच...", समीराला मध्येच थांबवत शौर्य काउंटरवर जाऊन गेम खेळण्यासाठी कार्ड घेऊन आला..

कार्ड स्वाईप करत शौर्य टेडी कॅच करू लागला.. पण टेडी काही आला नाही..

शौर्य नाराज होतच समीराकडे बघु लागला..

समीरा : "चल जाऊ दे.. "

शौर्य : "एकदा पुन्हा ट्राय करतो तुझ्यासाठी.. अस बोलत शौर्य पुन्हा कार्ड स्वाईप केलं.."

समीरा मात्र शौर्यकडेच बघत पुन्हा हरवुन गेली...

¶♂मेरी नज़र का सफर, तुझपे ही आ के रुके
कहने को बाकी है क्या, कहना था जो कह चुके
मेरी निगाहें हैं, तेरी निगाहों पे
तुझे खबर क्या बेखबर
मैं तुझसे ही छुप-छुप कर, तेरी आँखें पढ़ती हूँ
कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मे ये करती हुं...¶

"येहहहह..", शौर्यच्या आवाजाने ती भानावर आली..

शौर्य गुढग्यावर बसतच ते टेडी समीराला देत होता.. समीराने टेडी हातात घेताच आजु बाजूचे लोक टाळ्या वाजवू लागले दोघांसाठी..

समीरा लाजतच शौर्यला घेउन तिथुन निघाली...

शौर्य : "आपण काही तरी खाऊयात मला भुक लागलीय.."

समीरा : "मला पण.. "

दोघेही मॉलमध्येच एका हॉटेलमध्ये घुसले..

"तु ऑर्डर कर..", अस बोलत शौर्य मेनू कार्ड समीराच्या पुढे करतो...

" मला तुझ्या आवडीच खायला आवडेल", अस बोलत समीरा मेनु कार्ड शौर्यच्या पुढे करते..

"नाही तु", अस बोलत शौर्य पून्हा ते समीराच्या पुढ्यात करतो..

दोघांचंही काही ठरत नसत..

शौर्य : "समीरा प्लिज ना .. नेक्स्ट टाइम मी ऑर्डर करेल.. "

"प्लिज...", शौर्य अगदी डोळे बारीक करूनच समीराला बोलु लागला..


आता तर समीरा त्याला नाही बोलुच शकत नव्हती.. समीरा मेनुकार्ड स्वतः समोर धरत दोघांसाठी काय मागवायच हे बघत होती... आणि शौर्य तिच्या नकळत तिचे फोटो काढण्यात..

★★★★★

इथे लेक्चर संपल्यावर सगळे बाहेर येऊन बसले..

वृषभ : "रोहन तु अजुन किती दिवस बोलणार नाहीस त्याच्याशी.."

रोहन : "मला नाही माहीत आणि खर सांगु मला नाही वाटत मी कधी बोलेल त्याच्याशी.."

टॉनी : "तु मनवीशी बोललास.."

रोहन : "ती कजीनच्या वेडिंगसाठी गेलीय.. इथे काय घडलं हे सांगुन मला तिचा मुड खराब नाही करायचा."

वृषभ : "पण तु जास्तच रुडली वागतोस.."

राज : "मला पण असच वाटत झालं गेलं जावा ना विसरून.."

रोहन : "असले घाणेरडे आरोप त्याने मनवीवर केले मग कस विसरून जाऊ आणि मनवी मला आधीही सांगायची की शौर्यची नजर तिला काही ठिक वाटत नाही.. पण मीच मूर्ख जे तीच ऐकुन न ऐकल्यासारखं करत होतो आणि मला हा टॉपिक नकोय पुन्हा निदान मनवी येईपर्यंत तरी.. मला काम आहे मी जातो घरी.. बाय.."

रोहन तिथुन घरी जायला निघाला..

टॉनी : "कस व्हायच देव जाणे.. बाय दि वे समीरा का नाही आली ग सीमा??"

सीमा : "ते रूमवर गेल्यावर कळेल म्हणजे तैयारी तर करत होती ती कॉलेजला येण्यासाठी.. "

राज : "चला मग इथे थांबुन काय उपयोग.. शौर्य बघूया काय करतोय रूममध्ये ते.."

सीमाला बाय करत सगळे शौर्यच्या रूमवर जायला निघतात..

पण त्याची रूम बाहेरून लॉक असते..

वृषभ मोबाईल काढुन शौर्यला फोन लावतो..

वृषभ : "आहेस कुठे?? आणि अस लेक्चर मध्येच सोडून का गेलास.."

शौर्य : "ते मला एक काम होत.. ते आठवल.. "

वृषभ : "आहेस कुठे???"

शौर्य : "मॉलमध्ये..."

वृषभ : "एकटाच..??"

"एकटा नाही कोणी तरी आहे सोबत.. मी तुला मग फोन करतो बाय..", अस बोलत शौर्यने फोन कट केला..


"कट केला यार फोन..", वृषभ फोन ठेवतच राज आणि टॉनीला सांगु लागला..

टॉनी : "आहे कुठे??"

वृषभ : "मॉलमध्ये.. कोणासोबत तरी.."

टॉनी : "कोणासोबत??"

वृषभ : "तेच तर नाही ना सांगितलं.."

राज : अ"जुन कोणासोबत समीरा सोबत.. ती पण नाही आली ना आज लेक्चरला.. "

वृषभ : "अरे हा... "

"राज तुला काही सुचतय काय???",टॉनी हसतच राजला बोलु लागला..


राज : "येस... मिशन स्टार्ट..."

वृषभ : "तुम्ही दोघ पण ना कधी सुधारणार नाहीत.. "

(राज आणि टॉनी मिळुन काय करायचा विचार करत आहेत?? रोहन आणि शौर्यची मैत्री खरच तुटेल..?त्यासाठी प्रतिक्षा करा पुढील भागाची.. हा भाग कसा वाटला ते ही कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतलप