अपराधी मेघराज शेवाळकर द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपराधी

अनघा थोडी घाबरतच रेस्टोरंट मध्ये शिरली.. जनरली मुलगी बघण्याचा कार्यक्रम घरातच होतं असतो पण.. पण असीमने हट्टाने बाहेरच भेटायचे असं सांगितलं.. आता त्याने सांगितल्यावर माई आढेवेढे घेत तयार झाली..
" जपून रहा.. जास्त अघळपगळ बोलत नको बसू.. तो विचारेल त्याचं प्रश्नांची उत्तरे दे.. " माईच्या सतराशे साठ सूचना..
तिचा आवडता लॅव्हेंडर कलरचा सलवार कमीज, त्यावर फिक्कटसा मेकअप.. वाऱ्यावर उडणारे केसं सारखे करत ती रिजर्व असणाऱ्या टेबलजवळ गेली.. तिला पहाताच एक राजबिंडा युवक उठून उभा राहिला.

" हॅलो.. दिस इज अगस्त्य.. आगस्त्य बिराजदार.. " त्याने हात पुढे करत आपला परिचय करुन दिला. अनघाने आपला हात पुढे केला. हस्तांदोलन झाल्या नंतर तो पुढे झाला अन एक खुर्ची मागे सरकवली..

" प्लीज.. बसा.. बि कॉमफेरटेबल.. " आगस्त्य म्हणाला.

थोडीशी लाजलेली, थोडीशी बावरलेली ती बसली..

" एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण भेटत आहोत.. तसही मला हा बाजार नाही आवडतं.. हो.. लग्नाचा बाजारच..! " आगस्त्य म्हणाला.

त्याचं आत्मविश्वासाने मत मांडणं तिला मनापासून भावलं..

" तुम्ही आवडला आहात मला.. तुम्हाला काय वाटतं माझ्या बाबतीत, तुम्हाला काही विचारायचं असेल.. जाणून घ्यायचं असेल तर.." आगस्त्य म्हणाला.

" तुमचा बायोडाटा वाचला.. माझे असे काही प्रश्न नाहीत.. फक्त एक सांगायचंय.." अनघा .

" बोला.. मोकळेपणाने बोला.. " आगस्त्य.

" माझं.. एका मुलावर प्रेम होतं.. आम्ही लग्न करणारं होतो.. पण आमचं लग्न नाही होऊ शकलं.. आता ह्यातून बाहेर पडले आहे.. पण तुमच्या सोबत आयुष्यभराच नातं जोडायचं आहे.. तर जे घडून गेलंय ते सांगायला हवंय." अनघा म्हणाली.

" घडून गेलेल्या गोष्टी त्या.. त्यांना विसरायचं असतं.. मला काही फरक पडतं नाही.. तुम्हाला मी पसंद आहे का नाही ते सांगा?... " आगस्त्यने विचारले.

अनघा लाजली, तिने मान हलवून होकार दिला.. आगस्त्यने तिचा हात हातात घेतला.

सात पाऊल चालून अनघा आगस्त्यच्या संगतीने माप ओलांडून त्याच्या जीवनात आली. दोघांचा राजाराणीचा संसार सुखात सुरु होता.. प्रशस्त घर, गाडी.. आगस्त्यची उच्चपदस्त नोकरी. अनघा सुखात होती.. बघता बघता लग्नाला चार वर्ष निघून गेली.. सासूबाई सारखा मुलं होऊ द्या म्हणून तगाडा लावत होत्या.. अर्थात अनघासुद्धा त्या सुखासाठी अधीर झाली होती.. उपासतापास सारं करुन झालं.. डॉक्टरांना दाखवून झालं.. कमी दोघातही नव्हती. नाराज असणारी अनघा पाहून आगस्त्य हवालदिल होतं असे.. आई, शेजारी, मित्रमंडळ यांच्या नजरा.. त्यांच्या डोळ्यात दिसणारे प्रश्न.. ज्याची उत्तरे दोघांकडेही नव्हती.. पण दोघांना अस्वस्थ करीत असतं. एक दिवस दिवस आगस्त्य पाच वर्षांची मुलगी घेऊन घरी आला.
" आई, ही बघ तुझी नातं. श्वेता.. " आगस्त्य म्हणाला.
ती गोरी गोरी छोटीसी परी पाहून अनघा हरखुन गेली.. तिने तिचं हसत मुखाने स्वागत केलं.. तिचा संसार परिपूर्ण झाला.. अपत्य सुख लाभलं दोघेही आनंदून गेले.
श्वेता.. तिचं घरभर खेळण.. तिच्या पैंजनाचे छुम छुम वाजणारे बोल.. तिची भातुकली.. बाहुली.. सारं कसं दोघांना स्वर्गीय सुख देत होतं.

" अनघा.. हे सारं मृगजळ आहे बाई.. तुला सांगते आपलं ते आपलंचं असतं.. कुठली कोण मुलगी उचलून आणलीय तूझ्या नवऱ्याने.. तू ही कवटाळून बसली आहेस.. " सासूबाई म्हणाल्या.
अनघाच मन कोमेजून गेलं..तिच्या मनात सासूबाईंच बोलणं खोलवर रुजल गेलं. तिने एक दिवस आगस्त्यजवळ विषय काढलाच..

" अनू.. ती तूला आई म्हणून कुशीत शिरते हे पुरेसं वाटतं नाही का?..तूला आई बनवलंय तीन हे विसरू नकोस. मुलं हे देवाचं प्रतिरुप असतं.. " आगस्त्य.

" हो खरंय तुमचं म्हणणं.. पण आपला अंश नाहीये ती. " अनघा म्हणाली.

" अगं नशिबात असेल तर आपल्याला मुलं.. श्वेताला भावंड होईलच की.. " आगस्त्य.

" पण बबड्या हे दुसऱ्याच मुलं नकोय आपल्याला.. तिला नेऊन सोड, जिथून आणलंय तिथे.. " सासूबाई.

" आई ती माझी मुलगी आहे.. हो माझी मुलगी.. एका मुलीवर माझं प्रेम होतं.. बाबांच्या धाकामुळे आम्ही चोरुन लग्न केलं होतं.. हिला जन्म देताना ती दगावली.. इतके दिवस श्वेता तिच्या आजीजवळ रहात असे.. आता ती देवाघरी गेलीय.. हिला आणावंच लागलं. " आगस्त्यने कबूल करत सांगितलं.
आपल्या पोटच्या मुलाचा अंश.. सासूबाई हरखुन गेल्या.
अनघा मात्र कोलमडून गेली.. आगस्त्यने आपल्यापासून लपवून ठेवलं.. ती धुसमसत राहिली. स्वेता सोबत वागण्यात बदल दिसून येऊ लागला.. सतत हसणारी अनघा कोमेजून गेली हे आगस्त्यने मनोमन जाणले.

" मी तूला आधी सांगायला हवं होतं.. माझी चूक मान्य आहे मला.. पण हयात त्या चिमुरडीचा काय दोष? " आगस्त्य..

" पण तुम्ही आधी कल्पना दयायला हवी होती. " अनघा.

" तूझ्या प्रेमात पडलो होतो.. तूला गमवायचं नव्हतं म्हणून.. चुकलो मी .. मला माफ कर " आगस्त्य.

" चूक नाही म्हणता येणार.. फार मोठा अपराध केलात तुम्ही.. " अनघा.

रागात अनघा आगस्त्यला सोडून आपल्या माहेरी निघून आली. माहेरपणाला लेक आलीये असं समजून mai आनंदात होती. महिना उलटून गेला तरी जावईबापूंचा फोन नाही.. अनघासुद्धा त्यांच्याविषयी बोलतं नाही हे पाहून माई काळजीत पडली.. माईने जावईबापूना फोन करुन बोलावून घेतले. दोघांना समोरासमोर बसवून त्यांनी भांडणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला.. श्वेता बद्दल विषय निघताच माई गंभीर झाली..

" अनघा.. तूला लक्षात असेल.. तूला फसवून तो निघूनच गेला.. त्याचं मुलं तू जन्माला घालायचं ठरवलंस.. माझा विरोध असताना.. तूला मुलगी झाली.. तू बेशुद्ध होतीस.. मी ते बाळ.. तुझ्यापासून दूर केलं.. कारण त्या मुलीला एकटं वाढवणार होतीस.. तूला खोटंच सांगितलं तूझं मुलं मेलेलं जन्माला आलं.. ती मुलगी माझ्या बहिणीजवळ वाढत होती.. एकदिवस ती वारली.. मी स्वेश्वेताला घेऊन आले.. आता माझेही जास्त दिवस नाहीत हे लक्षात आलं.. मग जावईबापुना सारं सांगितलं.. त्यांनी मोठ्या मनाने सत्य स्वीकारलं.. पोरी तुझी अपराधी मी आहे.. जावईबापू नव्हेतं. " माई रडत सांगत होती.
पाऊस पडून गेल्यावर जसं आकाश स्वच्छ होतं अगदी तसंच झालं.. अनघाला सारं कळालं होतं.. तिने आगस्त्यची माफी मागितली..

" अनू तू माफी मागायची काहीही आवश्यकता नाही.. कारण जे घडलं ते तूझ्या नकळत.. सारं विसर अन आपल्या घरी चल.. आपली श्वेता तुझी वाट पहाते आहे... "

अनघा आपल्या घरी निघाली, आपल्या मुलीजवळ..


|| समाप्त ||