पडछाया - भाग - १ मेघराज शेवाळकर द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पडछाया - भाग - १



विराज वाफाळालेला चहाचे घोट घेत बाल्कनीत बसला होता.. बाहेर रिमझिम पाऊस बरसत होता.. त्याच्या आवडीचा अल्बम चालू होता..
" रिमझिम पाऊस.. सोबतीला वाफाळलेला चहा, गरमागरम भजी... सोबतीला पंचमदाची गाणी.. जीवनात अजून काय पाहिजे.. " विराज म्हणायचा.. हे आईला आठवलं.
" विहू .. तूला अजून काही हवयं का? " आईने विचारलं.
" नको गं.. इच्छाच नाही.. " विराज म्हणाला.
आई आपल्या खोलीत येऊन जप करत बसली..
विराज खुर्चीत बसून बाहेर बरसणाऱ्या सरींना पहात होता..

खाली हाथ शाम आयी है
खाली हाथ जायेगी
खाली हाथ शाम आयी है
आज भी ना आया कोई
आज भी ना आया कोई
खाली लौट जायेगी
खाली हाथ शाम आयी है

आशाताईच्या स्वराने विराजच्या मनात काहूर उथलं.. तीच्या सोबत बघितलेला इजाजत चित्रपट.. रेखाने हया गीतावर केलेली अदाकारी.. तिला खूप खूप आवडली होती.. हया गीताच्या वेळेस तिच्या डोळ्यात उभे राहिलेले अश्रू.. डोळे पुसताना विहानच्या खांद्यावर टेकवलेले डोके.. विहान च्या डोळ्यासमोर तरळून गेलं.. अगदी कालचं घडून गेलंय.. त्याच्या डोळ्यात त्याच्या आठवणीने आसवं तरळली.. त्याचं हृदय दाटुन आलं.. चहाचा कप दूर पकडत त्याने गालावर ओघळणारे अश्रू पुसले..

आज भी ना आये आंसू
आज भी ना भिगे नैना
आज भी ना आये आंसू
आज भी ना भिगे नैना
आज भी ये कोरी रैना
आज भी ये कोरी रैना
कोरी लौट जायेगी..

तिच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या विहानने, म्युजिक सिस्टीम बंद केला.. चहाचा कप टीपॉय वर ठेऊन तो पुढे गेला.. रिमझिम पाऊस आता त्याच्या अंगावर बरसत होता.. तो ओलाचिंब झाला.. पण मन अजून कोरडंच होतं.. ते आठवणींच्या मागे धावत होतं.. कंटाळून तो आत आला.. ओले कपडे बदलून कोरडे घातले.. टॉवेलने केसं कोरडे करत तो उभा राहिला.. बाहेर पाऊस कोसळत होता..

" स्टेला... काय करतेस.. चेहऱ्यावरून ओघाळणार पाणी पितेस.. असं कुणी करत का? " मिठीत असणाऱ्या तिला विहानने विचारले..
" जस्ट लव्ह.. लव्ह.. लव्ह.. डार्लिंग. तूला तर नवीन नसावं.. मूर्तीला अंघोळ घालताना ओघाळलेलं पाणी.. तुम्ही श्रध्येने पिताच कि.. " स्टेला म्हणाली .
" बेबी , ते पाणी नाही.. तीर्थ असतं.. तो देव आहे. " विहान.
" यू आर गॉड.. माय एंजिल.. माय लव्ह.. " ती म्हणाली .
" आय एम नॉट गॉड.. तुझ्यासारखा माणूस आहे.. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा.. प्लिज लेट मी बी अ मॅन.. नॉट अ गॉड... मला तूझा प्रेमीच असू दे.. " विहान म्हणाला.

आठवणीतून विहान भानावर आला.. चढत जाणारी रात्र त्याला जास्तच गडद भासू लागली.. त्याने घड्याळकडे पाहिलं.. रात्रीचे नऊच वाजले होते.. त्याने एकवार कॅलेंडरकडे पाहिलं... रविवार.. पेनने केलेली खूण..
" उद्या तिच्या भेटीचा दिवस.. " मनात विहान म्हणाला. उद्या होणारी स्टेलाची भेट त्याच्या मनाला सुखावून गेली.. त्या खुशीत त्याला कधी झोप लागली ते कळलं नाही.

विहान लवकरच उठला.. आपलं सारं आवरुन तो किचन मध्ये आला.. आईने सारी तयारी करुनच ठेवली होती.. त्याने अंडी फोडून तव्यावर टाकली.. त्यात कांदा मिरची मीठ घालून ऑम्लेट बनवून डब्यात भरलं.. सोबत कॉफी बनवून थर्मासमध्ये ओतून घेतली..
" तूला.. ब्रेकफास्ट नाही करायचा का? " आईने विचारले.
" तिच्या सोबतच करेन.. आधीच उशीर झालाय.. येतो. " विहान म्हणाला.
विहान घाईतच बाहेर पडला.. आपल्या कारमध्ये.. पिशवी अन थर्मास ठेवला.. जाताना रस्त्यात सिग्नल लागताच तिथे आलेल्या मुलाकडून गुलाब घेतला.. रस्त्यात त्याच्या आवडीची पेस्ट्री घ्यायलाही विसरला नाही..
" आज तरी ती व्यवस्थित बोलली पाहिजे..? " हा विचार येताच विहान क्षणभर थबकला.. कार पार्किंग करुन खाली उतरला.. तिला भेटण्याचा आनंद होताच.. पण उत्साह अजिबात दिसतं नव्हता.. सारं सामान उचलून तो आत निघाला.. भेटण्याची नियोजित वेळ.. त्याला दहा मिनिटे अवकाश होता...हि दहा मिनिटे त्याला दहा वर्षांसारखी भासत होती.. बाहेर असलेल्या बाकावर तो बसला..

" विल यू मॅरी मी.. " स्टेला गुलाब देत म्हणाली .
विहानने गुलाब घेतला.. पण कसलंही उत्तर न देता तो स्टेलाच्या डोळ्यात पहात राहिला..
" से येस.. डार्लिंग विहू.. प्लिज से येस.. " विनवणी करत ती म्हणाली .
" तूला चांगलंच माहित आहे.. हे शक्य नाही.. " विहान म्हणाला.
" डोन्ट बिहेव सो रुड.. असं रुक्ष उत्तर नको देऊस.. मला चांगल वाटावं म्हणून हो म्हण.. फक्त एकदाच.. " स्टेला विहानला मागून मिठी मारत म्हणाली .
" तूला माहित आहे.. माझ्या आईने माझं लग्न ठरवलंय.. कदाचित आपण कधीच भेटू नाही शकणार.. " विहान तिला दूर करत म्हणाला.

गेट उघडले गेल्यामुळे विहान आठवणीतून बाहेर पडला.. सर्व सामान उचलून तो आत जायला निघाला..

|| क्रमशः ||