हो आहे मी विधवा.. Vrushali Gaikwad द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हो आहे मी विधवा..

हो... आहे मी विधवा... वयाच्या चाळीशीतच माझ्या आयुष्यात हा शब्द आला..लग्नानंतर मी माझ्या कुटुंबासोबत इतरांसारखीच खुप खुश होती. मी माझा नवरा आणि माझ्या दोन मुली असा माझा परिवार होता. पण आम्हांला कधी कोणाच्या विचारांची गरज लागत नव्हती. आम्ही जे काही करु ते आम्हांला आवडायचं, कोणी काही बोलेल किंवा कोणाला आवडेल की नाही याचा विचार आपण करायच नाही असं नेहमी माझा नवरा अविनाश मला आणि मुलींना सांगायचा. त्याने मला कधीच कपड्यांवर बंधन घातले नाही की मुलींना मनासारखं करण्यापासुन थांबवलं नाही. आज अविनाश आमच्या आयुष्यातुन गेला.. त्याचा एक महिन्यापूर्वी कामावरुन घरी परतत असताना रात्री अपघात झाला आणि त्या अपघातात तो आमच्यापासुन दुर गेला. मला आणि माझ्या मुलींना अविनाश शिवाय जगणं खुप अवघड होतं. पण अविनाश एक वाक्य नेहमी म्हणायचं कधी कोणाकडुन अपेक्षा करायची नाही किंवा कितीही जवळचा व्यक्ती दुर गेला तरी स्वतः हरायचं नाही.. हे मात्र मला आणि मुलींना सतत आठवत होतं.
आम्ही काही दिवस त्याच्या जाण्याच्या धक्क्यात होतो, किती काही झालं तरी माझा नवरा आणि माझ्या मुलींचा बाबा होता तो..पण आज लोकांना आमच्या तिघींकडे बघुन तसं जाणवत नसावं... आज माझी मोठी मुलगी अठरा वर्षांची आहे तर छोटी मुलगी पंधरा वर्षांची आहे. माझं लग्न आई बाबांनी वयाच्या विसाव्या वर्षीच ठरवले आणि अविनाश सोबत माझा संसार सुरु झाला होता पण स्वप्नात ही विचार आला नव्हता की आमच्या दोघांची सोबत फक्त विस वर्षांचीच आहे. आज तो आमच्यात नाही पण आम्हांला सतत तो नसल्याची जाणिव होते. अविनाशला जाऊन आज एक महिना झाला, आमचे अवघे चार व्यक्तींचे कुटुंब असल्यामुळे अविनाश वरच सर्व जबाबदारी त्याने घेतलेली मला तो नेहमी तुझं शिक्षण जरी जास्त असलं तरी तु मुलींसाठी त्याचा ऊपयोग कर तुम्हांला जे हवं ते मी आणुन देईल..तुम्ही फक्त खुश रहा...पण आज ते शक्य नव्हते.. मला आज माझ्या मुलींसाठीच बाहेर पडावं लागणार..
मी घरातुन बाहेर निघाली आणि आजुबाजुची लोकं माझ्याकडे बघायला लागले, ते जरी बोलत नसले तरी त्यांच्या नजरा बोलत होत्या. मी दुर्लक्ष करुन पुढे निघाली तेवढ्यात मागुन एक वाक्य ऐकायला आले, हीच्या नव-याला एक महिना ही नाही झाला तर ही चालली वाटतं आता बाहेर फिरायला.. मी ऐकुन न ऐकल्यासारखे केले. त्यांचे शब्द कदाचित त्यांच्या कानापर्यंत पोहचत नसणार म्हणुन त्यांना काय बोलुन गेल्या त्याची जाणिव नव्हती.. असो.. मी अविनाशच्या ऑफिसमध्ये गेली, अविनाश बाबतीत जे काही घडलं ते मी त्याच्या मॅनेजरला सांगितले आणि नोकरीसाठी विचारणा केली. त्यांनी मला थोडा वेळ बसवुन ठेवली खरी पण दोन तासानंतर तुम्ही ऊद्यापासुन जॉईन होऊ शकता असं सांगण्यात आले. मी खुप खुश होती माझ्यासाठो नाही तर मुलींसाठी अविनाश ला त्याच्या मुलींना जसं वाढवणार तसंच आता मी कुठेतरी प्रयत्न करणार होती. मला काही त्यांनी जास्त पगार नव्हता सांगितला पण मुलींसाठी भरपुर होता..
माझा रोजचा दिनक्रम सुरु झाला, मी रोज सकाळी सर्व आवरुन आठ वाजता घराबाहेर पडायची आणि संध्याकाळी सात वाजता पुन्हा घराय यायची. पण या मध्ये मला भरपुर काही सहन करावं लागत होतं. घराबाहे पडल्यानंतर माझे कपडे कशाप्रकारचे त्यावरुन लोकांची चर्रा सुरु व्हायची, त्यांना मी घातलेला प्रत्येक ड्रेस चुकीचाच वाटायचा पण माझ्या ही आयुष्यात अविनाश नी कधी मला कपड्यांमुळे थांबवलं आणि मी थांबवणार. मला आवडणारी प्रत्येक ड्रेसिंग मी करायची. जिन्स असो किंवा कुरता पायजमा मी आवडीने घालायची आणि त्यावर जे सुट होईल ती ज्वेलरी सुद्धा मी घालायची. कसं होतं माझ्या बाबतीत लोकांच्या मनात मी काही केलं तर चुकीचेच विचार येणार होते, मी कामाला गेली तरी ते अर्थ वेगळाच घेणार होते मी नटले तरी ते अर्थ वेगळाच घेणार होते.. म्हणुन मी एक दिर्घ श्वास घ्यायची आणि लोकांना उत्तर न देता मी त्यांच्या समोरुन जायची. पण हीच लोकं माझ्यावरच थांबले नाही तर माझ्या दोन्ही मुलींना ही प्रत्येक ड्रेस वरुन किंवा त्याच्या हसण्यावरुन, बोलण्यावरुन सुनवत राहिले. पण मुलीही आमच्या होत्या, अविनाश आणि मी त्यांना रडण्यासाठी किंवा खचुन जाण्यासाठी कधीच शिकवलं नव्हतं. त्या पण दुर्लक्ष करुन निघुन जायच्या..
माझ्या सासरी माझ्या चुलत दिराचे लग्न होते, म्हणुन मी प्रिया आणि प्रितीला घेऊन सासरी गेली. मी गेली पण माहित नाही कोणितरी वेगळा प्राणी आल्यासारखा सर्व मला बघत होते,.. मी इकडे तिकडे न बघता या दोघिंना घेऊन काकुंकडे गेली.. काकु पण मला बघुन शांत बसल्या आणि थोंड फिरवलं..
काकु, काय झालं आहे ??समजेल का मला???
तुला समजतंय तुझा नवरा नाही आता तु कसं राहायला हवं?? तो गजरा काढ आधी आणि पदर सोडलेला आहेस तो व्यवस्थित लाव.. मी गडबडली आणि बेडरुम मध्ये जाऊन पदर व्यवस्थित लावला आणि गजरा ही काढुन ठेवला..
काकु आता व्यवस्थित आहे का???
काय व्यवस्थित विचारते, मुली बघ तुझ्या कसे कपडे आहेत त्यांचे, त्यांचा बाप नाही आता आणि हे असे स्लीवलेस घालुन इतका मेकअप करुन बसल्या आहेत त्या.. मला खरंच नव्हतं आवडतं, असं वाटत होतं का आली मी इथे आणि कोणासाठी ??मी मुलींमध्थे काहीच बदल केला नाही. थोड्या वेळानी हळदीचा कार्यक्रम सुरु झाला आणि सर्व स्त्रिया आरती करुन हळद लावत होत्या..मी ऊठतच होती तर काकुंनी माझा हात धरला आणि बोलल्या तु नाही करायचं आता...
मी काकुंचा हात झटकला आणि पुढे गेली.. आणि आरतीचा ताट हातात घेतला, एक स्त्री बाजुलाच हळुच बोलली ही तर विधवा आहे ना..?? अपशकुन होईल हा?? मला आता यावेळी खरंच दुर्लक्ष करावं किंवा गप्प रहावं वाटलं नाही.. मी कोणाचाच विचार न करता ऊभी राहिली आणि सर्वांना दिसेल अशीच ऊभी राहिली..
हो.. आहे मी विधवा... मग काय झालं..
मी लावला गजरा तर काय झाल???
मला वाटलंच हसावं, तर काय झालं???
मी सजली थोडी तर काय झालं???
मी आली शुभ कार्यात तर काय झालं????

तुम्हांला वाटतंयच ना ..मी काही केलं तरी अपशकुन होईल तर मग तुमच्या विचारच अपशकुनी आहेत त्यांनाच काही अर्थ नाही.. जिथे तुमचे विचारच नाही सुधारत तर मी काय सुधरवु तुम्हांला.. माझा नवरा आता जगात नाही याचं तुम्हांला वाईट वाटलं पाहिजे, तुम्ही माझ्या मुलींचा आणि माझ्या जगण्याचा विचार केला पाहीजे तर तुम्ही स्वतः एक स्त्री आहात पण तुमच्या सारख्याच एका स्त्री ला समजुन नाही घेऊ शकत. आणि हा...मला पण इथे यायची इच्छा नव्हती तुम्ही आमंत्रण दिला म्हणुन मी आज इथे आहे.. मला मी इथे आली म्हणुन वाईट वाटतं नाही तर तुम्ही विचार बदलु शकत नाही याचं वाईट वाटतं मला.. तुम्ही एक व्यक्ती असुन एका व्यक्तीला समजुन घेऊ शकत नाही..
मी इथे तुम्हांला मी तुमच्या अशा विचारांच्या मुळे आणि अशा वागण्यामुळे मी माझं किंवा माझ्या मुलींच जगणं बदलणार नाही, तुमच्यासाठी आम्ही आमचे विचार बदलण्याची काही गरज नाही.. आम्ही आहोत तसेच राहु, तुम्हांला बदलायचं असेल तर तुमचे विचार बदलण्याचा प्रयत्न करा आणि दुस-यांना दोन गोष्टी शिकवुन त्यांना दुखावण्यापेक्षा, जमलंच तर स्वतः दोन गोष्टी शिका आणि स्वतः आनंदी रहा...

✍सौ.वृषाली रोहीत जाधव
8308782361