Swash Aseparyat - 10 books and stories free download online pdf in Marathi

श्वास असेपर्यंत - भाग १०



अरे अमर , " मित्रांमध्ये चर्चा करतांना हा आवाज माझ्या कानी पडला. आवाज तर ओळखीचा वाटत होता. पण तो मुलीचा असल्याने मी दुर्लक्ष केलं. असेल म्हटलं दुसरा कुणी तरी अमर."
परत जवळ आल्यावर

अरे अमर , " मी लक्ष्मी तुझ्या गावची . ओळखलं नाही का मला ?????"

ती जवळ आल्यावर मी तिला ओळखलं, की ही तर आमच्या गावच्या पाटलांची लक्ष्मी होती. बाबा ज्यांच्याकडे नेहमी कामाला असायचे त्याचं पाटलांची ती कन्या होती लक्ष्मी. बहुतेक चार - पाच वर्षे झाली असतील तिला न पाहून. गावात दहावीच्या निकालाच्या वेळी पेपर चाळत असतांना तिच्याशी तोंडओळख आणि अधून - मधून नजरभेट व्हायची.

" आजही ती तशीच सुंदर , मोहक दिसत होती . कानात गोल रिंग सारखे घातलेले, ओठांवर गुलाबी लाली, तसाच शोभेल असा मॅचिंग ड्रेस घातलेला, कपाळावर शोभेल अशा आकाराची लाल टिकली , कंबरेपर्यंत लांब केस , अगदी नजरेत भरावी आणि चेहऱ्यावर सदा हास्य असणारी, एखाद्या राजाची राणीचं शोभावी अशीच ती लक्ष्मी दिसतं होती. "

" राजमहालकडे जायला पाहिजे तर ती, आमच्या महाविद्यालयात काय करत आहे???? " असाचं मी तिला पाहता मनातल्या मनात पुटपुटलो...

" इकडे कशी काय लक्ष्मी??????
आणि आमच्या महाविद्यालयात काय करत आहेस ???? " मी लक्ष्मी ला आश्चर्याने प्रश्न केला.

माझे मित्र मात्र माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. कधी कोणत्या महाविद्यालयातील मुलीं सोबत न बोलणारा, जेवढं काम आहे मोजक्याच शब्दांत बोलणारा आणि आज चक्क एक अनोळखी मुलगी दिसताच बोलू लागणारा अमर, ते मात्र माझ्याकडे अवाक होऊन बघत होते. अमर कुण्या मुलींशी बोलत आहे यांवरच त्यांचा विश्वास बसत नव्हता...

अरे काही नाही रे , " मला माझे जुने कॉलेज घरांजवळून लांब पडत असायचं आणि काही शिक्षक निवृत्त झाले , त्यामुळे आता तिथे जायचा सुद्धा कंटाळा आला होता, आणि त्याचं कॉलेज मध्ये काही मन रमत नसल्याने मी या कॉलेजला ऍडमिशन घेतली . "

" मला माहिती नव्हतं की , तू पण या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असणार !!!"
लक्ष्मी आपल्या चेहऱ्यावर आनंद झाल्यासारखी बोलत होती.

जणू एखादा पक्षी मधुर गीत गाऊन स्वतः तर आनंद घेतोच आहे पण त्या निघणाऱ्या ध्वनीपासून इतरांना ही आनंद देतो अशीच लक्ष्मी बोलत होती. माझे मित्र आणि आनंद मात्र माझ्याकडे आणि तिच्याकडे टक लावून पाहत होते. तिच्या सोबत बोलतांना भूतकाळात मी केव्हा जाऊन पोहोचलो मलाच समजले नाही.

दहावीला चेहऱ्यावर थोडी - थोडी दाढी चे केस आलेला मी , आता पूर्ण चेहरा दाढी आणि मिशी ने वेढलेला असून , या लक्ष्मीने आपल्याला ओळखलं हेच नवल म्हणायचं.

" मला तू दुरून ओळखीचा वाटला म्हणून, तुझ्या जवळ आले , तर तू अमर होता. "
लक्ष्मी आपली बोलत होती.

" छान केलं!!! " लक्ष्मी इथे प्रवेश घेऊन...
मी आपला हळुवारपणे प्रतिसाद दिला.

आनंद , आणि सोबत असलेले मित्र आमच्या गोष्टीने रेंगाळले होते आणि ती कोण असेल ???? कधी अमर आपली या व्यक्तींशी ओळख करून देण्याची वाट पाहत बसले होते.

" ही आमच्या गावातील पाटलांची कन्या लक्ष्मी पाटील. अभ्यासात खूपच हुशार आहे ."
अशी मी लक्ष्मी ची ओळख सर्व मित्रांना करून दिली.

सोबतचं हा माझा जवळचा आणि खास मित्र " आनंद" मेहनती आणि कष्टाळू अभ्यासात सुद्धा हुशार, अशी मी आनंदची ओळख करून दिली . मी आणि आनंद आठव्या वर्गापासून सोबतच शिकत आहे आणि सोबतच वसतिगृहात राहत असतो..

सर्वांशी ओळख करून दिली . सर्वांशी ओळख झाल्यावर लक्ष्मीने आपले गोड स्मित हास्य करुन आमचा निरोप घेतला.
आम्ही सुद्धा सर्वांचा निरोप घेऊन मी आणि आनंद वसतिगृहात जाण्यासाठी निघालो .

जेवण झाल्यावर आनंदने मला प्रश्न केला,
" अमर तुझी एवढी ओळख कशी काय मित्रा???? मी एवढे वर्ष तुझ्या सोबत असतांना त्या गोष्टीचा किंवा लक्ष्मी चा उल्लेख केला असावा , असे मला कधी आठवत नाही!!!!"

अरे आनंद , " मी कोणती गोष्ट कधी लपवली आहेस का तुझ्या जवळून??? " आजपर्यंत ज्या कामाच्या गोष्टी असायच्या, तुझ्यासोबत शेअर करत असतो न!!! "

आफ्टर ऑल , " यू आर माय बेस्ट फ्रेंड अंड ब्रदर अल्सो"
आता राहिली लक्ष्मी ची गोष्ट, तर ती माझ्यासाठी एवढी महत्त्वाची वाटली नाही . त्यामुळे ती तुला सांगावीशी वाटली नाही . आज अचानक ती दिसली. तिने मला आवाज दिला तर बोलावं लागेल ना. नाही बोललो असतो तर ते बरं वाटलं नसतं!!!. आपल्या कॉलेजमध्येच प्रवेश घेतला आहे आता तर होईल आपली तिची भेट . बोलता - बोलता आम्हाला कधी झोप लागली , ते कळलंच नाही .

अशीच , आमची लक्ष्मीची आनंद शी ,माझ्याशी व इतर मित्रांशी आता चांगलीच गट्टी जमली होती . लक्ष्मी ला जेवण बनवण्याची आवड असल्याने आणि आम्हांला बाहेरचे, नवीन पदार्थ खायची आवड असल्याने तसं तर आम्हांला वसतिगृहात एकच एक जेवण मिळत असल्याने कुठे चटकदार मिळते का याचीच आम्हीं वाट बघत असायचो. म्हणून कधी कधी बिन बुलाये महमान पधारे, म्हणून आम्हीं कधीही जेवायला तयार असायचो. लक्ष्मी आता आम्हांला सुद्धा जास्तीचा जेवणाचा डबा आणत असायची.

दिवस कसे भुरकुन निघून जात होतें, काहीच कळतं नसायचं...महाविद्यालयात एवढं रममाण झालो होतो की,घरची आठवण येत असायची पण या महाविद्यालयात आलं की सर्व विसरून जात असे...

सावीतरे, आईला बाबा याचं नावाने हाक मारायचे.
" मी काय म्हणतो, माझ्या पायाचा त्रास जास्तचं वाढत चालला . जखम बसते पण परत त्यातून पस बाहेर येत असतो त्यामुळे जास्त वेळ काम केले की, लगेच थकवा येतो आणि मग पाटील ओरडते. काम लवकर नाही निघालं की पाटलांच्या शिव्या ऐकावं लागत असते."

" यंदाच्या वर्षी, पाटलांकडे नोकरीला नाही राहत म्हणतो मी!!!!"
बाबा सावकाश आणि गंभीर होऊन बोलत होते.

" मग काय करायचं म्हणता तुम्ही ?????" ' आपलं पानावर आणणं अन् हातांवर खाणं ' असतं . पाटलांची चाकरी केली नाही , तर आपली सोय लागणार का????
आईसुद्धा गंभीर मुद्रेत बोलत होती...तिच्यापुढे पण पेच निर्माण झाला होता.. नवऱ्याचं पायांच दुखणं असल्याने ती सुद्धा काही म्हणतं नव्हती.

" बरोबर आहे तुवं म्हणणं !!!! " पण यावर्षी आपली पडीक शेती घरीच करावी म्हणतो..

" मी पाटलांकडून शेतीसाठी काही उसनवारी कर्ज घेतो , अमदा चांगला पाऊस , पाणी झाला की, चुकवुन देऊ पाटलांची परत फेड. देतील पाटील शेतीसाठी कर्ज. त्यांनाही माहिती आहे की,अंबादास ला काम करतांना त्रास होतो, शेवटी तो धनी मालक,गाय लंगडी झाली की ,खाटकाला विकून टाकावी लागते, दोन पैसे तरी येतील म्हणून....

आई पण आता थोडी सततच्या कामाने थकली होती.
आईने " ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं!!" म्हणून आपला होकार भरून दिला.

बाबांनी पाटलांकडून वावरांसाठी काही कर्ज म्हणून रक्कम घेतली. तेंव्हा पाटील म्हणतात, अंबादास , " ठीक आहे . तुझ्या कडून जास्त काम होत नाही, म्हणून तू स्वतः शेती करतो म्हणत आहे, तो तुझा निर्णय योग्य म्हणायचा . "

" पण कर्ज परतफेड करतांना अडचणी आल्या तर रक्कमेची कशी परतफेड करणार ??????"
काही आमच्याकडे पैशाच्या मोबदल्यात हवे की नाही नाही!!!!

राहिलं सर्व चांगलं पीक पाणी तर आमची घेतलेली रक्कम तू वापस करणार एवढं आम्हांला माहिती आहे ...

पण.......म्हणतं पाटील शांत झाले....

" मालक विश्वास ठेवा, एवढे वर्ष तुमची चाकरी केली, आज परिस्थिती तशी असल्याने शेती करतोय म्हणतो,म्हणून तुमच्याकडून कर्ज घेत आहे..
बाबा केविलवाणी होऊन बोलत होते...

पण ......

" काहीतरी पैशाच्या बदल्यात तुला आमच्याकडे गहाण म्हणून दागिने, शेती, अजून काही असेल ते ठेवावे लागेल ."
पाटलांचा उद्देश बाबांनी समजून घेतला ..

पाटील काय म्हणत आहेत ते समजल्यावर बाबांनी ती घरची जमीन गहाण ठेवण्याचा विचार केला...

" घरच्या जमिनीचा तुकडा तुमच्या स्वाधीन करतो आहे मालक!!!" असे बोलून बाबा शांत झाले....

"""आत्ता कुठे व्यवहार बरोबर झाला अंबादास राव.... !!!!!"

पैश्याची परतफेड लवकर करा आणि जमिनीचा कराराचा कागद वापस घेऊन जा . अशी तंबी पाटलांनी बाबांना दिली. बाबा पैसे घेऊन घरी परत आले.....

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED