Premgandh - 24 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - २४)

आपण मागच्या भागात पाहीलं की अजय राधिकाला मघाशी झालेल्या प्रसंगाबद्दल साॅरी बोलत असतो.... पण राधिका मात्र त्याला समजून घेते. अजयच्या बाबांची आणि राधिकाची बसमध्ये भेट होते. राधिका घरी जाऊन आईला अजयसोबत घडलेल्या प्रसंगाबद्दल सगळं सांगते... पण संध्याकाळी त्या गुंडाच्या घरी येण्याने मात्र राधिकाच्या बाबांची तळपायाची आग मस्तकात जाते आणि ते खूप रागासंतापात त्याला बोलत असतात, पण तो त्यांचं सर्व शांतपणे ऐकत असतो.... आता बघूया पुढील भागात काय होते ते......


➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗


राधिकाचे बाबा आणि सगळेच त्याच्याकडे रागाने बघत होते. पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र एक असूरी हास्य होतं.


तो - "अहो मामा, माझ्याशी लग्न करून कसं काय तुमच्या पोरीचं आयुष्य खराब होईल सांगा. स्वतःच्या घरातच तर राहणार आहे तुमची पोरगी... घरात सर्वच स्वर्गसुख असेल तीला... नोकरचाकरांनी घर भरलंय आपलं. दागदागिने, पैशांची कसलीच कमतरता भासणार नाही तिला.... अगदी राजवाड्यात राणीसारखी राज्य करेल तुमची पोरगी..." तो मिशांना पिळ देतच म्हणाला.


राधिकाचे बाबा - "तुझा राजवाडा, नोकरचाकर, दागदागिने, पैसा सगळं तुझ्याकडेच ठेव, समजलं का. आम्हाला काय लाच देतोस का तू? तुझ्या त्या हरामच्या पैशांसाठी माझ्या पोरीचा बळी देऊ का मी? आम्हाला लालच नाही तुझ्या पैशांची... आणि तुझ्या पैशांचा माज इथे नाही करायचा कळलं का, काय माज करायचा तो तुझ्या घरी जाऊन करायचा समजलं का... स्वर्गसुख कसलं आलंय तुझ्या घरात.... मी आणि माझ्या बायकोने नरकयातना भोगलेत त्या घरामध्ये... आता काय माझ्या पोरीला ढकलू का त्या नरकात? आणि आत्ताच्या आत्ता ऊठ इथून आणि चल चालता हो... आणि परत माझ्या घराकडे वळून बघायचं नाही समजलं का..."


तो - "काय मामी, मामा एवढं काही बोलत आहेत मला आणि तुम्ही एकदम शांत उभ्या आहेत.... मामांना समजवा जरा.... घरी आलेल्या पाहुण्यांना अशी वागणूक देतात का तुम्ही? आल्यापासून नाही चहा पाणी विचारत कोणी.... मामा तुमचं म्हणून मी एवढं ऐकून घेतो, नाहीतर कोणाचं ऐकून घेत नाही मी...."


राधिकाचे बाबा - "तीला काय बोलतोस तू आणि कोणाचा कसा, किती पाहुणचार करायचा हे चांगलं ठाऊक आहे आम्हाला... तू शिकवायची गरज नाही आम्हाला..." ते खूप रागातच बोलत होते.


तो - "हे बघा मामा, तुम्ही कधीशी माझा फक्त अपमान करताय... तरीही मी अजूनही तुमचा मान ठेवत आहे... माझी लिमिट मी अजूनही सोडलेली नाही.... मी काय इथे तुमच्याशी वाद घालायला आलेलो नाही... शांतपणाने तुमच्याशी बोलतोय मी आणि फक्त तुमच्या मोठ्या बहीणीसाठी आणि राधिकासाठी गप्प आहे मी... कारण तुम्हाला वाईटसाईट बोलून या दोघींच्या नजरेतून मला उतरायचं नाही.... नाहीतर कोणाची हिंमत होत नाही माझा अपमान करायची... शेवटी काय तर आई आणि बायको यांच्या मनाचा विचार करावा लागेल ना मला.... आणि मी कोणी परका आहे का मामा? आपलं कटुंब पण एकच आहे ना... कसला एवढा रागराग करताय तुम्ही...?" तो विचित्र हसतच म्हणाला.


राधिकाचे बाबा - "वाह... म्हणे आपलं एकच कुटुंब... कुटुंब म्हणजे काय असते हे तुला आणि तुझ्या आईशीला ठाऊक तरी आहे का रे? आपल्याच सख्या भावाला, भावजयला घरात नोकरासारखे वागणुक देणारे तुम्ही लोकं... तुम्हाला काय कुटुंबाचं महत्त्व कळणार आहे.... आणि तू काय माझ्याच घरी येऊन मलाच धमकी देत आहेस असं? तूला काय वाटलं तूझ्या धमकीला घाबरेन का मी? तुझ्या धमकीला भीक नाही घालत मी समजलं का? आणि तुझ्यासारख्या गुंडमवालीच्या मानाची मला काहीच गरज नाही... नाही माझ्या पोरीला.... तू गुंडमवाली असशील तो तुझ्या घरचा, माझ्या घरी येऊन दादागिरी करायची नाही... आणि माझ्या मुलीचं लग्न कोणाशी करायचं ते माझं मी ठरवेन.... तू सांगायची गरज नाही... आणि आता शेवटचं सांगतोय तूला चुपचाप निघायचं इथुन, नाहीतर धक्के मारून हाकलून देईन मी, लक्षात ठेव तू...."


तो - "अहो मामा, झालं ते झालं... कशाला त्या जून्या गोष्टी उगाळून काढताय तुम्ही? त्या़वेळी माझ्या आईची चुकी झाली. तिच्या वतीने मी माफी मागतो तुमची... मोठ्या मनाने माफ करा माझ्या आईला... तुमची मोठी बहीण आहे ती आणि मोठी बहीण आईसमान असते... आईचा का राग धरावा एवढा..." आणि त्याने बाबांसमोर हात जोडले...


राधिकाचे बाबा - "वाह रे व्वा... मला शिकवतोस का तू नात्यांची किंमत? ज्यांना स्वतःला आपली नाती जपता येत नाहीत.... फक्त ज्यांना नात्यापेक्षा पैसा महत्वाचा वाटतो, तो मला नाती जपायला शिकवतो वाह... तुमच्याशी आमचं कोणतंच नातं उरलेलं नाही.... ज्यावेळी आम्ही ते घर सोडलं, त्यावेळीच तुमच्याशी असलेलं नातं पण तुटलं आणि पुन्हा आता तुम्ही मायलेक आमच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करू नका... कारण आता आमच्याकडून तुम्हाला फक्त अपमानच मिळेल.... आणि अजून थोडा वेळ पण तुझ्याशी बोलण्याची माझी अजिबात इच्छा नाही... म्हणून चुपचाप निघायचं इथून..."


तो - "बरं ठिक आहे... निघतो मी, पण तुम्हाला मी घाबरून चाललो असं नका समजू... तुम्ही आता रागात आहात म्हणून असे बोलत आहात. पण जाता जाता तुम्हाला एक सांगतो मी, राधिकाचं लग्न होईल ते फक्त माझ्याशीच होईल, याद राखा तुम्ही.... आणि जर ती माझी नाही झाली तर तीला मी दुसऱ्या कोणाची होऊ पण देणार नाही... आणि मी हे फक्त सांगत नाही, करून पण दाखवेन.... विचार करून ठेवा तुम्ही या गोष्टीचा. आता जातोय मी, पण पुन्हा येईन आणि त्यावेळी तुमचा आमच्या लग्नाला होकारच असेल अशी आशा करतो.... नाहीतर पुढच्या परीणामांना तोंड द्यायला फक्त तयार राहा तुम्ही बस्स...." विचित्रपणे हसतच तो म्हणाला आणि जायला निघाला.


पण राधिकाच्या बाबांना त्याच्या या बोलण्यावर खूप राग आला होता. त्यांनी त्याला जात असताना जोरात खांद्याला पकडून आपल्या बाजूने वाळलं आणि रागातच त्याला जोराची एक कानाखाली लावून दिली. त्याने गालावर हातच ठेवला. राधिका, आई वैगेरे सगळे खूप घाबरले. ते सगळे बाबांच्या जवळ येऊन उभे राहिले...


राधिकाचे बाबा - "तू समजतोस कोण रे स्वतःला...? धमकी देतोस तू मला? तूला काय वाटलं तुझ्या अशा धमक्यांना घाबरून माझ्या मुलीचं लग्न मी तुझ्याशी लावून देईन का? तुझी जबरदस्ती आहे का की माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशीच करून द्यावं असं? आणि कोणत्या परीणामांची गोष्ट करतोस तू? तूझी गुंडागर्दी करणार आहेस का तू इथे? आणि कोणत्याही परिणामांना मी घाबरत नाही... आतापर्यंत जसा मी एकटा माझ्या बायको पोरींच्या पाठीशी उभा राहीलोय ना, यापुढेही तसाच त्यांच्या पाठीशी उभा राहीन मी.... जा तूला जे काय करायचं ते कर... बघतोच मी पण आता... आणि चल निघ आत्ताच्या आत्ता चालता हो इथून. यापुढे माझ्या घरी कधीच पाय ठेवायचा नाही तू...." बाबा खूप रागारागात बोलत होते.


तो - "बरं ठिक आहे मामा, जशी तुमची इच्छा... येतो मी... मामी चला येतो. भेटू नंतर..." त्याने राधिकाकडे एक तिरका कटाक्ष टाकला आणि गाडीत बसून तो निघुन गेला.


राधिका बाबांना घरामध्ये घेऊन गेली. आईने त्यांना पाणी प्यायला आणून दिलं. सगळेच खूप टेन्शनमध्ये होते... घरात थोडावेळ शांतता पसरली. कुणीच काहीच बोलत नव्हतं... बाबांनीच बोलायला सुरुवात केली.


बाबा - "तुम्ही सगळे एवढे का शांत शांत आहेत? घाबरले का तुम्ही?" बाबांचं ऐकून सगळे बाबांच्या जवळ जाऊन बसले...


सोनाली - "हो बाबा आम्ही खूप घाबरलो होतो... त्याने काही केलं असतं तर तुम्हाला?" तिने निरागसपणे प्रश्न केला.


बाबा - "अगं वेडी गं माझी पोरगी, एवढं घाबरायचं असतं का? काही करत नाही तो मला... आणि तुम्ही तर माझ्या सगळ्या खूप धीट, बिंधास्त मुली आहात... आणि अशा मवाली लोकांना घाबरून कसं चालेल? त्यांना वेळीच धडा शिकवायला हवा ना, नाहीतर हिंमत वाढते त्यांची... बरोबर ना... आणि काही घाबरायचं नाही बाळा, मी आहे ना.... कोणी काही करत नाही आपल्याला..." ते सोनुच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत म्हणाले.


आई - "काय वाईट केलंय आपण त्यांचं तेच कळत नाही... सारखे काही ना काही तरी कारणावरून त्रास देतच आहेत आपल्याला... किती हालअपेष्टा करून पोरींना लहानाचं मोठं केलं, तेव्हा आपण मेलेत की जगलेत हे कोणी ढुंकूनही पाहीलं नाही... आणि आता कुठे चांगले सुखाचे दोन घास खात होते ते पण त्यांना बघवले नाही म्हणून इथे येऊन पण त्रास देत आहेत.... अजून नशिबात काय भोग वाढून ठेवलेत ते परमेश्वरालाच माहीती..." आणि बोलता बोलताच आईने साडीचा पदर डोळ्यांना लावला. सगळ्यांचेच डोळे पाणावले. राधिकाने आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि तीला धीर दिला.


राधिका - "अगं आई, कशाला रडतेस तू? काही वाईट होत आपलं, सगळं काही ठीकच होणार आहे. नको जास्त काळजी करूस."


बाबा - "हो ना तेच तर, काही कोणाला घाबरायचं कारण नाही... कशाला उगाच रडतेस? तुच अशी धीर सोडून रडलीस तर पोरींनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? उलट तूच त्यांना हिंमतीने लढायला शिकवायला पाहीजे..."


राधिका - "हो आई खरंच, बाबा अगदी बरोबरच बोलत आहेत..."


आई - "काळजी वाटते गं तुमची, बाकी काही नाही..."


राधिका - "अगं आई, नको काळजी करुस तू, काही होत नाही... आणि आता रडू नकोस, शांत हो..."


घरात एक प्रकारची शांतता पसरली होती. एकमेकांना सगळेच आपापल्या परीने धीर देत होते पण प्रत्येकाच्या मनात मात्र एक अनामिक भिती निर्माण झाली होती. प्रत्येकजण आपापल्या विचारातच वावरत होते.


➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗


अजय - "अगं आई साॅरी ना, परत असं नाही करणार मी. त्यावेळी प्रसंगच तसा होता गं, म्हणून तसं वागावं लागलं मला... अगं बोल ना काहीतरी. किती वेळ अशी रागावून बसणार आहेस? चुकलं माझं... साॅरी आई..."


आई - "मला अजिबात बोलायचं नाही तुझ्याशी... तूला एवढं समजावून पण जर तू माझं ऐकत नसशील तर काय उपयोग...? जा तुझ्या मनात येईल तसं वाग तू... मला काहीच सांगू नकोस..."


अजय - "आई खरंच चुकलं गं माझं... परत असं नाही वागणार मी..."


आई - "अरे तूला माहीती आहे ना... तुझ्या अशाच वागण्यामुळे घरात किती काही वाईट गोष्टी घडून गेल्यांत... अजूनही आठवलं तरी मन बेचैन होते माझं..." आईच्या डोळ्यात बोलता बोलताच पाणी तरळलं... अजय गप्पच होता...


बाबा - "अगं सावी, का असं ऐकवून दाखवतेस गं त्याला? अगं त्यावेळी त्याची एकट्याचीच चुकी होती का? आणि आता तर तुझ्या मनासारखाच वागतोय ना तो... काही वेळा आपल्या आयुष्यांत असे प्रसंग येत असतात गं कि आपल्यालाही जसा समोरचा वागेल तसं वागावं लागते... प्रत्येकवेळी सहन करून कसं चालेल तूच सांग बरं... आणि जे घडून गेलं ते गेलं.... ते आठवून कशाला स्वतःला त्रास करून घेतेस?"


आई - "तुम्हाला काय कळतेय आईचं काळीज? माझ्या पोराला कोणी नावं ठेवलेली, कोणी वाईटसाईट बोललेलं मला अजिबात आवडणार नाही.... त्याच्या असं वागण्याने अजून काही वाईट होईल की काय या गोष्टीची सतत भीती वाटत राहते हो मला.... आधीच एवढं काही घडून गेलंय, त्या गोष्टीचं सगळं खापर माझ्या पोराच्या नावावर फोडलं गेलंय... अजून पुढे काही असं सहन करण्याची क्षमता नाहीये माझ्यांत..." आई साडीचा पदर डोळ्याला लावतच रडू लागली.


बाबा - "अगं सावी, तुझ्या पोरावर तुझा विश्वास नाही का?"


आई - "माझा माझ्या मुलावर पुर्ण विश्वास आहे, पण लोकांवर नाही..."


अजय - "आई तुझा विश्वास आहे ना माझ्यावर मग बस झालं मला... आणि तू एवढा नको विचार करूस गं. उगाच आजारी पडशील तू आणि तुला त्रास होईल असं मी आता काहीच करणार नाही गं ..."


आई - "बरं ठिक आहे बाळा, पण अशा गुंडांच्या नादी नको लागत जाऊस तू.... मला तूला गमवायचं नाहीये बाळा.... त्या लोकांचा काहीच नेम नसतो.... आधी जे घडून गेलं त्याची पुनरावृत्ती नकोय आपल्या घरात..."


अजय - "आई असं वागून तूला मी परत दुखावणार नाही गं आता... विश्वास ठेव माझ्यावर आणि आई आता मला खूप भूक लागलंय गं... चल ना जेवायला वाढ मला... आज ना मी तूला माझ्या हाताने भरवणार आहे..."


आई - "काही नको... माझी मी जेवेन... एवढा मस्का नको लावूस मला...." आईने त्याच्या हातावर एक फटकाच दिला. बाबा आणि अजय दोघेही हसू लागले....






क्रमशः-


(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)


[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]


🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹


💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - २४


➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️


🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED