Premgandh - 25 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - २५)

आपण मागच्या भागात पाहीलं की, राधिकाचे बाबा खूप संतापलेले असतात... तो गुंड धमकीच्या स्वरुपात त्यांच्याशी बोलत असतो म्हणून राधिकाचे बाबा त्याला रागातच कानाखाली मारतात आणि त्याला निघून जायला सांगतात... घरातले सगळे खूप घाबरलेले असतात, पण राधिका आणि बाबा सगळ्यांना धीर देतात... इथे अजयची आई पण अजयवर रागावलेली असते. पण अजयचे बाबा आणि अजय तिला समजावतात... आता बघूया पुढील भागात काय होते ते....

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗

--श्रीरामपूर-- भालेकर वाडा---

गोविंद बाहेरून आल्यापासूनच घरात सगळ्या वस्तूंची आदळआपट करत फिरत होता... आणि जोरजोरात ओरडत होता... त्याचे काही साथीदार त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण तो कोणाचंच ऐकत नव्हता. घरातले सर्व नोकरचाकर खूप घाबरले होते... ते एका साईडला उभे राहून त्याला बघत होते. कुसुम आत्या त्याला सारखी समजावत होती. पण तो समजावण्याच्या पलीकडचा माणूस काय ऐकणार तीचं....?

गोविंद - "माझ्या अंगाला हात लावायची कोणाची हिंमत होत नाही आणि तुझ्या त्या भावाने सगळ्यांसमोर माझ्यावर हात उचलला. त्याची किंमत तर वसूल करून घेईनच मी... सोडणार नाही तुझ्या भावाला लक्षात ठेव..." तो कुसुमकडे हात करून रागारागातच बोलत होता.

कुसुम - "तूला काय गरज होती त्याच्या घरी जायची? मी सांगितलं होतं का जायला तूला? थोडे दिवस थांबू शकत नव्हतास का तू? तूला बोलली होती ना मी की वेळ आली की मी स्वतः जाऊन राधिकाला मागणी घालून येईन असं? तुझा विश्वास नव्हता का माझ्यावर?"

गोविंद - "आता तर माझा कोणावरच विश्वास नाही. काय करायचं ते माझं मलाच करावं लागेल. मला गरज नाही तूझी. हे सगळं होतेय ना ते सगळं तुझ्यामुळे होतेय. तूला काय गरज होती त्यांना आपल्याच घरात नोकरासारखं वागवायची? तोच तूझा राग आता माझ्यावर काढतोय तो.
या सगळ्याला कारणीभूत तूच आहेस. जर राधिकाचं लग्न नाही झालं ना माझ्याशी तर त्या मामाला पण बघून घेईन आणि तू माझी आई असलीस तरी तूला पण सोडणार नाही मी बघ तू, मग मला कोणाचा जीव घ्यावा लागला ना तर तो पण घेईन मी..." तो रागारागातच कुसुमला बोलत होता.

कुसुम - "मेल्या मुडद्या, तू नशेत काय बोलतोस ह्याची तरी शुद्ध आहे का तुला? स्वतःच्या आईला धमकी देतोस का तू? हेच दिवस बघण्यासाठी का तूला मी लहानाचं मोठं केलं... हे जे काही सगळं केलंय ते कोणासाठी केलंय मी? सगळं तुझ्यासाठीच केलंय मी... माझा एकुलता एक मुलगा या सर्व संपत्तीवर राजासारखा राज करेल हे माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न तर दूरच राहीलं आणि जीने तुझ्यासाठी एवढं सगळं केलं, तिलाच तू मारायची धमकी देतोस? शोभते का तूला हे?" ती पण रागारागातच बोलत होती.

गोविंद - "ते बाकीचं काही तू मला सांगू नकोस... एवढं केलंयस ना माझ्यासाठी तर अजून एक गोष्ट कर... राधिकाचं लग्न माझ्याशी कसं होईल ते बघ आणि जर तुझ्याने ते काम झालं नाही तर मग मी माझ्या परीने तीला मिळवण्याचा प्रयत्न करीन, मग तू आमच्या मध्ये यायचं नाही. सांगून ठेवतो तूला... आणि जर तू आमच्या मध्ये आलीस तर तू माझी आई आहेस हे पण मी विसरून जाईन, लक्षात ठेव तू..." तो हाताचं बोट दाखवूनच तीला बोलत होता.

कुसुम - "म्हणजे? तू काय करणार आहेस गोविंद? तू गुंडागर्दी करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न करणार आहेस का? तू असं काहीही करणार नाहीस गोविंद... माझं ऐक तू... मी सरू आणि नाम्याशी शांततेने बोलून घेते... पण तू असं काहीही चुकीचं करणार नाहीस तूला सांगून ठेवते मी..."

गोविंद - "तूला काय वाटते? तू त्यांच्याशी शांततेने समजून बोलशील तर तूझा भाऊ लगेच राधिकाचं लग्न माझ्याशी लावून देणार आहे का? तो तर आपल्या दोघांना नजरेत घेत नाही. अजूनही त्याचा आपल्यावरचा राग गेलेला नाही. काय करायचं ना ते शांततेने काहीच होणार नाही... काय ते माझ्या पद्धतीने मलाच करावं लागेल... काय करायचं ते माझं मी बघतो... तू मध्ये पडू नकोस..." तो रागारागातच पाय आपटतच बाहेर निघून गेला.

"अरे गोविंदा ऐक माझं, असं काहीही करणार नाहीस तू... गोविंदा ऐक..." कुसुम ओरडूनच त्याला आवाज देत होती. पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीतच नव्हता. तिच्याकडे दुर्लक्ष करून तो रागारागातच बाहेर निघून गेला. तिने डोक्यालाच हात लावला आणि खालीच बसून पडली. तिच्याकडे घरातले नोकर धावतच आले... त्यांत एक म्हातारी आजी होती... तीने कुसुमला पाणी प्यायला दिलं. कुसुमने ते पाणी पिलं. आणि त्या आजीला ती मिठी मारून खूप रडू लागली. ती आजी तीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत होती.

कुसुम - "सावीत्री माय, तू एकदम बरोबर बोलली होती गं मला. मी त्यावेळी तुझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही.... नेहमी मुलीसारखं मला मानलंस. मुलीसारखं मला समजावलंस... पण मीच कधी तुझं ऐकलं नाही....
फक्त पैसा, धनसंपत्ती हेच माझ्या डोळ्यासमोर होतं. सगळं फक्त माझ्या मुलालाच मिळावं असं मला वाटत होतं... या पोराला इतका जीव लावला. नाही नवर्‍याकडे लक्ष दिलं, नाही सख्या भावाची, भावजयीची दया केली मी... हया संपत्तीवर फक्त माझ्या मुलाचाच हक्क असणार एवढाच विचार मी त्यावेळी मी करत होती... त्यावेळी नाही कोणती नातीगोती जपली, नाही कोणाशी चांगलं वागली... कोणासाठी केलं हे सगळं मी तर या माझ्या मवाली पोरासाठी आणि त्यालाच आज माझी काडीची किंमत नाही.... ह्याच्यासाठी एवढं सगळं करून तरी आज आईलाच मारण्याची धमकी देतोय तो... काय माझं फुटकं नशिब..." आणि ती डोक्याला हात लावूनच रडू लागली...

सावित्री माय - "अगं रडू नकोस कुसमे. आता रडून तरी काय फायदा आहे. तूला त्याचवेळी मी किती समजावत होती, पण तू माझं अजिबात ऐकलं नाहीस. जे तू पेरलंस तेच उगवलंय, आता ते नाकारता पण येणार नाही. आणि तुला अजून एक गोष्ट आवर्जून सांगते बघ. राधिकाचं लग्न गोविंदाशी अजिबात नको लावूस. बिचारी ती पोरगी साधी आहे. कशाला तिचं आयुष्य खराब करायला निघालीस?"

कुसुम - "अगं सावित्रीमाय, तसं नाही गं. तीच्यासोबत लग्न केलं तर माझा गोविंदा सुधरेल तरी. म्हणून तिच्यासोबत लग्न लावायचा विचार करतेय."

सावित्रीमाय - "तूला काय वाटते कुसमे? जो पोरगा स्वतःच्या आईचं ऐकत नाही, इज्जत करत नाही, तो काय त्याच्या बायकोची इज्जत करेल का? आणि तो तिचं ऐकेलच असं कशावरून? बघ मला एवढंच बोलायचं आहे की नको त्या पोरीच्या आयुष्याची उधळण करूस. मी सांगायचं काम केलं तूला, बाकी तूझी मर्जी." एवढं बोलून सावित्रीमाय उठून गेली. कुसूमपण तिच्या बोलण्याचा विचार करत होती आणि यावेळी तीला पण तिचं बोलणं पटलं. अगोदर तिचं बोलणं न ऐकून खूप मोठी चूक केली होती, पण आता यावेळी पुन्हा तीला तीच चुक करायची नव्हती. ती उठली आणि सावित्रीमायकडे गेली.

कुसुम - "सावित्रीमाय, चल माझ्यासोबत एका ठिकाणी जायचं आहे आपल्याला." आणि कुसुम तीला हाताला पकडून घेऊन जाऊ लागली.

सावित्रीमाय - "अगं कुसमे, कुठे घेऊन चाललीस मला?"

कुसुम - "अगं तू चल माझ्यासोबत. काम आहे एका ठिकाणी."

सावित्रीमाय - "बरं चल..." दोघीपण गाडीत बसल्या आणि कुसूमने ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. काही तासाने ते एका घरासमोर येऊन उभे राहिले. दोघीही गाडीतून खाली उतरल्या. सावित्रीमाय मात्र खूप खुश झाली. ती लगबगीने घरात गेली. सगळे जेवायला बसले होते.

सावित्रीमाय - "या मायला विसरलास होय रे तू नाम्या... आठवन हाय की नाय माझी...."

तसे राधिकाचे आईबाबा पटकन उठले आणि जाऊन सावित्रीमायच्या पाया पडले.

राधिकाचे बाबा - "अगं माय तूला कसा विसरेन गं मी? माझ्या आईनंतर तर तूच मला आईची माया दिलीस. लहानाचं मोठं केलंस. तुझे खुप उपकार आहेत गं माझ्यावर... तूला कसं विसरेन मी सांग? ये ना बस." त्यांनी सावित्रीमायला हाताला पकडून पलंगावर बसवलं. राधिकाच्या आईने तीला पाणी आणून दिलं.

राधिकाचे बाबा - "आज इथे कुठे वाट चुकलीस तू? आज कशी काय आठवण आली माझी तूला?"

सावित्रीमाय - "माय कधी विसरते का आपल्या लेकरांना? आता म्हातारी माणसं आम्ही. कुठे येताजाता येत नाही. कोणी सोबत असलं की जमते. तुम्हा लेकरांना तर काय मायची आठवण येत नाय. मग काय मीच आली तुम्हाला भेटायला."

राधिकाचे बाबा - "अगं माय आम्ही गावी येत नाही पण असं नाही की तूला विसरलो. तुझी आठवण तर नेहमीच येत राहते आम्हाला. पण आता कोण हाय आमचं तिथे? म्हणून नाय येणं जाणं होत तिकडे."

सावित्रीमायने चौघींना जवळ बोलावलं. चौघींनी पण तीला नमस्कार केला. राधिकाच्या बाबांनी चौघी पोरींची सावित्रीमायसोबत ओळख करून दिली.

सावित्रीमाय - "पोरी मोठ्या झाल्या रे नाम्या तुझ्या. अगदी नक्षत्रावाणी दिसतात बघ चौघी पण. पोरी लहान होत्या तेव्हाच घर सोडलं होतं. लहान होत्या तेव्हा माय माय करत माझ्या मागे फिरायच्या, आता काय आठवत पण नसेल त्यांना." चौघीपण हसत होत्या.

सावित्रीमाय - "राधी, ये इथे माझ्याजवळ बस." राधिका सावित्रीमायच्या जवळ जाऊन बसली. राधिकाच्या डोक्यावरून, पाठीवरून तीने मायेने हात फिरवला.

"राधी, खूप कौतुक वाटलं बघ पोरी तुझं. आईबापाचं नाव मोठं केलंस तू. पुढेही अशीच प्रगती करत रहा पोरी. आणि तुम्ही तीघीपण राधीसारखंच चांगलं शिकून, स्वतःच्या पायावर उभं राहून आईबापाचं नाव मोठं करायचं बरं का पोरींनो." मेघा, मीरा आणि सोनालीकडे बघत सावित्रीमाय बोलली.

कुसुम मात्र घराबाहेरच उभी होती. भावाच्या घरात जाऊ तरी कोणत्या तोंडाने हाच विचार ती करत होती. घरात सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. आणि कुसुम दारात येऊन उभी राहिली. तिला बघताच राधिकाच्या बाबांचा पारा मात्र वाढला. तो काही बोलणार तेवढ्यात सावित्रीमाय बोलली.

सावित्रीमाय - "नाम्या, आज तुझ्या दारात आलंय ती कुसुम खूप वेगळी आहे. काही वर्षांपूर्वी ज्या कुसुमला तू पाहीलं होतं ती कुसुम खूप बदललीय. आज ही कुसुम तुझी मोठी बहिण म्हणून आलंय."

राधिकाचे बाबा - "सावित्रीमाय, ही बदलणारी माणसं नाहीत. यांना आपली माणसं नकोत, नाती नकोत, यांना फक्त पैसा पाहीजे बस्स. आता कशाला आलीस माझ्या दारात? तुम्ही श्रीमंत माणसं, आम्ही गरीब माणसं काय पाहुणचार करणार तुमचा?" ते रागातच बोलत होते.

कुसुम - "नाम्या मोठ्या मनाने माफ कर रे या चुकलेल्या बहीणीला. माझं खूप चुकलं आणि माझी चूक मला कळलंय. शेवटी जे तुमच्याशी वाईट वागले होते तेच माझ्या पदरात पडलं रे... खूप वाईट वागली मी तुमच्यासोबत. मला माहिती आहे तूला खूप राग येतोय माझा... पण मनापासून माफी मागतेय तुमची माफ कर मला..." तीने हात जोडून त्यांची माफी मागितली. बोलताबोलताच कुसुमच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. राधिकाच्या बाबांनी मात्र रागाने तोंड फिरवून घेतलं. पण राधिकाच्या आईने कुसुमचे दोन्ही हात पकडले.

राधिकाची आई - "अहो ताई, असे हात नका जोडू. या इथे बसा तुम्ही."

कुसुम - "वहीनी, मी तूझी आणि तुझ्या पोरींची खूप मोठी अपराधी आहे. खूप वाईट वागले मी, तुमच्याशी माफ कर मला."

राधिकाची आई - "अहो ताई, असं नका बोलू. झालं ते झालं. आता नात्यांत वैर कसलं ठेवायचं? सगळं जूनं वैर विसरून नव्याने नाती जपायची." कुसुम मात्र राधिकाच्या आईचं असं बोलणं ऐकून अजूनच रडू लागली.

कुसुम - "वहिनी, खरंच खूप मोठं मन आहे गं तुझं. मी तुमच्याशी एवढं वाईट वागून पण आजही तू माझ्याशी चांगलंच वागतेस."

राधिकाची आई - "अहो ताई, आपल्याच माणसांसोबत वाईट वागून तरी काय मिळणार आहे मला? त्यावेळी आमच्याशी तुम्ही तसे वागलात म्हणून आज मी पण तुमच्याशी तसंच वागू का? एकाच कुटुंबातली माणसं आपण, उगाच एकमेकांबद्दल वैर कशाला ठेवायचं?"

कुसुम - "बरोबर आहे वहीनी तुझं. या इतक्या साध्या गोष्टी मी समजून घेतल्या नाहीत, त्यावेळी फक्त धनसंपत्ती, पैशाचं सावट होतं माझ्या डोळ्यांवर, त्यामुळे मी आपली प्रेमाची माणसं पण सगळी गमावून बसली. त्याचाच आज पश्चात्ताप होतोय मला." आणि कुसुम रडू लागली. राधिकाचे बाबा मात्र रागाने एका साईडला तोंड फिरवून उभे होते.



क्रमशः-

(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)

[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]

🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹

💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - २५

➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED