Premgandh - 31 books and stories free download online pdf in Marathi

प्रेमगंध... (भाग - ३१)

(आपण मागच्या भागात पाहिलं की नारायण नावाचा एक शेतकरी सगळ्यांसाठी आपल्या शेतातले मके घेऊन येतो आणि ते मके अजय, निलेश सर, दिलीप सर मुलांना भाजून देत असतात... तेवढ्यात तिथे दारू पिलेली चार पाच माणसं येतात आणि त्यांना बघून नारायण अजयला वैगेरे तिथून निघून जायला सांगतात... म्हणून ते पण जायला निघतात... पण त्यातला एक माणूस नारायणला कमरेत लाथ मारून खाली पाडतो. त्याच्या कपाळाला लागते... अजय येऊन त्यांना सावरतो आणि त्यांना ओरडतो... पण नारायण अजयला समजावून जायला सांगतो... पण ते राधिकाला उद्देशून बोलतात, त्यामुळे अजयला राग येतो आणि त्यांना अजय, निलेश सर, दिलीप सर तिघेही मिळून चांगलीच अद्दल घडवतात आणि अजय नारायण आणि राधिकाची त्यांना माफी मागायला लावतो... आता बघूया पुढे...)


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


सगळी मुलं बसजवळ जाऊन पोहोचली. अजयने टाईम बघण्यासाठी हात वर केला पण त्याच्या हातात घड्याळच नव्हतं... त्याने खिशात पाहीलं पण ते घड्याळ त्याला काही सापडलं नाही... त्याला अचानकच आठवलं की त्याने ते नदिच्या काठावर एका दगडावर काढून ठेवलं होतं... त्याने डोक्यालाच हात लावला... आणि तो तसाच मागे वळला... तिथे नारायण काका एकटेच खाल्लेल्या कणीसाचा कचरा एका टोपलीत जमा करत होते...


अजय - "काका, तुम्ही अजून इथेच?"


नारायण - "अहो मास्तर, हा कचरा इथेच जमा राहीला तर सगळीकडे पसरेल आणि नदिच्या पाण्यात जाईल म्हणून घरी नेऊन जाळेल कचरा... पण तुम्ही परत का आलात इथे...?"


अजय - "माझं घड्याळ राहीलं इथे... तेच घ्यायला आलो होतो..." अजयने ते घड्याळ उचललं आणि हातात बांधलं आणि तो पण काकांसोबत कचरा जमा करू लागला...


अजय - "काका, तुम्ही डाॅक्टरकडे जायचं सोडून काय करत आहात हे...? आपल्या सगळ्या मुलांना हे काम करायला लावलं असतं तर हसतखेळत पटापट त्यांनी केलं असतं ना..."


नारायण - "मी ठीक आहे पोरा... आता चाललोच मी... तुम्ही पण चला..."


अजय - "हो चला..." दोघं मिळून कचरा उचलत होते... पण तिथे गोविंद आपल्या माणसांसोबत येऊन पोहोचला होता...


गोविंद - "काय रे हाच का तो मास्तर..." तो रागातच बोलला...


"हो भाई हाच तो... यानेच आम्हाला मारलं..." एकजण म्हणाला...


"काय रे फार माज चढलाय का तूला...? माझ्या माणसांवर हात उचलायची हिंमत कशी झाली रे तूझी...?" गोविंद रागातच म्हणाला... नारायण दोघांच्या मध्येच येऊन उभा राहीला....


नारायण - "साहेब, मास्तरची काही चुकी नाही त्यांत... त्यांना नका मध्ये आणू तुम्ही... एक दिवसाचे पाहुणे आहेत ते आपल्या गावातले... त्यांना काही ठाऊक नाही तुमच्याबद्दल... हवं तर मी समजावतो त्यांना... त्यांच्या वतीने मी माफी मागतो तुमची..." नारायण हात जोडून त्यांना बोलू लागला...


गोविंद - "ए नर्‍या चल साईडला हो तू... या मास्तरच्या जीवावर उडत होतास का तू? बघतोच त्याला आता आणि तुला पण..." त्याने नारायणला एका हाताने ढकलून दिलं... पण अजयने त्यांना पकडलं...


अजय - "काका, तुम्ही का माफी मागताय त्याची? आपण काहीच चुकी केलेली नाही... उलट त्यांनी तुमची माफी मागायला हवी... पण या लोकांना ते पण जमणार नाही..."


गोविंद - "आम्ही या थेरड्याची माफी मागू असं...? लायकी तरी आहे का याची आमच्यासमोर उभी राहायची..." तो हसतच म्हणाला... आणि गोविंद अजयच्या तोंडाकडेच बघू लागला... अजय त्याच्याकडे बघून हसत होता....


अजय - "ओळखलं असेलच मला तू... मानलं राव, खरंच ही दुनिया खूप लहान आहे... शेवटी परत भेट झालीच आपली... पण एवढ्या लवकर परत आपली भेट होईल असं वाटलं नव्हतं..."


गोविंद - "तूला कसा विसरेन मी? हा गोविंद आपल्या दुश्मनला सहजासहजी कधी विसरत नाही... आणि आज तू तुझ्या दुर्भाग्याने माझ्या एरीयात आला आहेस, आज तर तू माझ्या हातून सुटणार नाहीस..."


अजय - "बघू तुझं दुर्भाग्य की माझं दुर्भाग्य आहे ते... एक डायलॉग माहीती असेलच तूला... "हर कुत्ता अपने गली में शेर होता है।" तशी अवस्था तुझी आहे बाकी काही नाही..." तो हसतच म्हणाला.


तसा गोविंदला राग आला आणि तो अजयच्या अंगावर धावून गेला. त्याने अजयला मारण्यासाठी त्याच्या अंगावर हात उचलला... पण आपला अजय पण काही कमी नाही... त्याने गोविंदचा हात आपल्या मजबूत हाताने अडवला आणि त्याच्याच जोराची एक कानाखाली लावून दिली... गोविंदच्या कानाखाली एवढ्या जोरात पडली की आवाजच घूमला आणि गोविंदची एका साईडला झोकच गेली... त्याच्या माणसांनी त्याला पकडलं आणि त्याला सावरलं...


गोविंदची माणसं अजयच्या अंगावर धावून आली... नारायण हे सगळं बघून मात्र घाबरला... पण अजय मात्र एकदम बिंधास्त होता... त्याने समोरून येणार्‍या माणसाच्या जोराची पोटातच लाथ मारली... त्याच्याच मागे धावत येणाऱ्या माणसाच्या अंगावरच जाऊन तो पडला... एकाच्या हाताला पकडून त्याचा जोरात हातच पिरगाळला आणि त्याला पाठीमागून जोराची लाथच मारून पाडलं.... त्याने लगेचच बाजूलाच पडलेलं जाड लाकुड उचललं आणि समोरून येणाऱ्या दोन माणसांना त्याने त्या लाकडानेच लगबगीने त्यांच्या पायांवरच मारले... ते पण खाली विव्हळतच पडले... आधीच ज्यांनी मार खाल्ला होता त्यांनी कधीच घाबरून पळ काढला होता... नारायण आणि गोविंद मात्र अजयकडे बघतच राहिले... गोविंदला त्याच्या माणसांवर खूप राग येत होता...


त्याने पण रागानेच एक लाकुड उचललं आणि अजयला मारायला धावला पण अजयने मात्र पटकन खाली वाकून त्याचा वार चुकवला आणि लगेच उठून हाताच्या मजबूत मुठी वाळून गोविंदच्या नाकावरच एक जोराचा मुक्का मारला... तसं गोविंद ओरडला आणि नाकाला पकडूनच मागे झाला... त्याच्या नाकातून रक्त येऊ लागलं... तेवढ्यात तिथे भीम्यापण येऊन पोहोचला...


भीम्या - "मालक... मालक...." तो ओरडत धावतच आला... त्याने गोविंदला सावरलं... आणि तो अजयकडे रागानेच बघू लागला...


भीम्या - "तू समजतोस कोण स्वतःला? माझ्या मालकावर हात उचलायची तुझी हिम्मत कशी झाली...?" तो अजयच्या अंगावर धावतच गेला आणि अजयला त्याने जोराचा एक हाताने मुक्का मारला पण अजयने आपल्या हाताने त्याचा हात घट्ट पकडला आणि त्याचा हात मागे पिरगाळला आणि एका हाताने पाठीमागून त्याचा गळाच आवळला... बराचवेळ भीम्याचा श्वास गुदमरत होता... भीम्याने अजयला आपल्या पायानेच त्याच्या पायावर जोराची लाथ मारली... त्यामुळे अजयच्या हाताची पकड सैल झाली आणि तो थोडा मागे सरकला....


तेवढ्यांत राधिका अजयला जोरात आवाज देतच आली...


अजयचं लक्ष राधिकाकडे गेलं... तेवढ्यात भीम्याने अजयच्या डोक्यातच लाकडाने मारलं... अजयने डोक्यालाच हात पकडला, डोक्यातून रक्त येऊ लागलं... तो एकदम खालीच कोसळला...


"अजयऽऽऽ...." राधिका जोरातच रडत ओरडत त्याच्या जवळ धावत आली... तीच्या पाठोपाठच कुसुम आणि सावित्रीमाय पण आल्या होत्या... त्यांनी अजयला भीम्याला मारताना पाहीलं होतं... कुसुमने भीम्याच्या जोराची एक कानाखालीच मारली....


"भीम्या माझ्या पोरासोबत तू पण राक्षस झालास का रे...? आणि गोविंदा तूला तर नंतर बघतेच मी..." कुसुम दोघांनाही रागातच बोलली...


पण राधिका जोरात "अजयऽऽ अजयऽऽ" करून ओरडत होती... कुसुम तिच्याकडे धावत गेली... गोविंद मात्र रागारागातच दोघांकडे बघत होता... सावित्रीमायने एक काठी उचलली आणि भीम्याला मारू लागली....


"काय रं मुडद्या... हे दिवस बघण्यासाठी का तुला मी लहानाचा मोठा केला...? गुंडामवाली बनलास पण आईबापाची, या मायची शिकवण पण विसरलास का रं? माणुसकी संपली का तुझ्यातली...?" सावित्रीमाय भीम्याला रागारागातच बोलत होती आणि काठीने मारत होती....


"अगं माय आम्ही काहीच नाही केलं. आधी त्यानेच माझ्या मालकावर आणि माणसांवर हात उचलला..." भीम्या म्हणाला....


"म्हणून काय तू त्या पोराचा जीव घेणार आहेस का मुडद्या...?" ती रागातच बोलली...


अजय मात्र बेशुद्धावस्थेत होता... त्याला लगेचच हाॅस्पीटलला हलविण्यात आलं... राधिका खूप रडत होती... आणि तेवढीच घाबरली पण होती.... ती अजयला अशा अवस्थेत बघून थरथर कापत होती.... कुसुमने तीला समजावून सावरलं आणि धीर दिला...

अंजली बाई,
निलेश सर, सरीता बाई, दिलीप सर, नारायण सगळेच खूप घाबरले होते.... पण ते राधिकाला धीर देत होते... निलेश सरांनी अजय आणि राधिकाच्या घरच्यांना फोन करून हाॅस्पीटलमध्ये बोलवलं होतं.... बातमी ऐकताच अजयच्या आणि राधिकाच्या आईने मात्र हंबरडाच फोडला होता... त्यांना यायला उशीर होणार होता... म्हणून निलेश सर आणि दिलीप सरांनी हाॅस्पीटलमध्ये थांबण्याचं ठरवलं... पण शाळेच्या इतक्या मुलांची पण त्यांच्यावर जबाबदारी होती... मुलांचे आईवडील काळजी करतील, त्यांची वाट बघतील, म्हणून राधिकाने त्यांना मुलांसोबत घरी जाण्यासाठी सांगितले...


"अजयची ख्यालीखुशाली कळवत रहा..." राधिकाला असं बोलून सगळे शिक्षक मुलांना घेऊन तीथून निघून गेले...


कुसुमने नक्की काय काय घडलं ते सगळं नारायणला विचारलं... नारायणने कुसुमला सगळं सांगितलं... कुसुमने आता गावातल्या लोकांच्या मदतीने गोविंदच्या विरोधात स्वतःच पाऊल ऊचलायचं ठरवलं आणि आपल्याच मुलाच्या विरोधात लढायचं ठरवलं... कारण गावातली लोकं पण बर्‍याच वर्षांपासून गोविंदला आणि त्याच्या माणसांना कंटाळली होती... खूप झालं आता काहीतरी करून गोविंदची गुंडा गर्दी संपुष्टात आणायचीच असा कुसूमने मनाचा पक्का दृढ निश्चय केला होता...


अजयला अजूनही शुद्ध आली नव्हती आणि दोघांच्या घरचे पण अजून कोणीच आले नव्हते... राधिकाला मात्र काहीच सुचत नव्हतं... ती खूप घाबरली होती... रडत होती... तीला काय करावं काहीच कळत नव्हतं... जवळ कुसुम आत्या आणि सावित्रीमाय होत्या पण तिला तिच्या घरच्यांचीच खूप आठवण येत होती...


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


इथे गोविंदचा राग अनावर झाला होता.... तो त्याच्याच माणसांना रागाने मारत होता...


"फक्त खाऊन खाऊन माजलेत तुम्ही लोकं... काय कामाचे नाय तुम्ही.... तो कालचा पोरगा आपल्याच गावात येऊन आपल्यालाच मारून जातो... फक्त दारू पिऊन मज्जा मारायला येतात का तुम्ही इकडे...? गावात काय इज्जत राहीली आपली...? हा... बोला... गावातली लोकं हसत असतील आपल्याला आता..." असं बोलत रागातच त्यांना तो मारत होता....


"मालक माफ करा, माफ करा...." असे ते ओरडतच गोविंदसमोर हात जोडत होते... गोविंदचा राग खूप धुमसत होता....


"मालक, त्यांचा जीव घेणार आहेत का तुम्ही आता? सोडा त्यांना...." आणि भीम्या गोविंदला तिथून घेऊन गेला....


"स्वतःच्या पोराला लागलंय त्याची काळजी नाही माझ्या आईशीला आणि तो कोण कुठचा मुलगा त्याची काळजी तिला.... आणि ती राधिका तीने तर मला एका नजरेनेही ढुंकूनही पाहीलं नाही आणि त्याच्यासाठी हंबरडा फोडून रडत होती... कोण आहे तरी कोण तो....?" आणि रागानेच त्याने हातातच दाबून काचेचा ग्लास फोडला... त्याच्या हातात काचा घुसल्या आणि रक्त येऊ लागलं.... भीम्याने त्याच्या हाताला पट्टी बांधली....


"भीम्या... तो कोण आहे, काय करतो, कुठे राहतो, राधिकासोबत त्याचं नातं काय आहे...? ही सगळी माहिती काढ त्याची.... मला लवकरात लवकर सगळी माहिती पाहीजे त्याची... जा कामाला लाग आताच...." -- गोविंद...


"हो मालक, काढतो सगळी माहिती आणि सांगतो तुम्हाला..." -- भीम्या...


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


रात्रीचे दहा वाजून गेले होते... हाॅस्पीटलला सगळे येऊन पोहोचले होते... राधिका तर आई येताच तिला मिठी मारून रडत होती... अजयची अशी अवस्था पाहून त्याची आई मात्र खूप रडत होती... अजयचे बाबा, राधिकाची आई सगळेच तिला समजावून धीर देत होते.... सगळ्यांच्याच डोळ्यांतून पाणी तरळत होतं... नारायण मात्र तिथेच बसला होता... त्याच्या डोक्याला पण डाॅक्टरांनी पट्टी बांधली होती म्हणून त्याला कुसुमने घरी जाण्यांस सांगितलं होतं, पण त्याला मात्र अजयला अशा अवस्थेत सोडून जाण्यास जीव लागत नव्हता... म्हणून तो त्यांच्यासोबत तिथेच थांबला होता... सगळ्यांना असं रडताना बघून त्याचा जीव मात्र खूप हळहळत होता...


राधिकाची आई - "तरी तुम्हाला मी आधीच बोलली होती की दोघांनाही नका पाठवू या गावात... पण तुम्ही माझं एका शब्दानं ऐकलं नाही..." रडतच बोलत होती...


राधिकाचे बाबा - "अगं मला पण एवढं काय माहीत होतं कि इथे आल्यावर असं काही होईल म्हणून...?"


"आणि अजयरावांना जास्त काही झालं म्हणजे? मग काय करायचं आपण... त्यांच्या आईवडीलांना तोंड कसं दाखवायचं आपण...? -- राधिकाची आई...


"अशी अभद्र का गं बोलायला लागलीस? काही होत नाही अजयरावांना... उद्यापर्यंत बघ कसे हसतेखेळते दिसतात की नाही ते..." -- राधिकाचे बाबा...


ते तसं बोलत तर होते पण त्यांचं पण काळीज आतून पेटून निघालं होतं... आणि दोघांनाही इथे येऊ दिलं या गोष्टीचं त्यांना पण पश्चात्ताप होत होता....





क्रमशः-


(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)


[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]


🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹


💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - ३१


➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED