नक्षत्रांचे देणे - ११ siddhi chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

नक्षत्रांचे देणे - ११

''सावंत लीगलच्या फाइल बद्दल काय निर्णय झाला.''  किर्लोस्करांनी विषयाला हात घातला.

''ज्या मुलीने ऐनवेळी येऊन चंदीगढमध्ये प्रेझेंटेशन दिले तिच्यासोबत ती फाईल गेली आहे. दुर्दैवाने ती मुलगी आमच्या जास्त परिचयाची नसल्याने वेळ लागला आहे. तरीही आम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.’’ सावंत त्यांच्याकडे पाहत म्हणाले.

''सर, कंपनीके रेप्युटेशन का सवाल है. ती फाइल लीक झाली तर....''

मुखर्जी पुढे बोलणारच तेवढ्यात सावंत ओरडले. ''तर काय होईल हे तुम्ही आम्हाला सांगण्याची काही गरज नाही. कंपनीचा करता धरता मी आहे. मी बघतो काय करायचं ते.''

''होय सावंत. तुम्ही सर्वेसर्वा असलात तरीही मी सुद्धा तुमचा पार्टनर आहे, हे विसरू नका. तुमच्या मुलाच्या चुकीमुळे मला देखील बदनामीला तोंड द्यावे लागेल.'' सरळ उभे राहत कोर्लोस्कर रागारागाने क्षितिजकडे बोट दाखवत होते.

''कोर्लोस्कर साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे एक लीगल हेड म्हणून काम करत असला तरीही भविष्यात क्षितीजच या कंपनीचा मालक असणार आहे. त्यामुळे शब्द वापरताना जपून वापरा.''  सावंतच्या चिडलेल्या मुद्रेमुळे मिटिंग हॉलमध्ये एकाएकी शांतता पसरली. 'भविष्यात तोच या कंपनीचा मालक असणार आहे.' या त्यांच्या वाक्याबरोबर त्यांनी अप्रत्यक्षपणे कंपनीच्या भविष्याचे भाकीत केले होते. आपल्या मुलाला कायम दुय्यम स्थान देणारे सावंत साहेब आज एवढे कर्तव्यदक्ष कसे काय झाले, हेच किर्लोस्करांना कळेना.

परिस्थिती संभाळण्यासाठी मुखर्जीं पुढे आले. ''सर काबुल है, त्यावेळी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. आपला लीगलचा माणूस अनुपस्थित होता, वेळ टाळून नेण्यासाठी आपण त्या मुलीच्या हातात ते कागदपत्र दिले, पर बादमे वो कागजद बापास लेनेकी जिम्मेदारी हमारी थी.''

''त्यावेळी तुम्ही सुध्या चंदीगढमध्ये उपस्थित होतात ना. मग तुम्ही काय करत होता मुखर्जी?'' किर्लोस्कर एकाएकी मुखर्जींवर भडकले होते.

''सर वो..वो...''

मुखर्जी काही बोलण्याच्या आत किर्लोस्कर उठून दाराकडे निघाले. पाठमोरे वळून त्यांनी क्षितीज आणि मुखर्जी यांच्याकडे आळीपाळीने पाहत सांगितले. ''ती लिगल फाइल घेऊन येण्याची जबाबदारी तुमची, २४ तासाची मुदत देतो. नाही जमले तर माझी इथली पार्टनरशिप संपली म्हणून समाजा.''

कोणालाही काहीही बोलण्याची संधी न देता ते निघूनही गेले. ते पार्टनरशिप सोडणार म्हणजे कंपनीचे दिवाळे निघणार, या विचारानेच मुखर्जींना आतल्याआत गुदगुदल्या होत होत्या. आपला आनंद लपवत, तोंडावर वाईट हावभाव आणून त्यांनी कसेबसे त्यांनी क्षितिजला विचारले. '' अब क्या करे.''

'’पुढे काय करायचे ते बघू.'’ असं म्हणून घाईघाईने क्षितीज आणि मिस्टर सावंत दोघेही मिटिंग रुममधून बाहेर पडले. मथिलीच्या अपघातामुळे क्षितिजीवर असलेला राग बाहेर काढण्यासाठी किर्लोस्करांना एक चान्स हवा होता. पण संपूर्ण मीटिंगमध्ये क्षितिज काहीही बोलला नव्हता. मिस्टर सावंत म्हणजेच त्याच्या पप्पानी तसे आधीच बजावले होते. त्यामुळे जास्त काही वादावादी न होता मिटिंग थोडक्यात संपली होती. पण फक्त २४ तासात ती फाइल पुन्हा मिळवणे, तेही भूमीचा कोणताही आता पत्ता  नसताना. कसे काय शक्य आहे?  याचा विचार करत क्षितीज आणि मिस्टर सावंत घरी परतले.

*****

''आशाकाकू बैठक व्यवस्था झाली का? आणि प्रसादाच काय केलं?  भटजी बुवा एवढ्यात येतील शिरा आणि पंचामृताची तयारी करा. मोरेदादा पूजेसाठीच्या फुलांच्या करड्या व्यवस्थित जागेवर ठेवा, नाहीतर खराब होऊन जातील ती.''  सूचनांचा भडीमार लावत  मेघाताई आपली जांभळी पैठणी सावर जिना उतरत होत्या. मस्त मोकळे सोडलेले केस आणि त्यात उजवीकडे खोवलेले गुलाबाचं मोठंसं फुल नीटनेटकं करत त्यांनी पूजेची तयारी झाली का याची पाहणी करायला सुरुवात केली.

''मेघे आजतरी चांगले कपडे घालायचेस गं. तुझ्या वॊर्डरॉबमध्ये साडीशिवाय काही नाहीय वाटत.''  मस्त पायघोळ नारिंगी वनपीस त्यावर महागडं वुलनच ओपन जाकीट आणि गळ्यात छोटीशी फंकी सिल्वर चैन असा पेहेराव करून आज्जो खाली आल्या होत्या. त्यांचा असा अवतार बघून मेघाताईंना हसू आवरेना.

''काय तुझी फॅशन. आज पूजा आहे पूजा. पार्टी नाहीय. मम्मा अशाप्रसंगी साडी नेसावी.''

''तू नेस साडी, म्हाताऱ्या सारखी... मैं तो अभी जवा हू.'' आज्जो ई हसत-हसत सोफ्यावर येऊन बसल्या.

मिस्टर सावंत म्हणजेच क्षितिजचे बाबा थोडे चिंताग्रस्त दिसत होते. सारखे हॉलमध्ये फेऱ्या मारत होते.

''काही पत्ता लागला का त्या मुलीचा?’’  मेघाताईनी त्यांना विचारले.

''नाही.''

एक शब्दात उत्तर देऊन ते पुन्हा फेऱ्या मारायला लागले. एवढ्यात क्षितिज देखील जिन्यावरून खाली उत्तराला. बिस्कीट कलरचा कुर्ता-पायजमा आणि त्यावर गोल्डन जरीचे नक्षीकाम विणलेले होते. अश्या पेहेरावात तो अजूनच हँडसम दिसत होता. त्याला पाहून मेघाताईंनी कॉम्प्लिमेंट दिली.  ''क्षितीज ड्रेस मस्त वाटतोय.''

''थँक्स.'' म्हणत तो ही आज्जोच्या बाजूला सोफ्यावर बसला.

''शेवटी संजय सावंतांचा सुपुत्र आहे. नुसताच मस्त नाही. जबरदस्त दिसतोय ह.'' म्हणत आज्जोने त्याला टाळी दिली.

''क्षितीज काय झालं? काही माहिती मिळाली का?'' पप्पा त्याच्याकडे बघत विचारत होते.

''पप्पा काही लोक पाठवलेत, तिच्या नावाव्यतिरिक्त आपल्याकडे काहीही माहिती नाही, त्यामुळे वेळ लागतोय, तरीही रात्री पर्यंत शोधतील ते.''

''हल्ली कोणीही भरवशाचे नाही. एका मुलीमुळे एवढा मोठा प्रॉब्लेम होईल वाटलं नव्हतं.'' आज्जो काळजीच्या सुरत म्हणाली.

'' माझंच चुकलं, अश्या मुलींपासून दूर राहिलेलं उत्तम. एकदा का ती मुलगी सापडली ना मग बघ.'' क्षितिज आता फारच चिडला होता.

''आपल्याकडे फक्त आजचाच दिवस आहे. नाहीतर किर्लोस्कर काय करतील याचा नेम नाही.''  सावंत पुन्हा डोक्याला हात लावून बसले.

''पैशासाठी त्या मुलीने हे सगळं केलं असेल का रे? की दुसऱ्या कोणीतरी म्हणजेच आपल्या शत्रूंपैकी कोणी तिच्याकडून ती फाइल मिळवली असेल. काही कळत नाही.'' मेघाताईसुद्धा चिंतेत होत्या.

''पैशाची गरज असती तर  तर तिने केव्हाच आपल्याला ब्लॅकमेल केलं असतं.'' मिस्टर सावंत काहीतरी विचार करत म्हणाले.

''मला सुद्धा असच वाटत. असो पाहुणे येतील एवढ्यात आणि भटजी देखील. सर्वांसमोर ती विषय नको. पूजा झाल्यावर बघूया काय ते. ''

म्हणत मेघाताई स्वयंपाकघराकडे निघाल्या.

'साठेकाका भडजींना घेऊन पोहोचले होते, निवडक पाहुणे आणि मित्रमंडळी जमा झाली. पूजेला सुरुवात झाली होती. खरतरं संपूर्ण सावंत कुटुंबीयांचं लक्ष फोनवरती लागलेल होतं. केव्हा एकादा फोन येतो, की ती मुलगी सापडली आणि ते महत्वाचे कागदपत्र हाती लागले. असं सर्वाना झालं होत.’

क्रमश

https://siddhic.blogspot.com/