नक्षत्रांचे देणे - १३ siddhi chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

नक्षत्रांचे देणे - १३

''कंपनीत चाललेले गैरव्यवहार आमच्या सहमतीने किवा ऑर्डरने नाही होत आहेत. कोणीतरी आतील व्यक्ती कंपनीला बदनाम करण्यासाठी हे सर्व आमच्या मागे करत आहे. तेच तर उघडकीस आणायचं आहे.'' आत्तापर्यंत शांत राहिलेला क्षितीज आता त्यांच्या मैफिलीत सामील होत म्हणाला.

''आय सी. असं आहे तर, इफ यु डोन्ट माइंड, मला थोडा वेळ लागेल प्लिज. अचानक हो किंवा नाही  असं नाही सांगता येणार.''  भूमी त्यांचा आदर करत म्हणाली.

''नो प्रॉब्लेम. एनी टाइम. बायदवे नाइस तू मीट यु बेटा, मी निघती थोडं काम आहे.'' म्हणता मिस्टर सावंत निघाले. आणि त्यांच्या बरोबर आज्जोदेखील बाहेर बेडरूमकडे निघाल्या.

''बराच वेळ झाला, मी देखील निघते. बाय.''

भूमी सोफ्यावरून उठली होती. मेघाताईंनी क्षितिजला हातानेच खूण करून तिला सोडायला जायला सांगितले.

''थँक्स.'' म्हणत क्षितीज तिच्यासोबत बाहेर निघाला.

''फाइन. येते.''

''तुम्ही न सांगताच निघालात चंदिगढ वरून.'' क्षितिज

''तुमच्या रूमची बेल वाजवली होती. पण डोअर नाही उघडला. मला वाटलं तुम्ही झोपला असाल. सो तिथेच वेटरकडे निरोप देऊन निघाले. थोडी इमर्जन्सी होती.''  भूमी.

''ओह, ही फाइल फार महत्वाची आहे. म्हणून आम्ही सगळेच काही दिवस काळजीत होतो, तुमचा शोध घ्यायचा तर माझ्याकडे कोणता कॉन्टॅक्टही नव्हता. आम्हाला वाटलं कि...''

क्षितिज पुढे बोलणारच तेवढ्यात भूमी म्हणाली. '' डोन्ट वरी, मी कोणतेही पेपर्स लीक केलेले नाहीत. आणि मला तशी गरजही नाही. चंदीगढला असताना माझा गैरसमज झाला होता, की तुमची कंपनी लोकांची फसवणूक करत आहे, पण आता इथे आल्यावर समजले, की कोणीतरी तुम्हाला बदनाम करण्यासाठी हे सगळं मुद्दाम घडवून आणत आहे. असं असेल तर  यापुढे बी केअरफूल.''

त्या बरोबर दोघेही खळखळून हसले.

''हे माझं कार्ड, फोन नंबर आहे. तुम्ही जॉईन करायला तयार असाल तर, पप्पांना किंवा मला कळवा.'' क्षितिजने आपले कार्ड तिच्या समोर धरले.

कार्ड हातात घेत ती म्हणाली, ''जमेल का बघते.''

''होय नक्की.'' क्षितीज म्हणाला.

बराच वेळ शांतता पसरली शेवटी भूमी निघाली. ''वाटलं नव्हतं आपण पुन्हा भेटू.''  दोघांच्याही तोंडून एकच वाक्य बाहेर पडले. आणि अचानक दोघांनी एकमेकांकडे पहिले. एक सुंदर स्माईल तिच्या चेहेऱ्यावर पसरली होती आणि बाय करून ती तशीच निघाली. चेहेऱ्यावर मंद स्मित घेऊन क्षितीज घरामध्ये आला, मेघाताई खुश होऊन त्याच्याकडे बघत होत्या. 'काय बघतेस?' अस मानेनेच विचारल्यावर, 'तुला बघतेय. खूप दिवसांनी तुझा हा असा आनंदी चेहेरा बघायला मिळतोय ना.'' असं म्हणत मेघाताई सत्यनारायण देवाला हात जोडून उभ्या राहिल्या.  त्यांच्या मते खऱ्या अर्थाने पूजेची सांगता झाली होती. आणि क्षितिजीचा ग्रहदोष टाळायला सुरुवातही झाली होती.

*****

'मेघाताईंनी भूमी आणि क्षितीज बद्दल काही गोष्टी क्षितिजच्या पप्पांच्या म्हणजेच आपल्या नवऱ्याचा कानावर घातल्या होत्या. त्या विषयी कोणताही निर्णय न घेता  सध्यातरी दोघांनी व्यावसायिक दृष्टीने विचार करण्याचे ठरवले. पण भूमी बद्दल क्षितिजच्या मनात अजूनही बऱ्याच काही भावना आहेत, हे मेघाताईंनी ओळखले होते. साठे काकांना फोन करून तिची चौकशी करावी म्हणून त्यांनी विचार केला. पण आधी क्षितीज जवळ या विषयी बोलणं करून घेऊ मग पुढे जाऊ असं त्यांनी ठरवलं.'

'किर्लोस्करांना पेपर्स दाखवून मिस्टर सावंत निर्धास्त झाले. पेपर्स कसे काय मिळाले? या विचारात असणारे मुखर्जी मात्र नवीन काही शक्कल लढवता येते का? या शोधात होते. वेदांतचे कोर्लोस्करांचे कान भरण्याचे काम सुरु होतेच. भूमीशी कॉन्टॅक्ट व्हावे, आणि तिला आपण इथे नियुक्त करावे यासाठी दोघांचे जोरदार प्रयन्त चालू होते. त्या दोघांनाही या गोष्टीची खबर सुद्धा लागलेली नव्हती, कि मिस्टर सावंतांनी परस्पर ऑफर देऊन भूमीला कंपनी जॉईन करायला सांगितले आहे. आणि त्यांच्या या प्रपोजलला भूमीने त्यांना कॉल करून होकार देखील कळवला होता. हि गोष्ट अजून क्षितिजच्या कानावर नव्हते. मिस्टर सावंत बऱ्याच गोष्टी खाजगी ठेवत, त्यानुसार जॉइनिंग होई पर्यंत कोणालाही कळू द्यायचे नाही. असे त्यांचे ठरले होते.

भूमी कंपनी जॉईन करायला होकार देईल कि नाही, या विचारात क्षितीज देखील गॅलरीत येऊन आभाळाकडे टक लावून उभा होता. त्याला न राहवून सतत भूमी डोळ्यासमोर येत होती. दूरवरच्या आकाशात पोकळीतील अफाट जागा जणू त्या नक्षत्रांनी भरून काढावी अगदी तशी. नकळत का होईना पण, मैथिलीसाठी एवढी वर्ष वाट बघत एकाकी आयुष्य जगणाऱ्या क्षितीजच्या आयुष्यातील त्या एकाकीपाणाची जागा आता भूमीने भरून काढली होती.'

' आठवड्यापूर्वीच भूमी, माई आणि नानांच्या आग्रहामुळे आपलया पुढील करिअरसाठी शहरात आली होती. विभासाचे सत्य समजल्यावर नानांनी तिला तिचे आयुष्य पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतला होता. विभासशी कोणतेही संबंध न ठेवता, जणू काही झालेच नाही, असे समजून भूमीला स्वतःच्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगण्याचा अजून एक चान्स मिळाला होता. त्यात भूमीने आपल्या करिअरला पाहिले प्राधान्य दिले होते.

एका छोट्याश्या बॉक्समध्ये ठेवलेले मंगळसूत्र तिने बाहेर काढून आपल्या हातात घेतले. ते अगदी जसेच्या तसे होते. तिने ते मंगळसूत्र माई आणि नानांच्या शिवाय कोणाच्याही समोर घातले नव्हते. खरंतर आता माई-नानांच्या समोर देखील ते घालण्याची गरज उरली नव्हती.  लग्न झालं त्याच दिवशी विभासच खोटेपणा तिला समजला, तिने त्यांच्याशी न जुळलेले नातं  लग्नाच्या दिवशी तोडून टाकलं  आणि त्यांचा संसार उभा राहण्याच्या आधी तुटून गेला. आपल्या विश्वासाला गेलेला तडा आणि असा आंधळा विश्वास ठेवून आपण केवढी मोठी चूक करून बसलो आहे. हे सदैव लक्षात रहावे,  जेणेकरून आपण अशी चूक पुन्हा करणार नाही. यासाठीच तिने हे मंगळसूत्र स्वतःकडे जपून ठेवले होते. त्याच्याकडे बघून नकळत तिचे डोळे भरून आले. ते मंगळसूत्र तसेच त्या बॉक्स मध्ये ठेवून ती गॅलरीत आली, वर पांघरलेले निळंशार आभाळ आणि त्यात गुंतलेली अगणिक नक्षत्र बघण्यात ती पुन्हा गढून गेली. एकांत समई तिचा हा आवडता विरंगुळा होता. त्यातच चंदीगढला असताना पासून  क्षितीजमध्ये गुंतलेले तिचे मन... कितीही नाकारले तरीही भूमी देखील त्याचा विचार मनातून काढू शकत नव्हती.'

दूरवर कुठेतरी सूर उमटू लागले होते.

'तुम आये तो हवाओं में एक नशा है

तुम आये तो फिजाओं में रंग सा है

ये रंग सारेहै बस तुम्हारे

और क्याऔर क्याऔर क्या.'

क्रमश

https://siddhic.blogspot.com/

रेट करा आणि टिप्पणी द्या

Komal Jadhav

Komal Jadhav 4 महिना पूर्वी

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 8 महिना पूर्वी

Reader

Reader 1 वर्ष पूर्वी

siddhi chavan

siddhi chavan मातृभारती सत्यापित 2 वर्ष पूर्वी

Prerana Surshette

Prerana Surshette 2 वर्ष पूर्वी

best