vachlas re vachlas 17 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - १७

''बाय द वे... तुम्हाला फोन घ्यायला आवडत नाही का?'' एवढा वेळ पसरलेली शांतता भंग करत भूमी फोनकडे बघत क्षितिजला विचारात होती.

''का?'' क्षितीज 

''केव्हापासून तुमचा फोन वाजतोय, तुम्ही लक्ष देत नाही.'' भूमी

''ओ, पप्पांचा फोन आहे. ते विचारणार कुठे आहेस? आणि मला ते सांगायचं नाहीय. म्हणून नाही उचलतं. '' क्षितीज

''का?'' भूमीने आश्चर्याने त्याला विचारले. 

''ते कुठे सगळ्या गोष्टी मला सांगतात.'' तो मिश्किल हसला.

''कोणाचा फोन आला, तर बोलून तरी बघावं, दुसर काही महत्वाचं काम असू शकतं.'' भूमी त्याला समजावत होती. तिच्याकडे बघत क्षितीज काहीतरी विचार करत होता आणि पुन्हा फोन वाजला. त्याने लगेच उचलून तो कानाला लावला.

''हॅलो पप्पा.'

''हॅलो मला महत्वाचं एक काम आहे, सो कंपनीतून डायरेक्ट बाहेर जातोय. तू संभाळून घरी जा.''  एवढेच सांगून त्यांनी फोन ठेवला. कामाचं बोलून डायरेक्ट  फोन कट करायचा ही त्यांची नेहमीची सवय. आवाजावरून मिस्टर सावंत गडबडीमध्ये असावे असे वाटत होते. फोन बाजूला ठेवून क्षितिज मोठ्याने हसला. त्याला त्याची चूक समजली असावी. ''यु आर सो ग्रेट हा.'' 

'' घरी सुद्धा सर फक्त कामाचाच बोलता का? फारच प्रोफेशनल आहेत ना?'' भूमी

''होय. त्यांची फर्स्ट प्रायोरिटी कंपनी... बाकी तुम्ही सुद्धा फार प्रोफेशनल आहात.'' क्षितीज

''मी आणि प्रोफेशनल? ते कसं?'' भूमी

''शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही तुमचा जॉइनिंगबद्दल मला जरा सुद्धा कळू दिल नाही.'' क्षितिजने शेवटी मनातील सल विचारली होती.

''अच्छा, आहे हे असं आहे तर. त्याच काय आहे ना, सरांनीच मला सांगितलं होतं, की माझ्या जॉइनिंगबद्दल कुणाला काहीही सांगायचं नाही. का ते मला अजून सुद्धा समजलेलं नाहीय.'' भूमी स्पष्टीकरण देत त्याला म्हणाली.

 ''पप्पा म्हणजे आपल्या विचारशक्तीचा पलीकडचे... आम्हाला अजून त्यांचं वागणं समजत नाही. तुम्ही एका दिवसात त्यांना काय समजणार म्हणा.'' क्षितिज

पाणी किती ओसरले याचे लाइव्ह अपडेट बघत क्षितिजने गाडी चालवायला सुरुवात केली होती. त्याचा राग आता निवळला होता. तो पुढे बोलत होता. ''पप्पा कोणतेही डिसिजन असे डायरेक्ट ऐकवतात. ऐकणाऱ्याला ते नवीन वाटत असलं, तरीही कोणताही निर्णय घेण्याआधी त्यांची स्वतःची त्यावर बरीच RND झालेली असते.''  

क्षितिज त्याच्या पप्पांच्याबद्दल बरच काही सांगत होता आणि भूमी शांतपणे ऐकत होती.
 
*****

भूमीचा फोन येऊन गेल्यापासून माई काळजीत होत्या. 'कशी पोहोचते घरी काय माहित, त्यात ऑफिसचा पहिलाच दिवस... रूमवर पोहोचल्यावर फोन करेल म्हणा. गोखले काकूंना फोन करून सांगितलं आहे तिला जेवण द्यायला.' केव्हा पासून माईंची बडबड ऐकून नाना तिथे आले. ''बघू दे तिला दुनियादारी, याही प्रसंगातून जाऊदेत, म्हणजे शिकेल ती. एकटीने राहायचं तर हे सगळं आलंच गं. लहान आहे का ती आता.''

''लहान नाही हो. काळजी वाटतेच ना. एकटीच मुलगी, तीही शहराच्या ठिकाणी. आपल्यावर जबाबदारी आहे तिची. कोण आहे का दुसरं? ''

माई भूमीच्या फोनची वाट बघत बसल्या होत्या

''होय गं, पण मोठी हिमतीची आहे ती. अचानक पाणी भरलं त्याला कोण काय करणार.'' नानांनी रिमोट बंद केला. पुराच्या बातम्या ऐकून कंटाळलेले नाना उठून बाहेर अंगणात गेले. माई मात्र भूमीच्या काळजीने फोनकडे बघत बसल्या होत्या.  

*****

''मेघे आला का क्षितिज?'' आज्जो विचारत होती. मेघाताई बाहेर सोफ्यावर बसून मोबाइल चाळत होत्या.

''नाही. लेट होईल सांगितलं आहे त्याने.''

''मेघे एवढा कुठे अडकला आहे?'' आज्जोने प्रश्न केला आणि मेघाताई बुचकळ्यात पडल्या. खरं कारण सांगून उगाच प्रशनोत्तर वाढवत बसण्यापेक्षा कुणाला काहीही न सांगण्याचे त्यांनी ठरवले.

''मम्मा बाहेर बघ जरा, निम्मं शहर पाण्याखाली आहे, जो रस्ता सेफ असेल तिथून वाट काढत येणार ना तो. त्यात काही ठिकाणी धोक्याची सुचना दिली आहे, त्यामुळे मुख्यरस्ता सोडून बाहेरच्या रस्त्याने येत असेल. वेळोवेळी फोन करून कल्पना देतोय ना. मग झालं.''

''तुम्हा मायलेकाचं काय गुप्तगू आहे माहित नाही, माझा एकही कॉल घेत नाही तो. असो तू बस ऑनलाईन साड्या बघत. मी झोपते जाऊन.'' म्हणत आज्जो बेडरूमकडे वळली. आणि मेघाताईंना हायसे वाटले. खरतरं क्षितिजने एकच फोन केला होता, पण तो भूमीला सोडायला गेला आहे हे समजल्यावर मेघाताई  निर्धास्त झाल्या. त्यांना माहित होतं, क्षितिजने जर कोणती जबाबदारी आपणहून स्विकारली असेल तर तो ती पूर्ण करणार, मग भूमीला सुखरूप घरी सोडून तोही सुखरूप परत येईल, या बद्दल त्या निश्चित झाल्या.  विनाकारण घरी विषयाला फाटे फुटायला नकोत म्हणून हि गोष्ट संजय किंवा स्वतःच्या आईला म्हणजेच आज्जोला कळू नये, एवढी खबरदारी त्यांनी घेतली होती.

*****

बाहेर रस्ता तसा सुमसान होता, पण पाण्यातून अंदाजे गाडी चालवत असल्यामुळे बऱ्याच वेळा खाचखळगे लागत होते. गुगल दाखवेल त्या रोडने जात असल्यामुळे  फार उशीर झाला होता तरीही भूमीच  लोकेशन अजून २ तास लांब दाखवत होते आणि तिथून अजून अर्धातास पुढे क्षितिजच घर होत.  

बऱ्यापैकी आऊटसाइड रोड असल्याने या बाजूला पाणी थोडे कमी झाले होते, वाहनेही नसल्याने, 'चला आता लवकर घरी पोहोचू' असा विचार करून क्षितिजने  स्पीड पकडला.  खूप रात्र झाली होती. प्रत्येक ठिकाणी गाडी थांबवून मग अव्हेलेबल रोड बघून पुढे जायचं, दुसरा पर्याय नसेल तर वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

बराच वेळ भूमी काहीही बोललेली नव्हती. आपण ऑफिस मध्ये थांबायला पाहिजे होतं, असं तिला वाटू लागलं. त्यात आपल्यामुळे क्षितिजसुद्दा या प्रॉब्लेममध्ये अडकला आहे, या विचाराने तिला अजूनच खजील झाल्यासारखं वाटत होत.  ती टेन्शनमध्ये आहे, हे क्षितिजच्या लक्षात आलं होत. पण बोलणार काय? हे सुचत नसल्याने तो ही शांत होता.

'गंभीर पूरस्थिती लक्षात घेता, ऑफिसने उद्याची सुट्टी जाहीर केली होती, याचा मेल इनबॉक्स मध्ये पाहिल्यावर मात्र भूमीच्या चेहेऱ्यावरचा ताण थोडा कमी झाला. यात तिचा डोळा कधी लागला हे तिला समजलेच नाही. ती राहत असलेले ठिकाण तर जवळ आले होते, पण तिला उठवणार कसं? या विचारात  शांतपणे गाडी चालवणारा क्षितीज गाडी थांबवून खूप वेळ तिच्याकडे टक लावून पाहत होता. झोपेत ती अगदी नाजूक आणि रेखीव अशी दिसत होती. अलगद मिटलेले ते सुंदर डोळे हलकेसे उघडझाप करत होते. अर्ध्या सुटलेल्या केसांमधील एखादी चुकार बट तिच्या गोऱ्यागोबऱ्या गालाला स्पर्शून जात होती. कामातील छोटेसे सोनेरी डूल त्यात नाजूक जरीचा काठ असलेली  मऊसूत प्लेन बर्गंडी साडी तिच्या गोऱ्या रंगाला अगदी उठून दिसत होती. तासंतास बघत राहीलं तरीही चेहेरा हटवता येणार नाही, असं निरागस रूप होतं. न राहवून क्षितिजने तिच्या हाताला हलकेच स्पर्श केला. 'भूमी' असा आवाज ऐकताच तिने हळूच डोळे उघडून आजूबाजूला पहिले. फायनली आपण पोहोचलोय हे तिच्या लक्षात आलं होतं. ''थँक्यू सो मच.'' म्हणत गाडीचा दरवाजा उघडून ती लगेच बाहेर पडली. 'thats fine' म्हणत क्षितिज देखील दार उघडून बाहेर आला.

क्षितिजने जवळपास अर्धी गाडी पाण्यातून चालवली होती. त्यामुळे बाहेरून गाडीची अवस्था तशी बिकट होती. पावसाचे पाणी, त्यात वाहणारा कचरा वगैरे सगळी घाण बाहेरून लागली होती. बाहेर येऊन क्षितीज त्याचे निरीक्षण करत असतानाच, बंद केलेल्या गाडीच्या दरामध्ये बाहेरून अडकलेला तिच्या साडीचा पदर सोडवण्यासाठी भूमी धडपड करत होती. गाडीचा दरवाजा जॅम झाल्याने उघडतं नव्हता. आणि वनसाइड सोडलेल्या पदराचे शेवटचे एक टोक त्यामध्ये अडकून राहिले होते. हे बघून क्षितीज त्या बाजूला आला. दरवाज्याला आधी चावी लावून उघडण्याचा प्रयन्त केला, नंतर हान्डेल ओढून पहिले पण दार एकजात ऊघडेना.  अगदी रिमझिम पाऊस सुरूच होता, त्यामुळे छत्री वगैरे पकडण्याची कोणालाच नव्हती. बराच वेळ प्रयत्न सुरू होते, गाडीचे दार उघडण्याच्या नादात बाहेर पाऊसाने पुन्हा जोर लावला आणि रिमझिम चा तो मुसळधार सुरु झाला. अश्या परिस्थितीत काय करावे दोघांनाही समजेना. मागच्या सीटवर असणारी छत्री काढण्यासाठी भूमीने मागील दार उघडले,  त्याच क्षणी क्षितिजीनेही पुढच्या दाराला मोठ्याने धक्का मारला होता. धक्का एवढा जबरदस्त बसला कि दार उघडून त्या दाराला चिकटून उभी असणारी भूमी त्याच्यावर जोराने आदळली होती. त्याला आदळून ती खाली पडणारच एवढ्यात आपल्या दोन्ही हातांनी त्याने तिला सावरले. हातातील उघडलेली छत्री वाऱ्याच्या जोराने कुठल्या कुठे उडून गेली होती. अडकलेला पदर तर सुटला होता, पण भूमीला सावरण्याच्या धडपडीत  तिच्या जवळ गेल्याने क्षितिजच्या गळ्यातील लॉकेट आणि तिच्या गळ्यातील छोटीशी सोनेरी चैन एकमेकांत गुंफली गेली होती.

क्रमश 

https://siddhic.blogspot.com/

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED