नक्षत्रांचे देणे - २१ siddhi chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नक्षत्रांचे देणे - २१

''संजय उद्या रिसेप्शन पार्टी आहे, निल आणि संजनाच्या लग्नाची. आपल्या फॅमिलीला खास इन्व्हेटेशन आहे.'' आज्जो गाडीमध्ये बसून आपल्या जावयाला सांगत होती.

''जोशी कुटुंब चंदिगढ वरून आले का इकडे?'' संजय (मिस्टर सावंत)

''होय, केव्हाच... क्षितीज गेला होता त्या लग्नाला म्हणून त्यांना बरं वाटलं.'' आज्जो

''ओह, मला जमेल असं वाटत नाही. तुम्ही दोघी रिसेप्शनला जाऊन या.'' संजय

''क्षितिजला सांग आमच्या सोबत यायला. तू सांगितलंस तर येईल तो.'' आज्जो

''सांगतो. मी पुढे एका कामासाठी जातोय. रात्र घरी येईन. तुम्हाला कुठे सोडू? '' संजय

''मला फिनिक्स मॉलला सोड. थोडी शॉपिंग करेन म्हणते.'' आज्जो एकदम आनंदी होत म्हणाली.

''ओके. झालं कि घरी फोन करा. ड्राइवर येईल न्यायला.'' संजय.

''एस माय सन.'' म्हणत आज्जो गाडीतून बाहेर आली होती. त्यांनी हात करून संजयना बाय केले. आणि मिस्टर सावंत गाडी घेऊन पुढे निघून गेले.

*****

'आज पाऊस नव्हता. क्षितिजची गाडी भरधाव वेगाने निघाली होती. ऑफिसचा एखादा विषय किंवा इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या.

भूमीच्या डोक्यात काहीतरी वेगळेच चालू होते. 'विभास जर घरी आला असेल तर? माझ्यामुळे नाना आणि माईंबरोबर त्याच भांडण वेगैरे व्हायला नको. ते दोघेही एकटेच असतात. मी सुद्धा तिथे नाही आहे. रूमवर पोहोचल्यावर आधी त्यांना फोन करून चोकशी करते. किआत्ता फोन करू?' असा काही ना काही साचार तिच्या मनात येत होता. दोन वेळा हातातील फोनवर नजर फिरवून तिने तो पुन्हा पर्समध्ये ठेवला. ती आपल्याशी बोलत असली तरी तीच लक्ष फोनमध्ये आहे. हे क्षितिजच्या लक्षात आलं होत.

''डोन्ट वरी मी नाही ऐकणारं... तुम्ही फोन करू शकता.'' तो म्हणाला.

''नॉट लाइक दॅट. माईंना फोन करायचा होता. पण कन्फ्युज आहे. आत्ता करू का नंतर?'' भूमी

''एनी टाइम. गाडी थांबवतो, महत्वाचं काही असेल तर बाहेर जाऊन बोला. '' क्षितिज

''नाही. घरी जाऊन बोलेन... तसंही पाच-दहा मिनिटांत पोहोचू आपण.'' भूमी

''नाही थोडा उशीर होईल. चालेल ना?'' क्षितीज

''काही काम आहे का?'' भूमी

''काम असं नाही, कॉफी घेणार?'' क्षितिज

''कॉफी।'' भूमी आश्चर्याने त्याच्याकडे बघत विचारात होती.

''चालेले ना?'' क्षितिज

भूमी मानेनेच हो म्हणाली. काय बोलावं तिला कळेना. नाही म्हणता येत नाही, आणि हो म्हणावंसं वाटतही नाही. या माणसाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतंय, हे तिने ओळखलं होत. तिच्याही मनात क्षितीज बद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. त्यात विश्वासही होता, आणि अजून बरेच काही.

''मी मघापासून बघतोय, तुम्ही कसलातरी विचार करताय. एनी प्रॉब्लेम?'' तिच्याकडे गाडीच्या समोरच्या आरशातून पाहत क्षितिजने विचारले.

गोंधळलेली ती लगेच मन डोलावून 'नाही'म्हणाली. पण चेहऱ्यावरचे हावभाव लपवणे शक्य नव्हते. तिने नजर खिडली बाहेर वळवली. एवढ्यात तिचा फोन वाजला. पलीकडून माई बोलत होत्या. ''भूमी, इथे सगळ ठीक आहे, काळजी करू नको.''

''ओक माई... घरी जाऊन फोन करते.'' असं म्हणत तिने फोन ठेवला. थोड्यावेळापूर्वी तिने पाठवलेला मेसेज माईंनी पहिले होता. म्हणून त्यांनी फोन करून तिला सगळ व्यवस्थित असल्याच सांगितले. त्यांची काळजी करण्याचे कारण नाही, समजल्यावर भूमी रिलॅक्स झाली.

''कामाचा जास्तच विचार करताय असं दिसतय.'' क्षितीज

''नाही, जस्ट सुरुवात केली आहे.'' भूमी

''फार सिरिअस होऊ नका. काम सुद्धा एन्जॉय कर ता आलं पाहिजे.'' क्षितिज

'' होय. एन्जॉय करतेय, हि केस फार किचकट आहे. आणि बरेच पेपर्स गहाळ आहेत. त्यामुळे खूप शोधाशोध करावी लागते.'' भूमी

''ऑफिसमध्ये बाकी स्टाफ कसा आहे? ऑल ओके ना?'' क्षितीज

''ऑल ओके, मुखार्जी जरा ओव्हर वागतात. कंपनीचे दोन्हीही मालक जेवढी ढवळाढवळ करत नाही ता त्यापेक्षा जास्त ऍक्टिव्हेन्स आहे त्यांचा.'' भूमी

''ते आधीपासून ओव्हर कॉन्फिडन्ट आहेत. त्यांना जास्त इंटरटेन करू नका.'' गाडी एका कॅफेच्या समोर थांबवत क्षितीज उतरला. तीन बाजूंनी ओपन असणारे कॉफी शॉप होते. गर्दी तशी तुरळक होती.

''होय.'' म्हणत भूमी दुसऱ्या बाजूने उतरली होती.

''उद्या एक मिटिंग अरेंज केलीय. पास्टच्या काही गोष्टी क्लिअर होत नाहीत. सो एकदा आधीच्या टीम बरोबर आणि सरांबरोबर बोलून घेईन.'' भूमी

''गुड.'' क्षितीज

दोन कॉफीची ऑर्डर देऊन ते दोघेही एका टेबलपाशी बसले. बाहेर रिमझिम पाऊस सुरु होता. हवा बऱ्यापैकी थंड होती. मोबाइलवर आलेल्या फोनवर बोलत असताना अचानक येणाऱ्या हवेच्या जोराने भूमीचे केस तिच्या चेहेऱ्यावरून मागे हेलकावे घेत होते. त्यांना पुन्हा-पुन्हा हातानेच व्यवस्थित करत तो फोनवर बोलत होती. दोन कॉफी मग समोर ठेवून वेटर निघून गेला. फोन कट करून भूमीने क्षितिजकडे पहिले, खरतर ती त्याला काहीतरी सांगणं होती. पण तो आपल्याकडेच बघतोय हे लक्षात आल्यावर ती शांत राहिली. 'सर अजून काही?' समोर उभा असलेला एक वेटर विचारत होता. त्या आवाजाने क्षितीज भानावर आला. ''नो.'' म्हणत तिने एक कॉफी मग उचलला.

''काय झालं?'' ती क्षितिजकडे बघत विचारात होती. काहीही न बोलता तो फक्त स्माईल दिली. भूमीच्या चेहऱ्यावर सुद्धा हलकेसे हसू उमटले. आणि ती किंचितशी लाजली. अगदी अनपेक्षित होतं ते, का ते तिलाच कळेना. तिच्याकडे बघून 'हाऊ क्युट...' तो मनातच म्हणाला.

काय बोलावं ते भूमीला कळेना, कॉफी संपावेपर्यंत फक्त स्माईल देत बसायचं का इथे, नको त्यापेक्षा ऑफीस विषयी बोलूया, असा विचार करून भूमीने हातात घेतलेल्या कामाबद्दल आणि येणाऱ्या प्रॉब्लेम्स बद्दल सांगायला सुरुवात केली. क्षितीज फक्त तिला पाहत होता. ऐकतोय असं दाखवण्यासाठी मधेच तो एखादा शब्द बोलत असे. थोड्यावेळाने हि गोष्ट भूमीच्या लक्षात आली.

''क्षितीज बोर झालं का? मी ऑफिसचा विषय काढला म्हणून.'' भूमी

''रिपीट अगेन?'' आश्चर्याने त्याने तिला मध्येच थांबवत अचानक प्रश्न केला होता.

''कंटाळलात का? माझं लेक्चर ऐकून.'' भूमी

''आधी काय बोललात ते रिपीट करा. सेम सेन्टेन्स.'' क्षितीज

आता भूमीची ट्यूबलाइट पेटली होती. आपण याच क्षितीज असं एकेरी नाव घेतलं. म्हणून हा रिपीट अगेन म्हणतॊय तर. आता काय करावं? विचार करत ''काही नाही. जाऊदे. निघायचं का आपण?'' म्हणत ती कॉफी संपवून उठली.

क्षितीज असं भूमीने उच्चरलेलं एकेरी नाव त्याला आवडलं होत. तिच्या तोंडून ते परत ऐकण्याचा मोह त्याला आवरेना. भूमी उठून बाहेर जायला निघाली होती. तो हि नाइलाजाने तिच्यामागून बाहेर निघाला. दोघेही गाडीमध्ये बसून निघालेही. नंतर कोणीही एकही अक्षर काढले नाही. बिल्डिंग जवळ आल्यावर उतरताना,'' थँक्स.'' एवढं बोलून भूमी गेटकडे जायला वळली.

''भूमी यापुढे क्षितिज अस नाव घेत जा. ऐकायला छान वाटत.'' असं म्हणून क्षितिजने गाडी स्टार्ट केली.

''तुम्हीसुद्धा उद्यापासून भूमी याच नावाने माझ्याशी बोललात तर मला सुद्धा बर वाटेल. अहोजाओ करण्याची काय गरज आहे ना...'' भूमी

''मी आजपासूनच सुरुवात केली.'' क्षितीज

डोळे मिचकावून, मंद स्मित करत ती 'बाय' बोलून निघूनही गेली. आणि आपण भूमीच्या प्रेमात पडलोय याची कबुली स्वतःलाच देत क्षितीज त्याच्या घराकडे निघाला.

क्रमश

https://siddhic.blogspot.com/