gift from stars 25 books and stories free download online pdf in Marathi

नक्षत्रांचे देणे - २५

'आपल्याला त्या दोघांनी पाहिलेले नाही, आणि पाहूही नये असे भूमीला वाटले. ती आणि क्षितीज शांतपणे तिथून बाहेर आले. निधीच्या बाबतीत असं का घडावं ? तिची बेस्ट फ्रेंड होती ती... आणि माणूस म्हणूनही अगदी प्रेमळ, जीवाला जीव लावणारी. भूमी फारच अपसेट होते. तिला हि सिचवेशन हान्डेल करन अवघड झालं होत. निधी खरतर पार्टीला येणार नव्हती, आपण मेसेज केला आणि ती भूमीला घेऊन आली. त्यामुळे पाहिलेल्या प्रसंगाचे क्षितिजलाही वाईट वाटले. त्या दोघांनाही निलची फार चीड येत होती.'


''आय कान्ट बिलिव्ह... बेस्टफ्रेंड म्हणते, आजपर्यंत तिने मला यातलं काहीही कळू दिल नाही. ''भूमी

''विश्वास ठेवणं कठीण आहे, पण आयुष्य म्हंटल कि असं होत असत.'' क्षितीज

''तिला तो मुलगा भेटला... काय म्हणून? दुसरं कोणीही असत तर ठीक होत... हा निल दर दोन महिन्यांनी नवीन मुलीसोबत फिरणारा. कशावरुन तो म्हणतो ते खरं आहे... संजनाला तर त्याने फसवलच पण अजूनही तो निधीला फसवतोय.'' भूमी

''त्याच्या बोलण्यावरून तरी मला तस नाही वाटतं. मुलींबरोबर फिरणं वेगळं आणि एखादीवर खरोखर प्रेम करण वेगळी गोष्ट आहे... तो सिरिअस वाटला. '' क्षितीज

''काही कळत नाही. यातून ती कशी बाहेर पडेल देव जाणे.'' भूमी

''वेळ... वेळ हेच सगळ्यावर उत्तर आहे.'' क्षितीज

''तिला सावकाश येउदेत. मला इथे थांबणं आता शक्य नाही. मी निघते...'' भूमी

''लेट्स गो... मी पण निघतोय.'' म्हणत त्याने बाजूलाच उभ्या असणाऱ्या आपल्या कारचा दरवाजा उघडला. भूमी आत जाऊन बसली आणि ते दोघेही निघाले.

*****

''आयुष्य आहे, आपल्या हातात आहेच काय म्हणा. स्टार्स, ते नक्षत्र आहेत ते ठरवतात, कोणाला काय द्यायचं आणि कोणाकडून काय हिरावून घयायच.'' चालत्या गाडीतून समोर वर दिसणारे चांदणे बघत भूमी म्हणाली.

''स्टार्स। स्टार्स वगैरे असं काही असत यावर माझा विश्वास नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आल्याला प्रयत्न करावे लागतात. फ्रीमध्ये कुठे काय मिळत.'' क्षितिज

''मिळत ना. बऱ्याचद असं होतं, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, प्लनींग करतो, पण आपल्याला यश येत नाही. आणि अचानक केव्हातरी ती गोष्ट अकस्मीत घडून येत, आपण काहीही न करता आपल्याला पाहिजे ते मिळत. दॅट्स कॉल्ड गिफ्ट फ्रॉम स्टार्स. 'माझी आई म्हणायची तुझे स्टार्स चांगले आहेत. ते देतील, आयुष्यात मिळेल ते घ्यायला शिक, तक्रार करू नको.' '' भूमी

''खरं आहे. गोष्टी ठरवल्याप्रमाने घडत नाहीत, पण आयुष्यात अचानक घडणाऱ्या गोष्टी खूपच ठराविक असतात. '' क्षितीज

''मला नाना-माईंसारखी जीव लावणारी माणसं मिळाली. निधी सारखी फ्रेंड मिळाली. ''काही गोष्टी अचानक हिरावूनही घेतात, हेही तितकंच खरं आहे.'' भूमी आकाशाकडे बघत म्हणाली.

''स्काय गेझिंग करायला आवडत का?'' क्षितीज

''हो... खूप... मी तासंतास बघत बसते ताऱ्यांना. मूड खराब असेल तर अख्खी रात्र तारे मोजत बसते.'' भूमी

''ओके, मग मूड खराब आहेच. घरी जाऊन तोच तो विचार करण्यापेक्षा तुला आवडत ते करूया.''

म्हणत गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन दोघेही खाली उतरले. गाडीला टेकून उभी असणारी भूमी त्या चांदण्यांना बघण्यात गढून गेली होती. आणि क्षितीज भूमीला बघण्यात.

''you are the most precious gift of my life, which i got from stars.'' क्षितीज हळू आवाजात नकळत बोलून गेला होता.

''काय?'' भूमी आश्चर्याने.

''आपली भेट देखील अचानक झाली ना. म्हणून म्हणालो.'' क्षितिज

भूमी त्याच्याकडेच बघत होती. तो काय बोलला हे तिने व्यवस्थित ऐकलेलं होत. 'इट्स नॉट राइट टाइम... हे ओळखून ओठावर आलेले वाक्य न बोलता क्षितीज शांत राहिला होता.

रात्र मध्यावर आली होती. तारे तारकांनी भरलेले आकाश अगदी नयनरम्य दिसत होते. ती जणू भान विसरून त्याच्याशी मूक संवाद साधत होती. नकळत तिच्या उजव्या हातात आपला डावा हात गुंफून तोही आकाशाचा नजारा बघण्यात मग्न झाला. गाडीमध्ये चालू असणाऱ्या रेडिओने गोल्डन इराच्या आठवणी जाग्या केल्या होत्या. मंद प्रकाशात आशा ताईंचा गोडं आणि गूढं आवाज ऐकू येत होता.

‘इस पल के साए में अपना ठिकाना है

इस पल की आगे की हर शय फ़साना है

कल किसने देखा है कल किसने जाना है,

इस पल से पाएगा जो तुझको पाना है,

जीनेवाले सोच ले यही वक़्त है कर ले पूरी आरज़ू

आगे भी ...

आगे भी जाने न तू, पीछे भी जाने न तू…

जो भी है, बस यही एक पल है.’

गाणं सुरु असताना दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. 'बस यही एक पल हैं...' म्हणत क्षितिजने त्याच्या हातात गुंफलेला तिचा हात वरती घेतला. तोपर्यंत तिला हि गोष्ट माहीतही नव्हती. तिने आपल्या हाताकडे बघून क्षितिजकडे पहिले. त्याने आपला उजवा हात तिच्या हातावर ठेवला.

''काही नात्यांना नाव देता येत नाही. नावाची गरजही नसते. आपल्यामध्ये तसच काहीतरी आहे समज. there is something between us. आयुष्यात तुला कधीही कोणत्याही कारणाने माझी हेल्प लागली तर मी नेहमी तिथे असेन. आणि मला आवडेल तुझ्यासाठी काहीही करायला.''

क्षितिज तिच्याकडे बघत बोलत होता. तिला प्रश्न पडला. याला अप्रत्यक्षपणे प्रपोजल म्हणावं का? फारतर काळजी म्हणता येईल किंवा भावना. ती दोन मिनिट स्तब्ध आणि कमालीची शांत झाली. काय करावं, काय बोलावं ते कळेना. ''थँक्स.'' एवढाच शब्द तिच्या तोंडून बाहेर पडला. आणि तिने खाली पहिले.

''पण का? लोकांना मदत करायला आवडत का?'' भूमी

''लोकांना नाही, तुला.'' क्षितिज आपल्या वाक्यावर अगदी ठाम होता.

''कारण?'' भूमी

''सांगेन केव्हातरी... तुझ्याभाषेत सांगायचं तर 'विनाकारण'.'' क्षितीज

''मान्य आहे ना... काही गोष्टी अचानक घडतात किंवा अचानक मिळतात?'' भूमी

''येस, आपली भेट सुद्धा अशीच होती. अचानक मिळालेल्या गिफ्ट सारखी.'' क्षितीज

'' यालाच तर म्हणता, नक्षत्रांचे देणे.'' भूमी

''गिफ्ट फ्रॉम स्टार्स.'' क्षितीज

थोडावेळ दोघेही तिथेच उभे राहिले. एकमेकांशी मूक संवाद साधत... सोबतीला होती अंधारी रात्र, ताऱ्यांचा नयनरम्य देखावा, गाडीमध्ये वाजणारे मंद-धुंद संगीत आणि शांत अंकात. अजून काय पाहिजे आयुष्यात.

''निघायचं?'' क्षितीज

''होय.'' भूमी

पार्टी नंतर घडलेल्या प्रसंगाने डाऊन झालेला मूड बऱ्यापैकी ठीक झाला होता. दोघेही गाडीत बसून घरी जायला निघाले. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी क्षितिजला चांगली संधी मिळाली होती, पण त्यापेक्षा त्याला भूमीची काळजी जास्त होती. आणि विश्वास... विश्वास असल्याशिवाय कोणतेही नाते टिकत नाही. त्यामुळे घाई न करत तिच्या कलेनुसार घायचा, असं ठरवून तो शांत राहिला.

'प्रेम करायला काळ, वेळ, ठिकाण पाहण्याची गरज नसते. पण प्रेम व्यक्त करण्यासाठी या गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि खास क्षण असतो तो. त्यामुळे तो क्षण असा साजरा करावा कि कायम स्मरणात राहील.

*****

‘भूमी सावंतांचा घरी सगळ्यांना आवडली होती. क्षितिजला ती आवडते, एवढंच नाही तर तो तिच्यावर प्रेम करतो, हे मेघाताईंना समजायला वेळ लागला नाही. त्यामुळे तिला लग्नाबद्दल विचार, असं त्या क्षितिजला सांगत होत्या. तिचे कोणी नातलग नाहीत, मानलेले कोणी जवळचे असतील तर त्यांच्या कानावर घालून आपण पुढची बोलणी करूया असेही त्या म्हणाल्या. क्षितिजला वाटत होते, एवढी घाई करण्याची काही गरज नाही. आधी दोघांनीही एकमेकांशी बोललं पाहिजे, तिच्या मनात नक्की काय आहे, हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर लग्नाचा विषय येतो.’

*****

निधीने क्षितिजला 'कालचा प्लॅन स्पॉईल झाला, त्यासाठी सॉरी.' असा मेसेज केला होता. क्षितिजला पार्टीमध्ये घडलेल्या प्रसंगबद्दल तिला विचारायचे होते. त्याने तिला संध्याकाळी भेटण्यासाठी बोलावले. तिने 'ओके.' असा रिप्लाय केला आणि तो ऑफिसला जायला निघाला.

*****

'' मॅडम काही नवीन माहिती?'' मिस्टर सावंत सकाळी-सकाळी भूमीच्या केबिनमध्ये येऊन भूमीला विचारत होते.

''सर काही फाईल्स गायब आहेत त्या शोधतेय, एकदा का मिळाल्या, की मग केस सॉल्व व्हायला वेळ नाही लागणार.'' भूमी

''काही मदत लागली तर सांगा, पण लवकरात लवकर शोध घ्या.'' मिस्टर सावंत

''होय, सर मी पूर्णपणे प्रयत्न करते.'' भूमी

''किती वर्षे तो कंपनीची फसवणूक करतोय माहित आहे. एखादा का त्या फ्रॉडरची माहिती मिळालाय ना, मग मी फ्री होईन. सगळ्या कंपनीला पार्टी देतो का नाही बघा.'' मिस्टर सावंत

''फक्त पार्टी का सर?'' भूमी हसत-हसत म्हणाली.

''तुम्ही मागाल ते बक्षीस मिळेल तुम्हाला. हे प्रॉमिस आहे माझं.'' ठाम विश्वासाने बोलत ते बाय करून निघाले.

''सर मग प्रॉमिस लक्षात ठेवा हं, लवकरच ती वेळ येणार आहे.'' भूमी त्यांना ऐकू जाईल अश्या आवाजात म्हणाली. आणि 'येस, येस...'म्हणत ते त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले.

*****

क्षितिजचा वाढदिवस जवळ आला होता. मेघाताई क्षितिजच्या वाढदिवसाची जय्यत तयारी करत होत्या. मैथिली प्रकरणामुळे दोन वर्ष वाढदिवस साजरा झाला नाही. त्याला इच्छाही नव्हती. या वर्षी मात्र मेघाताईंनी काही खास सरप्राइज प्लॅनींग केले होते. तेही क्षितिजच्या नकळत. मिस्टर सावंत आणि आज्जो देखील त्यांच्या सरप्राइज प्लॅनमध्ये सामील झाले होते.

*****

'' मॅडम काय शोधताय इकडे?'' संध्याकाळी ऑफिस सुटण्याची वेळ ती गुपचूप कोणीनाही ते पाहून फाइल्स शोधत होती, तेही कोणाची परवानगी न घेता. कंपनीच्या गोडाऊनमधून अचानक आलेल्या आवाजाने भूमी घाबरली. मागे क्षितीज उभा होता. त्याला बघून तिला हायसे वाटले.

''काही महत्वाच्या फाइल्स मिळत नाहीत, त्या शोधते.'' भूमी

''इथे, आणि असं एकटीने.? कोणत्या फाईल्स सांगितले असते तर कोणीही केबिनमध्ये आणून दिल्या असत्या.'' क्षितिज

''तोच तर प्रॉब्लेम आहे, कोणत्या फाइल्स महत्वाच्या आहेत हे सांगितल्यावर त्या फाइल्सच गायब होतात.'' भूमी

''आता काय शिपाई वगैरे सगळेच या फ्रॉडमध्ये सामील आहेत कि काय?'' क्षितीज

''नक्की माहित नाही, पण बरेच एम्प्लॉई सामील आहेत एवढं मात्र नक्की, म्हणून तर मी गपचूप येऊन इथे शोधाशोध करतेय.'' भूमी काही फाइल्स हातात घेत म्हणाली.

''काही महत्वाचं मिळाल का?'' क्षितीज

''काही फाइल्स मिळाल्या आहेत, महत्वाच्या निघाल्या उद्याच हि केस संपून जाईल.'' भूमी ठाम विश्वासाने म्हणत होती.

''उद्या। मग मला एखादा फ्रॉड करावा लागेल असं दिसतंय.'' क्षितीज तिच्याकडे बघत बोलत होता.

''म्हणजे.'' ती न कळल्याने.

''हे काम संपले, तुम्हाला नवीन काहीतरी काम नको का? काम नसेल तर लगेच कंपनीला डच्यु द्याल ना.'' तो मस्कारी करत म्हणाला.

''तुमची कंपनी खूप फ्रॉडर आहे, अजूनही बऱ्याच केसेस पेंडिंग आहेत. त्या सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार का?'' भूमी

''तसही त्या केसेस सॉल्व्ह केल्यानंतरही नाही सोडणार.'' क्षितिज तिच्या हातातल्या फाइल्स बघत म्हणाला.

''आ?'' ती आ करून त्याच्याकडे बघत होती.

''आय मिन, माझ्या पर्सनल सुद्धा काही केसेस आहेत, फारच गुंतागुंतीच्या अश्या... कंपनीचे काम संपले की आपण दोघांनी त्या केसेस सोडवुया.'' क्षितीज

''एवढा गुंता करायचाच कशाला? काही गोष्टी अगदी सहज सोप्या असतात. दिसत तेवढ अवघड वगैरे नसत काही.'' भूमी

''मग कसं असतं? ती तुमची चैन माझ्या लॉकेटमध्ये गुंतली होती तसं का? अगदी सहजसोपा गुंता, पण सोडवणे अवघड.'' क्षितीज तिला चिडवत होता.

''झालं का? ऑफिसमध्ये प्रोफेशनल वागावं. आत्ताच तुम्ही म्हणालात ना, आधी कंपनीची केस सोडवायची. मग आपण सावकाश तुमच्या गुंतागुंतीच्या केसेस बघुयात.'' म्हणत तिने क्षितिजच्या हातातील दोन-तीन फाइल्स आपल्या हातात घेतल्या. त्या दिवशीचा प्रसंग आठवून तिच्याही नकळत तिच्या गालावर हसू उमटले होते. आणि ती गोडं लाजली. आपल्या चेहेरा त्याला दिसू नये म्हणून तिने क्षितिजकडे मुद्दामहून पाठ फिरवली होती. त्याला हे समजले होते.

'' प्रोफेशनल वागतोय म्हणून तर मॅडम म्हणालो ना. बाय द वे, त्यादिवशी सांगायचं राहून गेलं, ती साडी सुंदर दिसत होती. आणि तू पण...'' म्हणत तो हसून तिथून बाहेर पडला. ती अजूनही तशीच उभी होती. क्षितीज गेला त्या दिशेने बघून तिने खात्री केली आणि आपल्या गोऱ्यागोबऱ्या गालावर पसरलेली लाजेची लाली लपवत ती तिच्या केबिनकडे निघाली.

*****

हातातल्या फाइल्स एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी आणि स्वतःची पर्स भूमीने उचलली. ड्रॉव्हर लॉक करून ती घरी जायला निघाली. आज लेट होईल असे निधीने सांगितले होते. त्यामुळे ओला बुक करून ती वाट बघत उभी होती. हातातील फाइल्सची जड पिशवी लपवण्याचा तिने आटोकाट प्रयत्न केला पण बाजूने जाणाऱ्या मुखर्जीच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही. वर त्यांनी संध्याकाळी भूमीला तळमजल्याकडे जाताना पहिले होते. पिशवीत भरलेल्या फाइल्सचे टोक वरती आल्याने त्यांनी ओळखले कि, या ऑफिसच्या फाइल्स आहेत. मॅडम घरी घेऊन जात आहेत म्हणजेच नक्की महत्वाचे काहीतरी असणार. त्यामुळे संध्याकाळपासून ते दुरूनच तिच्यावर लक्ष ठेवून होते. कोणालातरी मेसेज करून त्यांनी याची माहिती दिली आणि ते तिथून निसटले.

निधी गाडी घेऊन तिथे टच झाली होती. खरतर ती क्षितिजला गुपचूप भेटायला आली होती. भूमी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला समोरच कॅबची वाट बघत असलेली तिने पहिले आणि त्याच वेळी भूमीचे लक्ष तिच्याकडे गेले. तिथेच गाडी पार्क करून ती भूमीच्या जवळ आली. तोपर्यंत क्षितिजही खाली आला होता. निधी ऑफिसखाली आल्याचा मेसेज त्याने वाचला होता. दोघींनाही समोर बघून त्याचा गोंधळ उडाला, आपली गाडी बाजूला उभी करून तो उभा राहिला.

क्रमश
https://siddhic.blogspot.com/

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED