सांग ना रे मना (भाग 1) Author Sangieta Devkar.Print Media Writer द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सांग ना रे मना (भाग 1)

ना समझ सके हम जिंदगी के ये फैसले।
तुम तक पहुँचने के लिये और कितने तय करने है फासले? मितेश ने ही पोस्ट टाकली एफ बी वर आणि बाकीच्या गोष्टी चेक करत राहिला. त्याच्या पोस्ट ला भरपूर लाईकस आणि कमेंट्स यायच्या. ख़ुप भावस्पर्शी लिहायचा तो. पटापटा त्याच्या पोस्ट वर लाइक्स आणि कमेंट्स येऊ लागले. वॉव कीती मस्त लिहिले आहे पण सैड आहे या कमेंट ने मितेश चे लक्ष वेधुन घेतले. त्याने पाहिले कोणी संयुक्ता म्हणून मुलीने ती कमेंट केली होती. उत्सुकते पोटी त्याने तिचे प्रोफाइल पाहिले. एम ए झालेली संयुक्ता एका ठिकाणी जॉब करत होती. त्याने तिचा फ़ोटो पाहिला. सिल्की केस टपोरे काळेभोर डोळे,नाजुक जीवणी,हसमुख चेहरा. छान होती सयुंक्ता. मितेश हे बघत होता तोपर्यंत सयुंक्ता ने त्याच्या इतर पोस्ट वर कमेंट्स दिल्या होत्या. मितेश चे अकॉउंट पब्लिक असल्याने सगळ्याना दिसत होते. संयुक्ता ला मितेश आजच बघत होता. या आधी कधी हीने त्याचे पोस्ट्स बघितले नव्हते. त्याने तिला थैंकस असा कमेंट वर रिप्लाय दिला. सयुक्ता ने त्याचा प्रोफाइल फोटो ही लाइक केला. ओह्ह बेस्ट सेलर ऑथर मितेश सयुं ने वाचले ग्रेट इनटरेस्टिंग पर्सनालिटी ! मितेश ही दिसायला हैंडसम, फ्रेंच कट बियर्ड,ब्रावुनिश डोळे,उभा चेहरा. काहिसा गंभीर गूढ़ असा..एकुन रायटर शोभत होता. सयुंक्ता भान हरपुन त्याचे सगळे फ़ोटोज बघत बसली. त्याच्या चारोळया,कविता यात हरवून गेली. कारण तिला ही आवड़ायचे कविता शेरो शायरी . तिने मितेश ला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केली. मितेश होताच ऑनलाइन त्याने पाहिले तिची रिक्वेस्ट आलेली. पण लगेच त्याने नाही स्वीकारली. जरा आखड़ू टाईप होता मितेश लगेचच कोणाला भाव देत नसे त्यातून आजकालच्या मुली म्हणजे नुसता अल्लड़पणा म्हणून तो जास्त कोणाशी बोलत ही नसे. इकडे संयु वाट बघत होती कि कधी हा माझी रिक्वेस्ट घेतो. मितेश मग ऑफ़लाइन गेला. काय यार कीती खड़ूस आहे हा. याच्या जागी दूसरा कोणी असता तर मूली ची रिक्वेस्ट बघून लगेच एक्सेप्ट केली असती. संयु मनात च हे बोलली. मग ती ही ऑफ लाईन गेली. एका कॉलेज च्या ऑफिस मध्ये ती ऍडमिनिस्ट्रेशन चे काम करत होती.इकडे मितेश त्याच्या ऑफिस मध्ये बसून त्याच काम करत होता.तो नावजलेला लेखक होता लिखाना सोबत एडवरटाइजिंग चे काम ही करायचा त्याचा मित्र निनाद त्याच्या सोबत ग्राफिक्स चे काम करायचा. हे ऑफिस मितेश चे होते . मितेश ला निनाद मद्त करायचा त्याचे बुक पब्लिशिंग,बुक एड़ीटिंग कव्हर पिक ,त्याच्या मुलाखती,कार्यक्रम हे सगळ निनाद मैनेज करायचा. दोघ कॉलेज मेट आणि बेस्ट फ्रेंडस होते. लैपटॉप वर त्याने गाणी लावली ,म्युझिक एकदम प्रिय होत मितेश ला. मितेश ने टेबल च्या ड्रॉवर मधून एक सिगरेट काढली आणि लाइटर ने पेटवली . चेयर वर मागे मान टाकून सिगरेटचे झुरके घेवू लागला. तू रंग है मेरा, नूर है तू आदत तेरी मुझे, फितूर है तू फितूर है तू। तेरे साथ मैं हो सुबह। तू ही सबसे पहले हो हाँ। रातों मे बातें तेरी ना नींद को दे जगह। तेरे पास हरपल रहूँ यही आरजू है मेरी ।साँसों मे तेरी महक हो हाथों में हाथ तेरा। मेरे सीने की धड़कन है तू बन गया माहिया मेरे माहि, जानिया दिल जानी माहिया मेरे माहि, जानिया दिल जानी। डोळे मिटून तो हे गान ऐकू लागला. सिगरेट हातात होती. किन्ना सोना तू सोना तू हाँ ।किन्ना सोना तू सोना तू हाँ किन्ना सोना तू सोना तू हाँ ।तू ही तो रहबर है तू ही है मेरा रहनुमा तू ही मुक़द्दर है। तू ही है नसीब मेरा तुझको देखे बिना जी ये लगता नहीं। तुझको देखने से आँखें थकती नहीं है ।कहाँ कोई तुझ सा नज़ारा यहाँ। त्याच्या डोळ्यातुन अश्रु येऊ लागले . मितेश सिगरेट संपली लक्ष कुठे आहे भाजेल ना ! म्हणत निनाद ने त्याच्या हातातली सिगरेट काढून फेकली. सॉरी यार ते मी गाणयात गूंग होतो. हे मित्या आर यू क्राइंग ? त्याच्या डोळ्यात पाणी बघून निनाद ने विचारले. डोळे पूसत मितेश बोलला नाही रे असच . मला माहित नाही का तू आरोही ला मिस करतोस. पण सॉरी टू से मितेश आता सहा महीने होऊन गेलेत अजुन कीती वाट बघनार आहेस? तुझ आयुष्य वाया घालवनार आहेस का? मी वाट बघनार आहे निनाद बिकॉज आय स्टील लव हर आय काण्ट इमैजिन माय लाईफ़ विदावूट आरु. मित्या समजते रे मला पण असा तडफ़डत तुला जगताना पण नाही बघू शकत. का वेळेला अस बांधून टाकले आहेस आणि सव्हताला ही? बाहेर पड़ आता मला तुला सुखात पाहायचे आहे. माझ सुख माझा आनंद आरोही पासून सुरु होत आणि तिच्या पर्यंत येऊन थांबत.

क्रमश...©sangieta devkar 2017.