Sang na re mana - 7 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 7)

मी माझ्या परीने खूप प्रयत्न करत आहे. पण रिझल्ट शुन्य. मग निनाद आणि मितेश सुजय च्या केबिनमध्ये आले. पियून ने त्याच्या साठी कॉफी आणली. मितेश यु विल मूव्ह ऑन. आता वाट पाहण्यात अर्थ नाही. नो सुजय आय कांन्ट मी आरु शिवाय नाही जगू शकणार. मितेश अस काही नसतं. तू ही एक माणूस आहेस तुलाही मन भावना सगळं आहे. दुसरी एखादी मुलगी तुज्या आयुष्यात आली तर तू आरु ला विसरून ही जाशील आणि तेच योग्य आहे. माणसाला प्रेम जिव्हाळा हवा असतो. प्रेम ही प्रत्येकाची नैसर्गिक गरज आहे. कोणीतरी आपलं असणं ,आपल्यावर प्रेम करणार हे ही महत्वाचे आहे. मला गरज नाही सुजय मी आहे असा एकटा ठीक आहे. मितेश अरे वेड्या सारख का वागतो आहेस? जरा शान्त पणे विचार करून बघ. मग तुझं तुलाच समजेल.मान्य आहे की तुझं आरोही वर खूप प्रेम आहे पण आता ती आहे का तुझ्या सोबत? का स्वहताला अस बंदिस्त करून ठेवतो आहेस? जीवन एकदाच मिळते त्याचा उपभोग घे. तुला आम्हा सर्वांना आनंदात सुखात पाहायचे आहे . कारण तू आमचा जिवलग मित्र आहेस. निनाद मितेश ला समजावत म्हणाला. मला माहित आहे निनाद तुम्ही माझी किती काळजी करता. आणि प्रेम ही करता माझ्यावर. मला तुमच्या फिलिंग्ज समजतात पण माझ्या मना पुढे मी हतबल आहे. मी आरु चा विचार करणं सोडून देऊ शकत नाही. मितेश ओके जसा वेळ जाईल तस तुझं तुला जाणवेल आम्ही आता काही ही तुला सांगणार नाही किंवा बोलणार ही नाही. तुला जसे पाहिजे तस जग. सुजय रागऊ नकोस ना रे. मी तरी काय करू सांग. आरु ला मी विसरू शकत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे. मितेश तू आरु चा विचार करणं बंद कर मग आपोआप सगळं नीट होईल. तुझं प्रेम कायम असेलच आरु वर. पण ते प्रेम शाश्वत हवे रे आभासी नको. जर डोळस पणे विचार कर. तुझ्या कोशातुन बाहेर पड आणि मनासारख जग मित्रा. हो सुजय आय विल ट्राय. दयाट्स लाइक अ गुड बॉय. म्हणत सुजय ने मितेश चा हात हातात घेतला. मितेश आणि निनाद ऑफिस ला आले.

संयु चा गुड मॉर्निंग चा मितेश ला आला होता.त्याचा आज मूडच नव्हता सो त्याने तिला काही ही रिप्लाय दिला नाही. तसे ही हे रायटर लोक जरा मूडीच असतात. आपल्याच विश्वात रमलेले असतात."तुला भेटण्या आतुर श्वास माझे.

न सांगता घे जाणून माझी स्पंदने.

रोमा रोमात तू भारलेली ,कस समजेल मला ,
काय असते उगा धडधडणे.----- मीत. अशी पोस्ट मितेश ने एफ़ बी वर टाकली. या वर लगेचच लाइकस आणि कमेंट्स चा मारा होऊ लागला. सहज मितेश ने संयू चे प्रोफाईल चेक केले. तिने मितेश च्या शेरो शायरी ,कविता हे सगळ शेयर केले होतेच पण या सोबत मितेश चे काही फोटोज ही शेयर केले होते. आता मितेश ला ही जरा सयुंक्ता बद्दल उत्सुकता लागून राहिली का ही मुलगी माझे फ़ोटो माझ्या कविता शेयर करते. बाकीच्या ही करतात शेयर पण ही जास्तच आपल्यात इंटरेस्ट दाखवत आहे हे त्याला समजले. संध्याकाळी संयू चा गुड़ इव असा मेसेज त्याला आला. मितेश ऑनलाइन होताच जरा विचार करून मग त्याने ही रिप्लाय दिला. सर ख़ुप छान लिहिता तुम्ही मला आवडते तुमचे लिखान म्हणून मी तुमच्या पोस्ट शेयर करते संयू बोलली. ओह थैंकस . एक सांगा मिस सयुंक्ता त्याने मेसेज केला. बोला ना सर . माझे पोस्ट शेयर करता ते ठीक आहे पण माझे फोटोज का शेयर केलेत तुम्ही? संयु ला जरा टेंशन आले आता काय बोलावे तिला सुचेना. सर ते तुम्ही बेस्ट सेलर ऑथर आहात ना म्हणून आणि मी फैन आहे ना तुमची म्हणून. ओह्ह इतकेच ना? त्याने विचारले. हो सर सयुंक्ता बोलली. मग मितेश ऑफ लाईन गेला. तो थोड़ा वेळ तरी बोलला याच आनंदात संयू होती. मग रोजच सयुंक्ता मितेश ला मेसेज करू लागली. मितेश ही फ्री असेल तर तिला रिप्लाय करत होता. आज मितेश ची नॉवेल हारजीत ची एक हजार कॉपीज सेल झाल्या मुळे प्रकाशकानी ग्रैंड पार्टी ठेवली होती. निनाद सुजय आणि मितेश पार्टीला आले होते.
क्रमश


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED