Sang na re mana - 2 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 2)

माझ सुख माझा आनंद आरोही पासून सुरु होत आणि तिच्या पर्यंत येऊन थांबत. तू ऐकनार नाहीस हट्टी आहेस ख़ुप. जावू दे मी काही ही बोलनार नाही ओके. निनाद सॉरी बट ट्राय टू अंडरस्टैंड मि प्लीज. हम्म म्हणत निनाद ने मितेश ला मीठी मारली. मित्या त्या नवीन स्टोरी चे काय झाले लिहायला सुरु केलेस की नाहीस? नाही अजुन जरा कंसेप्ट डोक्यात येऊ दे मग सुरवात करतो. निनाद ला कॉल आला हैलो हा बोलतोय . किती हवी आहेत अजुन ? ओके बस्स एक वीक लागले . मित्या गुड़ न्यूज़ अरे आपली हारजीत नॉवेल चे अजुन शंभर कॉपीज हव्या आहेत. ख़ुप डिमांड आहे आपल्या बुक ला आता त्या बुक शॉप च्या ओनर चा कॉल होता. वा इट्स ग्रेट निनाद तुझ्या मुळे सगळ होतय. तू ख़ुप कष्ट घेतोस माझ्या साठी. हो का तुला काही प्रोब्लेम आहे. मला माझ्या मित्राला ख़ुप मोठा झालेला बघायचे आहे. आता आहेसच तू बेस्ट सेलर ऑथर मितेश पण अजुन तू फेमस व्हायला हवास. मितेश फ़क्त निनाद कड़े बघून हसला."तू नही साथ तेरी यादे ही सही,कमबख्त जीने के लिए ये भी कम नही। हरपल में तू है समाई,तुझ में ही तो मेरी जिंदगी बसी।" मितेश ने कॉल लावला,हॅलो कशी आहे आरु सुजय? मितेश काही ही फरक नाही रे आहे तशी आहे आरु यु कॅन मूव्ह ऑन मितेश. नो सुजय तू तरी अस बोलू नकोस. माझं आयुष्य तिच्या पासून सुरू होत आणि तिच्या पर्यंत येऊन थांबते . मितेश मी समजू शकतो तुझ्या भावना पण जरा प्रॅक्टीकल वाग आणि हृदयाने नाही रे डोक्याने विचार कर. तुझा नाही पण काका काकूंचा जरा विचार कर. तुझ्या सुखा साठी धडपडतात रे ते. तुला त्यांना सुखी बघायचे आहे मितेश. सुजय मला वेळ हवा मी नाही विसरू शकत आहे अजून तरी. मितेश इतका पण लेट नको करू की उद्या हातात काहीच उरणार नाही. काका काकू थकलेत आता. सुजय मला इमोशनल ब्लॅकमेल नको करू प्लिज. ओके नाही काही सांगत तुला. तुला जे योग्य वाटत ते तू कर असे पण कोणाचे ऐकतोस तू? स्वहताच च खर करतोस ना. आम्ही कोण आहोत तुझे बाय म्हणत सुजय ने कॉल कट केला. मितेश डोकं हातात धरून बसला. परत दुसरी सिगरेट काढली त्याने. मितु तू कधी पासून सिगरेट ओढू लागलास? चांगले आहे का ते? नाही रे कधी तरी घेतो टेन्शन असेल तर. हो का काय टेन्शन आहे तुला? का रायटर च्या इमेज ला सिगरेट शिवाय पूर्णत्व येत नाही. अरे कुठल्या कुठे विचार करतेस तू आरु जस्ट चिल मी काय इतका पण चेन स्मोकर नाही आहे हा. तरी पण ओढतोस ना सिगरेट ? आरु अग आता तू नको चिडू नाही ओढणार जास्त मी सिगरेट खुश. हास ना जरा स्वीटु . अजिबात नाही जा. स्वीटु मी तुझा स्वीट पेढा आहे ना प्लिज स्माईल नाहीतर गुदगुल्या करेन बघ . तरी ही आरोही गप्पच होती. मितेश ने मग तिच्या कमरे वर हात ठेवून तिला गुदगुल्या करायला सुरू केले. मित्या गप ना नको करू ना. पण मितेश ऐकत नवहता. आरोही नको नको म्हणत हसत होती. बस्स आता हसले ना थांब मितु. मग मितेश ने तिला आपल्या मिठीत ओढून घेतले स्वीटु अशीच हसत रहा कायम . तुला खूप सुखात ठेवेन मी. या डोळयात कधीच अश्रू येणार नाहीत. त्याने तिच्या गालावर किस केले. मितु इतकं प्रेम करतो का रे माझ्यावर. इतके नाही डियर इतकं म्हणत मितेशने आपले बोट आकाशा कडे केले. ओहह मित्या आय लव यु सो मच पेढ्या. आय लव यु टू . दोघे एकमेकांच्या मिठीत बराच वेळ होते. आमच्या प्रेमाला नजर ना लागो देवा अस मनातच आरु बोलली. मितेश पासून बाजूला होत आरु ने विचारले,मितु काय म्हणत होता तू कसले टेंशन आहे तुला. काही नाही ग कामाचं जरा. मी आहे लेखक त्यामुळे मी कधी सेटल होणार आणि कधी तुज्याशी लग्न करणार .? हो का लग्नाची खूप घाई झालीय मी. रायटर. हो मग मला नाही करमत तुझ्या शिवाय स्वीटु.आणि काय ग मला हे पेढ्या का म्हणतेस? कारण तू पेढ्या सारखा गोड गोड आहेस ना म्हणून. अच्छा पण पेढा तर खायचा असतो ना? हो खाऊ का मग तुला आरु बोलली. हो खा ना. आरु ने त्याच्या टोकदार नाकाला चावले बघ खाल्ले म्हणत हासू लागली. असे नाही काही इथून खायचे म्हणत मितेश ने आपल्या ओठांवर बोट ठेवले. जा वाट बघ. म्हणत आरु बाजूला गेली. तसे पटकन मितेश ने तिला पकडले तुझ्या साठी आयुष्यभर वाट बघायला तयार आहे मी जान. म्हणत त्याने आरु ला जवळ घेतले तिच्या डोळ्यात बघत म्हणाला,तू माझी आहेस स्वीटु माझ्या पासून तुला कधीच दूर नाही जाऊ देणार आणि त्याने तिच्या ओठावर आपले ओठ ठेवले बराच वेळ ते एकमेकांना किस करत राहिले. आई ग म्हणत मितेश ने हात झटकला. त्याची सिगरेट हातातच संपली होती आणि त्याला चटका बसला. तसा तो आठवणीतुन बाहेर आला. "जख्म कहा कितने मिले क्या रखे हिसाब? गिरते संभलते है फिर भी अबतक जिंदा है जनाब "।। क्रमश ..© sangieta devkar 2017

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED