Sang na re mana - 9 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 9)

पल्लवी निनाद कडेच बघत होती हे निनादच्या लक्षात आले तो गालातल्या गालात हसला. मिस पल्लवी तुम्ही काय करता? निनाद ने विचारले तसे गोंधळून जाऊन पल्लू बोलली अम्म्मम मी पण जॉब करते .मितेश ने निनाद च्या मनातले ओळखले म्हणाला मिस संयुक्ता तुम्ही आमच्या सोबत डीनर करू शकता. नको सर पार्टी तुमची आहे आम्ही फक्त कार्यक्रमाला आलो होतो. डोन्ट वरी तुम्ही आम्हाला जॉइन होऊ शकता अँज आवर गेस्ट. ओके सर संयु म्हणाली. मग निनाद मितेश सुजय संयु पल्लवी एकत्र बसले. सगळे छान गप्पा मारत जेवण करत होते. पल्लवी आणि निनाद चा नजरेचा लंपडाव सुरु होता. बहुतेक दोघे एकमेकांना आवडले होते. मितेश च्या लक्षात ही गोष्ट आली होती. सर तुमच्या अजून कोणत्या कादंबरी फेमस आहेत संयु ने विचारले. माझी हँग ओव्हर ,है तुझे भी इजाजत या काही बेस्ट कादंबरी आहेत . त्या तुम्हाला ऑनलाइन ही मिळू शकतील मितेश म्हणाला. ओके सर मी नक्की वाचेन. संयु बोलली. संयु चे बोलणे मितेश ला कुठेतरी सुखावत होते. मनात एक वेगळी भावना निर्माण होत होती. माणसाला प्रेमाची पण भूक असते हे विसरून मितेश ने स्वहताला आपल्याच कोषात बंदिस्त केले होते. पण मन वेड असत त्याला प्रेमाचा ओलावा हवा असतो. आपल्या सोबत आपलं कोणीतरी हवं असत. तीच कमतरता मितेश कडे होती. आज तो खूप महिन्यांनी अस एखाद्या मुली सोबत डीनर घेत होता. इतकं बोलत होता. त्याच हे वागणं सुजय आणि निनाद ला सुखावून जात होते. आपला मित्र आनंदी रहावा हिच त्या दोघांची मनापासून इच्छा होती. संयुक्ता खरच स्वभावाने चांगली होती ही जर मितेश च्या आयुष्यात आली तर मितेश त्याच दुःख विसरून जाईल. अस सुजय ला वाटून गेले. त्याच डिनर झाले तसे मितेश म्हणाला,तुम्हा दोघींना ड्रॉप करतो आम्ही. नको सर आम्ही जाऊ कॅब ने संयु बोलली. नो मिस संयुक्ता रात्र खूप झाली आहे आम्ही सोडतो चला. मग मितेश ने संयु ला ड्रॉप केले. आज पल्लू कडेच संयुक्ता थांबणार होती. संयु ला आज झोप च येत नवहती. मितेश चा विचार मनातून जात नवहता. किती छान आहे तो इतका मोठा रायटर असून ही जर सुद्धा घमेंड नाही की मोठेपणा नाही . बोलायला एकदम लॉयल संयु हाच विचार करत कधीतरी झोपी गेली.

इकडे मितेश ही संयु चा विचार करत होता . तीच बोलणं हसणं सगळं त्याला पुन्हा पुन्हा आठवत होते. आयुष्यात एकट एकाकी असणं खरच त्रासदायक असत. आपल्या दुःखऱ्या मनावर फुंकर घालायला आपल्या सोबत चालायला कोणीतरी आपलं अस जवळच असावं लागतं. दुःखात प्रेमाने जवळ घेणार, मी आहे ना सोबत नको काळजी करू अस हक्काचे कोणी असणं खूप गरजेचे असते. याच विचारात मितेश संयु कडे आकर्षित होत होता. त्याला संयु आवडू लागली होती पण त्याचे मन या गोष्टीला ग्वाही देत नवहते.सयुं रोज त्याला मेसेज करत असायची तो कसा आहे हे विचारायची. मितेश कधीतरी तिला रिप्लाय करायचा.पल्लू मला मितेश ला सांगायचे आहे माझ्या मनातले कसे सांगू ? संयू मला नाही वाटत ग त्याच्या मनात तुझ्या बद्दल तशा काही फिलिंग असतील. अरे हे तू कसे काय सांगू शकतेस? तसे नसते तर आपल्याला त्या दिवशी डीनर ला त्याने इन्वाइट केले नसते. सयुं हा त्याचा मोठेपना होता. पल्लू अस म्हणतात की एखाद्या वर आपले प्रेम असेल तर ते सांगून टाकावे उगाच उशीर करू नये. हम्म मी काय बोलू आता . पल्लू एक काम कर ना तू निनाद ला एफ़ बी वर ऍड हो आणि त्याच्या शी बोलून मितेश च्या मनात काय आहे ते काढून घे. संयु डोक्यावर पडली काय ग मी त्या निनाद ला एफ़ बी वर रिक्वेस्ट करू? नो नो. मग त्या दिवशी कार्यक्रमात त्याच्या कड़े इतके टक लावून कोण बघत होते पल्लू डार्लिंग. तुला पण निनाद आवडतो खरे की नाही सांग. निनाद चे नाव ऐकूनच पल्लवी चा चेहरा गुलाबी झाला. सयुं अस काही नाही. हो का बस मग नुसत त्याला बघत आणि तो दुसऱ्याच मूली च्या प्रेमात पडेल मग. बर बर मी करते त्याला रिक्वेस्ट ओके पल्लू बोलली. दयाटस लाइक अ गुड़ गर्ल म्हणत संयु ने तिचे गाल ओढले. ओह्ह याचा अर्थ तुला निनाद आवडतो हो ना? हसत पल्लू ने मान डोलवली. मग पल्लू ने लगेचच निनाद ला रिक्वेस्ट सेंड केली. निनाद काही ऑन लाइन नवहता. आता पल्लू ला ही त्याच्या शी बोलन्याची उत्सुकता लागली होती कारण तिला निनाद आवडला होता. "काहुर मनी सांजवेळी का उगा दाटले.

बघ तुझ्या आठवणीत डोळे पुन्हा भरून आले

नाहीस तू जवळ माझ्या,हे असे जरी खरे.
भावनांना कुठवर रोखु तूच आता सांग रे." ..मीत. मितेश ने पोस्ट टाकली होती सोबत त्याचा मस्त असा एक फोटो ही टाकला होता. सयुंक्ता ने लगेच तो लाईक ही केला. तिने त्याला मेसेज केला. हैल्लो सर कसे आहात. पण मीतेश लगेच ऑफ लाइन गेला. मीतेश ला सुजय चा कॉल आला होता. सुजय डॉक्टर होता. त्याच्या कड़े उद्या फॉरेन हुन एक स्पेशलिस्ट येणार होते ते सांगायला त्याने मीतेश ला कॉल केला होता. सकाळीच मितेश सुजय कडे आला होता. थोड्या वेळाने ते फॉरेन चे डॉक्टर येणार होते. मितेश आरोही कडे फक्त बघत बसला होता. ती शान्त पणे झोपून होती. तिचा मितेश तिच्या जवळ बसला होता पण तिला कशा चेच भान नवहते. मितेश डॉक्टर आले आहेत तू जरा वेळ बाहेर बस सुजय म्हणाला. मितेश बाहेर येऊन बसला. डॉक्टरांना घेऊन सुजय आत गेला. 15/20 मिनिटांनी ते सुजय च्या केबिनमध्ये आले. सुजय काय झाले ? मितेश ने विचारले. तसे ते डॉक्टर म्हणाले की मिस्टर मितेश देयर इज नो लिटील होप सो वूइ आर हेल्पलेस . वूई कान्ट डु एनिथिंग. ते डॉक्टर निघून गेले . मितेश चे डोळे भरून आले त्याच्या ही नकळत त्याचे अश्रु वाहू लागले. सुजय फक्त मितेश कडे बघत राहिला. थोडं त्याला रडून मोकळे होणं गरजेचं होतं . सुजय मी निघतो म्हणत मितेश निघाला. ओके टेक केयर म्हणत सुजय ने मितेश च्या खांद्यावर थोपटले.


क्रमश

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED