Sang na re mana - 3 books and stories free download online pdf in Marathi

सांग ना रे मना (भाग 3)

जख्म कहा कितने मिले क्या रखे हिसाब? गिरते संभलते है फिर भी अबतक जिंदा है जनाब ।" मितेश काम करत होता तेव्हा मेसेज ची टोन वाजली त्याने पाहिले एफ बी वर मेसेज आला होता. संयुक्ता नाव दिसले म्हणून त्याने मेसेज ओपन केला. हॅलो सर मला तुमच्या कविता ,शायरी खूप खूप आवडतात. मी तुमची जबरदस्त फॅन आहे. म्हणून तुम्हाला इथे एफ बी वर शोधुन काढले आणि फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केली आहे. प्लिज अकॅसेप्ट करा सर. मितेश एकटाच हसला. त्याने तिला थँक यु सो मच असा रिप्लाय केला. रिप्लाय दिला नसता तर तो किती रूड आहे असं वाटले असते तिला. इतका मोठा रायटर आहे म्हणून भाव खातो अस ही वाटलं असत. पण त्याने फ्रेंड रिक्वेस्ट नाही घेतली. बघू नंतर असा विचार केला. इकडे त्याचा मेसेज आला म्हणून संयु जाम खुश झाली. तिने तिच्या मैत्रीणी ला पल्लवी ला लगेच मेसेज केला. कारण पल्लू तिची बेस्ट फ्रेंड आणि संयुक्ता मितेश ची फँन आहे हे तिला माहीत होते.खुश ना आता पल्लवी ने रिप्लाय केला. हो ग पण बघ ना रिक्वेस्ट नाही घेतली अजून खडूस आहे एकदम. संयु ने मेसेज केला. घेईल ग जरा वाट बघ. हो ओके. बाय असा मेसेज करून संयुक्ता काम करू लागली. सकाळी परत तिने मितेश ला गुड मॉर्निंग चा छान मेसेज सेंड केला. त्याच्या कविता शायरी आपल्या टाइमलाईनवर शेयर केल्या. पाहताक्षणीच कोणी ही मुलगी मितेश च्या प्रेमात पडेल असाच होता तो. खास करून त्याचे डोळे खूप गहिरे जणू समोरच्या च्या मनाचा ठाव घेणारे असे. चेहरा इतका ग्लोइंग की समोरच्याला त्याला बघत बसावेसे वाटेल. त्याच काम त्याच लिखाणा बाबत च पॅशन त्याच्या चेहऱ्यावर दिसत असे. आपण जे काम मना पासून करतो त्याच रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्यावर झळकते तसच काहीसं मितेश च होत. संयु चा हा बालिश पणा हो त्याला बलिशपणाच वाटत होता त्याला हासू येत होते कारण बरयाच मुली त्याच्या फॅन होत्या तो बोलावा म्हणून धडपड करायच्या त्याच्या पोस्ट ,फोटोज शेयर करायच्या सो ही गोष्ट त्याला नवीन नवहती.

अँखियाँ मेरी पूछ रही हैं दिल को मेरा चैन नहीं हाँ। किथे लड़ाइयाँ वे तू अखियाँ किथे लड़ाइयाँ वे कैसे मैं तुझको बताऊँ ।राहें तेरी तकती जाऊं नीदों चुराइयां वे तू मेरियां निदां। चुराइयां वे धड़कन ये कहती है दिल तेरे बिन धडके ना। एक तू ही यार मेरा मुझको क्या दुनिया से लेना। गाणं ऐकत मितेश काम करत होता. गुड मॉर्निंग ब्रो निनाद ऑफिस मध्ये येत मितेश ला बोलला. वेरी गुड मॉर्निंग . काही सुचते का लिहायला रायटर. हो रे लिहितो आहे . तिकडे संयु ने आपला फोटो अपलोड केला आणि मितेश ची शायरी टाकली" तू माळून येतेस गजरा सखे ,मी धुंद वेडा होऊन जातो.
तू निघून गेली तरी, धुंद सुगंध मागे मागे उरतो.
प्रेम दिवाना मी तुझा,त्या सुगंधात तुला शोधत राहतो.
श्वासा श्वासात मग तू तो गजरा,अलवार उतरत जातो. बेस्ट सेलर ऑथर मितेश. मितेश ने पाहिले त्याची पोस्ट शेयर केली कोणी तरी आणि सयुक्ता नाव पाहताच तिचे प्रोफाइल पाहू लागला तिचा फोटो आणि त्याचे लाइनस बघत होता. कोण रे ही मित्या? निनाद ने विचारले. कोणी नाही अशीच एक फॅन माझी. दोन दिवस झाले माझे पोस्ट लाइक कमेंट करते. मला फ्रेंड रिक्वेस्ट ही सेंड केली आहे.आता ही माझी पोस्ट शेयर केली सो आय सी ओन्ली. हम्मम घे ना मग रिक्वेस्ट छान आहे दिसायला ही संयुक्ता! निनाद कामाला लाग तुझ्या ओके. अरे नुसते रिक्वेस्ट घायला काय हरकत आहे.

क्रमश.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED