सांग ना रे मना (भाग 4) Author Sangieta Devkar.Print Media Writer द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सांग ना रे मना (भाग 4)

अरे नुसते रिक्वेस्ट घायला काय हरकत आहे. अशा वागण्याने लोक तुला रूड खडूस समजतील तुझी इमेज काय राहील मग. हा बेस्ट सेलर रायटर आहे पण याला साधी माणुसकीही नाही बोलतील. जितके जास्त लोक तुझे फॅन असतील ना तितका तू फेमस होशील. अँटीट्यूड मध्ये तर सगळेच राहतात रे पण मनात जो राहतो तो खरा! वा निनाद माझ्या सोबत राहून तू ही लिहायला वैगरे लागलास का? नो वे देयर इज ओन्ली वन बेस्ट रायटर मितेश ! घे तिची रिक्वेस्ट नावाला पाहिजे तर बोलू नकोस सिम्पल. ओके भाई जा आता . निनाद हसतच आपल्या केबिन कडे गेला. मग मितेश ने संयु ची रिक्वेस्ट घेतली. ती काही ऑनलाइन नवहती. मितेश आपल्या कामाला लागला. मितेश ने आपली रिक्वेस्ट घेतली हे नोटिफिकेशन बघूनच संयु जाम खुश झाली. तिने पटकन त्याला मेसेज केला थँक यु सर. पल्लू ला ही तिने सांगितले. आज संयु खूप खुश होती. मितेश ते मीडिया वाले विचारत होते की तू गेस्ट लेक्चर देशील का? काय सब्जेक्ट असेल आणि मानधन द्यायला तयार आहेत का ते मितेश ने विचारले. कथा आणि पटकथा यातला फरक आणि सवांद लेखन असा विषय आहे.मानधन जे असेल ते द्यायला तयार आहेत. ओके कधी ठेवणार आहेत लेक्चर. तुझा होकार असेल तर कळवतो बोलले आहेत. मी त्यांना हो सांगतो. कुठे असणार आहे लेक्चर निनाद. त्याच्या वेबसाईटवर लाईव्ह असणार आहे बाकी मग कोणाला जॉइन व्हायचे त्यांना होता येईल.ओके मितेश म्हणाला. निनाद ने मग त्याना मितेश चा होकार कळवला. आणि एक मस्त पोस्टर पोस्ट करण्यासाठी तयार करण्यात गुंतला. संयु आता रोज मितेश ला गुड मॉर्निंग आणि गुड नाईट चे मेसेज करत होती. मितेश ते मेसेज बघायचा पण रिप्लाय देत नसायचा. कधीतरीच उत्तर द्यायचा. पण संयु मात्र त्याच्या लिखानाच कौतुक करत राहायची. बाकी चे लोक ही कौतुक करायचे पण संयु अगदी बालिश पणे त्याला इथे असे हवे होते हा शब्द नको होता अस सांगायला अजिबात घाबरत नवहती. मितेश ला याच च आश्चर्य वाटायचे की लोक आपले नाव ऐकले तरी भांबावून जातात . कारण तितका तो मोठा आणि फेमस रायटर होता. पण ही मुलगी मात्र बिनधास्तपणे जे मनात आहे ते बोलून जाते. तिचा हा भाव मितेश ला कुठेतरी स्पर्शून जायचा. शेवटी तो ही माणूसच होता त्याला मन,भावना ही होत्या आणि स्वहताच कौतुक तर सगळ्यानाच प्रिय असते. आपले काम त्याला मिळत असणारी दाद प्रत्येकाला हवी असते. मग मितेश या गोष्टीला कसा काय अपवाद असू शकेल?

संयु ने लंच ब्रेक मधये एफ बी चेक केले वॉव किती हँडसम दिसता तुम्ही मितेश . मितेश चे पोस्टर बघून संयु मनातच बोलली. त्याच्या लाईव प्रोग्राम चे पोस्टर निनाद ने पोस्ट केले मितेश चा स्पेक्टेकल घातलेला फोटो होता . त्याला तो स्पेक्टेकल जबरदस्त शोभुन दिसत होता. मूळात गोरा रंग आणि लाल काड्याचा चष्मा बेस्ट कॉम्बिनेशन होते. संयु किती तरी वेळ त्याचा फोटो बघत होती. मितेश तिला आवडू लागला होता.रविवारी मितेश चा लाईव शो होता. खूप जण त्याचे फॅन्स त्या शो ला कनेक्ट झाले होते संयु ही होती. कधी त्याचा आवाज ऐकते अस तिला झाले होते. "आप की आंखो को देखकर जिते है हम ,ये हरवक्त वो हमसे कहते थे..। आज देखो खुद ही आंखे बंद करके हमसे गुस्ताखी करते है। ------- मीत. मितेश ने आल्या आल्या आपल्या भारदस्त आवाजात हा शेर ऐकवला.

क्रमश