The Author ️V Chaudhari फॉलो करा Current Read स्वप्नांचे इशारे - 2 By ️V Chaudhari मराठी कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books गोळ्याचे सांबार 🟡गोळ्यांचे सांबार🟡माझी आई नोकरीवाली होतीपण अनेक पदार्थात तिच... क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 1 व्हिक्टोरिया 405 भाग 1 भाग 1] कथेवाटे कोणत्याही धर्माला गालब... अनोळखी हनिमून "... गोष्ट प्रेमाची आणि प्रवासाची.....भाग १ ही एका मुलाची गोष्ट आहे ज्याचे नाव राहुल आहे. तो महाविद्यालय... आर्या... ( भाग ४ ) आर्या च्या नवीन जीवन प्रवासाला सुरुवात झाली होती . अनुराग... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी ️V Chaudhari द्वारा मराठी कथा एकूण भाग : 8 शेयर करा स्वप्नांचे इशारे - 2 (1) 4.1k 7.6k आता प्रश्न होता तो फक्त राजेश चा. राजेश कधी येणार आहे इकडे ? केशव ने प्रश्न केला. एक महिन्याचा काही प्रोजेक्ट आहे सध्या, तो पूर्ण करून येतो असं सांगितलं आहे त्याने , सीमा ताई बोलल्या. तर राजेश आल्यावरच आपण बघायचा प्रोग्रॅम ठेवूया. असं सगळ्यांच मत त्यांनी केशव ला सांगितलं. चला येतो मग म्हणत केशव त्याच्या घरी जायला निघाला, तो घरी पोचून फोन करेल त्या आधीच त्याला प्रियाच्या बाबांचा फोन आला. काय केशव केली का गोष्ट तु मुलाच्या घरी? हो हो आता त्यांच्याच घरून येत आहे मी. मुलगा कामा निमित्त मुंबई ला असतो तो एक महिन्याने येणार आहे तेव्हा बघायचा प्रोग्रॅम ठेवूया असं सांगितलं त्यांनी. असं का चालेल चालेल म्हणत प्रियाच्या बाबांनी फोन ठेवला. प्रिया आणि तिची आई इकडे कानात तेल टाकून बाबांच्या बोलण्याची वाट बघत होते. तेवढ्यात प्रियाच्या फोन ची रिंग वाजते , unknown नंबर वरून फोन असतो. ती फोन घेते पाच मिनीट बोलून झाल्यावर फोन ठेवते आणि आनंदाने कुदू लागते. तिच्या आई बाबांना कळत नाही की हिला नेमके झाले काय, आई विचारते , अग प्रिया आम्हाला ही सांग काय झालं तुला येवढं आनंदी व्हायला ? प्रिया सांगते की तिला एका चांगल्या कंपनी मधे जॉब भेटला आहे. तिने आणि तिची मैत्रीण केतकी ने रिझल्ट लागल्याबरोबर कंपनी मध्ये जॉब साठी अपलाय केलं होत. पण अचानक तिला आठवत की बाबा तर आता केशव बरोबर बोलत होते त्यांनी काही सांगायचंय आधीच फोन आला आणि ती त्या आनंदात मागचं सगळं विसरली च .तिचा चेहरा अचानक पडला तिला वाटल आता बाबा परमिशन देतील की नाही जॉब करायची काय माहित? तिचे चेहऱ्यावरचे भाव तिच्या बाबांनी ओळखले आणि बोलले काही टेन्शन नको घेऊ बेटा तू कर जॉब, असही मुलाचा ही एक महिन्याचा प्रोजेक्ट आहे तो संपल्या नंतरच त्यांनी बघायचा प्रोग्रॅम च कळवू असे सांगितले आहे. ती ही खुश होते आणि झोपायला जाते. अचानक तिच्या लक्षात येत की तिने तर राजेश चा फोटो च बघितलेला नाही ,तिला हि बघायचे असते स्वप्न आणि सत्य यात काही समानता आहे की नाही, तिच्या स्वप्नात येणार राजकुमार आणि राजेश मधे काही साम्यता आहे की नाही ,तशी तशी तिची उस्तुकता वाढत जाते राजेश चा फोटो बघण्याची, ती विचार करते की बघायचा आहे पण आता गेली तर आई बाबा विचारणार का आली म्हणून ,पण फोटो बघायचा च होता तर काही तरी युक्ती करून जायचं ठरवते मग आधी किचन मधे जावून पाण्याचा ग्लास भरते म्हणजे कोणी विचारल तर सांगता येईल की पाणी प्यायला आली म्हणून........मग टीव्ही टेबल जवळ चोर पावलांनी जाते जिथे राजेश चा फोटो ठेवलेला असतो, मग हळूच टीव्ही टेबल वरून फोटो उचलायला हात पुढे करते तेवढ्यात मागून आईचा आवाज येतो प्रिया काय करते ,आणि त्या आवाजाने बिचकुन पाण्याचा ग्लास फोटो वर पडतो आणि फोटो पूर्ण ओला होतो. ती लगेच फोटो वर पेपर टाकते आणि काही नाही, झोप येत नाही तर टीव्ही बघायला आली सांगते .तिची आई ओके म्हणून झोपायला जाते. तशीच ती फोटो उचलून बघते तर फोटो पूर्ण ओला आणि खराब झालेला असतो. ती खूप प्रयत्न करते पण तिला राजेश चा चेहरा नीट दिसतच नाही. शेवटी नाराज होऊन झोपायला जाते... झोपताना उद्या जॉब चा पहिला दिवस या विचाराने परत तिची झोप उडते ..थोडी भीती थोडा आनंद ..त्यात राजेश चा फोटो बघता न आल्याचा, स्वप्नाचा उलगडा न झाल्याची खंत या सगळ्या विचारात हळू हळू झोप लागते ... क्रमशः ‹ पूर्वीचा प्रकरणस्वप्नांचे इशारे - 1 › पुढील प्रकरण स्वप्नांचे इशारे - 3 Download Our App