पालवी : विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प Dr.Swati More द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पालवी : विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प

एक दिवस सहज फेसबुक बघत असताना एक व्हिडिओ समोर आला ..मी उस्तुक्तेपोटी काय आहे म्हणून तो व्हिडिओ बघितला.. त्या व्हिडिओने मला आतून एवढं हेलावून सोडलं की मी लगेच त्या व्हिडिओ संबधित संस्थेची माहिती काढली..
प्रभा हिरा प्रतिष्ठन संचलीत *“पालवी”* हा प्रकल्प पंढरपूर येथे सन 2001 पासून चालविला जातो.
या ठिकाणी एच .आय.व्ही. पॉझिटिव अनाथ मुले सांभाळली जातात..
पंढरपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे..नदीत जसं निर्माल्य सोडावं तसं घराला समाजाला नको असलेल्या व्यक्ती या तीर्थक्षेत्री सोडल्या जातात. यात असतात मनोरुग्ण, अपंग, बेघर. यांचा पण सांभाळ पालवी मध्ये आनंदाने केला जातो.

डिंपल ताईला कॉन्टॅक्ट करून मुलांना भेटण्याची इच्छा दर्शवली..
त्यांनी कोविडचे प्रोटोकॉल पाळून लांबूनच मुलांना भेटता येईल असे सांगितले.. आम्ही आनंदाने तयार झालो..मी आणि अनिल मिळेल त्या ट्रेनची तिकिटे काढून पंढरपूर जाण्यासाठी तयार झालो..
ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी पालवी मध्ये पोहचलो.. ताईने आमचे स्वागत करून, अाम्हाला पालवी प्रोजेक्ट ची माहिती दिली..

प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलीत *“पालवी”* हा प्रकल्प पंढरपूर येथे सन 2001 पासून चालविला जातो. हा प्रकल्प ईतर प्रकल्पासारखा नॉर्मल मुळीच नाही आहे..मी अगोदर सांगितल्या प्रमाणे ईथे एच .आय.व्ही. पॉझिटिव अनाथ मुले आणि मनोरुग्ण, अपंग, बेघर यांना सांभाळले जाते..

हे सगळं सुरू केलं तेंव्हा मंगल आई आणि डिंपल ताईला खूप त्रासाला सामोरं जावं लागलं.. आपल्या समाजात एच .आय.व्ही. पॉझिटिव व्यक्तीला सहजा सहजी कोणी स्वीकारत नाही.. समाज सोडाच पण त्यांच्या नातेवाईकांना पण ते नकोसे असतात.. अश्या, समाजाला नकोश्या असणाऱ्या लोकांना आई आणि ताईने आपलेसे केले.. त्यांना हक्काचे घर तर दिलेच पण मुलांना शिक्षण देवून त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत केली आणि करत आहेत..

पालवीने स्वतःचे शैक्षणिक संकुल विश्वकल्याण विजयजी ज्ञानमंदिर २००७ मध्ये सुरु केले. २०१३ पर्यंत पहिली ते दहावीचे सर्व वर्ग सुरु झाले. कॉम्प्युटर, ईलर्निंग सुविधाही दिल्या जातात. सध्या १० शिक्षक व ५ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत .साल २०१७ तसेच २०१८ च्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परिक्षेत पालवीचा निकाल १०० टक्के ते ही प्रथम श्रेणीत लागला. हि शाळा पुर्णतः विनाअनुदान तत्वावर चालवावी लागत आहे.
भक्तियोग अंगणवाडी मध्ये एक ते आठ वयोगटाची अठरा बालके शिक्षण घेत आहेत

अरुणा कौशल्य विकास विभाग यामध्ये विविध खेळांमधून मुलांना शिक्षणाची आवड लावणे तसेच मेंदूचा विकास करणे असे उपक्रम चालतात

वाचन शिवार या उपक्रमांतरगत मोकळ्या पटांगणामध्ये विद्यार्थी वाचावयास बसतात व त्यानंतर वाचलेल्या पुस्तकावर ती माहितीचे आदान-प्रदान गप्पा असं मुलांकडून करून घेतले जाते..

पत्रमैत्री यामध्ये मंगल ताईंनी बालकांना वाचनाची गोडी लागावी व ज्यांना वाचायला येत नाही त्यांनी वाचावयास शिकावे याकरिता स्वतः बालकांना पत्रे लिहावयास सुरुवात केली हळूहळू बालकांना त्याची सवय लागत गेली व आता बालके आठवड्यातून तीन दिवस स्वतः पत्र लिहितात..

आता एच .आय.व्ही. पॉझिटिव मुले आहेत म्हणजे त्यांची वैद्यकीय सुविधा पण आलीच..
याच अनुषंगाने दर 3 महिन्याने CBC, सहा महिन्याने CD4 व व्हायरल लोड, एक्सरे तसेच संपूर्ण शारिरीक तपासण्या केल्या जातात. याकरिता एम.बी.बी.एस. चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बहुमुल्य योगदान लाभते.

कौशल्य विकासनावर आधारित स्वयंसहाय्यता गट
या उपक्रमामध्ये संस्थेतील मुलांना प्रशिक्षण देऊन साड्यांची पायपुसणी, कॅरीबॅग, गोधड्या, विविध पसेंस बनविल्या जातात. ठिकठिकाणी त्याचे प्रदर्शन लावून विक्रीतून स्वावलंबी बनविणेचा प्रयत्न केला जातो..

हे सगळे ऐकून मन अगदी भारावून जाते.. समाजाने नाकारलेल्या व्यक्तींसाठी डिंपल ताई आणि मंगल आई म्हणाजे त्यांची विठू माउलीच..
या दोघी आणि त्यांचे कुटुंबीय अगदी मनापासून करतात या मुलांसाठी..

त्यांना फंडींग पण येतं..पण एवढा मोठा प्रकल्प आहे त्यामुळे पैसा पण तेवढाच लागतो..
आपल्या सारख्यांनी प्रयत्न करायचा की लोकांपर्यंत त्यांचे काम पोहचवून त्यांना जेवढी होईल तेवढी मदत करायची..
खूप काही नाही पण .. त्या दोघी जे एच .आय.व्ही. पॉझिटिव मुले आणि आपला समाज यांच्यात जे सेतु बांधण्याचे काम करत आहेत.. त्यांच्या या कामात आपण खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो..

पालवी कॉन्टॅक्ट नंबर
919673664455

मंगल आई आणि डिंपल ताई तुमच्या या प्रयत्नांना नक्कीच यश मिळो.. ही ईश्र्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व