चुकीचे पाऊल! - ०२ Khushi Dhoke..️️️ द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चुकीचे पाऊल! - ०२



आता पर्यंत आपण बघीतले.

माझ्यासोबत घडलेल्या प्रकारातून सावरायचा प्रयत्न करत असताच दारावर थाप पडली…

आता पुढे..!

जाऊन दार उघडले तर, बाहेर आई आणि ऋत्वी उभ्या होत्या. मला असं गोंधळलेल्या अवस्थेत बघून लगबगीने आई खोलीच्या आत शिरली आणि संशयित कटाक्षाने संपुर्ण खोलीवरून तिने एक नजर फिरवली. नंतर तिची संशयित नजर माझ्यावर येऊन थांबली. तिच्या या संशयीत नजरेला मात्र मी खूप घाबरले होते!

"इतका वेळ काय करत होतीस?" : आई वैतागून, वेगळ्याच संशयीत नजरेने मला विचारू लागली.

"काही नाही. त….. ते….. मला झोप येत होती. आज खूप थकले होते ना." : मी, घाबरून तिला समजू नये या उद्देशाने विषय टाळत बोलले.

"नक्की ना." : आई, परत संशयाने! डोळे बारीक करत विचारू लागली.

"हो अग. अजुन काय असेल?" : मी, आईच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत बोलून गेले.

"काही असायला ही नको." : आई, खात्रीशीर दम देत बोलली.

आईचे ते शब्द ऐकून मी अजूनच बिथरले! कारण, आता माझ्या मनातील शंकांचे निरसन मी कधीच करू शकणार नाही हा विचार मनात पक्का झाला होता! या विचाराने मला अजुनच अस्वस्थ केले होते. मला गोंधळलेल्या अवस्थेत बघून आई मोठ्याने बोलू लागली.

"खाली ये, जेवायला वाढलंय आणि हो आज लॅपटॉप वगैरे वापरायचा नाही. पुस्तकं वाच त्यापेक्षा आणि हो आजचा दिवस माझ्या खोलीत झोपायचं दोघींनी. चला आता, जेवून घ्या दोघी." : आई, मला स्वतःजवळ झोपायचे मन बनवून, संशयित कटाक्षाने बोलून गेली.

"हो, आले." : मी, दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने हताश होत बोलले.

आईच्या खोलीत झोपायला मिळणार या विचाराने मला सुरक्षित तर वाटत होते. मात्र, मनातील गोंधळ अजुन तसाच होता. आईचा आपल्यावर विश्वासच नाही! हे मला कुठे तरी मनात दुखावून गेले! पण, तसं न दाखवता मी आईच्या पाठी जायचे ठरवले.

थोड्याच वेळात माझी खोली आवरून मी खाली जायला निघाले. गोंधळलेल्या मनस्थितीतंच मी जेवायला खाली निघून आले होते. जेवण आटोपून जो - तो झोपी गेला. माझे विचारचक्र मात्र अजूनही न थांबता सुरूच होते! काही केल्या मला झोप येत नव्हती. जरी ओंकारचा तो स्पर्श मला आठवला तरी, क्षणिक भीती मात्र नंतर वेगळाच आनंद मी अनुभवत होते! हे बरोबर की, चुक हे विचारण्याचं माझं धाडसंच होत नव्हतं. त्यामुळे मी भावनेच्या भरात फक्त वाहत होते.

रात्री माझे विचारचक्र सुरू असल्यामुळे मला उशिरा पर्यंत झोप लागली होती. सकाळी मला ०८:०० वाजता जाग आली. उठून घाईतच तयार होऊन देवपूजा आटोपली आणि शाळेसाठी तयार झाले. सकाळी १०:०० वाजता शाळेची बस आली. मी बसच्या आत शिरले. ओंकार माझ्याच जागेवर बसलेला बघून, माझ्या पोटात गोळा आला! पण, नंतर त्याच्या हसणाऱ्या चेहऱ्याकडे बघून, मी सुद्धा नेहमीप्रमाणे त्याला हसूनच प्रतिसाद दिला. मला बसायला जागा देत, तो उठला. मात्र, त्यादिवशी त्याने हद्दच पार केली! मी सीटवर बसताना त्याने माझ्या छातीला हात लावला. त्या स्पर्शाने मनात धस्स झाले! मी त्याच्याकडे बघितले तर तो विचित्र हसत होता. हे बघून माझ्या मनात अजुनच भीती दाटून आली. त्यानंतर मी शांत आपल्या जागेवर खाली मान टाकून बसून राहिले.

शाळेत त्यादिवशी मी पूर्ण दिवस शांतच बसून होते. जास्त कोणाशी बोलले तर नव्हतेच. मात्र, खेळायला ही गेले नाही. मनाशीच आज आईचा किती ही राग सहन करावा लागला तरी, मनातलं सर्व सांगून टाकूया. या विचारातच कधी ०५:०० वाजता सुट्टीची वेळ झाली, समजले नाही! उठून शाळेच्या बस मध्ये येऊन बसले. ओंकार माझ्याचकडे पाहत होता. त्याच्या अशा बघण्याने मन भीतीने थरथरले! तो माझ्या दिशेने जस - जसा पाऊल टाकत होता, तस - तशी मनातली धाकधूक अजूनच वाढत होती.
.
.
.
.

क्रमशः

©खुशाली ढोके.