बावरा मन - 5 - गिफ्ट.. Vaishu Mahajan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

बावरा मन - 5 - गिफ्ट..

आज लग्न असल्यामुळे सगळीकडे लगबग सुरु होती... रुचिका आणि रिद्धी अंकितला तयार करत होत्या... दुसरी कडे ब्युटीशिअन सियाला रेडी करत होती.. विराज च्या मदतीला सगळे गँग बॉईज बाहेरच बघत होते... लग्नाचा मंडप समूद्रावर टाकला गेला होता... अंकित रेडी झाल्यावर मंजिरीने रुचिका आणि रिद्धिला तयार होण्यासाठी पाठवल... अंकित कडून लग्नाआधीचे विधी करून घेतले... रिद्धिने आल्यावर त्याला फेटा बांधला... रोहिणीने त्याची नजर काढली... सगळी तयारी झाली होती... निंबाळकर कुटुंबीय खूप आनंदात होते... विराजने रक्ष , आदि , आरव आणि वीरला व्हेंन्यूला पाठवुन दिलं... सगळी तयारी झाल्यानंतर अंकित बाहेर आला...




विराजने खाली बसून हात पुढे केल्यावर अंकित हातावर पाय देऊन घोड्यावर बसला... आणि बँड बाजा वाजु लागतो.. लहान पासून मोठ्यां पर्यंत सगळे मनमुराद नाचत होते... नाचत सर्वजण व्हेंन्यू वर पोहोचले.... रिद्धीने वंशच लक्ष पूर्णतः स्वतःकडे वेधून घेतल होत.. वंश देखील भान हरपून तिला बघत होता.. जणू तिथे फक्त ती आणि तो हे दोघेच होते.. तिला बघून तिची नाचतानाची प्रत्येक अदा बघून तो वेडावत होता...

संध्याताईंनी अंकितला ओवाळुन आत घेतलं.. सरंजामे कुटुंबीय त्यांचे स्वागत करतात...




अंकित स्टेजवर जाऊन बसतो... वेटर सर्वांना वेलकम ड्रिंक देतात... वंशची नजर चौफेर रिद्धिला शोधत होती.. त्याने तिला अजून नीटसं पाहिलं नव्हतं आणि त्याला ती दिसली... गँग सोबत तिच काहीतरी डिस्कशन सुरु होत.. तिला बघून तो पुरता हँग झाला... त्या गोल्डन साडीत ती खूप सुंदर दिसत होती...




तो तिच्याकडे बघत असताना आवाज येतो..
" Do you like her..( तुला ती आवडते का..?)
" Yes... " वंश बोलून जातो पण लगेच भानावर येतो...
" Dad you.. what are you talking..about there is nothing like that..( बाबा तुम्ही... काय बोलताय तुम्ही असं काही नाही.. ) वंश मनिष कडे पाहून बोलतो...
" Why is it false? ( का हे खोटं आहे का.? )" मनिष
" नाही डॅड.. आवडली मला ती... पण आता नाही आधी पासुन.." वंश रिद्धिकडे बघत बोलतो..
" म्हणजे.." मनीष न कळून बोलले..
" नंतर सांगेल पण मी हिला आधी देखील पाहिलं आहे आणि तेव्हा पासून आवडली आहे... " वंश हसत सांगतो
" अरे व्वा... मग कधी बोलयच निंबाळकरांसोबत.. " मनीष त्याला चिडवत बोलतात..
" आधी दादीसा सोबत बोलू मग बघू..." वंश
" आम्ही बोलतो माँसा सोबत... " मनिष
"Ok Dad... " वंश
वंश आणि मनिष राजमातांकडे जातात...
रिद्धी देखील आल्यापासुन वंशला शोधत होती.. आणि तिला वंश राजमातांसोबत बोलत असताना दिसला.... त्याने तिला मॅचिंग रंगाची शेरवानी घातली होती... त्यामध्ये तो खूप हँडसम दिसत होता...

बोलत असताना सहज त्याच लक्ष तिच्याकडे गेलं तर ती त्यालाच पाहत होती... तिने त्याला छान स्माइल दिली..

" हि मला पाहून हसली... पण किती छान स्माइल आहे हिची.. " वंशने स्वतःला प्रश्न केला.. त्याला तर आता आभाळात गेल्याचे फीलिंग येत होते... त्याने पण तिला स्माइल दिली... त्यांचे नजरेचे खेळ शेजारी असलेल्या पियू आणी तनु बघत होत्या...
" काय झालं रिधु कोणाला बघून हसते आहेस... " तनु काही माहीत नाही असं बोलते..
" ते ते ओळखीचे गेस्ट होते... " रिद्धी अडखळत बोलते
" अच्छा.. चल तिथे चेअर वर बसू उन्हाने तुझा चेहरा लाल झालाय हो ना तनु... " पियू तिला चिडवत बोलते..
" हो ना .. बघ किती लाल झाली आहे.. " तनु रिद्धिला बघुन बोलते.. खर तर रिद्धी लाजेने लाल झाली होती...
"तुम्ही बसा मी सीयुला बघून येते... " रिद्धी तिथून गेली.. ती गेल्यावर दोघी स्टेज जवळ असलेल्या टेबलवर जाऊन बसल्या... रिद्धी जातं असताना तिला अर्पिता बोलवतात..

" रिद्धी खूप सुंदर दिसताय तुम्ही साडीमध्ये... " अर्पिता तिच्या गालावर हात ठेवून बोलताय..
" थँक यु काकू... " रिद्धी हसून आभार मानते..
" मी तुमची ओळख करून देते... या राजमाता म्हणजे आमच्या माँसा... रिद्धी त्यांना नमस्कार करते..
" औक्षवंत रहा... " राजमाता तिला आशीर्वाद देतात..
" हे आमचे पती... अर्पिता मनिषजींची ओळख करून देते... रिद्धी त्यांना नमस्कार करते...
" आणि हे वंश आमचा मोठा मुलगा यांना तर तुम्ही ओळखतात... " अर्पिता शेवटी वंशकडे बघत बोलतात..
" हो काकू... ओळखते मी यांना.. " रिद्धी वंश कडे बघून बोलते..रिद्धिला पुरोहित कुटुंबीयांसोबत हसत बोलताना बघून समिधाला धोक्याची घंटा ऐकू येऊ लागली... पुढे अजून काही होण्याआधी आपण तिथे गेले पाहिजे विचार करून ती रिद्धीजवळ येते..
" रिद्धी तु इथे आहेस.. मी तुला शोधत होते.. " समिधा
" काही कामं होत का... " रिद्धी
" हा.. ते.. हा तुला तन्वी शोधत होती... " समिधा सुचेल ते बोलते..
" मी आत्ताच तिच्याजवळुन आले आहे... " रिद्धी
" अच्छा मग त्याआधी शोधात असेल... " समिधा
" काकू हि समिधा आहे..अंकित दादाची मावस बहीण.." रीद्धी तिची ओळख करून देते.. समिधा सग्ळ्यांना हात जोडून नमस्ते बोलते सामिधाची नजर फक्त वंश कडे होती... राजमातांच्या तीक्ष नजरेतुन हे सुटलं नाही...

त्या बोलता असताना संध्या येतात...
" वंश सियाला आणायच आहे... चला.. रिद्धी तु येतेस ना... " संध्या वंशला बोलतात...
" हो मी तिकडेच येत होते... " रिद्धी आणि वंश एंटरन्स कडे जातात.... आरव, वंश, विराट आणि रक्ष गेटजवळ फुलांची चादर घेऊन थांबता... सिया रिद्धिचा हात धरून कारमधुन उतरल्यावर चादर खाली थांबते.. तिच्यासोबत येताना धरा आणि संजु होत्या...

सियाला घेऊन सगळे स्टेजकडे निघतात... तिच्या पायाखाली गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या.. सिया समोर धरा आणि संजू असल्यामुळे अंकित तिला पाहू शकत नव्हता... सिया स्टेजवर येऊन तिच्या पाटावर उभी राहते... गुरुजींनी दोघांमधे अंतरपाट धरला होता.. गुरुजींनी मंगलाष्टक सुरु केले... अंकितला तर कधी एकदा सियाला बघतो असं झालं होत... मंगलाष्टक झाल्यावर अंतरपाट बाजूला झाला... सियाला बघून अंकित तिला भान हरवून बघत असतो...




गुरुजी आवाज देतात त्याने तो भानावर येतो.. दोघे एकमेकांना हार घालतात.. त्यानंतर बाकी विधिंना सुरुवात होते.. रिद्धी आणि धरा दोघांजवळ मागे बसल्या होत्या... रिद्धिला वंश स्टेजकडे येताना दिसतो... पण धरा काहीतरी बोलते म्हणून ती तिच्याकडे बघून समोर बघते तर वंश नसतो.. तिची नजर सर्वत्र फिरते पण तो दिसत नाही..

"आत्ता तर इथे होते.. कुठे गेले.. " रिद्धी मनात विचार करते..

तेव्हा मागून कोणीतरी तिचा हात घट्ट पकडला...
" कोणाला शोधत आहेस मला.... " वंश तिच्या कानात बोलतो..
" नाही मी ते.. ते मी संजूला शोधत होते.. " रिद्धी कसबस अडखळत बोलते... ती तिचा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत असते पण त्याची पकड खूप टाईट होती.. शेवटी ती सोडून देते आणि धरून बस असं मनात बोलते... सर्व आपल्यात मग्न होते त्यामुळे दोघांकडे कोणाच लक्ष नव्हतं... तिने त्याच्याकडे पाहण मुद्दाम टाळल...

काही वेळात तिच्या कानाला गरम श्वास जाणवले...

" Today You are looking so much beautiful... वंश तिच्या कानाजवळ जाऊन बोलला..

त्याच्या गरम श्वासांच्या स्पर्शाने तिचे अंग शहारले... तिची मान त्याच्याकडे वळली... तसा त्याने हलकेच तिला डोळा मारला... तिचे डोळे फक्त बाहेर येणे बाकी राहील होत.. त्याची कट्यारीच्या धारेसारखी नजर तिच्या काळजावर घाव करत होती... तिने पटकन आपली नजर सरळ पुढे वळवली... स्टेजखाली संजू , तनु आणि पियू त्यांना बघून हसत होत्या...

समिधा मुद्दाम राजमाता आणी अर्पिता सोबत बोलायला कारण शोधत होती.. काही ना काही कारण काढून दोघींसोबत बोलत होती... राजमातांना एव्हाना तिचा उद्देश कळाला होता...
" समिधा तुम्ही काय करतात... " राजमाता
" मी MBA केलं आहे आणि आता डॅड सोबत बिझनेस हॅण्डल करते आहे... " समिधा
" मग लग्नाचा काही विचार केलात कि नाही... म्हणजे तुमच लग्नाच वय झालय आता... " राजमाता बोलल्यानंतर समिधाच्या मनात लाडू फुटायला लागले..
" हो बघू या वर्षी... मॉम डॅड देखील बोलत आहेत... " समिधा..
" माँसा तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत... जेवून घेऊया... " अर्पिता
" हो चला... " राजमाता गेल्यानंतर समिधाने अर्चनाला गाठल आणि दोघींच बोलण सांगितल ... त्यांना देखील आनंद झाला... समिधाने सिया अंकितच्या लग्नात स्वतःच्या लग्नाचे स्वप्न बघायला सुरुवात केली...

आता वेळ आली ती मंगळसुत्राच्या विधीची.. अंकितने मंगळसुत्राच्या वाट्यांमध्ये हळद कुंकू भरलं... आणि त्याने ते सियाच्या गळ्यात घातले... तिच्या भांगेत सिंदुर भरले... तिच्या चेहेऱ्यावरुन आनंद ओसंडुन वाहत होता..

भडजींनी महत्त्वाच्या विधिला म्हणजे सप्तपदी साठी होम पेटवला.. सप्तपदींना सुरुवात झाली.. गुरुजी प्रत्येक वचनाचा अर्थ समजावुन सांगितल...सगळे विधी पार पडल्यानंतर सगळे जेवणाच्या सेक्शन कडे वळाले...

" भाई तु सियाला घास भरव... " रिद्धीच्या बोलण्यावर सगळे त्यांना फोर्स करतात..
" आणि उखाणाही घ्यायचा... " रुचिका
" वाहिनी मला नाही येत उखाणा... सिया घेईल " अंकित
" अजिबात नाही दादा तुलाही घ्यावा लागेल... " संजिता
" बर आधी सिया घेईल... " अंकितने सियाकडे पाहिलं तशी तिची नजर झुकली..

" संसारात प्रेमाला हवी, विश्वासाची जोड…
अंकितचे नाव घेते, रसमलाई भरवून गोड.. "

सियाने अंकितला घास भरवला... आता सगळे अंकितला आग्रह करतात...

"कधी आमचे लग्न होईल, याचा लागला होता ध्यास ,
सियाला भरवतो , मी रसमलाईचा घास... "


अंकित तिला घास भरतो.. जेवण करून दोघांचे फोटोसेशन झाले... सगळ्यांनी दोघांसोबत फोटो काढले... सियाने मुद्दाम वंश आणि रिद्धी सोबत दोघांचा एक फोटो काढला... वंश तिला नजरेत सामावुन घेत होता...

फोटोशुट झाल्यानंतर सिया अंकितला रूम्स मध्ये चेंज करायला गेले... संध्याकाळ असल्याने समुद्र किनाऱ्यावरील सुर्यास्ताचे दृश्य मनमोहक दिसत होते...




रिद्धी आणि विराजने सर्वांना लवकर तयार राहायला सांगितल होत... सगळे आजच मुंबईला परतणार होते..
कारण दुसऱ्या दिवशी घरी पूजा आणि रिसेप्शन होत.. त्यामुळे त्यांची लग्नाच्या दिवशी रात्रीच मुंबईची रिटर्न फ्लाईट होती... सगळे रूम मध्ये जाऊन फ्रेश झाले... सियाने चेंज करून हलकी साडी घातली... रिद्धी सर्व वस्तू रिचेक करून घेत होती.... फ्लाईटची वेळ झाल्यावर सगळे एअरपोर्टला निघाले... सर्व फॉर्मॅलिटी करून ते प्लेन मध्ये जाऊन बसले... सिया वंश हातात हात घेऊन बसले होते... सियाने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं होत... धरा आणि अपेक्षा लग्नाचे फोटो बघत होत्या... रिद्धी तिचा टॅब ओपन करून बसली होती... तिच्या शेजारच्या रांगेत वंश होता... त्याने तिच्या शेजारी बसलेल्या पैसेंजर कडून सीट चेंज करून तिच्या शेजारी येवून बसला... त्याला शेजारी बसलेलं बघून तिला आता काय कराव सुचेना... वंशने रिद्धी शेजारी बसलेलं समिधाला अजिबात आवडलं नाही तिने खास त्याच्यासाठी त्याच्या क्रॉस सीट घेतली होती जेणेकरुन त्याला बघता येईल... पण तिचा हिरेमोड झाला...

वंशने तिचा हात हातात घेऊन तिच्या हातात एक बॉक्स दिला... तिला काही समजेना...
" हे काय.. आणि मला का... " रिद्धी
" तुला माझ्याकडुन गिफ्ट तुला नक्की आवडेल... " वंश
" पण मी हे कस घेऊ.... " रिद्धी
" हे असं... " वंशने तिचा हात सरळ करून तिच्या हातात बॉक्स ठेवला...
" आणि मी दिलेलं गिफ्ट परत घेत नाही ok... " वंश तिच्या डोळ्यांत बघत बोलतो...
" पण हे गिफ्ट कशाबद्दल हे तरी सांगा... " रिद्धी
" कारण मला द्यावस वाटलं... घरी गेल्यावर बघ आणि सांग... " वंश
" Ok... Thank you... " रिद्धि त्याला तिची खळीवाली स्माइल देते... ज्याने तो फुल्ल फ्लॅट होतो...

९ वाजता सगळे मुंबईला दाखल होतात... विराजने गाड्या बोलावल्या होत्या... सियाला मात्र आता रडू येत होत... तिने संध्या आणि विजयला मिठी मारली... अंकितने तिला जाऊन सावरल... आरव देखील हळवा झाला होता... दोघे मिठी मारून रडत होते... दोघांना रडतान बघून रिद्धिने विराजला मिठी मारली... त्याने तिला एका बाजूने मिठीत घेतल...
" विजय दादा ताई सियाची अजिबात काळजी करू नका.. आम्हाला आता दोन मुली आहेत... " मंजिरी संध्याजवळ जावुन बोलतात..
" राजमाता पुरोहितजी आपले आदरातिथ्य करायला वेळ मिळाला नाही... उद्या पूजेला आणि रिसेप्शनला नक्की या..." अनिल हात जोडून त्यांना निमंत्रित करतात...
" हो नक्की येऊ... आणि आम्हाला तुमच्याकडुन काही तरी हवं आहे झालेल्या दुर्लक्षा बद्दल... " राजमातांच्या बोलण्याने निंबाळकर विचारात पडले... निरोप घेऊन सगळे घरी निघाले... वंशने जाताना रिद्धिला स्माइल दिली... तिने देखील त्याला हसुन बाय केलं...

क्रमशः

आता लग्न तर पार पडलं मग रिद्धी वंशची भेट कशी होईल... ?
राजमाता निंबाळकरांकडुन काय घेणार आहेत.. ?
सामिधा राजमातांना आवडली तर नसेल ना... ?...


बरेच प्रश्न आहेत पण यांचे उत्तर पुढील भागात मिळतील.. I hope तुम्हाला कथा नक्की आवडत असेल...

तुम्हांला हा भाग कसा वाटला.. नक्की कमेंट्स करून कळवा ...

प्लीज लाईक , कंमेंट , शेअर , रेटिंग आणि फॉलो करा..
लिहिताना व्यकरणात काही चुक झाली असेल, शब्द चुकीचा लिहिला गेला असेल तर नक्की कळवा ...
Stay Tuned.. 🙂🙂