नक्षत्रांचे देणे - ३१ siddhi chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नक्षत्रांचे देणे - ३१

 

 

 

‘क्षितिजला काहीच कळू न देता घरी मेघाताई आणि आज्जोने सगळी तयारी करून ठेवली होती. वाढदिवसासाठी हॉल वगैरे बुक झाला होता. संध्याकाळी सगळ्यांना पार्टीसाठी बोलावलं गेलं होतं. क्षितीज घरी आला तेव्हा उशिरा आल्याबद्दल कोणीही काहीही बोलले नाही. घरी सगळ्यांनी दरवर्षीप्रमाणे साधंसं विश केलं. मेघाताईनी ओवाळणी केली आणि त्याच्या आवडीचे पदार्थ केले. त्याला विशेष काही आहे अशी जाणीव करून दिली नाही.’

 

*****

 

भूमी देखील रूमवर आली होती. आल्या-आल्या निधीने तिला विश केल. आश्रमातल्या गप्पा मारता दोघीही बसल्या होत्या. तेव्हा तिच्यासाठी एक निनावी पार्सल आलं होतं. ते निधीने तिला दाखवलं. गिफ्ट असावं म्हणून तिने ते उघडलं आतमध्ये एक लेटर होतं. 

‘तुमच्या केसच्या संदर्भात खूप महत्वाची माहिती माझ्याकडे आहे. पत्ता-जिप्सी गार्डन, काइट्स माउंटन. संध्याकाळ ७.००.' एवढाच संदेश त्यावर होता.

 

'कोणी पाठवलं असेल? का? निधी आणि भूमी दोघी विचारात पडल्या. निधीलाही या बद्दल काहीही माहिती नव्हती. त्यामुळे गेस करने अवघड होते. जाऊ का नाही या विचारात भूमी असतानाच तिचा फोन वाजला. पलीकडून मेघाताईंचा मेसेज होता.

‘क्षितिजचा वाढदिवस आहे, हॉटेल सनशाइन. त्याच्यासाठी सरप्राइज पार्टी आहे. तुला यायचं आहे. मी वाट पाहतेय.'

आता भूमी फुल कन्फ्युज झाली. क्षितिजच्या वाढदिवसाची पार्टी संध्याकाळी आहे. या अनोळखी लेटरमध्ये सुद्धा संध्याकाळी  बोलावलं आहे. दोन्ही अड्रेस वेगळे आहेत. जायचं तरी कुठे? इकडे कि तिकडे? प्रश्न प्रश्न आणि नुसतेच प्रश्न तिच्या  मनाचा गोंधळ उडाला होता. केसाच्या रिलेटेड काही असेल तर जायलाच पाहिजे.

 

''कदाचित कोणीतरी तुझ्या ओळखायचे असावे, केसच्या संबंधित काही माहिती तिथे जाऊन मिळणार असेल तर जाऊन बघायला काय हरकत आहे. त्यानंतर तू क्षितिजच्या वाढदिवसाच्या पार्टीला जा.'' निधी तिला सांगत होती. भूमिलाही तिचे म्हणणे पटले. ती तयारीला लागली.

 

*****

इकडे माईंनी खूप समजावून सुद्धा विभास पुन्हा परदेशी जायला तयार नव्हता. इथेच सेटल व्हायचं असं म्हणत होता. भूमी त्याच्या फोन किंवा मेसेज रिप्लाय करत नाही म्हणून तो चिडला होता.  नानांची सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर आहे, हे समजल्यामुळे त्याला भूमीला भेटायचे होते. एकतर गोडं बोलून नाहीतर धमकावून तिच्या कडून सगळे परत मळवायचे असा त्याचा डाव होता. बिचार्या माईंच्या लक्षात हि गोष्ट येईना. नानांनी मात्र त्याला आधीपासूनच पुरते ओळखले होते. म्हणून ते भूमीचा पत्ता त्याला सांगत नव्हते. काही ना काही करून भूमी पर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता.

 

****

 

'गडद जांभळ्या रंगाची सिल्क ब्लेंडेड डिझाइनर साडी घालून भूमी तयार झाली. आधी काइट्स माउंटन मग ती तशीच पुढे क्षितिजच्या वाढदिवस पार्टीला जाणार होत. त्यातच क्षितिजचा दुसऱ्यांदा मेसेज येऊन गेला होता. 'संध्याकाळी भेटणार का?' त्याचा सरप्राइज बड्डे तिला स्पॉईल करायचा नव्हता. त्यामुळे  तिने 'आज शक्य नाही' असा मेसेज केला.

 

घरी कोणीही सेलिब्रेशन करणार नव्हते म्हणून भूमीसोबत संध्याकाळ घालावायच प्लॅनींग त्याने केले, तर ती देखील भेटायला तयार नव्हती. तो नर्व्हस झाला होता. शेवटचे वाढदिवसाचे सेलिब्रेशन मैथिली बरोबर असताना केले होते. तेही तिच्या आवडत्या ठिकाणी. सगळी तयारी तिनेच केली होती. त्यात तिचा स्वार्थ असो किंवा काहीही त्यानंतर वाढदिवस साजरा करावा असे क्षितिजला केव्हाही वाटले नाही. आज खूप दिवसांनी त्याने काहीतरी प्लॅनींग केलं होत. आणि तेही फसलं. तो नाराज झाला हे चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होते. घरी कोणाशी काहीही न बोलता तो घराबाहेर पडला.  त्याला बाहेर जाताना बघून 'मनासारख घडतंय बहुतेक' म्हणत मेघाताई मनातच हसल्या. 

 

भूमी लेटरमध्ये दिलेल्या ठिकाणी पोहोचली होती. जिप्सी गार्डन हे काइट्स माउंटनवर पसरलेले एक लहानसे गार्डन आणि ओपन कॅफे होते. त्या टेकडीवर सर्वत्र हिरवळ पसरली होती. टेकडीच्या टोकाला वसलेले ते छोटेसे पण बऱ्यापैकी आलिशान ओपन कॅफे. काही कपल्स तिथे आले होते. बहुतेक सिलेक्टिव्ह इंट्री असाव्या. काही लोक वरती पतंग  उडवण्यात दंग होते. यावरूनच त्याला काइट्स माउंटन असे नाव पडले असावे, हे भूमीने ओळखले.  भूमीने रिसिप्शनला चोकशी केली, टेबल ३ ला तिला बसण्यासाठी सांगितले गेले. तिचे टेबल होते तिथे ती पोहिचली. ते टेबल अगदी टेकडीच्या टोकाला होते. समोर पसरलेली अरुंद आणि खोल अशी दरी तिला तिथून स्पष्ट दिसत होती. ती एकटीच खुरीवर बसली. इथे आपल्याला कुणी बोलावले असेल आणि ती व्यक्ती अजून इथे का आली नाही? या विचारात ती आजूबाजूला बघत होती.

 

क्षितीज कॅफेमध्ये पोहोचला होता. सगळे टेबल बुक आहेत. हे रिसिप्शनवर समजल्यावर त्याला आश्चर्य वाटले. टेबल नंबर ३ त्याचे नेहमीचे टेबल तेही बुक होते. 'मी नेहमी इथे येतो, आजही माझं इथे बुकिंग आहे, तरीही तुम्ही ते टेबल दुसऱ्या कोणाला कसे दिले? टेबल ३ अरेंज होत का बघताय का?' त्याने रिसिप्शनिस्टला विनंती केली.

 

'काहीतरी प्रॉब्लेम झालाय सर, ते सेम टेबल अजून एका कस्टमरला चुकून देण्यात आलं वाटत. सर मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयन्त करते.' म्हणत ती त्या टेबल जवळ आली. भूमी त्याच ठिकाणी पाठमोरी बसली होती. तिच्याजवळ येत रिसीप्शनिस्टने तिला विनंती केली. ''मॅम मी तुमच्यासाठी दुसरे टेबल अरेंज करू का? ''

 

''पण का? माझं इथेच बुकिंग आहे ना? तुम्हीच तर मघाशी म्हणालात.''  भूमी

 

''ऍक्च्युली हे टेबल आमच्या नेहमीच्या कस्टमरने बुक केलं होते. चुकून तुम्हालाही हेच बुकिंग मिळाल. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते.'' रिसिप्शनिस्ट

 

''ओह. काही प्रॉब्लेम नाही.'' म्हणत भूमी उठली आणि आपली पर्स उचलून निघणारच होती. समोर क्षितीज तिच्याकडेच बघत उभा होता. ''प्लिज सीट.'' म्हणत तो समोरच्या खुर्चीवर बसला.

 

''तुम्ही? इथे कसे काय?'' भूमी त्याला विचारत होती.

 

''मी खूप वेळा इथे येत असतो. घरी बोर झाल किंवा  मुड ऑफ असला कि मी इथे येतो. तू इथे कशी काय?'' तो रिसिप्शनिस्टला हातानेच जाण्याची खुन करत भूमीला विचारत होता.

 

''मला माझ्या केसच्या संदर्भात एका निनावी व्यक्तीने इथे बोलावलं होत. मी केव्हापासून त्यांची वाट पहाटे, कोणाचा काहीही पत्ता नाही. का नक्की काय प्रकार आहे समजत नाही.'' भूमी त्याला तिच्याकडचे ते लेटर दाखवत म्हणाली.

 

''ओह, हे अक्षर थोडं ओळखीचं वाटतंय. पण एका लेटरवरून इथे त्या व्यक्तीला भेटायला येन सेफ नाही. कोणीही असू शकत.'' क्षितीज

 

''होय, मला इथून अजून एका ठिकाणी पार्टीला जायचं आहे, त्यामुळे म्हंटल जाऊन तरी बघावं. केस संदर्भात सगळे पुरावे नष्ट झालेत. काही नवीन हाती लागलंच तर त्याचा खूप फायदा होईल ना.'' भूमी

 

''कुठे पार्टीला जायचं आहे?'' क्षितीज

 

''अ... ते... एक मैत्रीण आहे तिच्याकडे.'' क्षितिजच्या वाढदिवसाची सरप्राइज पार्टी होती. हे तिला सांगता येणार नव्हते. त्याच्याकडे न बघताच भूमी खोट बोलली.

 

''ओके. म्हणून मला भेटायला यायला जमणार नाही असं सांगितलं का? आय सी. केस फारच महत्वाची आहे, बाकी आपण भेटलो काय आणि नाही काय सारखंच.''  क्षितीज जरा रागातच म्हणाला.

 

''तसं काही नाही. आता भेटलोच ना आपण. काय योगायोग आहे ना?'' भूमीला थोडं वाईट वाटलं. ज्याने भेटायला बोलावलं त्यांचा पत्ताच नव्हता. काय करावं तिला सुचेना. उलट क्षितीज नाराज झाला होता. हे सगळं अनपेक्षित घडलं त्यामुळे त्याच नाराज होणं सहजीक होत.

 

''लुकिंग ब्युटीफुल.'' तो तिच्याकडे बघतं म्हणाला.

 

''थँक्स आणि सॉरी या लेटरमुळे काहीही विचार न करत मी सरळ इथे निघून आले.'' भूमी

 

''दॅट्स फाइन. ते जे कोण येणार आहेत, ते आल्यावर मी निघेन इथून.'' क्षितीज अजूनही नाराजच होता.

 

''नाही, मला वाटत नाही आता कोण येईल म्हणून. खूप उशीर झाला आहे.'' भूमी

 

''कॉफी घेणार? जर तेवढा वेळ असेल तर?'' क्षितीज

 

''आज मूड ठीक वाटत नाहीय. काय झालं?'' भूमी त्याचा उजवा हात आपल्या हातात घेत विचारात होती. आपला डावा हात तिच्या हातावर ठेऊन तिच्याकडे बघत तो थोडा हसला. ''काही नाही. सहज.'' म्हणून तो आपला हात सोडवून उठून त्या दरीच्या दिशेने थोडं अंतर जाऊन पाठ करून उभा राहिला. ती सुद्धा उठून त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली.

''नसेल सांगायचं तर राहूदे. काही हरकत नाही.'' भूमी

 

''काही गोष्टी सांगण्याची गरज नसते, न सांगता सुद्धा समजू शकतेस ना?'' क्षितीज

 

''बरोबर, काही गोष्टी सांगण्याची गरज नसते. पण काही सांगाव्याच लागतात,  त्यांना आपल्या आयुष्यात खूप महत्व असतं त्यामुळे त्या गृहीत धरून चालत नाही.'' भूमी

 

''दॅट वॉज अनादर टॉपिक, मी स्वतःच विनाकारण अपसेट आहे.'' क्षितीज

 

''मी आपल्याबद्दल बोलतेय.'' भूमी

 

''विषय काढलाच आहेस तर थोडं बोलूया. अर्थात तुला वेळ असेल तर.'' क्षितीज पुढे बोलणारच एवढ्यात त्याचा फोन वाजला. मेघाताईंचा फोन होता. फोन उचलल्यावर त्या लगेच सुरु झाल्या.  'ही डेट मी अरेंज केली आहे. ते लेटर पाठवून भूमीला मी बोलावलं होत. न काही करता तू स्वतःहून तिथे पोहोचलास.

दॅट्स कॉल्ड स्टार्स, माय बॉय .''

 

''म्हणजे... तू हे?'' क्षितीज पुढे काही बोलण्याआधीच त्या पलीकडून म्हणाल्या. ''एन्जॉय युअर डे. आपण नंतर बोलू. नंतर तिला घेऊन हॉटेल सनशाइनला ये. मी वाट बघतेय. बाय.'' म्हणून त्यांनी फोन कट केला होता.

 

आत्ता क्षितिजला त्याच्या आईचा प्लॅन लक्षात आला. भूमीची यात काहीच चुकी नव्हती. ती दरीच्या अगदी जवळ जाऊन वरती आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांना टिपत होती. संध्याकाळची सात साडेसातची वेळ असल्याने आकाश मस्त तारकांनी भरून आले होते. अस्ताला निघालेल्या सूर्याची सोनेरी किरणे क्षितिजापलीकडे गायब होत चालली होती. एक लुकलुकणारी तारका त्याच क्षितीजा जवळ अगदी दिव्य प्रकाशाने चमकत होती.

 

''समोर असणारी खोल दरी म्हणजे जमीन, त्याच्या पलीकडे बरोबर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या हिरव्यागर्द टेकडीच्या मागे अस्ताला गेलेला लालतांबूस सूर्य आणि त्यावर पसरलेले केशरी-काळसर होत चाललेले आकाश, यांच्यामध्ये असणाऱ्या पण न दिसणाऱ्या आभासी अंतराला क्षितीज म्हणतात. कधीच जवळ न येणारी पण सतत दिसणारी भूमी व आकाश यांच्या मीलनाची आभासी सीमारेषा म्हणजे क्षितिज.'' भूमी समोर बघून बोलत होती.

 

''होय, मला माहित आहे.'' क्षितिज तिच्याकडे पाहून म्हणाला.

 

''सगळ्यांना असं वाटत कि, भूमी आणि आकाश यांच्या मीलनाची सीमारेषा म्हणजे क्षितिज आहे, पण प्रत्यक्ष भूमी आणि आकाश यांचं मिलन कधीच होतात नाही. खरं मिलन होत ते, भूमी आणि क्षितीज यांचं...  पण त्याला ना आपण मानतो ना काही नाव देतो.

असं एक नातं, जे निनावी आहे, ज्यात कोणातही बंधन नाही. कोणताही करार नाही. कोणाचाही होकार नाही किवा नकार नाही. तरीही ते आहे.''  भूमी बोलत होती.

 

''बरोबर, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे, कि आपण आपल्या नात्याला नाव देण्याचा प्रयन्त का करतोय?'' क्षितिज तिला मध्ये आडवून म्हणाला.

 

''होय, नाव दिलं कि रुसवे फुगवे येतात, एकमेकांवर हक्क दाखवणे, गृहीत धरणे हे सगळं सुरु होतं.'' भूमी

 

''आपल्या नात्याला कोणतही नाव देऊ नको. मला फक्त स्वतःला मान्य करायचं आहे आणि तुला सांगायचं आहे. कि मला तू आवडतेस. अँड आय रिअल लव्ह यु. दॅट इज इनफ फॉर मी.''  क्षितीज क्षणात सगळं बोलून गेला होता. त्यावर भूमी काहीही बोलली नाही. ती फक्त त्याच्याकडे बघत होती. खूप वेळ तिथे अगदी शांतता पसरली. मग पुन्हा क्षितिज ने तिला विचारले. ''तू काही बोलणार आहेस?'' 

 

''आपण यावर पुन्हा एकदा विचार करूया?'' भूमी

 

''करूया विचार. मला सध्या एवढंच सांग तुझ्या मनात काय आहे? हो का नाही?'' क्षितीज

 

''मला नाही सांगता येणार.'' भूमीला काय बोलावं ते कळत नव्हतं.

 

''मग माझी एवढी काळजी का करतेस? माझ्या अपघाताचं समजल्यावर एवढ्या रात्री हॉस्पिटलमध्ये का आलीस? निधी संगत होती, तू रात्रभर झोपलो नव्हतीस. दिवसभर सारखे फोन चालू होते. काल रात्री पण मी आश्रमात सोफ्यावर झोपलो तेव्हा अंगावर चादर टाकून गेलीस. जाताना केसावरुन हात पण फिरवलास. हे सगळं असंच निरर्थक आहे, असं म्हणायचं आहे का तुला?'' क्षितीज तिला दोन्ही हातांनी घट्ट पकडून विचारत होता.

 

''मग हे सगळं माहित आहे तरीही पुन्हा का विचारतोस?'' भूमी चिडून त्याच्या पासून दूर होत म्हणाली.

 

''तूच म्हणालीस ना. काही गोष्टी सांगाव्या लागतात, गृहीत धरून चालत नाहीत. मला आपल्या नात्याला कोणतही नावं द्यायची घाई नाहीय. तू म्हणशील त्या प्रमाणे होउदे.  फक्त तुझ्याकडून ऐकायचं आहे. डू यु लव्ह मी?'' क्षितीज

 

''येस.'' मानेनेच हो म्हणत ती थोडी लाजली. क्षितिजचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ''यु आर प्रिशिअस फॉर मी.''  म्हणत याने आपले दोन्ही हात पसरले आणि ती येऊन अलगद त्याच्या मिठीत विसावली. दोन्ही हाताने तिला जवळ घेत, आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवत त्याने एक दीर्घ श्वास घेतला. ''थँक्स.'' एवढेच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले.


त्या उघड्या आभाळातील चमकणाऱ्या अगणिक नक्षत्रांचा साक्षीने एका मच्युअर्ड आणि सदाबहार प्रेमकहाणीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती.

 

कॅफेमध्ये हळू आवाजात मधुर सूर वाजू लागले होते.

'शुरू हो गयी कहानी मेरी,

 मेरे दिल ने बात ना मनी मेरी,

हद से भी आगे ये गुजर ही गया,

खुद भी परेशान हुआ और मुझको भी ये कर गया.

 


दिल क्यों ये मेरा शोर करे,

दिल क्यों ये मेरा शोर करे,

इधर नहीं उधर नहीं, तेरी ओर चले.


 

क्रमश 

पुढील भागासाठी भेट द्या.  - https://siddhic.blogspot.com/