नक्षत्रांचे देणें - ३६ siddhi chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

नक्षत्रांचे देणें - ३६

'कोण बरे असेल ती व्यक्ती? एवढ्या तातडीने मला का बरे बोलावून घेतले असेल? आणि कोणती महत्वाची माहिती सांगणार आहे?' या विचारात मेघाताई हॉटेलमध्ये आल्या. मोबाइलवर त्यांनी तो निनावी नंबर डाइल केला. पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. थोडावेळ त्या तिथेच बसून राहिल्या, आणि काही वेळातच  एक गोरागोमटा तरुण येऊन त्यांच्यासमोर बसला.

''हाय मी विभास... विभास. मीच आपल्याला फोन करून इथे यायला सांगितलं होतं.'' विभास मेघाताईं पर्यंत पोहोचला होता. भूमी आणि क्षितिजच्या सुरु होणाऱ्या नात्यामध्ये कटूपणाचे बीज पेरण्यासाठी त्याने जय्यत तयारी केली होती.

 

''होय, पण आपण? आणि कोणत्या महत्वाच्या कामासाठी मला इथे बोलावलं आहे.'' मिसेस सावंत त्याला आश्चर्याने विचारात होत्या.

 

''तुमच्या होणाऱ्या भावी सुनेचा मी नवरा आहे. हा आता तुम्हाला काहीच माहित नसेल. हे फोटेज पहा मग लक्षात येईल.'' म्हणत त्याने भूमी आणि त्याच्या लग्नाचे काही फोटो मेघाताईसमोर धरले. ते पाहून त्या अवाक झाल्या. काय बोलावं त्यांना सुचेना.

 

''हे कस काय शक्य आहे. तिच लग्न आधीच झालेले आहे. तिने हि गोष्ट आमच्या पासून लपवून ठेवली. आणि क्षितीज, त्याला समजलं तर?'' त्या ते फोटोज पुन्हा पुन्हा चेक करत होत्या.

 

''होय, तिने तुम्हा सगळ्यांना फसवले आहे. आणि हे फोटोज अगदी खरे आहेत. आमच्या लग्नातील प्रसिद्ध फोटोग्राफरचा नंबर मी तुम्हाला शेअर करतो. तुम्ही खात्री करून घेऊ शकता.'' त्याने एका फोटोग्राफरचे व्हिसीटिंग कार्ड त्यांना दिले. ''भूमी मला फसवून इकडे निघून आली. माझ्याशी तिला काहीही संबंध ठेवायचे नाहीत, म्हणून तिने क्षितिजला तिच्या जाळ्यात ओढलं असणार. फक्त तुम्हाला सतर्क करण्यासाठी मी इथे आलो होतो.''  तो पुढे बोलत होता. मेघाताई मात्र तटस्थ राहून ते फोटो बघत राहिल्या. 'एवढी मोठी फसवणूक, तेही एका बिझनेसमॅनच्या मुलाची, आमच्या भावनांशी खेळली ती मुलगी, आणि आम्हाला काहीही पत्ता लागू दिला नाही.'  त्यांच्या मनात नुसता जळफळाट उठला होता. त्या 'थँक्स.' बोलून तिथून तडक निघाल्या. आधी साठेकाकांना फोन लावून त्यांनी भूमीची चौकशी केली. ‘भूमी ही आपली दुरचे नातलग नानांची सून आणि विभासची बायको आहे’ असे साठेकाकांनी त्यांना सांगितले. आता त्यांच्या संशयाला पुरावा मिळाला होता. विभासने सांगितलेले सत्य आहे, असे समजून त्या भूमीच्या याचा जाब विचारण्यासाठी निघाल्या.

विभास पुन्हा आपल्या आयुष्यात येऊन आपल्यासाठी  एवढं मोठं संकट निर्माण करेल याची भूमीला कल्पना सुद्धा नव्हती.

 

*****

 

'ऑफिसमध्ये मिटिंग सुरु होती. भूमी आठवड्याच्या सुट्टी नंतर आज हजर झाली होती. चंदिगढ प्रकरणी ऑफिस कर्मचारी आणि बाकी सगळ्यांचे हस्ताक्षर तपासणीसाठी दिले गेली होते. त्यांचा प्रतिसाद आला होता. एवढ्या सगळ्यांचे हस्ताक्षर तपासून अहवाल द्यायचा तर त्यासाठी सहा महिने तरी लागणार होते. यावर सगळ्यांनी डोक्याला हात लावला. एवढा वेळ एका केससाठी दिला तर  उशीर  होणार होता. हि केस सहा महिने थांबवणे किर्लोस्करांना शक्य नव्हते. त्यांनी तसे स्पष्ट सांगितले. मिस्टर सावंत शांतपणे मीटिंगचे परीक्षण करत होते. भूमी सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे टिपत होती. क्षितीज काहीतरी विचार करत म्हणाला.

''हस्ताक्षर तपासणी पेक्षा दुसरा काही पर्याय नाही आहे का? ज्यामुळे आपल्याला त्या गुन्हेगारापर्यंत लवकरात लवकर पोहोचता येईल.''

 

''सध्यातरी दुसरा काहीच पर्याय नाही. मैथिली मॅडम शुद्धीवर आल्या तर मात्र त्या आपल्याला डायरेक्ट सहकार्य करतील.'' भूमी म्हणाली.

 

''सावंत दुसरा पर्याय शोधा. मी एवढे दिवस वाट पाहू शकत नाही. आधीच माझा खूप लॉस झालेला आहे.'' म्हणत किरालोस्कर उठून मिटिंग रुम बाहेर पडले.

 

सोबत मुखार्जी आणि वेदांतही मिटिंग संपल्याचे घोषित झाल्यावर  बाहेर पडले. मिटिंग संपल्याचे जाहीर करूनही मिस्टर सावंत, भूमी आणि क्षितीज तिथेच थांबले होते. सगळे निघून गेल्यावर भूमीने एक कार्ड मिस्टर सावंतांकडे दिले.

''सर, हे आपली मदत करणार आहेत. बोलणं झालं आहे, आपली काही मोजकी माणस हिडन कॅमेरे घेऊन त्या लॅबमध्ये कामासाठी ठेवण्यात आलेली आहेत. काहीही संशयास्पद हालचाल आढळली तर ते लगेचच  आपल्याला कळवतील.''

 

''म्हणजे.'' क्षितीज तिच्याकडे बघत म्हणाला.

 

''मी सांगतो.'' मिस्टर सावंत त्याला समजावत म्हणाले.  ''ज्या लॅबमध्ये हस्ताक्षर तपासणी होणार आहे, तिथे आपली काही माणसे काम करतायत. तपासणीचा रिपोर्ट यायला सहा महिने लागतील. पण ज्याने हा फ्रॉड केला आहे, तो सहा महिने शांत बसणार नाही. तो लगेचच हालचाल करून त्या लॅबमधले त्याचे हस्ताक्षराचे पेपर्स किंवा रिपोर्ट्स गायब करण्याचे प्रयत्न करणार.  त्या लॅम मधल्या अधिकाऱ्याला पैश्याचे किंवा इतर कसलेही अमिश दाखवून रिपोर्ट्स परस्पर बदलण्याचा किंवा चुकीचे रिपोर्ट्स तयार करून  देण्याचा  प्रयत्न केला जाईल. आतापासूनच त्यांची हालचाल सुरु होईल.   तेथिल काही  वरिष्ठ अधिकारी वर्गाशी बोलून   आपण तिथे ठेवलेल्या कॅमेराबद्ध माणसांकडून आपल्याला त्याची माहिती मिळेल आणि आपण फ्रॉडर पर्यंत पोहोचू, तेही काही दिवसात. सहा महिने थांबण्याची गरज नाही. ''

 

''सर, पण हि गोष्ट आपल्या व्यतिरिक्त कोणाच्याही कानावर जायला नको. याची गुप्तता बाळगायला पाहिजे.''  भूमी बोलत होती. क्षितिजला आत्ता प्लान समजला होता. ''नाईस आयडिया.'' म्हणत तो हसला.

 

''डोन्टवरी कोणाला काहीही कळणार नाही. पुढचे हस्ताक्षर कागद तिकडे पाठवण्याची तयारी करा. निघतो मी.'' म्हणत मिस्टर सावंत उठले आणि बाहेर निघाले. भूमीही त्यांच्या पाठोपाठ निघाली. क्षितीज तिच्या मागून तिच्या केबीनमध्ये आला होता.

 

''पप्पांबरोबर राहून बिझनेस शिकलात हा मॅडम.'' म्हणत तो खुर्चीवर बसला.

 

'' सर, तुम्हाला काही काम नाहीय का? '' भूमी

 

''मी काय बिनकामाचा वाटतो का तुला? कामासाठीच आलोय इथे.'' तो नाटक्या रागाने म्हणाला.

 

''काय काम आहे, बोला?'' भूमी

 

''सकाळपासून दिसली नव्हतीस. लेट आलीस का?'' क्षितीज

 

''होय, हे काम होत का?'' भूमी

 

''नाही. महत्वाचं काम आहे.'' म्हणत त्याने उठून तिच्या कपाळावर  किस केले. ''झालं महत्वाचं काम.'' म्हणत तो दारा उघडून बाहेर निघूनही गेला. भूमी गालातच हसत तो गेला त्या दिशेने बघत  राहिली.  तिच्या आयुष्यातील ते अगदी सुंदर दिवस होते. प्रेमात पाडण्याचे, फुलण्याचे, उगाचच रागावण्याचे आणि रुसून बसण्याचे. पण याला विभासने प्लॅन करून गालबोट लावले होते हे तिला उशिरा समजले.

 

*****

 

'भांबावले मुखर्जी सारखे येरझाऱ्या घालत होते. ''वेदांत कुछ करो. वरना सब कुछ हातसे निकल जायेगा.'' ते वेदांतील सांगत होते. वेदांतही काहीतरी विचार करत होता.

''सर, त्या लॅब वाल्याला मॅनेज करायचं. मी करतो सगळं, तुम्ही काळजी करू नका.'' वेदांत शुअर होत म्हणाला.

 

''एक बात याद राखना. अगर हम मेसे कोईभी पकडा गया तो, दुसरे का नाम नाही बतायेंगे. एक अंदरसे और एक बहरसे मिलके कंपनीका बेंड बजायेंगे.'' मुखर्जी

 

''नहीं सर, कोई पकडा नही जायेगा. मैं अभीसे  सेटिंग लागता हू.'' म्हणत वेदांत उठून त्याच्या केबिनमध्ये आला. मुखार्फी आपल्या गोलमटोल पोटावरून हात फिरवत येरझाऱ्या घालत होते.

 

*****

 

‘मेघाताई भूमीला भेटायला तिच्या रूमवर गेल्या. तिचं काहीही ऐकून न घेता त्यांनी तिला क्षितीज पासून दूर राहण्याची ताकीद दिली. आपल्या लग्नाचे सत्य आणि असत्य काय? हे त्यांना सांगण्यासाठी भूमीने खूप धडपड केली, पण त्या तिच्याकडून एकही शब्द ऐकून घ्यायला तयार नव्हत्या.  आपल्याला साठे काका आणि विभास यांच्याकडून सगळी माहिती मिळाली आहे, त्यामुळे 'तुझ्यासारख्या फसव्या मुलीला मी माझ्या घराची सूर करून घेणार नाही. आमचा पैसे बघून क्षितिजची फसवणूक केल्यामुळे तो हि तुला माफ करणार नाही. 'असे सांगून त्या तडक तिथून निघाल्या.’

 

‘भूमीसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. हि गोष्ट अश्या प्रकारे बाहेर येणे तिला अपेक्षित नव्हते. तिने माई-नानांना फोन करून या प्रकरणी कानावर घातले. तसेच क्षितीज आणि तिच्यामध्ये असणाऱ्या नात्याबद्दलही कळवले. त्या दोघांनाही झाल्या गोष्टीवर विश्वास बसेना. विभास तिलाच शोधतोय, हे नानांनी तिला कळवले. तेव्हा ती सावध झाली. काय करावे तिला कळेना. ''मी विभासला समजावतो, तू तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात कर. आमची काहीही हरकत नाही. आता विभास इथे नाही आहे. जमल तर एकदा इथे येऊन जा. आम्हाला प्रत्यक्ष भेटून सगळं सविस्तर सांग. इथल्या काही महत्वाच्या गोष्टी देखील तुझ्या कानावर घालेन.'' असे तिला नानांनी सांगितले. झालेला गैरसमज कसा निस्तराव? हे तिला कळेना. आता हि गोष्ट क्षितिजला कळल्यावर तो काय म्हणेल? या विचारात ती होती.’

 


क्रमश 

रेट करा आणि टिप्पणी द्या

Manisha

Manisha 3 आठवडा पूर्वी

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 8 महिना पूर्वी

Swati Deshmukh

Swati Deshmukh 1 वर्ष पूर्वी