'मेघाताई म्हणजे क्षितिजची आई, त्या आज खूपच खुश होत्या. फायनली ती मुलगी आपल्या मुलाच्या आयुष्यातून गेली या गोष्टीचा त्यांना खूप आनंद झाला. थोडंफार वाईट ही वाटलं, कि क्षितीज तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. 'आधी मैथिली आणि आता भूमी क्षितिजच्या आयुष्यात येऊन वादळ निर्माण करून गेल्या. पण आत्ता नाही, आत्ता मी अशी मुलगी शोधून काढेन कि पुन्हा क्षितिजच्या आयुष्यात असे काहीही होणार नाही.' असे त्यांनी ठरवले.'
'हि गोष्ट मिस्टर सावंत म्हणजे क्षितिजच्या बाबाना समजली पण भूमी कायमची लंडनला निघून गेली आहे हे त्यांना माहित नव्हतं. त्यांना खूप वाईट वाटले. खरतर त्यांना मोठा धक्का बसला. मैत्रीलीच्या धक्क्यातून क्षितिजला खऱ्या अर्थाने सावरले होते ते भूमीने. आणि आत्ता परत क्षितीज एकटा पडणार कि काय हि भीती त्यांच्या मनात होती.'
'आज्जोसुद्धा अपसेट झाली होती. आज घरात एकाकी शांतता पसरली होती.'
*****
'नाना आणि माईना जेवण्याची इच्छा होईना, त्यांच्या घरात सून म्हणून आली असली तरीही भूमी त्यांच्यासाठी मुलगी समान होती. नानासाठी त्यांचा एकमेव आधार.
त्यामुळे नाना खूपच अपसेट झाले. त्यांचा मुलगा एवढं चुकीचं वागला तरीही त्या मुलीने नाना आणि माईना केव्हाही ते जाणवून दिले नाही, उलट त्याच्या पेक्षा जास्त काळजी घ्यायची. त्यामुळे भूमीला विसरणे किंवा तिच्यापासून दूर जाणे नाना आणि माईंना अतिशय दुःख देऊन गेले.
सहा महिन्या नंतर....
…………………………
'हॉटेलच्या शेवटच्या मजल्यावर धुमधाम चालू होती. जागोजागी फुलांची आरास, रंगीबेरंगी तोरणे, महागडे झुंबर, डेकोरेटिव्ह स्टेज, रांगोळ्या अशी सुरेख सजावट केली गेली होती. रात्रीच्या अंधारातही झगमगणारे असे वातावरण, आणि सुमधुर संगीत याने प्रसन्न झाले होते. नटूनथटून आलेल्या स्त्रिया-पुरुष, लहान मुलं, उगाचच तसेच इकडे-तिकडे ठुमकणाऱ्या सुंदर मुली आणि त्यांच्या मागून फिरणारी तरुण मूल असा सगळं लवाजमा जमलेला दिसत होता. मेहेंदी, हळदी सगळं आटोपलं होतं आता फेरे झाले की काही महत्वाचे विधी मग लग्न सोहळा संपन्न होणार होता. निधी लाल आणि हिरव्या रंगाची ब्रायडल साडी आणि त्यावर मॅचिंग दागिने वेगैरे घालून तयार होती. निल ही गोल्डन ब्राऊन शेरवानी मध्ये नवरोबा म्हणून उठून दिसत होता. दोघेही मंडपात आले आणि लग्नाच्या विधींना सुरुवात झाली.'
'निधी चे लक्ष बाहेर दाराकडे लागले होते. लग्नानंतर रिसिप्शनला घालायचे तिचे दागिने घेऊन ती अजून कसा आला नाही? याचा ती विचार करत होती. त्याच्यामुळेच तर आज निधी आणि निलाचे लग्न शक्य झाले होते. त्याने पुढाकार घेऊन संजना पासून निलाची सुटका केली. नीलच्या घरच्यांच्या विरीधात जाऊन त्याने नीलला जॉब दिला आणि त्याला त्याच्या पायावर उभे केले. नीलने घरदार सोडून निधी लग्न करण्याचा निर्णय घेतला तो हि त्याच्या मुळे. 'पण हा अजून आला कसा नाही? एवढा उशीर का झाला?' या विचारात निधी सप्तपदीसाठी उभी राहिली. लग्न सोहळा संपन्न झाला आणि नवरा नवरी कपडे चेंज करण्यासाठी आज निघून गेले. आत जाऊन ते रिसिप्शनच्या ड्रेसची तयारी करत होते. निधी तयार होऊन त्याची वाट बघत होती. रिसिप्शनचा ड्रेस. त्यावर मेकअप वैगरे करून झाला तरी त्याचा पत्ता नव्हता. दागिने मिळतील कि नाही याची तिला शंका होती. निल तिच्या रूममध्ये आला. आणि आता दोघे रिसिप्शनला खाली जाणार होते. निधी तसे बिना दागिन्यांचे बघून निलने ओळखले जी तिच्या मित्र अजून दागिने घेऊन आला नाही. त्याने थोडावेळ वाट पाहण्याचे ठरवले. खाली सगळे त्यांच्या येण्याची वाट बघत होती. निधी डोक्याला हात लावून बसली. एवढ्यात तिला मोठ्याने 'निधी.'असा आवाज ऐकू आला. तिने त्या दिशेने पहिले. निल आणि तिला विश्वास बसेना. समोर हातात गिफ्ट बॉक्स आणि फुलांचा गुच्छ घेऊन भूमी उभी होती. तिचे लांब सडक केस आणि हलकासा मेकअप आणि ओठांवर डार्क रेड लिपस्टिक यामुळे तिला ओळखता येणे कठीण झाले. पण सी मारिन रंगाच्या लेहेंग्यावर डार्क ग्रीन स्लिव्हलेस ब्लाउज आणि त्यावर पसरलेला सी मारिन लांब दुपट्टा. अश्या पेहेरावात ती सुंदर दिसत होती.
''निधी... निल... अभिनंदन.'' म्हणत तिने येऊन निधीला घट्ट मिठी मारली. दोघांचेही अभिनंदन केले.
''थँक्स अँड वेलकम बॅक.'' निल
''थँक्स. पण तू लंडनहून परत केव्हा आलीस? आणि कशी काय?'' निधी कुतूहलाने विचारत होती.
''तुझ्या लग्नाचं इन्व्हिटेशन मिळालं मग ठरवलं जायचं. तस काही रिप्लाय मी तुला केला नाही. तेही मुद्दाम. कस वाटलं सरप्राइज?'' म्हणत भूमीने तिच्या हातात ते गिफ्ट दिले.
''थँक्स. खूप छान सेट आहे.'' गिफ्टच्या आतमध्ये असलेल्या दागिन्यांच्या सेट कडे बघत निधी म्हणाली.
''तसही तू दागिन्यांमधील काही घातलेले नाहीस, गोल्डन आहे, तुझ्या कपड्यांवर मॅच होईल. मग, लवकर घाल तो सेट आणि खाली ये. सगळे वाट बघतायत.'' म्हणत भूमी बाहेर निघाली.
''अग... पण...''
''बाकीचं सगळं नंतर बोलू. आधी खाली ये.'' निधी काही बोलायच्या आत भूमी बाहेर निघून गेली.
‘'क्षितिजला माहित नाहीये, हि आलेय ते. समजलं तर?'' निधी विचार करत बसली.
''तर काय? केव्हा ना केव्हा ते दोघे समोर समोर येणारच ना. काही फरक पडत नाही.'' निल
''अरे, तो खूप राग करतो तिचा. ती लंडनला गेल्या पासून, गेल्या सहा महिन्यात त्या दोघांचं काहीही बोलणं नाही. काही कॉन्टॅक्ट नाही. क्षितीज तीच तोंडही बघणारा नाही.'' निधी
''काही होत नाही, थोडा राग आहे. भेटतील तेव्हा भांडतील, ओरडतील, एकमेकांवर राग काढतील. अजून काय करणार? मग आपोआप त्याचा राग निघून जाईल. त्या दोघांचं हि एकमेकांवर प्रेम आहे. त्यामुळे ते एकत्र येणारच ना.'' निल
''नाही, मला तस वाटत नाही. क्षितिजला खरं काहीही माहित नाही, भूमी त्याला सोडून लंडाला गेली आणि सहा महिने परत आली नाही, त्याला फोन नाही कि मेसेज नाही. त्यामुळे त्याला असं वाटत तिने जाणून बुजून त्याला फसवलं. पण तिने काहीही जाणून बुजून केलेलं नाहीये, हे फक्त तिला आणि मलाच माहित आहे.'' निधी
''मग तू का त्याला सांगत नाहीस.'' निल
''मी काहीही सांगू शकत नाही. मी भूमीला तस वाचन दिल आहे.'' निधी
''असो, आपण खाली जायचं? सगळे वाट बघतायत. नंतर या विषयी बोलू.'' निल
''हो. चल.'' म्हणत ते दोघेही रिसिप्शनला पोहोचले. निधीने भूमीने तिला गिफ्ट केलेले दागिने घातले होते. ते दोघेही येऊन स्टेजवर बसले. भूमीला त्यांना बघून खूप बरं वाटलं. कमीत कमी त्यांचं स्वप्न पूर्ण होत. त्यांच्या प्रेमाचा तरी विजय झाला. हे पाहून तिला आनंद झाला होता. थोडावेळ तिथे थांबून ती वरती रूममध्ये आली.
'सगळे पाहुणे आणि उपस्थित मंडळी येऊन त्यांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देत होते. निधी अजूनही मुख्यद्वाराकडे बघत होती.
आणि तो आला. शायनी व्हाइट पँट, त्यावर परपल ब्यू असा शर्ट समोरून अर्धा ओपन केलेला, डोळ्याला फ्रेमलेस चौकटीचा चष्मा, केसांना जेल लावून मस्त लॉ फॅड प्लस मेस्सी क्युफ अशी स्टाइलिश हेअरस्टाइल केली होती. अल्डो चे ब्रँडेड फॉर्मल शूज... अशी त्याने रुबाबदारपने एंट्री केली होती. लग्नाला आलेल्या लोकांपैकी बरेचसे लोक त्याच्याकडे बघू लागले. आणि मुली तर बघताच क्षणी त्याच्यावर फिदा झाल्या होत्या. डायरेक्ट स्टेजवर येत त्याने. निधी आणि नीलचे अभिनंदन केले.''
''काँग्रॅज्युलेशन हनी, काँग्रट्स ड्युड.'' म्हणत त्याने सोबत आणलेले फुल गुच्छ त्यांना दिले.
''अँग्री यंग मॅन तू फायनली आलास?. क्षितिज एवढ लेट? आणि माझे दागिने कुठे आहेत? मी केव्हाची वाट बघतेय.'' निधी त्याच्या वर चिडलीच. दुसरे कोणीही नसून तो क्षितीज होता. साधा भोळा राहिलेला नसून तो आता एकदम स्टाइलिश आणि रुबाबदार झाला होता.
''सॉरी, एक महत्वाचं काम निघाल आणि थोडं लेट झाला. हा तुझा दागिन्यांचा बॉक्स.'' म्हणत त्याने दागिने तिला दिले. आणि त्याने घातलेले दागिने बघत तिला विचारले. '' हे घातलेले दागिने मस्त आहेत, बरं झाल मॅनेज केलेस ते, पण एवढ्या शॉर्ट टाइममध्ये दागिने कुठुन आणलेस?''
त्याच्या प्रश्नावर निधी गोंधळली. पण भूमीने हे दागिने आणले आहेत हे सांगता येणे तिला शक्य नव्हते. आणि ती इथेच आहे हे हि. त्यामुळे ती शांत राहिले. वेळ मारून नेण्यासाठी निल म्हणाला. ''ते जाऊ दे, तू इथे आलास तेच खूप झाले. थँक्स बॉस.''
''माय प्लेजर, निधीला प्रॉमिस केलं होत. येणारच ना. वरती जाऊन फ्रेश होऊन येतो खाली. माझ्यासाठी कोणता रूम बुक केला आहे?'' निधीला विचारत क्षितीज स्टेजवरून खाली उतरला.
रम नंबर १२ मध्ये भूमी चेंज करायला गेली होती, तोच नंबर तिने मुद्दामहून क्षितिजला दिला. दोघेही इथे लग्नासाठी आले आहेत तर त्यांची भेट होणार हे नक्की होते. पण सगळ्यांच्या समोर इथे हॉलमध्ये भेटले असते तर क्षितीज रागाच्या भरात काय करेल आणि काय नाही याचा नेम नव्हता, त्यामुळे निधीने त्या दोघानाही एकाच रूममध्ये पाठवले. कमीत कमी बाहेर कोणाला काहीही कळणार नाही. आणि त्यांच्यामध्ये काय गैसमज झाला आहे ते दोघे मिळून सॉल्व करतील. असे तिला वाटले.
रूमचा लॉक कोड निधीने त्याला मेसेज केला होता. तो टाइप करून क्षितीज रूममध्ये आला. स्पेशिअस व्हीआयपी रूम होता तो, समोर छोटा हॉल मग बेडरूम आणि आतमध्ये बाथरूम असा. त्याने फोन करून हॉटेल रिसिप्शनला आपली बॅग तिथे आणायला सांगितली. आणि तो आपले अंगातील शर्ट काढून तिथेच सोफ्यावर ठेवून व्हॉशरुमकडे निघाला. तेव्हा त्याने पाहिले समोरच्या सोफ्यावरून एक हिरव्या रंगाची ओढणी पडलेली आहे, आतल्या बेडरूम पर्यंत ती पसरलेली होती. इथे अजून कोण आहे? कि निधी तिचे कपडे असेच टाकून गेली आहे? त्याला कळेना म्हणून तो ती ओढणी पकडून बेडरूमच्या दिशेने वळला.
आपली ओढणी कोणीतरी ओढत आहे हे कळल्यावर भूमीने तिच्या हातातील एक टोक पकडून ठेवले. ती ओढणी खूपच मोठी होती. फ्रेश होवून ती मेकअप करायला बसली तेव्हा तिने ती काढून मागच्या खुर्चीवर ठेवली होती. आणि ती आरशासमोर बसून तयार होऊ लागली. पण ओढणी मोठी असल्याने तिचे एक टोक वाऱ्याने बाहेर उडत गेले होते.
आपली ओढणी कोणीतरी बाहेरून ओढत आहे हे भूमीच्या लक्षात आले आणि ती उठून उभी राहिले. हातात असणारी ओढणीची एक साइड आपल्या अंगावर ओढून तिने तिला हाताने घट्ट पकडले. ''कोण आहे?'' म्हणत ती दाराच्या दिशेने आली. गोंधळलेल्या क्षितिजच्या लक्षात आले कि इथे कोणीतरी आहे. आवाज ओळखीचा होता पण नक्की कोण कळेना. त्याने क्षणात तो सोडून दिली. पाहतो तर समोर भूमी त्या ओढणीची एक साईट कशीतरी अंगावर सावरत उभी होती. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ''तू?'' तो अवाक होऊन तिच्याकडे बघत होता. तिची ओढणी तिच्या अंगावरून सरकून खाली लादीवर पडली होती. बाजूचा शर्ट कसातरी अंगात अडकवून तो त्याची बटणे लावण्याचा प्रयत्न करू लागला. तोपर्यंत भूमी येऊन मागून ''क्षितीज'' बोलत त्याला बिलगली होती. त्याने हातातील शर्ट तसाच सोडला.
तिने मागून केलेले ह्ग त्याला अनपेक्षित होते. त्याने भूमीला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण ती अजूनच जवळ आली. ''लिव्ह मी.'' म्हणत त्याने तिला मागे ढकलले. त्याने जोराने धक्का दिला होता त्यामुळे भूमी खाली लादीवर कोसळली. आणि बाजूच्या चौकोणी टेबलाचे एक टोक तिच्या पायला लागले होते. ''आई…'' एवढंच बोलून भूमीचे आपला पाय पकडून ठेवला. तिला लागलं हे क्षितिजच्या लक्षात आलं होता. तेव्हा '' सॉरी, रिअल सॉरी. चुकून झालं.'' म्हणत त्याने तिला उठवून सोफ्यावर बसवले. ''आर यु ओके?'' तो विचारत होता. त्याच्या अशा वागण्याने सर्प्राइज झालेली ती फक्त त्याच्याकडे बघत बसली. क्षितीज कधी आपल्याला हर्ट करेल याची तिने केव्हा अपेक्षा केली नव्हती. एकतर आधी साधा असणारा क्षितीज खूप बदललेला होता. त्याचा तसा अवतार बघून तिला अजूनच आश्चर्याचा धक्का बसला. ती तशीच एकटक त्याच्याकडे बघत राहिली होती. आणि तो हि नकळत तिच्याकडे बघत राहिला. तिची खाली पडलेली ओढणी उचलून तिच्या अंगावर टाकत ''सॉरी, कशी आहेस?'' म्हणत क्षितिजने तिला मिठी मारली.
''कशी आहे? विचारू नकोस, पण अजूनही तुझीच आहे. तू कित्ती बदलास रे, पण आधीपेक्षा हँडसम दिसतोस. आणि अगदी डॅशिंग.'' तिने त्याच्या पाठीवर हात फिरवत विचारले.
''पायाला जास्त लागल का? क्षितीज तिला आपल्यापासून थोडं दूर करत म्हणाला.
''जास्त नाही. थोडस लागलं.'' भूमी त्याच्या शर्टचे बटन लावत म्हणाली. तसे त्याने तिचा हात बाजूला करून शर्टचे बटन्स लावायला सुरुवात केली.
''माझ्यावर रागावला आहेस ना?" भूमी
''मी कोण तुझ्यावर रागावणारा? आपण ओळखतो एकमेकांना?'' क्षितीज
''सॉरी. कॅन आय एक्सप्लेन मायसेल्फ?'' भूमी
''त्याची गरज नाहीये, मी इथे निधीच्या लग्नासाठी आलोय, आणि तू पण त्यासाठीच आली असणार. सो नो मोअर पर्सनल डिस्कशन.'' म्हणत क्षितीज उठून सरळ बाथरूममध्ये निघून गेला.
''क्षितीज ऐकून तरी घे. प्लिज.'' भूमी मोठमोठ्याने ओरडून त्याला सांगत होती. पण तो काहीही ऐकायला तयार नव्हता. मग ती स्वतःचे आवरून खाली हॉलमध्ये आली. रिसिप्शन उरकले होते. सगळे आपापल्या घरी निघाले, आता नवरा नवरी घरी जाणार होते. क्षितिजही आवरून खाली आला. निधीला पुन्हा एकदा शुभेच्या देऊन तो तिथूनच घरी निघून गेला. त्याने जाताना साधे बाय असेही म्हटले नाही, त्यामुळे त्याला आपला खूप राग आला आहे, हे भूमीने ओळखले. निधी आणि निल ची गाडी निघाली, त्यांना बाय करून भूमी रूमवर आली. आपली बॅग घेऊन ती खाली कॅबमध्ये येऊन बसली. आणि ती देखील घरी निघाली. बदललेला क्षितीज आणि आपल्यासाठी त्याच्या मानत असलेला राग याचा भूमीला खूप त्रास होत होता. यात आपली काहीही चूक नाही. किंवा आपण त्याला मुद्दामहून अंधारात ठेवले नाही. हे त्याला कसे समजवावे याचा ती विचार करत होती. त्याचा नवीन नंबरही तिच्याकडे नव्हता. निधीकडून तिने नंबर मागवून घेतला. पण त्याने तिचा कॉल उचलला नाही. कोणी दुसऱ्याच मुलीने फोन उचलला आणि तो बिझी आहे, नंतर कॉल करा सांगून कट केला. त्यामुळे भूमीला अजूनच वाईट वाटले. आपण प्रत्यक्ष भेटून त्याच्याशी बोलूया आणि गैरसमज दूर करू असे तिने ठरवले.'