नक्षत्रांचे देणे - ४६ siddhi chavan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

नक्षत्रांचे देणे - ४६

'क्षितिजचे पप्पा भूमी आणि क्षितिजचा विचार करत बसले होते.

काही महिन्यांपूर्वी घरात हसतं खेळतं वातावरण होत. दोघांचा साखरपुडा झाला, लग्न होणार होत. आणि सगळं काही अचानक विस्कटवून गेलं. होत्याच नव्हतं झालं. विभासने येऊन मेघाताईंच्या मनात भूमी बद्दल संशय निर्माण केला आणि त्यानंतर गोष्टी बिघडायला सुरुवात झाली. पण भूमी अचानक लंडनला का निघून गेली? त्यामागे काय कारण होते? सत्य काय आहे? हे तिने विश्वासात घेऊन क्षितिजच्या कानावर घातले असेल तर हि वेळ आली नसती. कदाचित त्यामागेही तिचा काहीतरी हेतू असेल. होतात चुका. माणूस म्हंटल तर हे होणारच, पण या गोष्टच परिणाम होऊन क्षितिज एवढा बदलून जाईल. हे त्यांना मुळीच पटलेले नव्हते. त्यांच्या दृष्टीने महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे क्षितिजमुळे SK ग्रुप प्रॉफिट मध्ये आला होता. कंपनी जागतिक बाजार पेठेत आपलं नाव कमावत होती. तरीही त्यांना राहून राहून क्षितिजच्या खाजगी आयुष्याची चिंता लागून होती. खाजगी आयुष्यात त्याने कोणालाही हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली नव्हती. त्याचे सर्व निर्णय तो स्वतः घेत होता. कोणीही त्याला उपदेश किंवा सूचना केली तर ते त्याला आवडत नव्हते.

आता लग्न वेगैरे गोष्टी तर त्याच्या साठी संपलेल्या होत्या. त्याविषयी एकही अक्षर काढण्याची मुभा नव्हती. 'मी लग्न करणार नाही.' असे त्याने घरी ठामपणे सांगून टाकले होते. त्यामुळे मिस्टर सावंत त्याच्या भविष्या बद्दल चिंतेत होते.'

 

*****

 

'ऑफिस मध्ये आज खूप गडबड सुरु होती. कॉन्फेरंस हॉलमध्ये सगळा महत्वाचा स्टाफ एकत्र जमला होता. कंपनीचे उच्च अधिकारी येऊन खुर्चीवर बसले. एक महत्वाची घोषणा होणार होती. क्षितिजने किर्लोकस्कराचा मेल पाहिला आणि तो त्या तातडीच्या सभेसाठी हॉलमध्ये दाखल झाला. किर्लोस्कर उठून उभे राहिले आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केली.'

 

 

 

 

'शुभ सकाळ... आपल्या सगळ्यांनाच माहित आहे कि माझ्या बिघडत चाललेल्या तब्ब्येतीमुळे मला सध्या इथे नियमित हजार राहणे शक्य होत नाही. त्यामुळे कंपनीच्या कारभारात मला लक्ष देता येत नाही. त्याच कारणाने माझ्यानंतर माझा कारभार म्हणजेच माझे कंपनीमध्ये असणारे स्थान मी माझ्या वारसास सोपवत आहे, आणि त्यासाठीच मी इथे आज तुम्हा सगळ्यांना आमंत्रण पाठवून बोलावले आहे. सो मी आज एक महत्वाची घोषणा करत आहे.' म्हणत त्यांनी बाजूचे काही कागदपत्र आपल्या हातात घेतले.

 

 

 

 

'त्यांचा वारस? मैथिली व्यतिरिक्त त्यांना कोण वारस आहे? आणि ती तर आता उठण्या बोलण्याचाही मनस्थितीत नाही. उलट ती कोणाला ओळखत हि नाही. मग हे आपलं पद कोणाला देत आहेत? कोण आहे यांचा वारस?' क्षितीज डोळे उचंवून किर्लोस्करांकडे बघत होता. त्याला काही कळेनासे झाले.'

 

 

 

 

'किर्लोस्करांनी पेपर्सवरती स्वाक्षरी केली आणि ते संबंधित अधिकाऱ्यांना सोपवले. 'आज पासून  मी माझी द्वितीय कन्या मिस भूमी किर्लोस्कर हिला माझ्या पदावर बसवत आहे. त्यासंबंधी सगळे कायदेशीर कागदपत्र मी इथे दिलेले आहेत. भूमी प्लिज.'' म्हणत त्यांनी दरवाज्यातून आत येणाऱ्या भूमीकडे बोट दाखवले. परपल शर्टवर सफेद ब्लेझर आणि तशीच पॅन्ट, केसाचा हाय बन, डोळ्यात डार्क काजळ, कानात छोटेसे हँगिंग मोती अशी ती अगदी प्रोफेशनल आणि जबरदस्त दिसत होती. ती आत आली. मिस्टर किर्लोस्करांच्या बाजूच्या खुर्चीवर बसत तिने त्यांच्या हातातील पेपर्स आपल्या हातात घेऊन त्यावर स्वाक्षरी केली.'

 

 

 

 

'क्षितीज शॉक्ड होऊन समोर बघत होता. त्याच्या साठी हा सर्वात मोठा धक्का होता. आपल्या प्रतिस्पर्धीच्या खुर्चीवर ती व्यक्ती जिच्यावर आजही तो जीवापाड प्रेम करत होता. भूमीला बाबा नाहीत, असं ती म्हणायची, मग हे काय? असा प्रश्न त्याला पडला. आणि किर्लोस्करांना आधी हे माहित नव्हतं का ? कि भूमी त्यांची मुलगी आहे? अशा बऱ्याच गोष्टीं विषयी त्याला प्रश्न पडले होते.'

 

 

 

 

''गुड मॉर्निंग. इथे असणारे बरेचसे मला ओळखतात. भूमी साठे म्हणून. काही महिन्यांपूर्वी मी इथे लीगल आड्वायसर  म्हणून काम करत होते. तेव्हा मला आणि माझे बाबा म्हणजेच किर्लोस्कर सर याना आम्हा दोघांनाही आमच्या नात्याची पुसटशी कल्पना नव्हती. ती गोष्ट वैयक्तिक आहे त्यामुळे मी इथे त्याबद्दल जास्त काहीही सांगू इच्छित नाही.  आय होप तुम्ही समजून घ्याल. सो काहीच दिवसांपूर्वी आम्हाला आमच्या नात्याची ओळख मिळाली. यापुढे मी इथे बाबांच्या जाग्यावर SK ग्रुपच्या पार्टनरच्या अधिकाराने काम पाहीन. तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आपण मिळून कंपनीच्या हिताच्या दृष्टीने प्रयत्न करू. आजपासून मी हि जबाबदारी स्वइच्छेने स्वीकारत आहे. आशा करते तुम्ही सगळे मला सहकार्य कराल.''

 

एवढं बोलून भूमीने हातातील कागदपत्र मदतनिसांच्या हाती सोपवले. किर्लोस्करांच्या PA ने पुष्प गुच्छ देऊन ''वेलकम मॅम'' म्हणत तिचे स्वागत केले. आणि उपस्थित सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले.

 

 

 

 

''SK ग्रुप चे आपले एकमेव पार्टनर आणि सध्याचे CEO मिस्टर क्षितिज सावंत इथे उपस्थितीत आहेत, त्याच्या बरोबरीने आता मिस भूमी किर्लोस्कर काम करणार आहेत. सो आपल्या कंपनीचे आपले दोन्ही ही मुख्य अधिकारी इथे उपस्थितीत आहेत. मी मिस्टर क्षितीज सावंत ना विनंती करतो त्यांनी ही नव्याने झालेली नेमणूक आणि तिचे कायदेशीर कागदपत्र यांची एक प्रत आपल्याकडे रेकॉर्डसाठी ठेवून घ्यावी.'' मिस्टर किर्लिस्करांनी काही पेपर्स क्षितिजकडे दिले. क्षितिजपुढे काहीही पर्याय नव्हता. तो उठून तिथे आला आणि त्याने ते पेपर्स स्वीकारले. बाजूला भूमी उभी होती.

 

 

 

 

''अभिनंदन मिस भूमी किर्लोस्कर.'' म्हणत त्याने तिच्या हातात हात मिळवला. त्या दोघांची नजरा नजर झाली. क्षितीजने खुनशी पनाने भूमीकडे बघत टशन दिले होते. ती अगदी नॉर्मल होती. आधी जशी असायची तशीच.

 

 

.''थँक्स पार्टनर.'' म्हणत ती खुर्चीवर बसली. मिटिंग आटोपली होती. मिस्टर किर्लोस्कर भूमीला सगळं कारभार सोपवून घरी निघून गेले. बाकीच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून भूमी तिथून निघाली आणि आपल्या केबिनमध्ये आली.'

 

 

 

 

'मे आय कम इन?'' भूमी आतमध्ये येऊन बसते नाही तोपर्यंत क्षितिज तिच्या मागोमाग तिच्या केबिनमध्ये आला होता.

 

 

 

 

''माझ्या केबिन मध्ये यायला परमिशन लागत नाही. येऊ शकता सर.'' भूमी मुद्दामच सर या शब्दावर जोर देत म्हणाली.

 

 

 

 

''ओह, माझ्या केबिनमध्ये यायला परमिशन लागते ना , सो सवय झाले.'' क्षितीज

 

 

 

 

''उद्या पासून ती हि नाही लागणार.'' भूमी

 

 

 

 

''व्हॉट डू यू मिन?'' क्षितीज

 

 

 

 

''लिव्ह इट. उद्या समजेल. काहीतरी महत्वाचं काम असेल ना? त्याशिवाय इथे आलायस.  बोला. '' भूमी

 

 

 

 

''ते किर्लोस्कर आणि तू ... तुमचं नातं, ते लंडनला जाण्याआधी तुला माहित झालं असेल ना?'' क्षितीज

 

 

 

 

''होय.'' भूमी

''तू प्रत्येक गोष्ट माझ्यापासून लपवलीस? मला अंधारात ठेवल. का? का केलंस हे सगळं कशासाठी?'' क्षितीज चिडून तिच्या अगदी जवळ आला होता. ती उठून त्याच्या समोर उभी राहिली. आणि त्याच्याकडे फक्त्त बघत राहिली.

''मी काय विचारतोय? आणि तू बघतेस काय? दूर हो आधी.'' क्षितीज

ती त्याच्या अजून जवळ येत म्हणाली. ''पहिली गोष्ट तू माझ्या केबिनमध्ये आला आहेस. ते हि न बोलावता. आणि दुसरी गोष्ट कि, समोरची खुर्ची सोडून माझ्या खुर्चीजवळ येऊन वर मलाच सांगतोस, दूर जा म्हणूं.'' भूमी

''मुद्दाम करतेस ना हे सगळं. मला त्रास द्यायला.'' क्षितीज तिच्या दंडाला पकडत म्हणाला.

'' तुला एक ह्ग करुस वाटतंय रे. करू?'' तिने त्याच्या गळ्याभोवती हात ठेवून त्याची कॉलर नीट केली. आणि टाय हात पकडत त्याच्याकडे पहिले.

''हे ऑफिस आहे, नो मोअर पर्सनल डिस्कशन इन ऑफिस.'' क्षितीज तिच्या हातून आपली टाय सोडवून पार्ट त्याच्या खुर्चीवर येऊन बसला.

''इझॅक्टली... हेच तुझ्या प्रश्नच उत्तर आहे.'' भूमी

''म्हणजे?''क्षितिज

''मी आणि माझे नव्याने उत्पन्न झालेले बाबा, माझं लंडनला जाण आणि इतर पर्सनल गोष्टी इथे कंपमानीमध्ये विचारायच्या नाहीत. इथे आपण काम करायला येतो, सो पर्सनल डिक्सशन बाहेर करायचं.'' म्हणत तिने आपल्या समोरील पेपर्सचा गठ्ठा घेऊन तो चेक करायला सुरुवात केली. क्षितीज तिच्याकडे बघतच बसला.  त्याचीच ट्रिक वापरून तिने त्याला अंतर्मुख केले होते.

''संध्याकाळी भेटणार?'' क्षितीज

''ते सुद्धा कंपनी बाहेर गेल्यावर विचार. बाहेरच उत्तर देईन.'' भूमी वरती न बघता म्हणाली.

''सात वाजता भेट. काइट्स माउंटन.''  क्षितीज

''आज तिथे बारवाल्यानी लॉक लावलंय का?'' भूमी

''सात ला चालेल. आठ नंतर तिथे अजिबात जात जाऊ नकोस. माझ्या गाडीची काच फोडण्यात मला आजिबात इंटरेस्ट नाही.'' क्षितीज

''सातला नाही जमणार. काम आहे.''भूमी

''काम झालं कि ये, केव्हाही. लोकेशन पाठवतो. मग तर झालं?'' क्षितीज पुन्हा चिडून तिच्या जवळ येत म्हणाला.

''बघते, जमल तर.'' भूमी त्याला चिडवत म्हणाली.

''तू येणार आहेस. दॅट्स इट. बाय.'' म्हणत तो मागे वळून बाहेर जाऊ लागला. लगेच भूमीने उठून मागून त्याचा हात पकडला होता.

अजूनही कालच बँडेज तसच होत. ''डॉक्टर कडे का नाही गेलास?'' भूमी

''हे पण पर्सनल डिस्कशन झालं ना. बाहेर बोलूया.'' क्षितीज गालात हसत तिला म्हणाला.

''मी नाही येणार. तू जा एकटाच बस.'' भूमी नाक फुगवून म्हणाली.

''तू जिथे असशील ना तिथून उचलून घेऊन जाईन.'' क्षितीज तिच्या कानात येऊन हळूच म्हणाला आणि सरळ दार ढकलून बाहेर निघून गेला.

******

क्षितीज बाहेर निघून गेला आणि वेदांत भूमीच्या केबिन मध्ये आला. मुखर्जी निघून गेल्यापासून त्याची डाळ शिवजत नव्हती. त्यात क्षितीज मुख्य पदावर बसला होता. क्षितीज आणि भूमीच्या बिघडलेल्या रिलेशनच्या बातम्या त्याला माहित होत्या. त्यामुळे संधी साधून भूमीला इम्प्रेस करावे असे ठरवून ती तिथे आला.

''हाय भूमी. आय मिन भूमी मॅम.'' वेदांत

''हाय, बस ना.'' भूमी

''अभिनंदन.'' वेदांत

''थँक्स. कसा आहेस? आणि बाकी काय स्पेशल चाललं आहे?'' भूमी

''मी मजेत. कोर्लोस्कर सर आणि तू आय मिन तुम्ही.. तुमचं मुलगी वडिलांच नातं आहे. हे समजल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटल. मला पण.'' वेदांत

''येस, आय नो. बट इट्स ट्र्यु.'' भूमी

''मैथिली मॅम कशा आहेत? काही रिकव्हरी आहे का?'' वेदांत

''जर काही चेंजेस नाहीत. पण ठीक म्हणायचं..'' भूमी

''ओह, गुड.'' वेदांत

खरतर त्याला क्षितीज बद्दल आणि तिच्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा होती पण ती जेव्हड्यास तेवढे उत्तर देते हे पाहिल्यावर तो शांत बसला तोपर्यंत बाहेरून एक शिपाई आत आला होता. ''मॅम स्टाफ मेम्बर तुम्हाला भेटायचं म्हणत आहेत. जस्ट इंट्रो म्हणून... पाठवू का?'' शिपाई

''येस, प्लिज.'' भूमी

''ओके, मी निघतो. बाय.'' म्हणत वेदांत केबिन बाहेर निघाला आणि बाकीच्या स्टाफ बरोबर भूमी इंट्रो मध्ये बिझी झाली.

*****

भूमीच्या जॉइनिंग ची बातमी मेघाताईना समजली होती. पुन्हा क्षितीज आणि तिची भेट अटळ होती हे त्यांच्या लक्षात आले. आणि भूमी आता कंपनीच्या मुख्य पदावर असणार आहे हे समजल्यावर त्यांचा पारा चढला. कंपनीतील संबंधित लोकांशी संपर्क करून त्यांनी विचारपूस चालू केली. भूमीला कंपनीतूल काढून टाकण्यासाठी काही करता येण्यासारखे आहे का हे पहिले. पण ते आता शक्य नव्हते. आता ती कंपनीमध्ये कोणाच्याही हाताखाली काम करत नव्हती. कि कोणालाही रिपोर्टींग करत नव्हती. ती आता तिथे बॉस होती. 

 

उलट भूमी किर्लोस्करांची मुलगी आहे हे कळल्यावर मेघाताईंना जून आश्चर्य वाटले. किर्लोस्करांची मुलगी म्हणजे ती मैथिलीची सावत्र बहीण होती. मैथिलीमुळे त्यांची अर्धी कंपनी किर्लोस्करांच्या हातात आयतीच गेली होती. नंतर तिने क्षितिजला फसवले आणि आत तिची बहीण म्हणजे भूमी क्षितिजला फसवणार असे त्यांना वाटत होते. 

 

या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी उद्या पासून ऑफिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 

 

*****

 

भूमीने कंपनी जॉईन केली हे नीलने निधीला सांगितले होते. भूमी का उगाचच क्षितिजच्या विरोधात जात आहे ? हे तिला विचारण्यासाठी निधीने भूमीला फोन केला. 

''हाय, भूमी मॅडम. कशी आहेस?" निधी 

 

''ए मॅडम काय म्हणतेस ग? मी मस्त, ती कशी आहे?'' भूमी 

 

''मी पण मस्त, सध्या SK ग्रुप ची मॅडम आहेस. म्हणून मॅडम म्हंटल.  पण काय ग, का असे जाणून बुजून क्षितिजच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतेस?'' निधी 

 

''म्हणजे तुला पण असच वाटतंय कि मी त्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करते?'' भूमी 

 

''सध्याच चित्र तेच दाखवत आहे ना.'' निधी 

 

''मी त्याच्या बरोबरीने राहण्याचं ठरवलंय. त्याच्या विरोधात नाही तर त्याच्या जोडीने. पार्टनर म्हणून. कंपनीला क्षितीज एकटा हॅण्डल करतोय, पण त्याला नाही जमत. तो फक्त कंपनीच्या हिताचा विचार करतोय, कामगार हिताचं काय? त्यासहिच मी बाबांची ऑफ़िर स्वीकारली आणि इथे जॉईन झाले.'' भूमी 

 

''ते ठीक आहे ग. पण त्यामुळे क्षितिजचा राग अजून वाढेल ना. तुमच्या नात्यामध्ये तणाव निर्माण झालेत त्यामध्ये नाहक वाढ कशाला करतेस?''निधी 

 

''तुला माहित आहे, मी त्याला सगळं खरं सांगायला तयार आहे, पण तो काहीही ऐकून घेत नाही. उलट त्याने मला कंपनीत यायला परवानगी दिली नाही. त्याच्या घरी जाऊन फायदा झाला नाही. त्याने त्याच्या वैयक्तिक जीवनातून जवळजवळ वजा केली. हे आमच्या दोघांमध्ये जे डिस्टन्स वाढत चाललंय ना. ते संपवण्यासाठी मला सतत त्याच्या समोर किंवा जवळ राहणं गरजेचं आहे. कंपनीमध्ये जॉईन केल्यावर आता मला ते शक्य आहे. नाहीतर तो मला त्याच्या जवळपासही फिरकू देत नव्हता.'' भूमी 

 

''पण तिथे तुमचे काही मतभेद झाले तर? कंपनीचे शत्रू त्याचा फायदा घेतील.'' निधी 

 

''नाही होणार. मी त्याच्याच ट्रेकने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. लवकरच सगळं सुरळीत होईल. आणि क्षितीज अजूनही मायावर प्रेम करतो. फक्त रुसवा आह. तोही जाईल. बघशील तू.'' भूमी 

 

''गुड. मला आवडेल तुम्हा दोघांना एकत्र बघायला. काळजी घे. बाय .'' निधी 

 

''गुड डे हनी. बाय.'' भूमी 

 

 

 

रेट करा आणि टिप्पणी द्या

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 8 महिना पूर्वी

Geetanjali Kavitake

Geetanjali Kavitake 1 वर्ष पूर्वी

Priya

Priya 1 वर्ष पूर्वी

very nice story