‘भूमी पार्टी हॉलमध्ये पोहोचली तेव्हा डान्स फ्लोअरवर सगळे कपल डान्स करण्यात मग्न होते. मस्त धुंद असे डेकोरेशन, लाइट्स आणि फुलांच्या मला नि हॉल सजवण्यात आला होता.
' सायलेंट म्युझिक ची धून वाजत होती.
हमको मिली हैं आज, ये घड़ियाँ नसीब से
जी भर के देख लीजिये हमको क़रीब से
फिर आपके नसीब में ये बात हो न हो.
फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो.
लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो.
लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो.
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो.
लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो.
या गाण्यावर निधी आणि नीलने रोमँटिक अंदाजात एकमेकांच्या हातात हात घालून ताल धरला होता. सगळीकडे आपली नजर फिरवत,भूमी समोरच्या आसनावर बसून त्यांना बघत राहिली.’
'तिला क्षितिज आपल्या जवळ असल्याचा भास होत होता. कुठेतरी उभा राहून तो आपल्याकडे बघतोय, असे तिला वाटत होते. लग जा गले कि... च्या सुरुवातीच्या धून वर ती क्षितीज आणि तिच्या भूतकाळात गेली. त्याच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिला आठवत होता. अगदी काळ परवाच घडून गेल्यासारखे वाटत होते. त्याच्या शिवाय आपल्या जाण्याला अर्थच नाहीय, असे वाटून तिचे डोळे भरून आले. कोणी पाहू नये म्हणून तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. हाताच्या मुठी आवळून तिने स्वतःच्या भावना होल्ड करण्याचा प्रयत्न केला. हळूच डोळे उघडून तिने आजूबाजूला पहिले. समोरून कोणीतरी एक तरुण तिच्या दिशेने चालत आला होता. 'डान्स प्लिज.' म्हणत त्याने आपला हात तिच्या समोर धरला. कोण तो? ना ओळख ना पाळख. असेल निधीच्या नात्यातील. पण त्याच्या सोबत डान्स करण्याची तिची अजिबात इच्छा होईना. 'सॉरी.'म्हणत ती तिथून उठली आणि निधीने डान्स करता करता तिला पहिले. दुरूनच हात करून दोहींनी एकमेकींना हाय केले. 'तू कंटिन्यू कर, नंतर भेटू.' असे इशाऱ्याने सांगून भूमी तिथून बाहेर आली.’
‘हॉल बाहेरच्या छोट्या गार्डनमध्ये एका खुर्चीवर बसून तिने क्षितिजला मेसेज सेंट केला. 'कुठे आहेस?' त्याने वाचला तर ठीक, नाहीतर काय करू शकते. ती त्याच्या मेसेजच्या रिप्लायच्या प्रतीक्षेत तिथेच बसून राहिली. काहीही प्रतिसाद आला नव्हता. डोळ्यातून खळणारा एक अश्रू लगेच आपल्या रुमालाने टिपले. यापेक्षा जास्त वेळ तिथे थांबणे तिला शक्य नव्हते. कदाचित तिला रडू कोसळले असेल. जे थांबवता येणे तिला शक्य नव्हते. 'मी निघते. एन्जॉय कर. भेटू नंतर.' असा मेसेज करून ती उठली. आणि तिचा मेसेज बॉक्स वाजला. क्षितिजचा मेसेज होता. 'कुठे म्हणजे? अजूनही तिथेच आहे. तुझ्या हृदयात...' मेसेज वाचुन ती खुश झाली आणि वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने मागच्या दिशेने मस्त सुगंधित वास तिला आला. BVL ब्रँड चा तो पर्फ्युमचा वास होता, तिने क्षणात ओळखले. आणि खुश होऊन मागे वळून पाहिले.
क्षितीज तिच्या मागेच उभा होता. तिच्याकडे एकटक बघत. तिच्या उडणाऱ्या पदराचे एक टोक त्याच्या हातात होते. ते तिच्याबोवती गुंडाळत तो तिच्या जवळ आला. ''अशी रेड हॉट साडी घालून एकटीच उभी आहेस. ते हि अंधारात.'' क्षितीज
''सहज, कंटाळा आला होता म्हणून इथे आले. तू आला आहेस?'' भूमी
''हो, तू बोलावलं होतस, आलो.'' क्षितीज
''मी? आय मिन निधीने तुला तसं सांगितलं का?" भूमी
''होय, ती जास्तच फोर्स करत होती. मी इथे यावं म्हणून. सो मला डाऊट आला. तिला क्लिअर विचारलं, तेव्हा ती म्हणाली भूमीने रिक्वेस्ट केली आहे, तिला भेटायचं आहे, ये.'' क्षितीज
''ओह, तू भेटायचं म्हणत होतास, पण मला काल येता आलं नाही. सॉरी.'' भूमी खाली बघत म्हणाली. बोलताना ती कमालीची नर्व्हस असल्याचे स्पष्ट दिसत होते.
''आता नाना कसे आहेत? काही सुधारणा?'' क्षितीज
''निधीने सांगितलं का?'' भूमी
''होय. म्हणून इथे आलो. खरतर मला वेळ नव्हता. बट इट्स ओके.'' क्षितीज तिच्या उतरलेल्या चेहेऱ्याकडे बघत म्हणाला. ती उगाचच आपल्या हातातील रुमालाशी चला करत इकडे तिकडे बघत तशीच उभी होती. काय बोलावं? आणि कुठून सुरुवात करावी? तिला कळेनासे झाले.
''काहीतरी बोलणार होतीस?'' क्षितीज
''कुठून सुरुवात करू? आणि काय काय सांगू काहीच समजत नाहीये. आणि इथे पार्टी आहे, अशा ठिकाणी मला तुला काहीच सांगता येणार नाही.'' भूमी
''मी नक्की काय समजू? माझं महत्वाचं काम सोडून मी इथे आलोय, आणि तू...? तुझा हाच प्रॉब्लेम आहे, ऐन वेळेस पलटी खायची. मी पुन्हा तुला संधी नाही देणार. आत्ताच सांगतोय.'' क्षितीज खूप रागवला होता. ते बघून भूमीला काय करावे सुचेना. ती तशीच स्तब्ध त्याच्याकडे बघत उभी राहिली. आपले कां पकडून ती फक्त ''सॉरी'' एवढेच म्हणाली. आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
ते पाहून तिचे दोन्ही हात खाली करत क्षितिजने तिला मिठीत घेतले.''भूमी रडू नकोस प्लिज, शांत हो आधी. आणि एवढ्या सुंदर मुलीला मी रडवतोय असे इथे कोणी पहिले ना तर मारतील मला. त्यातआतमध्ये पार्टीमध्ये तुझ्यासोबत डान्स करायला खूपजण उत्सुक आहेत.'' क्षितीज तिच्या गालावर आलेले केस कानामागे सारत म्हणाला.
''म्हणजे तू तेव्हा तिथेच होतास?'' भूमी आपले डोळे पुसत म्हणाली.
''तेव्हा नाही. तू किर्लोस्करांच्या घरातून निघाल्यापासून मी तुझ्या मागे आहे. ते डोळे बंद करून मला आठवत होतीस ना, तेव्हा पण मी तुझ्या मागे होतो.'' क्षितीज
''का?'' भूमी
''तू पार्टीला येणार म्हणजे स्पेशल असणार. तूच स्पेशल आहेस म्हणा. आणि अशी तयार होऊन आलीस तर मला सिक्युरिटी द्यायलाच पाहिजे ना.'' क्षितीज तिच्याकडे बघत म्हणाला.
''काही पण असत तुझं.'' भूमी
''काही पण नाही. जे आहे तेच सांगतोय, या साडीत सुंदर दिसतेस. अगदी माझी नजर हटत नाही.'' क्षितीज तिला जवळ ओढत म्हणाला.
''तू मला माफ केलास?'' भूमी त्याच्या गालाला हलकेच हात लावत विचारत होती.
''नाही. पण आपण आता त्या विषयावर न बोललेलं बरं नाही का? उगाच मूड का खराब करून घ्यायचा.'' क्षितीज
''आय लव्ह यु.'' भूमी
''नो, यु डोन्ट. माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून तर एवढं सगळं होऊनही मी तुझ्या सोबत आहे. दुसरा कोणीही असता ना तर .... जाऊदे आता काय बोलायचं.तुम्हा बहिणींना सवय असावी बहुदा एखाद्याच्या विश्वासाचा गैरफायदा घायची. '' क्षितीज
''प्लिज असं म्हणून नको. आणि मैथिली बद्दल तर नकोच नको. ती खोटी केव्हाच नव्हती. नाहीये. ती फक्त बाबांचं ऐकायची आणि तसच वागायची. स्वतःच डोकं लावेल असत तर आज या अवस्थेत नसती.'' भूमी
''कशी आहे ती? तब्ब्येत ?'' क्षितीज
''काही दिवसांची सोबती आहे.'' बोलताना भूमीचा कंठ दाटून आला होता.
''ओह. सो सॅड.'' क्षितीज
''तुझ्या बाबानी माझ्याविरुद्ध शास्त्र म्हणून तुला त्यांच्या जागी उभं केलाय ना?'' क्षितीज
''नाही. त्यांना माहित आहे मी तुझ्या अगेन्स केव्हाच जाऊ शकत नाही. पण त्यांना कंपनीतील आमचे शेअर्स सोडायचे नाहीत. आणि कंपनीपण. त्यांना आता हे सगळं जमत नाही. म्हणून मला जॉईन करायला सांगितल '' क्षितीज
''आणि तू होकार दिलासा.'' क्षितीज
''फक्त तुला भेटता यावं, तुझ्या जवळ राहावं या एकमेव हेतूने मी हो तयार झाले. नाहीतर तू मस्त मागे पुढे दोन-दोन गाड्या घेऊन सिक्युरिटी सोबत फिरतोस. असा बाहेर भेटला असतास का मला? कोणाला जवळ फिरकू हि देत नाहीस. मग आपण भेटलो नाही तर एकमेकांपासून अजून दूर गेलो असतो.'' भूमी डोळे पुसत बोलत होती.
''तुला त्रास झाला ना. सॉरी तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला अजिबात नाही चालणार. तुला माहित आहे, या मधल्या काळात माझ्यावर दोन वेळा हल्ला झालाय. म्हणून ती सिक्युरिटी ठेवावी लागते. आणि भेटायचं म्हणशील तर तू इथे रिटर्न आलीस ना त्या दिवशी पासून मी अस्वस्थ आहे. तुझ्यावर राग सुद्धा आहे. आणि प्रेम सुद्धा. न राहवून मीच तुला भेटायला आलो असतो.'' क्षितीज तिच्या डोक्यावर आपलं डोकं टेकवत म्हणाला.
''तू कंपनीमध्ये असं का वागतोस? सगळे लोक घाबरतात तुला. नुसता राग राग आणि बॉसिगिरि करत असतोस. लोक कामासाठी येतात, त्यांना पैश्यची गरज असते आणि आपल्याला त्यांच्या कामाची. आपन त्यांच्यावर काय उपकार करत नाही. तू असं तडकाफडकी वागत जाऊ नकोस.'' भूमी
''सॉरी बाबा. आता तू काय लेक्चर सुरु करतेस का? आत चल, निधीला भेटूया, ती काय म्हणेल? '' क्षितीज
''होय, पण तू माफ केलास ना मला?'' भूमी
''नाही. अजून नाही. नंतर बघून ठरवेन.'' क्षितीज
''बघून म्हणजे? तू काय माझी परीक्षा वेगैरे घेणारेस का?'' भूमी
''आता एक किस घेतो, मग परीक्षेचं बघू. तयार राहा.'' म्हणत त्याने तिच्या गालावर हलकेच किस केले आणि ती गोडं लाजली, आता हातात हात घालून ते दोघे आतमध्ये पार्टी हॉल कडे निघाले.
*****
निधी अजूनही निल सोबत डान्स करत होती.क्षितीज आणि भूमी ते हि एकत्र तिथे आलेले पाहून तिला फारच आनंद झाला. तिने क्षितिजला वरती डान्स करण्यासाठी बोलावले आणि भूमीला घेऊन तो स्टेजवर गेला.
'ना है ये पाना
ना खोना ही है
तेरा ना होना जाने
क्यूँ होना ही है
तुमसे ही दिन होता है
सुरमई शाम आती
तुमसे ही, तुमसे ही.'
हे गाणं सुरु झालं होत,.
क्रमश
https://siddhic.blogspot.com/