यशस्वी होण्यापासून रोखते 'ही' विचारसरणी शिना ब्लूपॅड द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

यशस्वी होण्यापासून रोखते 'ही' विचारसरणी

अपयश येण्याचं मुख्य कारण काय असतं? काही जण म्हणतील अपुरे प्रयत्न, आळशीपणा, धाडस न करण्याची वृत्ती आणि असं बरंच काही. ही सगळी जरी अपयशी होण्याची अगदीच योग्य उत्तरे असली तरी त्यातील सगळ्यात मोठं कारण म्हणजे मोठी स्वप्न न पाहण्याची सवय.

अनेक जण असे असतात जे जेवढं काही मिळालं आहे त्यामध्ये सुखी, समाधानी असतात. जेवढं मिळालं आहे त्यात समाधानी असणं ही आपण चांगली बाब मानत असलो तरी हीच गोष्ट आपली प्रगती रोखून धरण्यासाठी कारणीभूत ठरणारी असते.

मुळातच सामान्य माणसांची स्वप्न, इच्छा, आकांक्षा या अगदीच सामन्य असतात. एक स्वतःचं घर, गाडी, हसतं खेळतं कुटुंब, पोटापुरतं अन्न आणि गरजेपुरते पैसे हे सर्वधारणपणे सामान्य माणसाचं स्वप्न असतं. या साठीच तो केवळ दिवसरात्रच नाही तर आपलं अख्खं आयुष्य झटत असतो. अर्थात प्रत्येकाची सुखाची आणि समाधानाची व्याख्या ही वेगवेगळी असली तरी थोडक्यात समाधान मानणारी विचारसरणी मात्र चुकीची आहे. या विचारसरणीला केंद्रभूत मानून जगणारी माणसं आपल्या आयुष्यात आपण अजून खूप काही करू शकतो, मिळवू शकतो याचा विचारच करत नाहीत. समोर असलेली संधी देखील त्यांच्यासाठी दिसेनाशी होते आणि अशी संकुचित वृत्ती ठेवून जगणे खूप कंटाळवाणे ठरू शकते.

तुम्हाला अपयश येणं, स्वप्न न पाहणं ही सामान्यता नसून तुम्ही कोणतीच गोष्ट करण्याचे धाडस दाखवत नाहीत ही आहे. मध्यमवर्गीय बनून राहण्यात गैर काहीच नसले तरी श्रीमंत होण्याचा साधा विचारही तुम्हाला शिवू नये ही खरी शोकांतिका आहे. पोटापुरतं मिळालं बास झालं ही विचारसरणी अयोग्य नसली तरी अडीअडचणीच्या वेळी पोटापेक्षा जास्तच लागतं आणि हे सत्य नाकारता देखील येत नाही. बुद्धीचे एवढे चांगले वरदान लाभले असताना तुम्ही केवळ आपल्या पोटापुरता विचार करत असाल तरमोठ्या स्वप्नांना तुम्ही मुकत आहात.

या अशा चौकटीत जखडून ठेवणाऱ्या विचारापासून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या गरजांपेक्षा अधिक गोष्टींचा विचार करा. हावरेपणा काहीतरी करून दाखवायचं आहे या गोष्टीसाठी ठेवा. ‘गरजेपुरतं बास झालं’ ही एक मानसिक धारणा आहे जी तुम्हालाच अधिक आळशी आणि सुस्त बनवेल. त्यामुळे लवकरात लवकर यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न चालू ठेवा.

जो पर्यंत तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या सामन्य, समाधानी असायच्या व्याख्येतून बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुमची स्थिती जैसे थेच राहील. स्वतःसाठी जगण्याच्या ज्या परिसीमा तुम्ही ठरवल्या असतील त्या कधीतरी ओलांडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करा. ते एक वेगळे जग अनुभवा. जितके जास्त अनुभव तुम्ही गाठीशी बांधत जाल तुम्हाला तुमचा वेगळा मार्ग सापडेल. यासाठी फक्त चौफेर विचारसरणी ठेवण्याची गरज आहे. जगातील अनेक यशस्वी व्यक्तींची उदाहरणे तुम्ही पाहिली, मग त्यात मुकेश अंबानी, मार्क झुकेरबर्ग, एलोन मस्क ह्या व्यक्ती यशस्वी, श्रीमंत होऊनही काही ना काही करण्यासाठी सतत झटत असतात. त्यांना एकाच गोष्टीवर समाधानी राहणे आवडत नाही आणि हेच खरे यशस्वी किंबहुना यश मिळवण्यासाठी भुकेले असणाऱ्या माणसाचे लक्षण आहे. होता होईल तेवढ्या लवकर ही मानसिकता मिटवा आणि नेहमीच गरजेपेक्षा अधिक गोष्टी मिळवण्यासाठी तुमचे प्रयत्न चालू ठेवा.

पुढे वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.bluepad.in/article/