आंतरिक प्रेरणा जागृत कशी ठेवायची? शिना ब्लूपॅड द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आंतरिक प्रेरणा जागृत कशी ठेवायची?

प्रेरणा माणसाचं आयुष्य, त्याचं जगणं सुंदर करते. त्याच्या इच्छांना, प्रयत्नांना बळकटी देण्याचं काम प्रेरणा करते. पण अजूनही अनेकांना हे प्रेरणा नामक रसायन नक्की काय आहे, हे माहितीच नसतं. तर आजच्या या लेखात आपण आंतरिक प्रेरणा नक्की काय असते आणि ती तुमच्या जीवनात कसा बदल घडवून आणू शकते याविषयी जाणून घेऊ.
काहीतरी करायचं आहे, या त्वेषाने आपण पेटून उठतो तेव्हा आपल्या आतमध्ये चालू असणाऱ्या गोष्टींची ताकदही खूप असते. कधीतरी हार मानून एका जागी सगळं काही सोडून आपण उदास बसतो तेव्हा कोणीतरी येतं आणि आपल्याला प्रेरणा देऊन जातं. प्रेरणा या दोन प्रकारच्या असतात एक आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा.

आंतरिक प्रेरणा ही आपल्या वैयक्तिक इच्छाशक्तीची निगडित असते. त्यातून घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्यावर अवलंबून असतात. तिथे कोणाच्याही इच्छेचा, मताचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा प्रभाव पडताना दिसत नाही. पण तेच बाह्य प्रेरणा ही संपूर्णपणे समोरच्या व्यक्तीवर निर्भर असते. थोडक्यात समोरची व्यक्ती आपल्याकडून हवी तशी कामे करवून घेऊ शकते.

समजा तुमच्या ऑफिसमधील बॉसने तुम्हाला तू खूप काम कर म्हणजे तुझे प्रमोशन होईल असे सांगितले तर साहजिकच तुम्ही खूप काम कराल कारण तुम्हाला प्रमोशन हवे असेल. म्हणजेच ही झाली बाह्य प्रेरणा. बरं, खूप काम करून सुद्धा जर तुम्हाला प्रमोशन मिळाले नाही तर तुमचा हिरमोड होईल, तुम्ही दुःखी व्हाल. ही तुमची अवस्था संपूर्णपणे इतरांवर अवलंबून असेल. दुसऱ्यांच्या कृतीचा परिणाम हा तुमच्यावर होईल.

हेच जर तुमची आंतरिक प्रेरणा खूप उत्तम असेल तर तुम्हाला या गोष्टीने फारसा फरक पडणार नाही. यावेळेस प्रमोशन मिळाले नाही म्हणून सगळं अवसान गळून बसण्यापेक्षा तुम्ही अजून प्रयत्न करण्यासाठी सरसावाल. मेहनत कराल. जिद्द, चिकाटी यांची पराकाष्ठा कराल. थोडक्यात काय तर आपण स्वतः प्रेरणादायी असणं महतत्वाचं आहे.

रोजच्या आयुष्यात मात्र गोष्टी या उलट्या घडताना दिसतात. बऱ्याच जणांची प्रेरणा इतरांवर अवलंबून असते. तेव्हा आपण असे का होत असेल, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. इतरांचा एवढा प्रभाव आपल्यावर का पडत असावा? यासाठी एक उदाहरण पाहू. दोन मित्र असतात. त्यातला एक मित्र म्हणतो चल, आईस्क्रीम खाऊ. त्यावर दुसरा मित्र म्हणतो त्यात हनिकारक पदार्थ पोटॅशियम सायनाईड असतं. म्हणून ते दोघंही आईस्क्रीम खात नाहीत. एके दिवशी सहजच त्यातला एक मित्र ज्याला आईस्क्रीम खाऊ नको, असं सांगण्यात आलेलं असतं तो एका कार्यक्रमात गेला आणि तिथे आईस्क्रीम होतं.

त्याचे इतरही मित्र तिथे होते त्या सगळ्यांनी आईस्क्रीम घेतलं आणि यालाही सांगितलं. पण याने तेच कारण देऊन ते खायचं टाळलं. त्यावर एकाने विचारलं, हे तुला कोणी सांगितलं? त्यावर तो म्हणाला माझ्या मित्राने. ‘तुझा तो मित्र एवढा विश्वासू आणि प्रामाणिक आहे की तू लगेच त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला?’ त्यावर हा म्हणाला, ‘नाही, तो माझ्याशी एक दोन वेळेस खोटं बोलला होता.’ ‘मग तरी तू त्यावर कसा विश्वास ठेवला?’

या प्रश्नाने तो काहीसा गोंधळला. थोडक्यात काय तर त्याने आपल्या डोक्यात हे पक्केच करून टाकले होते की जे काही मित्र म्हणेल ते बरोबरच असेल. मग भलेही तो खोटे बोलो अगर खरे. ती गोष्ट पडताळून पहावी असेही त्याला वाटले नाही. म्हणजेच त्याची आंतरिक प्रेरणा एवढी मजबूत होती की याचा परिणाम बाह्य प्रेरणेवर देखील दिसून आला. कारण त्याने त्याच्या कृतीने ते आइस्क्रीम खाण्यास सक्त नकार दिला. जे आपण मनात, डोक्यात पक्के करून टाकतो ती आंतरिक प्रेरणा बाह्य प्रेरणेवर परिणाम करत असेल तर याचा उपयोग चांगल्या कामासाठी करून घ्यायला हवा. उदा, वाईट सवयींचे व्यसन सोडण्यासाठी, चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी.

प्रेरणा तुमच्या मनाला, बुद्धीला आकार देत असते. या प्रेरणेची ताकद एवढी मोठी आहे की ज्या प्रकारच्या सूचना तुम्ही तुमच्या मेंदूला द्याल त्याप्रमाणेच गोष्टी घडतील. समजा तुम्हाला सिगारेट ओढायची आहे पण तुमच्या मेंदूला माहिती आहे की, सिगारेट ओढणे वाईट आहे. तर तुमच्यातील आंतरिक प्रेरणा जागृत होऊन मेंदूला सिगारेट न ओढण्याची सूचना देईल. त्यामुळे तुमचा हात सिगारेटपर्यंत जाणारच नाही. तुम्ही पूर्णपणे तुमच्या आंतरिक प्रेरणेच्या नियंत्रणात असाल. तेव्हा या बाह्य आणि आंतरिक प्रेरणेचे महत्व लक्षात घ्या. स्वतःच्या आंतरिक इच्छा ऐका. आंतरिक प्रेरणा सदैव जागृत ठेवा आणि ज्यावेळी गरज असेल तेव्हा प्रेरणेच्या मदतीने प्रत्येक अडचणींवर मात करा.

पुढे वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.bluepad.in/article