दोन दिवसांनी निंबाळकर परिवार जयपुर जाण्यासाठी निघाले... पहाटेची फ्लाईट असल्याने सगळे लवकर उठले होते... रिद्धी त्यांना बाय करायला उठली होती...
" रिधु काळजी घे बाळा... आम्ही उद्या परत येऊ तरी देखील..." मंजिरी
" आई तु नको काळजी करुस... मी घेईल स्वत:ची काळजी आता लहान नाही आहे मी... " रिद्धी त्यांना मिठी मारत बोलते...
" तु कितीही मोठी हो... आमच्यासाठी लहानच आहे.." यशवंत तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलले...
" आई - बाबा निघूया... बच्चा काळजी घे स्वतःची आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ नको थांबूस नाही तर मी नाही म्हणून कामं करत बसशील..." विराज
" हो दादू... मी घेईल स्वतःची काळजी आणि लवकर घरी येईल..." रिद्धी
" रिधु बाळा..." रोहिणी पुढे बोलत असतात कि रिद्धी त्यांना थांबवते...
" एक मिनिट.... वहिनी... भाई...." रिद्धी रुचिका आणि अंकितला आवाज देते... तिचा आवाज ऐकून दोघे हॉल मध्ये येतात....
" काय झालं..." अंकित
" काही नाही... मला तुम्हांला काही तरी सांगायच आहे..." रिद्धी
" काय सांगायच आहे..." रुची
" हेच कि मी स्वत:ची काळजी घेईल... जास्त वेळ ऑफिस आणि अकॅडेमी मध्ये थांबणार नाही... रात्री वेळेवर जेवण करेल आणि सर्वात महत्वाचं तुम्हांला माझी काळजी वाटणार् मी कितीही बोलले तरी म्हणून रात्री सगळी गँग रात्री इथे रहायला येणार आहे...", रिद्धी सर्वांनां एकत्र सांगते... तिच्या बोलण्यावर सगळ्यना हसू येत...
" बर निघूया... पुन्हा फॉर्मलीटीला लेट होईल..." विराज
" बाय... आणि पोहचल्यावर मला कॉल नाही तर मेसेज करा..." रिद्धी बाय करते... कार निघाल्यानंतर डोअर बंद करुन रिद्धी रूममध्ये येऊन झोपली...
अलार्मच्या आवाजाने रिद्धीला जाग आली.... अलार्म बंद करून ती फ्रेश व्ह्यायला गेली... त्यानंतर ती जीममध्ये निघून गेली.... जीम करून आल्यानंतर पटकन बाथ घेऊन ऑफिससाठी रेडी झाली... बॅग आणि डिझाइनची फाईल घेऊन ती खाली आली....
रमाने तिच्यासाठी ब्रेकफास्ट रेडी केला होता...
" ताई तुमचा नाश्ता इथे सोफ्यावर देऊ कि टेबलवर येतात..." रमा
" इथेच द्या काकू..." रिद्धी डिझाइन बॅगेत ठेवत सांगते... रमाने तिला नाश्ता तिथेच आणून दिला... तिने पटकन सँडविच आणि ज्युस संपवला.... बाहेर ड्राइव्हर गाडी तयार करून थांबला होता... रिद्धी आल्यानंतर त्यांनी गाडी काढली....
काही वेळात रिद्धीचा मोबाईल वाजला... वंशचा व्हिडिओ कॉल होता... ऱिद्धी समोर वंशला पाहुन त्याच्यात हरवते...
" गुड मॉर्निंग...." वंश
" गुड मॉर्निंग...." रिद्धी
"ऑफिसला निघालीस..." वंश
" हो... तुम्ही झालात रेडी..." रिद्धी
" हो... आत्ताच ब्रेकफास्ट करून आलोय..." वंश
" आई - बाबांना भेटला तुम्ही..." रिद्धी
" नाही अजून... त्यांची सगळी व्यवस्था दुसऱ्या पॅलेसला केली आहे..." वंश
" अच्छा... मग ते कधी येणार इकडे..." रिद्धी
" सकाळी दिनकरजी जाऊन सगळी व्यवस्था बघून आले आहेत... सगळे संध्याकाळी येतील तेव्हा मुहूर्त आहे..." वंश
" दादू बोलला मला ते रात्री परत निघणार आहेत..." रिद्धी
" हो... दुपारचा मुहूर्त निघाला होता... पण सकाळी पंडितजी आरतीला आले होते तेव्हा त्यांनी मुहूर्त संध्याकाळचा केला...." वंश
" ठीक आहे ना... आजी साहेबांची श्रद्धा आहे..." रिद्धी
" ह्म्म्म... तुम्ही ब्रेकफास्ट केला.." वंश
" हो... तुम्ही तेव्हा दिनकरजी बोलले ते कोण..." रिद्धी
" जसा मॅक्स आमचा PA आणि बॉडीगार्ड आहे... तसे दिनकरजी जयपुर मध्ये आमची सुरक्षा आणि व्यवस्था बघतात..." वंश
" ओह्ह्ह... तुम्हांला तर सगळीकडे बॉडीगार्डस आहेत..." रिद्धी
" काय करणार... आमची ख्याती तशी आहे..." वंश
" बर... मी नंतर कॉल करू.. ऑफिसला आले आहे..." रिद्धी
" ok... take care yourself...& don't skip lunch...." वंश
" OK Boss.... " रिद्धी
" Bye.... I Love You... " वंश
" I Love you 2... Bye... " रिद्धी कॉल कट करून ऑफिसला येते....
............................
...........................................
" बॉस ती आत्ताच ऑफीसला आली आहे...." पहिली व्यक्ती
" लक्ष ठेवा तिच्यावर... आज कामं झालच पाहिजे..." दुसरी व्यक्ती
" ठीक आहे बॉस..." पहिली व्यक्ती
गेले दोन दिवस हि व्यक्ती रिद्धीचा पाठलाग करत होती... तिच्या प्रत्येक मुव्हवर त्यांच लक्ष होत... आणि आज ते त्यांच कामं करणार होते...
......................
......................................
स्थळ :- जयपूर
आज सकाळ पासून पॅलेसवर घाई गडबड सुरु होती... पूर्ण पॅलेस सजवला गेला होता... ठिक ठिकाणी फुलांची सजावट केली गेली होती.... पॅलेसचे हेड जयंतजी जातीने सगळीकडे लक्ष देत होते...
" जयंतजी झाली का सर्व तयारी... कशाची कमी पडता कामा नये... पंडितजींनी सांगितलेल्या सर्व वस्तू आल्या..." अर्पिता
" हो राणी साहेब सर्व तयारी झाली आहे.... आणि सर्व वस्तू देखील आल्या आहेत... तुम्ही काळजी नका करू..." जयंत
" ठीक आहे..." अर्पिता आत किचनकडे गेल्या...
" छाया स्वयंपाकात काहीच कमी नाही पडली पाहिजे... सगळे पदार्थ बनले गेले पाहिजे.... राजमातांना नाराज होण्याच कारण देऊ नका..." अर्पिता
" हो राणी साहेब... तुम्ही काही काळजी करु नका... सर्व जेवण उत्तम आणि वेळेत होईल..." छाया
" ठीक आहे... पटपट हात चालवा..." अर्पिता बाहेर निघून जातात...
...............
...............................
रिद्धी संध्याकाळी अकॅडेमीला जाण्यासाठी निघते... गाडीत बसल्यावर निघणार तितक्यात ड्राइव्हरला कॉल येतो...
" बर... मी ताईंना सोडून येतो..." संतोष
"..........." ........
" हो आलो.... तोपर्यंत तु औषध दे...." संतोष बोलून कॉल कट करतो....
" काय झालं दादा..." रिद्धी
" काही नाही ताई... मुलीला ताप आला आहे... तर दवाखान्यात घेऊन जायच आहे..." संतोष गाडी चालू करत बोलतो
" थांबवा गाडी.... तुम्ही घरी जाऊन आधी तिला हॉस्पिटल घेऊन जा... मी जाईल..." रिद्धी
" पण ताई.." संतोष
" दादा... नका काळजी करू... मी जाईल तुम्ही जा बर..." रिद्धी खाली उतरून स्वतः ड्रायव्हिंग सीटला बसते... आणि अकॅडेमीला निघते.... अर्धा - एक तास अकॅडेमी मध्ये घालवून रिद्धी घरी निघते....
रात्र अशी नाही पण अंधार पडला होता... बाहेर मुसळधार पाऊस पडत होता... रिद्धी अकॅडेमी मधून बाहेर पडल्या पासून ती गाडी तिचा पाठलाग करत होती... तिला देखील ते जाणवल पण तिने दुर्लक्ष केलं...
रिद्धीचा मोबाईला वाजला तस तिने ब्लूटूथ ऑन केलं...
" रिधु कुठे आहेस..." तनु
" अग अकॅडेमी मधुन निघाले आहे... अजून एक तास लागेल.... ट्रॅफिक आहे थोडं..." रिद्धी तनु सोबत बोलत ड्राईव्ह करत होती....
" मी येताना पार्सल आणते... OK... " तनु
" ए नको... आपण घरीच काही तरी करू..." रिद्धी
" नाही नको... मस्त वेळ मिळाला आहे तर मस्त गप्पा मारू... मी पार्सल आणते..." तनु
रिद्धीने टूर्न घेतला.... पावसाने समोरच निटस दिसत नव्हतं.... ड्राइव्ह करत असताना तिला समोर काही आल्यासारख काही वाटलं म्हणून तिने ब्रेक मारायला घेतला... तर ब्रेक लागतं नव्हता...
" ओह्ह नो...😯😯" रिद्धी
" रिधु काय झालं..." तनु
" नाही... नाही काही नाही..." रिद्धी गाडीवर कंट्रोल ठेवत कशीबशी बोलली... एका टर्नवर समोरून एक ट्रक भरधाव वेगाने आला... रिद्धीला काही कळण्याअगोदर रिद्धीच्या कार ला धडक बसते..." धाडsssssssss.... " अक्सिडेंन्ट एवढा मोठा होता कि कान बधीर झाले होते... हवेत गोल फिरून कार जोरात खाली आदळली...
आलेल्या आवाजाने तनुला देखील काही कळत नव्हतं...
" हॅलो.... हॅलो रिधु.... रिधु..." तनु रडकुंडीला आली होती...
" काय झालं असेल... रक्ष... रक्ष..." तनूने पटकन रक्षला कॉल केला... आणि सर्व सांगितल.... ट्रॅफिक मुळे वंशच्या गार्डची कार मागे अडकली होती...
ऑक्सिडेंट स्पॉटवर अपघात बघून बरीच गर्दी झाली होती... रक्ष जवळच असल्याने लवकर तिथे पोहचला... रिद्धीला बघून तो सुन्न झाला होता... भानावर येत त्याने तिला पटकन गाडीत टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन आला....
निंबाळकरचे हॉस्पिटल असल्याने रिद्धीला बघून नर्सने लगेच डॉक्टरांना इम्फोर्म केलं... तोपर्यंत वॉर्डबॉय तिला ऑपेरेशन थेटर मध्ये घेऊन गेले...
घरी फोन करावा म्हणून त्याने फोन काढला... पण त्याला सर्व तिलक साठी गेल्याच आठवलं... शेवटी त्याने तनूला कॉल करून सर्व सांगितल.... काही वेळात सर्व गँग हॉस्पिटल आली... थेटर बाहेर सर्व वेड्यासारखे फेऱ्या मारत होते....
रिद्धीच्या एक्सिडेंटची न्युज मॅक्स पर्यंत देखील पोहचली होती.... त्यामुळे तो देखील घाईत हॉस्पिटल पोहचला...
" कशा आहेत रिद्धी..." मॅक्स
" डॉक्टर ऑपरेटर करत आहेत..." आदी
" तुम्ही त्यांच्या फॅमिलीला कळवल..." मॅक्स
" सगळे जयपुर गेले आहेत... आता जर त्यांना समजलं तर ते लगेंच निघतील..." संजू
" पण मला वंशला सांगाव लागेल... त्याला नंतर कळाल तर त्याला खूप राग येईल..." मॅक्स
.......................
.....................................
जयपुर मध्ये संध्याकाळी निंबाळकर परिवार पॅलेसवर आले... जयंतजींनी सर्व आल्याच कळवल....
सर्वांच अगत्याने स्वागत करण्यात आलं.... अर्पिता सर्व महिलांना घेऊन खाजगी महालात घेऊन गेल्या... संजना सोबत सर्वांची ओळख करून दिली... त्यांचे राहणीमान , उठण्या बसण्याची पद्धत सर्वांत रॉयल्टी दिसून येत होती...
निंबाळकरांना आत्ताच काळ्जी वाटू लागली कि रिद्धी तिथे कशी ऍडजस्ट करू शकेल का...?
त्यांच्या चहा नाश्त्याची व्यवस्था केली गेली.... पंडितजींनी सर्व तयारी करून ठेवली होती... मुहूर्त झाल्यावर त्यांनी सर्वांना बोलावल.... त्यानंतर विधी सुरु झाले....

धरा रिद्धीला दाखवण्यासाठी फोटो क्लिक करत होती.... यशवंत पंडितजी सांगतील ते करत होते... सर्व विधी व्यवस्थित पार पडतात....
रस्म पूर्ण झाल्यानंतर सर्वांना स्वीट दिलं जातं... धरा मोबाईल चेक करत होती... तेव्हा तिला नोटिफिकेशन आली... रिद्धीच नावं बघून तिने नोटिफिकेशन ओपन केली...
" कोरिओग्राफर आणि फॅशन आयकॉन असलेल्या रिद्धी निंबाळकर यांच्या गाडीचा अपघात.... लाईफलाईन हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे...."
न्युज वाचून तिच्या हातातला मोबाईल निसटला... तिला चेहरा निर्विकार झाला होता... तिच्या शेजारी अंतरा बसली होती...
" धरा मोबाईल पडला तुमचा लक्ष कुठे आहे..." अंतरा तिच्याकडे बघते तर धराचे डोळे पाणावले होते...
" धरा... धरा काय झालं... तुम्ही रडताय का..." अंतरा तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलते...
" काय झालं अंतरा... धरा तुम्ही रडताय का..." अर्पिता अंतराचा आवाज ऐकून बोलतात...
" भाई....भाई..." धरा भानावर येत पळत मुख्य महालात जाते... तिच्या मागे बाकी महिला देखील जातात...
" भाई... भाई...वहिनी... " धरा वंश जाऊन रडायला लागते...
" धरा काय झालं... तुम्ही रडताय का...तुम्ही आधी शांत व्हा... हे पाणी घ्या..." वंश तिला शांत करत तिच्या समोर ग्लास धरतो...
" आम्हांला पाणी नकोय... भाई न्यूज मध्ये काय सांगताय..." धरा उसासे टाकत बोलते... अंतरा लगेंच धराचा मोबाईल चेक करते... न्युज बघून ती सुद्धा घाबरते...
" कोणत्या न्यूज... थांबा... दिनकरजी न्यूज लावा..." वंश दिनकरला बोलतात...
" वहिनींच्या गाडीचा एक्सिडेंट झालाय..." अंतरा मोबाईल बघत बोलते...
तोपर्यंत टीव्ही ऑन होतो... न्युज चॅनेल वर तीच न्युज सुरु होती... न्युज बघून तर मंजिरीचा तोल गेला... यशवंत देखील मटकन खाली बसले...
" ताई अहो सांभाळा स्वतःला काही नाही होणार रिद्धींना..." अर्पिता मंजिरींना आधार देऊन सोफ्यावर बसवतात...
" मंजिरी यशवंतजी काही नाही होणार त्यांना.." राजमाता...
तेव्हाच विराज आणि वंशचा मोबाईल वाजतो... विराज पटकन कॉल रिसिव्ह करतो...
" रक्ष न्यूज मध्ये काय दाखवलं जाताय... रिधु ठीक आहे ना ..." विराज
" दादू रिधुचा एक्सिडेंट झालाय... डॉक्टर तिला ऑपरेटर करतायत...." रक्ष
" आम्ही निघतो लगेंच... तोपर्यंत तुम्ही सर्व कळवत राहा... आम्ही लवकर यायच बघतो..." विराज बोलून कॉल कट करतो...
..............
....................
" what is this max.... " वंश
" वंश रिद्धींच्या गाडीला ट्रकने धडक दिली आहे... त्यांना ऑपरेशन थेटर मध्ये नेलं आहे..." मॅक्स त्याला एक्सिडेंट कसा झाला ते सर्व सांगतो... इतक्यात एक नर्स बाहेर येते...
" नर्स रिद्धी कशी आहे... काही सिरीयस नाही ना..." आदी
" हे इंजेकशन अर्जेन्ट हवे आहेत.. Excuse me... " नर्स निघून गेली... संजू आणि आदी लगेंच फार्मासिस्ट कडे पळाले...
" मी मुंबई पोहचण्याआधी तो ट्रक ड्रायव्हर सापडला पाहिजे... tell me every second detail..." वंश
" OK... " मॅक्सने कॉल केला...
" जयंतजी माझ चॉपर रेडी हवय.... सोबत अजून एक चॉपर रेडी करा..." वंश बोलून लगेच रूममध्ये गेला...
पाच मिनिटात वंश चेंज करून आला.... निंबाळकर आधीच त्यांच्या पॅलेसवर गेले होते....
" भाई आम्ही पण येतो..." धरा
" नाही धरा तुम्ही इथेच थांबा... उद्या नाही तर परवा या..", वंश तिला समजावून सांगतो
" भाई आम्हांला त्यांना बघायच आहे... मला घेऊन चला ना प्लीज... 🥺🥺🥺" धरा
" ठीक आहे चला... निघूया... " वंश
" वंश... आम्हांला कळवत राहा... आम्ही उद्या येतो.." मनीष
" हो.. तुम्ही नका काळजी करू... येतो आम्ही..." वंश बोलून निघतो.... त्याच्यासोबत धरा आणि समर होते... काही वेळात ते चॉपर जवळ पोहचतात... आधीच आले होते...
वंश दाखवत नसला तरी आतून तो खूप घाबरला होता... त्याच्यासमोरुन रिद्धीसोबतचे सर्व मूव्हमेंट पळत होते...
दोन तासात सर्वजण मुंबई पोहचले... मॅक्सने आधीच कार पाठवल्या होत्या... गाड्यांचा ताफा हॉस्पिटलच्या दिशेने निघाला.... हॉस्पिटल बाहेर बरीच मीडिया जमली होती... गाड्या आल्याबरोबर गार्डसने त्यांना कव्हर केल.... आणि सगळे आत गेले...
" जस कि तुम्ही बघू शकतात आताच रिद्धी निंबाळकर यांची फॅमिली येथे पोहचली आहे... पण या फॅमिली बरोबर प्रसिद्ध उद्योगपती वंश राज पुरोहित देखील आले आहे... जे कि काही तास अगोदर जयपुर मध्ये होते.... त्यांच्या तात्काळ येण्याचे कारण काय असेल... " रिपोर्टर
सगळे आत आल्याबरोबर थेटर कडे पळाले...
" रक्ष आदी कशी आहे रिधु... डॉक्टर काय बोलले..." यशवंत
" काका अजून पण ऑपरेशन सुरु आहे... डॉक्टर अजून बाहेर आले नाही आहे... नर्सला विचारल तर त्या बोलतात डॉक्टर बोलतील..." रक्ष
वंशच लक्ष थेटरच्या लाईट वर होत... थोड्या वेळात लाईट बंद होते... तसा तो डोअर जवळ जातो... डॉक्टर बाहेर येतात...
" डॉक्टर रिधु कशी आहे..." विराजच्या बोलण्यावर डॉक्टर काहीच बोलत नाही... म्हणून सगळ्यांना टेन्शन येत..
" काय झालं आशिष डॉक्टर काय ते स्पष्ट बोल..." मंजिरी
" मॅम ऑपेरेशन सक्सेसफुल झालं आहे... but she is not responding to the medicine...." आशिषच्या बोलण्यावर सगळे शॉक बसतात... मंजिरी खचल्या होत्या... रोहिणी आणि रुचिका त्यांना सांभाळत होत्या...
" ती अजून शुद्धीवर आलेली नाही आहे... त्यामुळे सिच्युएशन क्रिटिकल आहे... मी खोटं नाही सांगणार पण हे 24 तास तिच्यासाठी महत्वाचे आहेत... तिला आता ICU मध्ये शिफ्ट करू..." आशिष
" excuse me... " डॉक्टर निघून जातात... तिथल्या कोणाला काय बोलाव काही कळतं नव्हतं...
काही वेळात रिद्धीला ICU मध्ये शिफ्ट केलं जात...

excuse me... पेशंट सोबत कोणीतरी एकच व्यक्ती इथे थांबू शकते... बाकीच्यांनी वेटिंग रूम मध्ये थांबा..." नर्स बोलून आत जाते...
यशवंत आणि मंजिरी तिला दरवाज्याच्या गोल काचेतून बघतात... तिला बघून दोघांनाही भरून येत...
वंश तडक तिथुन निघुन वेटिंग रूम मध्ये जातो... त्याच्या मागे मॅक्स आणि बाकिचे जातात....
" ट्रक ड्रायव्हर कुठे आहे... सापडला...." वंश आवाज शांत ठेवत बोलतो...
" आम्ही त्याला शोधतो आहे... सापडेल लवकरच..." रक्ष
" रक्ष मला माहित आहे हि तुमची ड्युटी आहे... पण मला तो माणुस माझ्याकडे हवा आहे... जोपर्यंत तो बोलत नाही त्याला सुटका नाही... नंतर तुला हवं ते तर..." वंश
" ठीक आहे... आम्ही शोध घेतो आहे त्याचा..." रक्ष पोलिस स्टेशनला निघून जातो...
" भाई मला माहीत आहे... तु दाखवत नसला तरी आता तुला काय फील होतय... रिधुला काही नाही होणार... तिचा गणू नेहमी तिच्या सोबत आहे..." सिया त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलते... त्या डोळ्यांत पाणी जमा झालं होत पण त्याने कितीतरी वेळ त्याला रोखून धरलं होत... शेवटी त्यातले थेंब बाहेर पडलेच..
" भाई तु रडतो आहेस... अरे तुच रडलास तर बाकींच्यांना कोण सांभाळेल... तु बघ तुझं प्रेम रिधुला काही नाही होऊ देणार..." सिया
" भाई तु आजपर्यंत कधीच हार मानली नाहिस... मग आज कसा हरू शकतो..." धरा त्याला आधार देते... वंश स्वतःला सावरुन अंकित आणि विराज कडे येतो...
" अंकित तु सगळ्यांना घेऊन घरी जा... तसपण इथे जास्त लोक अलाउड नाही आहेत... मी थांबतो इथे..." वंश
" वंश काका - काकू नाही ऐकणार... " अंकित
" मी समजावतो त्यांना... तोपर्यंत तुम्ही बाकीचे निघा..." वंश बोलून ICU कडे जातो... अंकित , सिया , रोहिणी , रुची आणि समीरला घेऊन निघतो...
वंश ICU समोर येतो.... यशवंत अजूनही काचेतून रिद्धीला बघत होते... मंजिरी तिथल्या बेंचवर बसल्या होत्या... डोळ्यातल पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं...
" बाबा...." वंश यशवंतच्या मागे जाऊन थांबतो... यशवंत त्याच्याकडे बघून पुन्हा समोर बघतात...
" बाबा तुम्ही आणि आई घरी जा... थोड्यावेळ आराम करा..." वंश
" नाही मी थांबतो इथे... मंजिरीला जाऊदे.. " यशवंत
" बाबा मला कळतंय... तुम्हांला काय वाटत आहे ते... पण तुम्ही किती वेळ असं थांबणार आहात... तुम्ही घरी जा.. रिद्धीला शुद्ध आली कि मी तुम्हांला कळवतो.." वंश
" माझ्या रिधूसोबत का असं झालं... ती तर नेहमी सगळ्यांना मदत करते... कधी कोणाच वाईट केलं नाही.. का बोलली नाही... मग का असं झालं... आज तर किती छान दिवस होता तिच्यासाठी आणि आजच हे अस का व्हाव..." यशवंत
" बाबा... तुम्हांला माहीत आहे ना... तुमची मुलगी किती स्ट्रॉंग आहे... मग असं रडताय कशाला... तुम्ही बघा तिला उद्या नक्की शुद्ध येईल...आणि लगेंच रिकव्हर होऊन तीच ऑफिस आणि अकॅडेमी सांभाळेल..." वंश
" पण बाबा जेव्हा शुद्धीवर येईल आणि तुम्हांला असं बघेल तेव्हा तिला कसं वाटेल... म्हणून सांगतोय तुम्ही आता घरी जा... आणि थोडं खाऊन तुमची मेडिसीन घ्या... मी आज इथेच आहे...ह्म्म्म... विराज..." वंश
यशवंत देखील मग घरी जायला तयार होतात... विराज दोघांना घेऊन घरी जातो...
सगळे गेल्यानंतर वंशची नजर काचेतून तिच्यावर जाते... रिद्धी बेडवर निश्चल पडली होती... चेहरा एकदम मलूम पडला होता... हॉस्पिटलचे निळे कपडे , चेहऱ्यावर आणि हातावर जखमा होत्या... श्वसना साठी ऑक्सिजन मास्क लावला होता...
त्याच्यासमोर तिच्या सोबत घालवलेले क्षण येत होते... तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाची रिद्धी त्यानंतर कधी भेट होईल असं वाटल ही नव्हत आणि लग्नात झालेली भेट... त्यांची झालेली धडक , संगीत मध्ये केलेला डान्स , तिची मिठी , तिची स्माइल सगळं चित्र त्याच्या समोर तरळून गेलं... आणि त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले...
" सर तुम्ही आत जाऊ शकता.." नर्स बाहेर येऊन त्याला बोलते आणि निघून जाते... वंश आत येऊन तिच्या शेजारी बसतो...
" प्रिन्सेस... I'm sorry... तुला माझी गरज होती आणि मी इथे नव्हतो... पण मी आता आलो आहे मग डोळे उघड ना... तु मला बोलली होतीस कि कायम माझ्यासोबत राहणार म्हणून मग आता उठ बघू... तुला असं बघून सगळ्यांना त्रास होतोय..." वंश तिचा हात हातात घेऊन बोलतो...
तेव्हा त्याचा फोन वाजतो... वंश काही न बोलता फोन कानाला लावतो...
" वंश ट्रक ड्रायव्हर सापडला आहे... त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होत... दोघांना गार्डने बेसमेंट मध्ये ठेवलं आहे..." मॅक्स
" ह्म्म्म...." वंश बोलून कॉल कट करतो...
" हे सर्व ज्या कोणी केलं आहे त्याला मी सहज सोडणार नाही... हा वंश राज पुरोहित काय चीज आहे हे अजून त्याला माहीत नाही.." वंश रिद्धीचा हात हातात घेऊन मनात विचार करत असतो...
डॉक्टर येऊन एकदा चेक करून जातात.... वंश रात्रभर तिच्या जवळ बसून होता... डोळ्यांत तेल घालून तो रात्रभर जागा होता... पहाटे केव्हातरी त्याला तिथेच झोप लागली....
क्रमशः