गुंजन - भाग २६ Bhavana Sawant द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुंजन - भाग २६

भाग २६.

गुंजनच सेमी फिनाले जवळ असल्याने ती खूपच स्वतः वर मेहनत घेत होती. कारण फिनालेला पोहचण्यासाठी तिला या पायरीवर चांगला परफॉर्मन्स करायचा होता. मगच ती शेवटच्या ठिकाणी पोहचणार होती. या कारणाने ती मेहनत घेत होती. वेद सोबत बोलणे देखील तिचे कमी झाले होते. पण काहीतरी मिळवायच होत तिला ते सुद्धा वेदसाठी त्यामुळे ती मनाची समजूत घालत असायची!!



शेवटी सेमी फिनालेचा दिवस उजाडला. सगळीकडे या शो ची बरीच पब्लिसिटी करण्यात आली होती. महाराष्ट्रीय लोक तर आपली कोणीतरी स्पर्धेत आहे? हे जाणून तो शो पाहत असायचे. त्यात गुंजनने तिच्या डान्सच्या अदांनी बऱ्याच लोकांवर भुरळ पाडली होती. तिची स्टाईल एकदम युनिक असायची. जिथे ही स्पर्धा चालू होती. त्या हॉलच्या बाहेर देखील बरेच तिचे फॅन्स हातात पोस्टर घेऊन बाहेर ओरडत होते. काहीजण तर मंदिर, मशीद, चर्च मध्ये ती जिंकावी म्हणून प्रार्थना करत होते. कसे लोक असतात ना आपले? कधी त्यांनी गुंजनला आसपास पाहिले देखील नव्हते!! हे नाव देखील त्यांना काही दिवसापूर्वीच कळल पण ती कोणी त्यांची लागत नसताना देखील महाराष्ट्राची कन्या आहे ना? यामुळेच सगळ काही तिच्या जिंकण्यासाठी करत होते. रिपोर्ट्स लोक देखील सगळ्यांचे थोडे थोडे बाईट्स टिव्हीवर दाखवत होते. असे प्रत्येक राज्यात चालू होते.

सेमी फिनाले असल्याने गुंजनच्या मनाला थोडीशी धाकधूक लागत होती. तयारी तर तिची झाली होती. पण थोडीफार भीती देखील तिला वाटत होती. संध्याकाळ होताच सर्व स्पर्धक हॉलकडे येतात. ते सर्वजण स्टेजच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या सिटिंग एरियातील सोफ्यावर बसतात. तिथून अँकर जस जस त्यांचं नाव घेत असतात ना? तस तसे ते लोक उठून स्टेजवर डान्स करायला जात असतात. सगळ्यांचे परफॉर्मन्स चांगले होतात. पार्थच देखील कौतुक सगळे जण करतात. पण तो जेव्हा स्पर्धक एरियात येतो ना? तेव्हा ती लोक मात्र त्याचं कौतुक न करता समोर फोकस करतात. कारण पार्थला आधी ते अभिनंदन करायचे, तेव्हा तो काहीसा स्वतः ला हुशार समजून हात मिळवणी न करता आपला गप्प बसून जायचा. यामुळेच ती लोक आता त्याला काय हात मिळवणी करायला जात नाही.


शेवटी गुंजनच नाव येत. तेव्हा मात्र स्पर्धक आपोआप गुंजनला जागा करून बेस्ट ऑफ लक करत असतात. ते पाहून पार्थ मनातच धुसफुसत असतो. पण जे सत्य होत ते सत्य होत. गुंजन जरीही बेस्ट डान्सर असली, तरीही ती त्याच्यासारख गर्वाने वागत नव्हती!!ती सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहत असायची. तिचा स्वभावच असा वेगळा होता की, लोक आपोआप तिच्या आसपास उभी राहत असायची.


"दिल थाम के बैठीये दोस्तों!! अब आ रही डान्सिंग क्वीन मिसेस. गुंजन वेद जाधव। इनका डान्स , साँग तो सरप्राइज हैं!! इसलीये आप खुद्द देखिये। परफॉर्मन्स होने के बाद गुंजन जी आपके लिये सरप्राइज है!! वो हम बाद में बतायेंगे। परफॉर्मन्स के लिये ऑल द बेस्ट!!", अँकर गुंजनकडे पाहत हसूनच म्हणाला. गुंजन मान हलवून त्याला "शुक्रिया" म्हणते आणि हसूनच आपली स्टेप घेऊन उभी राहते. अँकर बाजूला होतो तसा स्टेजवर पूर्ण काळोख निर्माण होतो. फक्त एक रेड रंगाचा लाईटचा फोकस गुंजनवर पडतो. तसे सगळे जण मन लावून स्टेजकडे पाहायला लागतात.


हळूहळू गाणं चालू होते आणि ते गाणं ऐकून तिथं बसलेल्या प्रेक्षक, जजेस लोकांचे चेहरे बदलतात. कारणही तसच होते. ते गाणं होत शंकर महादेवन यांचं ब्रेथलेस साँग होत ते.


कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता था
जैसे मेरी सारी दुनिया मैं गीतों की रुत
और रंगों की बरखा है
खुशबू की आँधी है
महकी हुई सी अब सारी फिज़ायें हैं
बहकी हुई सी अब सारी हवाएँ हैं
खोयी हुई सी अब सारी दिशाएँ हैं
बदली हुई सी अब सारी अदाएँ हैं
जागी उमंगें हैं
धड़क रहा है दिल
साँसों में तूफाँ हैं, होठों पे नगमे हैं
आँखों में सपने हैं,
सपनों में बीते हुए सारे वो सारे लम्हें हैं

गुंजन त्या गाण्याच्या कडव्या प्रमाणे पटपट आपले स्टेप्स चेंज करून चेहऱ्यावर भाव ठेवून आपल कथक फ्युजन मध्ये डान्स करायला लागते.

जब कोई आया था, नज़रों पे छाया था
दिल में समाया था, कैसे मैं बताऊँ तुम्हें
कैसा उसे पाया था,
प्यारे से चेहरे पे बिखरी जो जुल्फें तो ऐसा लगता था
जैसे कोहरे के पीछे इक ओस मैं धुला हुआ फूल खिला है
जैसे बादल में एक चाँद छुपा है और झाँक रहा है
जैसे रात के परदे में एक सवेरा है रोशन-रोशन
आँखों में सपनों का सागर
जिसमें प्रेम सितारों की चादर जैसे झलक रही है लहरों-लहरों बात करे तो जैसे मोती बरसे
जैसे कहीं चांदी की पायल गूंजे
जैसे कहीं शीशे के जाम गिरे और छन से टूटे
जैसे कोई छिप के सितार बजाये
जैसे कोई चांदनी रात में गाए
जैसे कोई हौले से पास बुलाये

गुंजन चेहऱ्यावर लाजण्याचे एक्स्प्रेशन ठेवत हातवारे करत नॉन स्टॉप आपल नृत्य करत असते. ते गाणं एवढ्या फास्ट होत की गुंजनचे बदलणारे एक्स्प्रेशन पाहून जजेस लोक खुर्ची सोडून उठून बसतात. एक जज तर खुश होऊन त्याचं वोटिंग करून टाकतो. तर दुसरा जज देखील फुल वोटिंग देऊन टाकतो.

कैसी मीठी बातें थी वो
कैसी मुलाकातें थी वो
जब मैंने जाना था
नज़रों से कैसे पिघलते हैं दिल
और
आरज़ू पाती है कैसे मंज़िल
और
कैसे उतरता है चाँद जमीन पर
कैसे कभी लगता है स्वर्ग अगर है
तो बस है यहीं पर


उसने बताया मुझे, और समझाया मुझे
हम जो मिले हैं, हमें ऐसे ही मिलना था
गुल जो खिले हैं, उन्हें ऐसे ही खिलना था
जन्मों के बंधन, जन्मों के रिश्ते हैं
जब भी हम जन्मे तो हम यूँ ही मिलते हैं
कानों में मेरे जैसे, शहद से घुलने लगे
ख़्वाबों के दर जैसे आँखों में खुलने लगे
ख़्वाबों की दुनिया भी कितनी हसीं
और
कैसी रंगीन थी ख़्वाबों की दुनिया
जो कहने को थी पर कहीं भी नहीं थी
ख्वाब जो टूटे मेरे, आँख जो खुली मेरी
होश जो आया मुझे
मैंने देखा मैंने जाना
वो जो कभी आया था, नज़रों पे छाया था
दिल में समाया था, जा भी चुका है
और दिल मेरा अब तन्हाँ-तन्हाँ
न तो कोई अरमां है, न कोई तमन्ना है
और न कोई सपना है
अब जो मेरे दिन और अब जो मेरी राते है
उनमें सिर्फ आँसू हैं
उनमें सिफ दर्द की रंज की बातें हैं
और फरियादें हैं
मेरा अब कोई नहीं
मैं हूँ और खोये हुए प्यार की यादें हैं
मैं हूँ और खोये हुए प्यार की यादें हैं
मैं हूँ और खोये हुए प्यार की यादें हैं


आता ती जमिनीवर बसून दुःखी एक्स्प्रेशन ठेवत नृत्य करते. तिला अस पाहून काही वेळ स्टेजवर शांतता निर्माण होते. पुन्हा एकदा कडव चालू होताच ती पुन्हा उभी राहून नृत्य करायला लागते.


डूब गया है दिल ग़म के अँधेरे में
मेरी सारी दुनिया है दर्द के घेरे में
मेरे सारे गीत ढले आहों में
बन के दीवाना अब यहाँ-वहाँ फिरता हूँ
ठोकर खाता हूँ उन राहों में
जहाँ उसे देखा था, जहाँ उसे चाहा था
जहाँ मैं हँसा था और बाद में रोया था
जहाँ उसे पाया था, पा के खोया था
जहाँ कभी फूलों के, कलियों के साए थे
रंगीं-रंगीं महकी रुत ने
हर इक कदम पर रास रचाए थे
गुलशन-गुलशन दिन में उजाले थे
जगमग-जगमग नूर था रातों में, झिलमिल-झिलमिल


गुंजनचा डान्स व्हायच्या आधीच तिच्या मागे चालू असलेली वोटिंग पूर्ण शंभरी पार करते. तसे आपोआप तिचं गाणं चालू असताना वरुनच तिच्या अंगावर वेगवेगळे चमकीदार छोटे छोटे कागद पडायला लागतात. तरीही ती आपला डान्स करत असते.

जब मैंने ख़्वाबों की देखी थी मंज़िल
जहाँ मेरी कश्ती ने पाया था साहिल
जहाँ मैंने पाई थी पलकों की छाँव
जहाँ मेरी बाहों में कल थी किसी की, मरमरी बाहें
जहाँ एक चेहरे से हटती नहीं थी, मेरी निगाहें
जहाँ कल नरमी ही नरमी थी
प्यार ही प्यार था बातों में, हाथ थे हाथों में
जहाँ कल गाये थे प्रेम तराने
जहाँ कल देखे थे सपने सुहाने
किसी को सुनाए थे दिल के फ़साने
जहाँ कल खाई थी जीने की मरने की कसमें
तोड़ी थी दुनिया की सारी रस्में
जहाँ कल बरसा था प्रीत का बादल
जहाँ मैंने थामा था कोई आँचल
जहाँ पहली बार हुआ था मैं पागल
अब उन राहों में कोई नहीं है
अब हैं वो राहें वीराँ-वीराँ
दिल भी है जैसे हैराँ-हैराँ
जाने कहाँ गया मेरे सपनों का मेला
ऐसे ही ख्यालों में खोया-खोया
घूम रहा था मैं कबसे अकेला


चंदा-सितारे जैसा कोई गगन में
गूंजी सदा कोई मन आँगन में
किसी ने पुकारा मुझे, मुड़ के जो देखा मैंने
मिल गया खोया हुआ दिल का सहारा मुझे
जिसे मैंने चाहा था, जिसे मैंने पूजा था
लौट के आया है
थोड़ा शर्मिंदा है, थोड़ा घबराया है
ज़ुल्फें परेशाँ हैं, काँपते होठ और भीगी हुई आँखें हैं
देख रहा है मुझे गुमसुम-गुमसुम
उसकी नज़र जैसे पूछ रही हो
इतना बता दो कहीं खफ़ा तो नहीं तुम
प्यार जो देखा फिर मेरी निगाहों में
आया नहीं कल था वो मेरी इन बाहों में
भूल गया मेरा दिल जैसे हर ग़म
बदल गया जैसे दुनिया का मौसम
झूमे नज़ारे और झूमी फ़िज़ाएँ
और झूमे चमन और झूमी हवाएँ
जैसे फिर कहने लगी सारी दिशाएँ
कितनी हसीं है, कितनी सुहानी
हम दोनों की प्रेम कहानी...

शेवटी गाणं संपताच गुंजन स्टेजवर गुढग्यावर बसते आणि स्टेजला आपली मान टेकवून सर्वांचं धन्यवाद करते. कारण आजचा परफॉर्मन्स संपायच्या आधीच लोकांचे भरपूर प्रेम तिला मिळाले होते. ज्याची अपेक्षा पण तिला नव्हती.एवढ प्रेम तिला मिळालं होत. टाळ्यांचा आवाज चालू असतो. गुंजन मागे न बघता समोर पाहत असते की, तेवढ्यात कोणीतरी मागून येऊन तिच्या डोळ्यांवर हात ठेवत. तशी ती हात दाबत तो हात ओळखण्याचा प्रयत्न करते. जजेस लोक हसूनच तिला पाहत असतात. मग जेव्हा तिला कळत तसे तिचे डोळे पाणावतात. बंद डोळ्यांतून तिच्या ते पाणी त्या हातांना लागताच ती व्यक्ती स्वतः चे हात बाजूला काढते.


"वेदऽऽऽ", अस बोलून मागे वळून रडतच त्याला मिठी मारते. तसा तो देखील हसूनच तिला जवळ घेतो.




क्रमशः
___________________